प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर दागिने आहेत
अमा हे ऱ्हाइनस्टोन आहेत का? सुंदर रंग आहेत.
हा माझा आवडता बुद्धा नेकलेस.
बुद्धा फेस्टीव्या नावाच्या कर्नाटका मधल्या वेबसाईटवर घेतला आहे. सुंदर ज्वेलरी होती तिथे.करोना काळात यांचे दुकान(म्हणजे साईट) बंद पडली Sad
आणि आवडते पॉम पॉम कानातले.
IMG_20210924_184242.jpg

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध |सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध |
त्याच हौसेतून जगद्रूप लेणे |प्राप्त झाले जीवास थोर पुण्य |
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही |असे मूळातचि आज नवी नाही |

- गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या कवितेमधुन

व्वा ! काय सुरेख धागा आहे ! Happy
ह्या धाग्यावर आलं की वामन हरी पेठे किंवा तनिष्क च्या शोरूम मध्ये आल्याचा फील येतो.

सगळे दागिने आणि त्यांच्या मालकीनी एकदम सुरेख!

सामो तुम्ही एकदम फ्रेंच कादंबरीतल्या मुक्त, बंडखोर नायिका वाटत आहात.. खूप कॉन्फिडेंट लूक ! Blush

सामो सॉलिड आहे तुमचं collection... आणि तुम्ही carry पण मस्त करता..
बाकीचे दागिने पण नेत्र सुखद आहेत..

डबल पोस्ट

धन्यवाद सामो , अनू. नाही ग , फक्त कानातलेच आहेत अनू.

सर्व दागिने मस्त मस्त!
गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या कवितेमधुन....तुझी कविता चालीवर म्हणून पाहिली.सेम चाल येते.

सायो, खूपच सुंदर आणि आर्टिस्टिक दागिने. सामो, पांढरे झुमके खासच. इतर सर्व कलेक्शन देखील छान आहे. हे सगळे दागिने कोरोनापूर्व काळात बघितले असते तर मी एव्हाना खरेदीसाठी बाहेर पडले असते

मस्त दागिने.
सायो अमा यांचे स्वतः केलेले तर खूप सुंदर.

IMG-20210925-WA0025.jpg
कोल्हापुरी साज oxidized
आता कुणीतरी नेक्स्टफ़ोटो टाका म्हणजे मलाही आणखी देता येतील Happy

कालबाह्य झाला असला म्हणून काय झालं, माझा पहिल्याच पानावरचा
मृणाली आणि वावे यांच्या मधला दागिना कोणालाच नाही आवडला त्याचे वाईट वाटतंय.

Lol
आधी सापडलाच नाही तुमचा अमूल्य दागिना.मी त्या माळा बघत बसले छोट्या मण्यांच्या आणि कुणीच छान म्हटलं नाही का ते पाहत बसले..
मागच्या वर्षी हस्ताक्षर स्पर्धेत टाकला पण होता तो दागिना Lol

Pages