प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

हो ना. म्हणूनच खूप आवडतात. सगळ्यांचेच दागिने मस्त आहेत. एक बँक काढायची का? हवे ते घ्या, घाला आणि परत करा. मनातल्या मनात तर करताच येईल.

सामो, एक फोटो टाकुन दम गेला. Happy
आता संधी मिळाली आहे तर तुम्हा सर्वांना जेम्स शो ची गंमत लिहिते. आम्ही शेवटच्या २ दिवसात गेलो होतो तेव्हा हा खडा दुकानं बंद व्हायच्या आधी केवळ १५ मिनिटे आधी नजरेत पडला व मनात भरला. किंमत ऐकुन घ्यावा की नको यात द्विधा झाले होते तेव्हा तो म्हणाला, ‘तुम्हाला नशिबाने हा खडा दिसतोय. यावर्षी कोविडमुळे चायनातल्या लोकांना इथे येऊ दिले नाहिये, नाहीतर चायनीज लोक पिशव्या भरभरून पैसे घेऊन येतात व पिशव्या भरभरून खरेदी करून सगळा चांगला माल लवकर संपवतात‘’. Happy

अगं मला हे सेमायप्रेशिअस खडे फार फार आवडतात. कसले महाग असतात ते पण. कार्नेलिअन, अ‍ॅमेथिस्ट, लापिझ , गार्नेट, मून स्टोन, टोपाझ काय न काय.
ही ट्रायबल अंगठी मी गराज सेलमधुन १० डॉलरला घेतली. तेव्हा कुठे काय भांडार सापडेल सांगता येत नाही.

https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLXf5HeFvzkAHvGrJYir7PMXxEvg806a6Mfe72V4cOViMrgoe84YC9dPkmdeZIQQBVwdaEJv-1S-OxyTkh599mXzSfvQP22GeS_FXR92L1cfKQGSTP1P7cJIz8riqSR_jHBa0vkE0ssXAZK3Y4uAnns1wQ=w661-h881-no?authuser=0

मस्त दिसताय सगळ्या.
सामो, कॉर्पोरेट वेअर ला मॅच चांगलं केलंय.
मृ,एकदम अभ्यासू वाटतेस.
धनुडी, सुंदर फोटो.
सामो,आपली दोघींची प्लेन कपड्यांची आवड बहुतेक सारखी असावी.

नही नही उमर पचपन कि दिल बचपन का आहे. Wink जाऊ दे मला सोडा, सामोने काय मस्त अंगठी घातली आहे. सुपर.
पार्वती सोन्यात करुन घ्यायची आयडिया मस्त. मला अशा प्रकारचे हुकवाले खुप आवडतात

सगळे अलंकार सुंदर..!!
सामो, मृणाली, धनुडी छान फोटो आहेत तुमचे...

@सामो तुझ्याकडे तर अलिबाबाचा खजिनाच आहे...
धनुडी - तुमच्या लेखनावरून मनात तुमची जी प्रतिमा बनली होती तिला तुमच्या फोटोने छेद दिला... छान फोटो..!

>>>>सामो,आपली दोघींची प्लेन कपड्यांची आवड बहुतेक सारखी असावी
अनु माझ्या साबांना भयानक फाईन सेन्स ऑफ अटायर होता. त्या प्लेन रंगच घालत असत. त्यांच्याकडुन शिकलेले आहे. आणि आता वयापरत्वे प्लेन कपड्यांवरती भर द्यावा का काय असे एकंदर वाटते.

ज्या सर्वांनी कौतुक केलेले आहे त्यांचे आभार.

सामोच्या उत्साहाला खूप मोठी दाद! खूप छान कॅरी करतेस.
पार्वती, मस्त आहेत कानातले ... बदलता येतात हे तर छान!
हो ना. म्हणूनच खूप आवडतात. सगळ्यांचेच दागिने मस्त आहेत. एक बँक काढायची का? हवे ते घ्या, घाला आणि परत करा. >>>>> हे वाक्य स्वगत हवं ना (न जाणो हे माझे कानातले घेऊन गेले अन परत केले नाही तर)
मनातल्या मनात तर करताच येईल. >>>>> हे उतर)ना Happy ह.घ्या
धनुडीबद्द्ल वरच्या कमेंटस ना मम सात्विक सौंदर्य!

हेयरक्लिप
20210922_191114.jpg20210922_191611.jpg

IMG_20210922_222905.jpg
मैत्रिणीने आत्ताच फोटो टाकला , ऑनलाईन खरेदी करण्यासाठी...तो इथे टाकला

फारच सुरेख आहेत सूर्यगंगा, अमुपरी, लावण्या.
सगळे निवांत बघते.
सामो, मृणाली, धनुडी छान फोटो आहेत तुमचे... >>अगदी गोड. धनुडीला बघण्याची इच्छा पूर्ण झाली. गोड आहेस. Happy

सगळेच दागिने सुंदर दागिने...
@ अमुपरी- हेअरक्लीप छान आहेत...
@लावण्या - अतिशय सुंदर सेट आहे.
@ पार्वती - नेकलेसचे पेन्डट आकर्षक आहे...

पार्वती नेकलेस फार आवडला. पांढरे मणी फेव्हरेट आहेत. फटक पांढरे नाही. तुझ्या नेकलेससारखे.
श्रद्धा घड्याळ छान. अभिनंदन.

सगळ्यांचे दागिने सुन्दर ,श्रद्धा अभिनंदन. सगळ्या जणींचे फोटो बघून प्रत्यक्ष भेटल्या सारखच वाटलं अगदी.
अंजू भाची किती गोड दिसतेय

Pages