खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओये होये, मस्त फोटो आहे मृणाली
कुरमुरे अगदी सुटेसुटे बघून मनातल्या सार्‍या शंका वारल्या

Lol
मलाही वाटलं भिजल्यावर काय होईल मुरमुर्यांचं.संध्याकाळच्या हलक्या फुलक्या नाष्ट्यासाठी मस्त पदार्थ आहे.

PSX_20210627_072113.jpg
ई. च. सां. Happy हल्ली इथे शेवग्याच्या शेंगा छान मिळतायेत. ते घालून सांबार मस्त लागले.

मका भेळ मस्त कलरफुल दिसतेय. डाळींबाचे दाणे आहेत वाटते. कॉम्बिनेशन कसे लागेल ईमॅजिन करतोय Happy

ईडली सांबारही छान. शेवग्याच्या शेंगा नसतील तर सांबार करूच नये Happy

IMG_20210627_211448_0.jpg

. उकडीचे मोदक बनवायचा कंटाळा.हेबरच्या पद्धतीने राईस पेढ्यांची तयारी केली.
मग पेढे न बनवता मोदक बनवले.

ओह आज संकष्टी होती. तरीच आज रविवार असून आमच्या घरच्यांनी वेज खाल्ले. जर एवढे छान ऊकडीचे मोदक बनवले असते तर मी सुद्धा खाल्ले असते Happy

थॅन्क्यु रुपाली.
अमु , मावा पेढ्यासारखे नक्कीच नाही लागत . Happy . गोड उकडीसारखे लागतात . बरेचसे उकडीच्या मोदकासारखे पण गूळाची खमंग चव नाही .
२१ मोदक आणि ५ पेढे केलेले नैवेद्याला .
मला आणि माझ्या लेकाला फार आवडले . अर्घ्यापेक्शा जास्त आम्ही दोघांनीच संपवले.
साबा आणि त्यांचा लेक फक्त ताटात वाढलेले दोन-दोन खाउन शांत राहिले .

IMG-20210620-WA0015[1].jpg
खांडवो (मेथी, गाजर , बीट, बेसन)

वा .. सगळे पदार्थ मस्तच.
शिरखुर्मा आणि खांडवो छान दिसत आहे. पण हांडवो असतो ना?
ओके स्वस्ती मी पण करुन बघेन थोडे.
रव्या चे लाडु.20210628_162053.jpg

जून मधील होमवर्क
>>>
खतरनाक.. हॉटेल टाका.. चार प्लेट खेकडाभजीची पहिली ऑर्डर माझी Happy

शाही छोले डाळ कशी केली सांगाल का ? >> छोले रात्रभर भिजवून नंतर उकडून घेतले. मग मिक्सर मधे पेस्ट करून घेतली.
कलोंजी १ चमचा आणि कांदा तेलात रंग बदलेपर्यंत परतला मग आले लसून पेस्ट, २ तमालपत्र, लवंगा, मिरी (प्रत्येकी ६-७), वेलची २-३ , १ इंच दालचिनी तुकडा, त्याच्यात परतल्यावर मग हळद, लाल तिखट (चवीप्रमाणे), मसाला, जिरे, धने पावडर एक एक चमचा, थोडा हिंग परत थोड परतल. मग छोले पेस्ट आणि तीन कप पाणी, चवी प्रमाणे मीठ मिसळून १० मिनिट उकळी काढली. त्याच्यात नारळाचे दूध आणि क्रीम अर्धा अर्धा कप टाकून पुन्हा उकळले. मग क्रीम आणि कोथिंबीरीने सजवले.
तज्ञ मंडळींनी १०० मार्क दिले. Happy
झी झेस्ट वर टर्बन तडका मधे दोन दिवसांपूर्वी पाहिली.

मका भेळ मस्त कलरफुल दिसतेय. डाळींबाचे दाणे आहेत वाटते. कॉम्बिनेशन कसे लागेल ईमॅजिन करतोय >>>धन्यवाद . डाळींबदाणेच आहेत पण हे काॅम्बिनेशन तितकसं चांगलं नाही लागलं. नेहमीच्या चुरमुरे भेळीत घालते म्हणून यात पण घालून बघितले.
ते मोदक ,कांदाभजी, रवालाडू, शिरखुर्मा मला पाहिजेत.

Pages