प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

छानच मृणाली, का हरवलेस ग पण, मला तरी द्यायचेस Lol मी आवडलेले जुने पुराणे कानातले पण वर्षानुवर्षे फार सांभाळून ठेवते Lol

निऱ्या, निरीचे अनेकवचन.
सहसा साडीपीन निर्‍यांना लावतात. गळ्यात माळ इ इतर दागिने नसतील तर ब्रूचसारखी पण वापरता येते.

कसल्या गोड साडी पिना आहेत. हा धागा addictive आहे.
अंबाड्याची फुलं वगैरे आहेत का कुणाकडे , माझी मावशी वापरायची.

ओके अनामिका, सी Happy
काय खास नाही हे कानातले पण तुला टाकायचा म्हणतेस तर टाकते.
IMG_20210925_154513.JPG

2_0.jpg

हा एक खूप जुना सेट आहे. खूप पूर्वी संयुक्ता मध्ये काही दागिन्यांचे फोटो अपलोड केले होते. हा त्यातला एक.

आज जरा वेळ मिळाला इथले दागिने बघायला. खूप सुरेख आहेत सगळेच दागिने

मस्त बांगड्या.
तुला याचा झब्बू टाकला असता पण आता फोटो क्लीकायचा कंटाळा. Wink उद्या टाकेन.

अल्पना सुंदर सेट आहे.

1_0.jpg

हे एक माझे खूप आवडते कडे आहे हल्ली जास्त दागिने घातले जात नाहीत. बरीच वर्षे झाली हे वापरले नाही. पण कोणे एके काळी हे कडे मी रोज घालायचे.

मस्त
मी खरेदीचा काही योग असला की हा धागा बघेन आधी.
बाबांनी जाण्याआधी माझ्यासाठी ठेवलेल्या पैश्यातून नंतर कधीतरी घेतलेलं हे ब्रेसलेट.(हिरे अर्थातच खरे नाहीयेत.)
22102014391.jpg

IMG_20210925_230507.JPG
वरच्या त्या नव्या कोर्या पिवळ्या सेटसाठी हि हिरवी नारायणपेट कॉटन साडी
अनामिका, टाक तुझा फोटो.

मृ तुच गं. :-* हे सिल्व्हर इअररिंग्सचं कलेक्शन
IMG_20210925_225433_copy_722x743.jpg
हे अॅरो स्टाईल
IMG_20210925_230551_copy_566x808.jpg
झुमके
IMG_20210925_230814_copy_683x600.jpg
कॅज्युअल वेअर टाॅप्स
IMG_20210925_230942_copy_657x900.jpg

तुळशीबाग आयटम व घड्याळ दोन्ही मस्तच श्रद्धा, अभिनंदन. Happy
सुंदर कलेक्शन आहे ऑक्सिडाईज चं.>>>+1
साडी अतिशय सुंदर मृ.. फार आवडली.

वाॅव अनु.. मस्त. moreover त्यात भावना आहेत सो अधिक जवळचं... Happy>> +११ हो गं
मृ हा हिरवा रंग भयंकर आवडता आहे.
सगळे दागिने मस्त

माझ्या एका पुतणीने मारवाडी मुलाशी लग्न केलं. लग्न त्यांच्या पद्धतीने होतं म्हणून आम्ही मुलीकडच्या नातेवाईकांनी एकदम मराठमोळा थाट केला होता. .

उजवीकडचा फोटो एका नणंदेचा आहे. अगदी साधी hairstyle केलेली तिने ,. मी मागे लागून , काहीतरी जुगाड करून आयत्यावेळी मोत्याचा सर लावला. डावीकडे मी आहे.
दोन्ही फोटोत आंबाड्यावर खोवलेले pendants आहेत. :).
सगळं imitation :).

IMG_20210926_124203.jpg

Pages