कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं.. कधी चुकुन एखादी सहल.. पाहुणे-राऊळे.. स्नेहभोजने.. डी-मार्ट्च्या वार्‍या.. दर रविवारी मंडई मधली भाजी/फळे खरेदी.. दुकानांतली/मॉलमधली नवीन खरेदी.. कधी मित्रांसोबत ट्रेकिंग.. अगदी सगळं कसं सुखनैव सुरु होतं.

कोरोना जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पुढे असं लॉकडाऊन वगैरे होईल अन आयुष्य पुर्णपणे बदलेल असं आजिबात वाटत नव्हतं. इतर साथीच्या रोगांप्रमाणे भारतात कोरोना जास्त हातपाय पसरू शकणार नाही अन भारतीयांची प्रतिकार शक्ती प्रबळ असल्याने इथे त्याचा टिकाव लागणार नाही असं बोलता-बोलता बरेच आप्त-स्वकीय-मित्र-स्नेही म्हणायचे. परंतु झालं उलटंच. नाही नाही म्हणता कोरोना कधी सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला हेही कळालं नाही अन सुखनैव सुरु असलेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर सुसाट पळणारी जीवनाची गाडी एकदम संथ गतीने चालू लागली..

कोरोना मुळे आयुष्याला प्राप्त झालेल्या या संथ गतीत बर्‍याचशा गोष्टी जीवनात नसल्या तरी चालतात याचा साक्षातकार होऊ लागला. ज्या गोष्टींशिवाय जगणं अशक्य होईल असं वाटत होतं तो केवळ गोडगैरसमज होता हे आता ध्यानी येतं अन आपण मनातचं हसतो..

उदाहरणार्थ :
१) सकाळी उठल्यावर वर्तमान पत्र हवंच हवं या गृहितकाला छेद जाउनही आता वर्ष झालं. वर्तमान पत्र नसलं तरी चहाचा घोट आरामात घशाखाली उतरतो हा नवाच शोध कोरोना आल्यामुळे लागला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

२) चिकन्/मटण्/मासे अगदी महिना-महिना खायला मिळाले नाही तरी काहीही बिघडत नाही याचाही शोध लागला.

३) घसा दुखेल्/सर्दी होईल या कोरोना लक्षणांच्या भितीने का होईना पण सलग दोन वर्षं आईस्क्रिम खायला मिळालं नाही म्हणुन देखिल काहीही बिघडलं नाही.

तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की ज्या गोष्टी कोरोना काळ सुरु व्हायच्या आधी फार गरजेच्या वाटत होत्या अन आता त्या गोष्टी जीवनात नसतील तरी फार काही बिघडत नाही. असतील तर शेअर करा Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< पर्यावरण बदल होऊन पृथ्वीवरून माणूस नष्ट झाला तर मला अजिबात वाईट वाटणार नाही. अगदी हे माझ्या काळात घडलं तरी. माणूस नष्ट होणे पर्यावरणासाठी उत्तमच ठरेल. >>

------- वाईट वाटण्यासाठी पृथ्वीवर मागे थांबावे लागेल.... Happy

जिज्ञासा - तुम्हाला हवे तिथे लिहा... वाचणारे वाचतील, काहींना लिहीलेले पटेल, काहींना पटणार नाही. तुम्ही तुमचे काम योग्य प्रकारे बजावत आहात आणि त्या प्रयत्नां बद्दल मला आदर आहे. तुमचा मार्ग काटेरी आहे याची जाण ठेवा. ग्रेटा, लिसिप्रिया यांना पण प्रखर टिकेला तोंड द्यावे लागते.

वर सुनिधी यांनी अगदी योग्य शब्दांत लिहीले आहे.

अ‍ॅडमीन साहेबांनी " पर्यावरणावर चर्चा " असे एक वेगळे फोल्डर /सदर तयार करावे जे सर्वांसाठी खुले असेल. तुम्ही/ इतरांनी तिथे विविध विषयांवर धागे काढावे.... म्हणजे तुमचे तसेच इतरांचे माहिती पुर्ण प्रतिसाद एका ठिकाणी सहजगत्या मिळतील. विषय व्यापक आहे, आणि सर्व एकाच धाग्यात सामावणे अगदीच अशक्य आहे आणि तशी अपेक्षा नाही. चांगल्या विषयावर असलेल्या धाग्याची ३५ पाने झाल्यावर नव्या दमाच्या खेळाडूला काही शोधायला मोठे कष्ट पडतील...

