कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं.. कधी चुकुन एखादी सहल.. पाहुणे-राऊळे.. स्नेहभोजने.. डी-मार्ट्च्या वार्‍या.. दर रविवारी मंडई मधली भाजी/फळे खरेदी.. दुकानांतली/मॉलमधली नवीन खरेदी.. कधी मित्रांसोबत ट्रेकिंग.. अगदी सगळं कसं सुखनैव सुरु होतं.

कोरोना जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पुढे असं लॉकडाऊन वगैरे होईल अन आयुष्य पुर्णपणे बदलेल असं आजिबात वाटत नव्हतं. इतर साथीच्या रोगांप्रमाणे भारतात कोरोना जास्त हातपाय पसरू शकणार नाही अन भारतीयांची प्रतिकार शक्ती प्रबळ असल्याने इथे त्याचा टिकाव लागणार नाही असं बोलता-बोलता बरेच आप्त-स्वकीय-मित्र-स्नेही म्हणायचे. परंतु झालं उलटंच. नाही नाही म्हणता कोरोना कधी सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला हेही कळालं नाही अन सुखनैव सुरु असलेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर सुसाट पळणारी जीवनाची गाडी एकदम संथ गतीने चालू लागली..

कोरोना मुळे आयुष्याला प्राप्त झालेल्या या संथ गतीत बर्‍याचशा गोष्टी जीवनात नसल्या तरी चालतात याचा साक्षातकार होऊ लागला. ज्या गोष्टींशिवाय जगणं अशक्य होईल असं वाटत होतं तो केवळ गोडगैरसमज होता हे आता ध्यानी येतं अन आपण मनातचं हसतो..

उदाहरणार्थ :
१) सकाळी उठल्यावर वर्तमान पत्र हवंच हवं या गृहितकाला छेद जाउनही आता वर्ष झालं. वर्तमान पत्र नसलं तरी चहाचा घोट आरामात घशाखाली उतरतो हा नवाच शोध कोरोना आल्यामुळे लागला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

२) चिकन्/मटण्/मासे अगदी महिना-महिना खायला मिळाले नाही तरी काहीही बिघडत नाही याचाही शोध लागला.

३) घसा दुखेल्/सर्दी होईल या कोरोना लक्षणांच्या भितीने का होईना पण सलग दोन वर्षं आईस्क्रिम खायला मिळालं नाही म्हणुन देखिल काहीही बिघडलं नाही.

तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की ज्या गोष्टी कोरोना काळ सुरु व्हायच्या आधी फार गरजेच्या वाटत होत्या अन आता त्या गोष्टी जीवनात नसतील तरी फार काही बिघडत नाही. असतील तर शेअर करा Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोव्हिड काळात लोकांचा पैसा वाचला आणि ते शेअर मार्केट आणि स्थावर मालमत्तेत गुंतवत आहेत.
कोव्हिड पूर्व काळात १२ हजारच्या घरात असणारा निफ्टी, आता जीडीपी खाली आला तरी १५ हजार वर गेलाय.

आमच्या छोट्या कॉलनीतच बरेच मोकळे प्लॉट्स होते, गेल्या आठ महिन्यात किमान दहा जागी इमारती, चार बंगले बांधणे सुरू झालेय, दीडशे मीटर त्रिज्येच्या वर्तुळात.

संशोधनातून निघेल ते मॉडर्नच असेल ना? आणि मॉडर्न मेडिसीन हा शब्द याबद्दल.

आता जे केमिकल/ ड्रग्ज/ वगैरे औषधांना अलोपथी म्हणायचं नाही, मॉडर्न म्हणायचं असं वारंवार सांगितले जाते म्हणून तो शब्द वापरला आहे.

