..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

Submitted by मामी on 17 July, 2021 - 12:36

मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा आठवा धागा :
पहिला भाग : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
सातवा भाग : https://www.maayboli.com/node/47162

सातवा भागाचा धागा जरी 9 January, 2014 ला सुरू केला तरी त्या धाग्यावर २०० कोडी पूर्ण व्हायला जुलै २०२१ उजाडलं. आता अनेक नवे खेळाडू आले आहेत आणि खेळात बहार येत आहे. चला आता या आठव्या भागावर नवनवी कोडी घालूया .....

हिंदी गाण्यांची लिस्ट हवी असेल तर ही साईट बघा. मस्त आहे. विविध प्रकारे गाणी शोधायची सोय आहे यावर. https://www.hindigeetmala.net/geetmala/

ही पण एक साईट आहे पण यात सिनेमांवरून गाणी आहेत. http://myswar.co/year

मराठी गाण्यांसाठी https://www.aathavanitli-gani.com/Anukramanika ही साईट छान आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागावर काढायला एक सहज कोडे:
८/९५
एके ठिकाणी अत्यंत स्वादिष्ठ शिरा खाल्ल्यावर त्याने विचारले हा शिरा तुम्ही कसा केला. उत्तर मिळतं की नेहमी सारखाच, फक्त यात एक खास जपानी रवा वापरला आहे, आणि तो एका विशिष्ट ब्रँडचा रवा आहे.

मग तो सुपर मार्केट मध्ये तो घ्यायला जातो. पण तो न दिसल्याने त्या विभागात तो दोन राउंड्स मारतो आणि परत तिसरा राउंड मारायला निघतो तेव्हा तिथला एक कर्मचारी त्याला विचारतो "काय शोधताय? मी मदत करू का?"
तेव्हा त्यावर उत्तर म्हणुन तो हे गाणे म्हणतो.

बरोबर.

८/९६
सव्वीस सिक्रेट एजंट्स मिशन ब्रीफिंगसाठी जमले होते. मॅडम झी ने सर्वांचे स्वागत करून त्यांना मद्याचे चषक दिले आणि 'टू द मदरलॅंड' असे म्हणून सर्वांनी ते एका घोटात रिचवले. थोड्याच वेळात एजंट ए बेशुद्ध पडला. मग एजंट बी, मग एजंट सी, असे करत हळूहळू सगळ्यांची शुद्ध हरपली. ते पाहून मॅडम झी छद्मीपणे हसली कारण ती फितूर होती आणि तिनेच सर्वांच्या पेल्यांत गुंगीचे औषध मिसळले होते. आता सर्वांच्या डोक्यात एक चिप इंप्लॅंट करून तिला शत्रूराष्ट्राला 'मिशन ॲकंप्लिश्ड' चा मेसेज कळवायचा होता म्हणजे त्या सर्वांचे मॉनिटरिंग करणे शक्य झाले असते.
पण एका एजंटला काहीतरी संशय आला होता आणि त्याने ड्रिंक न पिताच ओतून टाकले होते. बराच वेळ ते एकमेकांकडे संशयाने बघत राहिले. मग मॅडम झी गाऊ लागली.

८/९७
एक टकली मुलगी असते. तिला विग लावून तिचं लग्न ठरवतात. पण लग्नानंतर भांडं फुटलं की मग काय, अशी तिला भीती असते. तिची आई म्हणते काही काळजी करू नकोस, लग्न गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर आहे. तोपर्यंत वैद्यांनी दिलेलं हे तेल लाव, म्हणजे तोपर्यंत केस येतील. त्या दोघी रोज रात्री तिच्या डोक्याला तेल फासत आणि सकाळी चेक करत. असं करता करता लग्नाचा दिवस येऊन ठेपला, पण काहीच प्रगती होईना. तेव्हा त्या मुलीने म्हटले...