पर्यावरण वाचवा मोहीम मुळात मानव वाचवा मोहीमच आहे आणि ती मानव वाचवा मोहीम म्हणुनच राबवली पाहिजे.
पर्यावरण वाचवा म्हटलं की लोकांना दुसऱ्या कशा/कुणासाठी तरी आपल्याला त्याग करायचा आहे असं वाटू लागतं.

आपल्याला कुणावरही परोपकार करून काहीही वाचवायचं नाहीय तर आपल्याला आणि आपल्या नजीकच्या पिढीला वाचवायचंय हे स्पष्टपणे मांडले पाहिजे.

शाश्वत विकास आणि निसर्गप्रेम वेगळे ठेवले पाहिजे.
शाश्वत विकासात निसर्ग जपल्या जाईल पण ते निसर्गप्रेम म्हणुन नव्हे तर मानवजात वाचवायची गरज म्हणुन.
या उपर जे निसर्ग प्रेम आहे ते वेगळे ठेवावे यात ते आणु नये.

पर्यावरणाचा विचार मानव हे केंद्र मानून करायचा की निसर्ग? ( इतरही केंद्रे असून शकतात)
पर्यावरण मानवासाठी आहे की मानव हा पर्यावरणाचा फक्त एक भाग अशा वेगवेगळ्या विचारधारा आहेत.

माणूस स्वतः:ला निसर्गापेक्षा मोठा समजू लागला की निसर्ग त्याला धडा शिकवतोच.
गेल्या वर्षभरात हेही शिकता आलं नसेल तर पुढे समजणं अवघड आहे. .

माणूस स्वतः:ला निसर्गापेक्षा मोठा समजू लागला की
>>>>
मला नाही वाटत की माणूस स्वतःला ईतका मोठा समजत असेल
तसे असते तर जगात देव हि संकल्पनाच नसती Happy

माणूस निसर्गाची वाट लावतोय हे कबूल, पण ते स्वार्थासाठी, प्रगतीसाठी, विकासासाठी. स्वत:ला मोठा समजून वगैरे नाही. हि पुस्तकी वाक्ये आहेत.

पर्यावरण हा शब्द, ही संकल्पना, ते बदलू नये म्हणून प्रयत्न, त्यात होणारे बदल रिव्हर्स करायची इच्छा आणि प्रयत्न, हे ज्ञान एक पिढीकडून पुढे देणे... इ. इ. फक्त मानव करतो.>>> पण मानवाने केलेल्या ढवळा ढवळी मुले होणारे परि णाम इतर सर्व स्पीशीज भोगत आहेत. ह्याचा अंतिम परि णाम मानव जातीवर होणारच नाही कारन आम्ही हुषार. आम्ही मार्स वर पण राहून दाखवू वगैरे गर्व असेल तर अवघ डच आहे. वी हॅव जस्ट दिस वन प्लॅनेट.

आम्ही मार्स वर पण राहून दाखवू वगैरे गर्व असेल तर अवघडच आहे.
>>>>
हा गर्व फक्त हॉलीवूडच्या पिक्चरमध्ये असतो.
ईथे महिना अखेरीला घर कसे चालवायचे या चिंतेत पगाराची वाट बघणार्‍यांना असले गर्व असतील असे वाटत नाही Happy

अग बाई हे काय झालं पर्यावरण नको कुठेही घुसडायला म्हणता म्हणता प्रतिसाद पर्यायाने धागा तिकडेच वळला की हो :दिवे:

पर्यावरणाचा विचार मानव हे केंद्र मानून करायचा की निसर्ग? >> हा खरोखरच महत्त्वाचा प्रश्न आहे.
१) निसर्ग हा केंद्र मानून विचार करायचा झाला तर जेव्हापासून माणूस शेती/ पशू-पालन करू लागला तेव्हापासून पर्यावरणाच्या र्‍हासाला सुरवात झाली असे म्हणावे लागेल. तसच दुष्काळ/ साथ रोग यांचा सामना प्राणी कश्याप्रकारे करतात तश्याच पद्धतीने करायची तयारी दाखवावी लागेल.
२) माणूस केंद्रस्थानी मानायचा असं ठरवलं तर मग ह्या विषयावर अनेक मतं/मतप्रवाह निर्माण होणार याची तयारी ठेवावी लागेल. कारण जगातल्या कोणत्याही (संवेदनाशील किंवा असंवेदनाशील) विषयावर अनेक मतप्रवाह नेहमीच निर्माण होतात. पिंडे पिंडे मर्तिभिन्ना असे आपल्या पुर्वजांनीच सांगितले आहे.

