प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४ - अलंकार/दागिने

Submitted by संयोजक on 14 September, 2021 - 07:35

मायबोली गणेशोत्सव २०२१ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि आजचा विषय आहे अलंकार/दागिने.

अलंकार/दागिने

तुम्हाला तुमच्याकडे असलेली जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा -

Group content visibility: 
Use group defaults

हसू नको हां मॄ सूपात आहेस म्हणुन.
हाहाहा जस्ट किडिंग. बाकी काहीतरी दुखत नाही असा एक दिवस जात नाही. गुडघा, दात, पाठ, डोकं, पाय - सगळे आता निवांत गप्पा मारत अस्तित्वाची जाणिव करुन देतात. Wink

IMG-20210919-WA0003.jpg
पैंजण
बॅकग्राऊंड ला माझं जुनं वॉल्लेट
मस्त फोटो मृ आणि सामो

Ann Klein चे हे मोत्यांचे झुबे. द्राक्षं. अर्थात इमिटेशन. पण अतोनात आवडते. पाहीले आणि वेडी झाले होते इतके नाजूक.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLUOaFyuTprm44hFPvz7ADRZ1aiZYzLW-qjk4nKztSsSwLrXg3fwhRUOJjom_vCuy2FUMVxl1OvQkpVz2scS26oFZ8YvqlITFcEplh3Y2l_4JzEGOz-Dh1g2inLBb_gOy9zRRt6GBFSCTna7bqId5jmyYQ=w1175-h881-no?authuser=0

किल्ली चांदीचे पैंजण /साखळ्या / छुमछुम.
लहानपणी माझ्या मैत्रिणींचे असायचे. तेव्हाही मला आवडत. मधुर आवाज करत.

सामो, किल्ली दोघींचे फोटो गोड आहेत. सामो तुझं कलेक्शन जबरदस्त आहे. आणि तू मस्तच कॅरी करतेस.
मृ तू फोटो काढून टाकलास का गं?

थॅंक्यु सामो. मृ बघितला तुझा फोटो. Happy मला वाटलं काढून च टाकलास. ( मी पण आंधळ्या सारखी फोटो कुठे म्हणून शोधतेय)
गोडच आहे.

हा शेवटचा. अजुन बरेच फोटो व दागिने आहेत. पण आता कंटाळा आलाय.
हे ब्रेसलेट लवकर काळे पडले Sad पण घालायचे तेव्हा फार गोड दिसे.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/AM-JKLW7LcF8Qc-4L1c888UCSOrxwlGB75OfdYh7gWmEYZ7gb4FG6Eghzk1BEFcgk6uUDKUZwg5tcr0JQDEZ4TRqSyFNrMHzZ2MogEtegzb8sK7eov5P8-wEVWL9KlS9t0sCYK4QOCYNGYgKMLudJpXl0Oq2eg=w560-h400-no?authuser=0

नवीन फोटो पण छान. सामो, लगे रहो.

मला आता मोह झाला. आमच्या राज्यात दरवर्षी ‘जेम्स शो‘ असतो. तिथे कोवीडच्या नुकतंच आधी जाऊन आलो व जगाचं लॉकडाऊन झालं. तेव्हा ‘अ‍ॅम्बर’चे २ नग घेतले. बरेच मोठे खडे आहेत. पोलंडचा विक्रेता होता. तरी फोटोत मोठ्या खड्याचे सौन्दर्य टिपले गेले नाहिये. छान पिवळसर सोनेरी आहे.

8E0F003B-0EA1-4926-B0F3-135483AE3F2D.jpeg

सामो हा फोटो मला सगळ्यात आवडला . छान आहे आणी ब्रेसलेट पण खुप गोड आहे.
सुनिधी किती सुंदर आहे सगळे पीस

सामो तुमचं कलेक्शन जबरदस्त आहे. आणि छान कॅरीही करता तुम्ही. खरंच धागा गाजवलात तुम्ही.
मृ, धनुडी तुमचे फोटो पण मस्त.

वॉव काय मस्त आहे सुनिधी.
सामो ब्रेसलेट आवडलच, कानातले पण छान दिसताएत तुला.
अमुपरी थॅंक्यु Happy माऊमैय्या देवरूप थॅंक्यु

सगळ्यांना थँक्यु थँक्यु Happy

सुनिधी, मस्त कलेक्शन!

धनुडी छानै फोटो..

सामो आहेत तेवढे कलेक्शन फोटो टाकाच.
नव्या दमाच्या शिलेदारांनी आता उडी घ्या आणि धागा पुढे न्या Happy>>>>>> येस्स.

>>>>>सामो आहेत तेवढे कलेक्शन फोटो टाकाच.
काही काहींची चमक किंवा सौंदर्य पकडता येत नाहीये.
--------------------
देवरुप सुंदर आहे. खूपच मस्त. कॅटस आय वाटतायत.

A3A2BA68-8637-4E37-88DC-31EC4F32652B.jpeg
हे माझे अगदी लाडके कानातले. आधी असेच पॉलिशवाले घेतले होते पण डिझाइन आवडल्यामुळे सोन्यात करून घेतले. लोलक वेगवेगळ्या रंगाचे बदलता येतात.

Pages