८/९८
रिचर्ड आणि मोनिका (फ्रेंड्स मधले) डेटवर जाणार असतात. पण त्याच दिवशी डेलाईट सेविंग टाईम सुरू झाला असतो त्या घोळात रिचर्ड एक तास लवकर येतो. इकडे मोनिका तर नुकतीच वामकुक्षीतून उठून डोळे चिवडत बसली असते. तेव्हा ती त्याला म्हणते...

क्लू
१. रिचर्ड आणि मोनिका मध्ये BF-GF शिवाय आणखी कोणते कनेक्शन आहे ते आठवा
२. एक मुलगी डेटवर जाण्याआधी काय करेल- अर्थात मेकप वगैरे

बदल रही है आज ज़िन्दगी की चाल ज़रा
इसी बहाने क्यों ना मैं भी दिल का हाल ज़रा
सवार लूँ, हाय सवार लूँ

माझेमन गुड अटेम्प्ट. पण यात रिचर्ड-मोनिकाचा संबंध येत नाही
(फ्रेंड्स न पाहिलेल्यांसाठी- रिचर्ड तिच्या वडिलांचा मित्र असतो)
८/९८ चे उत्तर
ठाडे रहियो, ओ 'बा के यार' रे, ठाडे रहियो
मैं तो कर आऊं सोला सिंगार रे

हे गाणं असं आहे होय! मी इतके दिवस तौबाके यार म्हणत होतो. #चुकीचीऐकूआलेलीगाणी. अर्थात बरोबर ऐक्लं असतं तरी उत्तर आलं असतं असं नाही. बा के यार - मस्त

८ / ९९

एकदा स्वर्गात देवदेवतांचं फॉर्मल डिनर आयोजित केलेलं असतं. एका छानश्या हॉलमधे सजावट करून टेबलं मांडलेली, फुलांचं डेकोरेशन, मेणबत्त्यांचा प्रकाश ... एकदम सुरेख वातावरण असतं. एक एक देव येत असतात आणि त्यांची वेशभुषा ड्रेसकोडप्रमाणे आहे ना, हे तपासून एक यक्ष त्यांना जेवणाच्या हॉलमधे सोडत असतो. त्याचं कामच असतं की कोणाच्या ड्रेसमध्ये काही कमी असेल तर तेवढी डागडुजी करून ड्रेसकोडप्रमाणे त्यांना तयार करूनच आत सोडायचं.

इंद्रदेव येतात. त्यांच्या सुटावर गुलाब खोचलेला नसतो मग यक्ष त्यांना थांबवून गुलाब लावून देतो आणि मगच आत सोडतो. आत जाण्याआधी इंद्रदेव यक्षाला सांगतात की मागून यममहाराज येताहेत. आणि मग यक्षाच्या कानात हळूच कुजबुजतात की यममहाराजांचा ड्रेसकोड काही पूर्ण नाही कारण त्यांनी अमुकअमुक धारण केलं नाहीये. "आहे का तुझी हिंमत त्यांना थांबवायची?"

यावर यक्ष एक गाणं म्हणून उत्तर देतो.......

(गाण्याचा एक अंतरा. त्यातील पहिल्या तीन ओळी)

यम्मा यम्मा
पण अंतऱ्यामधल्या ओळी म्हटल्यावर खोडलं.

ओके.

हिंट : अमुकअमुकच्या जागी योग्य शब्द मिळाला की गाणं लगेच यावं. यमराज काय धारण करायला विसरले असतील बरं? आणि यमराजच का? ...... हम्म कोणत्या भाषेतलं गाणं असेल बरं ज्यात प्रत्यक्ष यमराजांचा उल्लेख आहे?

मुळात यमाची शस्त्रं - आभूषणं काय असतात?
पर्ची, भाला, गदा..?
Happy

बहुधा...हे कुणाच्या लक्षात नसावे...मुळात अर्धमेलं.. (अथवा पूर्ण मेलं) झाल्यावरच त्याची - आपली भेट होणार! तेव्हा काय पाहणार!

Pages