अग बाई हे काय झालं पर्यावरण नको कुठेही घुसडायला म्हणता म्हणता प्रतिसाद पर्यायाने धागा तिकडेच वळला की हो :दिवे:>> सर्व प्रस्न पर्यावरणाच्या मिसमॅने ज मेंट मधूनच निर्माण झाले आहेत ना त्याहुन असावे. हाच मेन धागा आहे इतर धागे त्याला युन मिळतातेत.

अग बाई हे काय झालं पर्यावरण नको कुठेही घुसडायला म्हणता म्हणता >>>>

यातले कुठेही हे महत्वाचे
हा धागा, आणि यातला विषय कुठेही मध्ये मोडत नाही. हा संबंधित विषयच आहे.

आता पावसाळा सुरू होईल. जागोजागी पाणी साचेल. आपण महानगरपालिकेला शिव्या घालू. सरकार कुठचे आहे यावरून राजकारण करू. यावेळी पाऊसच विक्रमी पडला बाई म्हणू, पण सर्व फसाद की जड पर्यावरणाला पोहोचवलेले नुकसान हेच असणार. आरेचे जंगल तोडून विकास कराल तर त्या विकासाची फळे चाखण्यासोबत दुष्परीणामाची फळे सुद्धा भोगावी लागणारच. त्यावर चर्चा न केल्याने पूर यायचा काही राहणार नाही.

अमा, सगळीकडे पर्यावरण घुसडायचा उबग आलेला तुम्हाला. मग वाचक वैज्ञानिक माहिती वाचण्याच्या मनस्थितीत नाही, मोठ्या कंपन्यांना जबाबदार धरा, सगळे मायबोलीकर मिळूनही इतकं प्रदूषण करू शकत नाहीत तर त्यांना कशाला पोस्ट वाचायला लावता? असं ही म्हणत होतात. त्याला २४ तास नाही झाले तोवर पर्यावरण पोस्ट लिहिलीत.
मत बदललं असू शकतं, पण इतकी हार्ष पोस्ट लिहिलीत तर जिज्ञासाची एका शब्दाने माफी मागणे मला तरी एथिकली आवश्यक वाटते. बघा तुम्हाला काय वाटतं.
बाकी मार्स वर राहून दाखवू (शब्दशः घेऊ नका) हा गर्व आणि ही विजिजिशू मनोवृत्ती या निसर्गानेच सर्वावावल प्रकरणात दिली आहे. ती आहे म्हणून तर इतक्या आपत्तीत तरालो.
वरच्या मानव च्या पोस्ट शी सहमत.

ण इतकी हार्ष पोस्ट लिहिलीत तर जिज्ञासाची एका शब्दाने माफी मागणे मला तरी एथिकली आवश्यक वाटते. बघा तुम्हाला काय वाटतं.>> माझी पोस्ट बघा. जिज्ञासाला जो त्रास झाला आहे ती पोस्ट माझी नव्हे.

माझ्या पोस्ट मध्ये मी लिहि ले आहे. ह्या प्रश्नाची मला माहिती आहे पण जित के डॅमेज मोठ्या कंपन्या करत आहेत एका वर्शात तितके सर्व मायबोली कर करू शक्णार नाहीत. भाबडे पणाचे वाइट वाटते. नेस्ले कोक पेप्सी इत्यादि कंपन्यांनी केलेले डॅमेज गूगल केले की सहज सापडेल. जो शाश्वत विकास तिला अपेक्षित आहे तो व्हावा पण नाही होणा र र्‍हा सच होतो आहे अति वेगाने ह्या मुळे तिला अतीव निराशा येउ शकते भविष्यात. हे मला दिसते आहे.

माझे फक्त एव्ढेच म्हणने होते कि उदा. मला दिवसात दहा ते पंध्रा मिनिटे दुपारी लंच टाइम मध्ये मिळतात माबो व इतर बघायला त्यात हे मोठ मोठे प्रतिसाद स्क्रॉल करण्यातच अर्धा वेळ जातो व तेव्हा हे डॅमेज वाचायची शक्ती नसते दर वेळी.. वी नीड अ मेंटल ब्रेक.

करोना मुळे कोणाला काय अनुभव सिद्ध ज्ञान मिळाले हे वाचायला पण बाफ उघडायचा नाही का? तर ठीक आहे. तसे करू. ट्विटर आहेच की.

