खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोक्स....लोक्स लोक्स थांबा जरा दमानं. ......घकादि वरुन डावी बाजु
१. आंब्याचा रस (केसर) आणी वर साजुक तुप,
२. रसोई (तिखट रस्सा) त्यात गव्हाच्या डुबुकवड्या (भातावर जे छोटे छोटे गोळे दिसताय ते)
३. भज्या.. मिरची, पालक, कांदा, आणी नुसत्या मिरच्या नी बटाट्याचे छोटे तुकडे एकत्र करुन
४. पापड...उडीद, चिकनीचे (शाळु/लाल ज्वारी आणी मिक्स), रंगीत कुर्डाया गहु-तांदळाचे पापड आणी तांदळाचे.
५. पुरण-पोळी वरुन साजुक तुप
६. भात आणी त्यावर क्रं. २ मधली रसोई. ( डुबुकवड्या म्हणजे गव्हाचे पीठ थोडे सैलसर भिजवुन रस्स्यात त्या छोटे छोटे गोळे करुन सोडायच्यानी शिजु द्यायच्या)

अरे हो सर्व प्रेमळ लोकांना मनापासुन धन्यवाद. प्रत्येकाला सेपरेट उत्तरनी धन्यवाद देवु शकलो नाही.

अरे वाह! मस्त मिरची,पालक,कांदा आणि बटाटा भजी. आता संध्याकाळी बनवावेच लागतील चहा बरोबर. असही पाऊस पडत असतो इथे.

इतके जिन्नस बनवायला किती वेळ लागला?

इतके जिन्नस बनवायला किती वेळ लागला?
सियोना साधारण ४ ते ८:३० पर्यतच प्रोजेक्ट वर्क होतं..
(हे तर हम पांच सारखं झालं......आं...मत कहो नां)

बापरे 4:30तास. खूप पेशन्स आहेत हा. इतके छान छान बनवायचा आणि फोटो काढून होई पर्यंत थांबायचे.

सगळ्यात जास्त वेळ पुरण पोळ्यांसाठी लागतो. पुरण शिजवुन त्याला चाळणीतुन झारुन घेवुन मग पुरणपोळ्या बनवणे हे एक दिव्य.
देवाला ताट दाखवायचं मग दम धरावाच लागतो.

पुरणाच्या यंत्राने केले तरी हात दुखतो..
हो बरोबर.
आणी.........आणी.......आणी
इतकी मेहनत करुन पोळ्या बनवल्यावर जर कां खाणार्‍याने एखाद पुरण पोळी खावुन मग नाही आता मला नको म्हटले रे म्हटले की मग जे होते ते तर........सुपर्बच

आज लै वेळ भेटला (मिळाला) मग हे फोटो सापडले. आधी टाकलेले असतील तरी.......पुन्हा बघा काय नाय होत......तेवढच लाळग्रंथींच्या कॅपिलरी फ्लश होतील.

WhatsApp Image 2021-06-16 at 4.45.17 PM (1).jpegWhatsApp Image 2021-06-16 at 4.45.18 PM (2).jpegWhatsApp Image 2021-06-16 at 4.45.18 PM.jpegWhatsApp Image 2021-06-16 at 4.45.18 PM (1).jpeg

ओह्ह तुमच्या ताट वरूनच ओळखलं.. आखाजीच ताट आहे का?
Happy Blush
नई वं माय...आंबा लयेल व्हतु एकसावा तं बनावना पडतीनच नां. ( कृ. ह. घे.)

Happy Blush
नई वं माय...आंबा लयेल व्हतु एकसावा तं बनावना पडतीनच नां. ( कृ. ह. घे.)
मला स्मायली टाकता येत नाही. पण खुप हसले..

मस्त पदार्थ आहेत सगळे जेम्स बॉण्ड. ही बुंदी रायता असलेल्या ताटात काय आहे? मसाला पुरी का? त्याची पाककृती काय आहे?

मसाला पुरी का? त्याची पाककृती काय आहे?
लिट्टीचोखा चे व्हेरिएअशन म्हणजे सत्तुचे पीठ वापरुन बनवलेला पराठासदृश्य

जेम्स बॉन्ड - पंचपक्वानांनी भरलेली ताट एक नंबर आहेत.
मानवजी - छान जेवण..
मृणाली - न्याहारी मस्तच...

अजनबी ......जीव घेता का राव
प्रॉन्स गस्सी करी आणी नीर डोसा बंगलोरला व्हाईटफिल्ड मधल्या एका फेमस हॉटेलात खाल्ला त्याची आठवण झाली.

PSX_20210618_172907.jpg
गूळ शेंगदाणा वडी.
मध्ये ज्या वड्या दिसत नाहीयेत त्या खाऊन टाकण्यात आल्या आहेत Happy

Pages