प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

जरा वेळच आले नाही या धाग्यावर तर कित्ती दागिने आलेत बाप रे!
अनु भारी कलेक्शन माळांचे
अस्मिता सुरेख ज्वेलरी आहे. फोटो टाकच आता Wink
भाग्यश्री साठी माझ्या कडे झब्बू आहे.
IMG_20210925_220803.JPG
गुंटुरमधे घेतला होता,सेट होता तीन रंगांच्या तीन जोड्या,
प्रत्येकाची जोडी हरवली तरी का ठेवलेत हे कानातले माहीत नाही Lol

किल्ले, खरंच ह्या आयाबाया अवतार करतात.छोटी कुयरी भरेल itake haladkunku लावलंय.
अस्मिता,हात किती सुंदर आहेत ग.इनहे कामपे मत लगाये काही मैले न हो जाए.
तुम्ही सर्वजणी हे दागिने वापरून नीटसपणे डब्यात ठेवता,धन्य आहात.

दागिने डबीत भरणेपेक्षा मला ते कानातल्याचे एक हँगर/झाड इ काहीतरी असते ते फार आवडते. देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव, खाऊचं झाड माझ्या अंगणात लाव सारखं वयापरत्वे इयरिंग्जचे झाड माझ्या अंगणात लाव म्हणते....

हो नक्किच
पुरुष मंडळी खूप मागे आहेत
त्यांनीही कफलिंक, भिकबाळी,ब्रेसलेट, ,चेन, घड्याळे आणायला हरकत नाही.

थँक्स मृ:-)IMG_20210925_222620_copy_1600x1053.jpg
ह्या लेटेस्ट साडीपिना

ह्या साडीपीना पदराला लावतात खांद्यावर कि निर्यांना.
मी नाही वापरली कधी (मुळात साडीच खूप कमी नेसते )
मीर्यांना मी क्लीप सारखी असती ती वापरते ज्याने भोकं पडत नाहीत साडीला म्हणून.
रच्याकने ते मिर्या असतात का निर्या..फार कनफ्युज होतं यात नेहमी.

Pages