माझ्या प्रतिसादा मुळे दुखावलेल्या असल्यास जिज्ञासा ह्यांची माफी मागते. लिहा तुम्ही.

अमा, तुमचा मुद्दा कळला आणि पटला आहे. त्यामुळे no hard feelings! All is well Happy
अमितव, धन्यवाद! अमा म्हणाल्या त्याप्रमाणे मला व्यक्तिशः सोहा यांनी लिहिलेला प्रतिसाद अत्यंत हीन दर्जाचा वाटला आहे. जिथे गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत तिथे उपरोधाने देखील पर्यावरण रक्षणासाठी जागरूक व्यक्तीला ऑक्सिजनचे कारखाने प्रदूषण होतंय या कारणाने बंद करायला लावणार का असे विचारणे हे बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. I was deeply hurt. जर त्यांना या प्रतिसादाबद्दल मनापासून माफी मागायची असेल तर त्यांनी जरूर मागावी.
इथे (आणि इतरत्र) पर्यावरणविषयक अवांतर करणार नाही असं बाणेदारपणे लिहिल्यावर पुन्हा त्याबद्दल लिहिणे योग्य वाटत नव्हते. पण मग सर्वांच्या प्रतिसादाची गाडी तिकडे वळलेली पाहून आपण कोणीच अवांतराच्या मोहापासून immune नाहीयोत हे जाणवून जरा बरे वाटले! बाकी वेळ मिळाला की धागा नक्की काढते. तुझ्या survival of the fittest theory वर पण काही लिहायचे आहे!
बाकी ज्या सर्व सदस्यांनी या विषयावर अजून लिहावे असे सुचवले आहे आणि सहमती दर्शवली आहे त्यांचे मनापासून आभार! कोणी वाचणारे/ ऐकणारे आहे म्हणून लिहायची प्रेरणा कायम राहते. हा संवाद असाच रहावा हीच इच्छा आहे. खरंच थँक्यू Happy

मंजुताई Happy
अमितव, पहिला परिच्छेद पटला Happy
हा विषयच असा आहे की बोटं ऐकत नाहीत ...

धन्यवाद.
माणसाने सर्वायवल ऑफ फिटेस्ट हे व्यक्तीकेंद्रित न ठेवता समूहकेंद्रित केल्याने त्याचा हा विकास होऊ शकला यावर माझा विश्वास आहे. पण हा किती मोठा समुह? किंवा कुठला समू?? किंवा कदाचित व्यक्ती का समूह निवडीची वेळ आली की आदीम प्रेरणा काय असतील अशा विचारातुन लिहिलेलं. अप्रत्यक्ष परस्पर मदत (इनडिरेक्ट रेसिप्रोसिटी) हा तर मानवाच्या विकासाचा पाया आहे. मी आज कुणाला मदत केली तर उद्या/ परवा मला कोणी दुसरा मदत करेल किंवा दुसरा कुणा तिसर्‍याला मदत करेल यावरच आपलं जीवन चालतं. मी जगतल्या सगळ्या गोष्टीत फिटेस्ट असण्याचा प्रयत्न करत नाही तर माझ्या समुहात सामावण्याचा प्रयत्न करतो.
बरं हा ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप? आपली मुले, नातेवाईक असा डीएनए ग्रुपच नाही तर इतिहासात समूह, प्रदेश, देश... टेक्नॉलॉजीच्या प्रसाराने हा ग्रुप आणखी विस्तारलेला दिसतो.
करोनाने या ग्रुप ठरवण्यात... एकुणच मानसिकतेत फरक झाला असेल का? यावर काही वर्षांनी अभ्यास झाला की वाचायला रोचक असेल.

कोरोनामुळे कॉलेज ऍडमिशनमधली स्पर्धा संपली.. माझ्या गावात सध्या दहावी व बारावीत ज्यांची मुले आहेत त्यांच्या मागे पंचक्रोशीतील कॉलेजेस हात धुवून लागलीत. आमच्या कॉलेजात या, रोज घरून पिकअप करू, फीमध्ये डिस्काउंट देऊ, पुस्तके फुकट देऊ. सवलतींचा पाऊस पडतोय सध्या.
गेल्या वर्षीपर्यंत ऍडमिशनसाठी कट ऑफ ची स्पर्धा असायची.

ह्म्म
पण कॉलेज ला जावे लागणारच आहे ना?
शिवाय १२ वी नंतर वाल्यांचे तर प्रत्यक्ष कॉलेज केव्हाही चालू होते.
मग अ‍ॅड्मिशन ला गर्दी का नाहीय?

Pages