इथेही घरांच्या किंमती कायच्या काय वाढल्या. लोकांना जास्त जागेची गरज भासू लागली. आई- बाबा आणि दोन मुलं असं चौघांचं कुटुंब असेल तर चौघांना चार खोल्यांची गरज भासू लागली कारण सगळे रिमोटली शाळा/ ऑफिस करू लागले.
फिजिकल डिस्टंसिंग पाळून जीवन जगायचं तर घराच्या आजूबाजूला जास्त जागा असेल तर बरं. दिवस भर घरात रहायचं तर मग बॅकयार्डात झाडं लावू, स्विमिंग पूल बांधू, डीवायआय फर्निचर करू, गझिबो करू म्हणजे मित्रांना बोलावून लांब बसून जेवणखाण गप्पा गोष्टी करता येतील. रिमोटच काम करायचं आहे तर शहरातील खुराड्यात कशाला रहा? सबर्ब मध्ये चांगलं ऐसपैस राहू. वर अनेकांनी म्हटलंय तसा पैसा आहे तर तो उपभोगू.
या सगळ्यामुळे शहरापेक्षा आजू बाजूच्या गावातील घरांच्या किमती कायच्या काय वाढल्या. बिडिंग वॉर न्यू नॉर्मल बनली. आस्किंग किंमतीच्या वर १०० हजार (१लाख) ते १ मिलियन अशा अफाट रेंज मध्ये घरं विकली जाऊ लागली. पण आता वाढ मंदावते आहे.

मुळातच भौतिक सुखाची लालसा मला फारशी नाहीये, जे एखाद्या सुखाला दुरावलो असे झाले नाही. वा कसले व्यसन नव्हते जे या काळात अडले असे झाले नाही. त्यामुळे कुठल्या गोष्टीतला फोलपणा कळला असे वैयक्तिक पात़ळीवर झाले नाही.

फॅमिली वा जवळचा मित्रपरीवार यातच रमणारा जीव असल्याने त्यांचे महत्व या काळात नव्याने कळले असेही झाले नाही. उलट जवळचे या काळात सोबतच होते हे चांगलेच झाले.

भटकंती करायची मुळातच आवड नाही, सुट्टी काढून आठवडाभर लांब फिरायला जायची मुळातच आवड नसल्याने, दरवर्षी जातो पण यंदाच कुठे जाता आले नाही असेही झाले नाही.
मात्र रोज थोडावेळ मोकळ्या हवेत फिरणे, विकेंडला वा दर सुट्टीच्या दिवशी घरात लोळत न पडता मुलांसोबत शहरातच जवळपास फिरायला जाणे आवडते. ते लॉ़कडाऊनचे कडक निर्बंधाचा काळ वगळता जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे मोकळ्या हवेत श्वास घ्यायचा प्रयत्न केला आणि ते शक्यही झाले.

मूळ लेखात चिकन मटण मासे यांचा उल्लेख आहे, आणि मी अट्टल मांसाहारप्रेमी आहे. वर्षाचे ३६५ दिवसही खाऊ शकतो. पण त्याचसोबत न खाताही राहू शकतो.हे नियंत्रण याआधीही हॉस्टेलची मेस वा शाकाहारी गर्लफ्रेंड/बायकोच्या निमित्ताने आजमावले आहे. त्यामुळे मांसाहार नाही मिळाला तरी बिघडत नाही असाशी शोध काही नव्याने लागला नाही. प्रत्यक्षात या काळात गेल्या वर्षी सुरुवातीचा अपवाद वगळता त्यानंतर मांसाहाराचे प्रमाण अफाट वाढले आहे ती गोष्ट वेगळी.

आरोग्याचे महत्व समजले वा आयुष्याची किंमत कळली असेही झाले नाही. म्हणजे आयुष्याची लालसा वा मरणाची भिती मुले लहान असताना एका ठराविक काळात वाटलेली. आताही मुले लहानच आहेत. पण नंतर माझे ते ही विचार बदललेले. म्हणजे जन्माला आलेला जीव वाढण्यासाठी त्याला कोणाचा आधार हवाच असे गरजेचे नाही. माश्याच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही तर माणसाच्या पिल्लाला तरी जगायला का शिकवावे लागावे. जगात कोणावाचून कोणाचे काही अडत नाही आणि काळ कोणासाठी थांबत नाही हे विचार आधीपासूनच क्लीअर आहेत ज्याला माझी बायको प्रॅक्टीकल विचारांचा आहेस असे म्हणते.

थोडक्यात माझ्याकडे या धाग्यावर लिहावे असे काही नाही.....

तरीही हातभर पोस्ट लिहिली
मग लिहायला काही असते तर किती लिहिले असते हा विचार आता करत आहे Happy

नातलग, मित्रमंडळी अगदी कुटुंबीयांच्याही मृत्यूनंतर त्याबद्दल शोक व्यक्त करण्याचं प्रमाण कमी झालं आहे का?
करोना मुळे आलेले प्रतिबंध आहेत. भेटायला जात येत नाही. अंत्यसंस्काराच्या वेळी किती लोकांनी यावं त्यावर मर्यादा. सतत कानावर पडणार्‍या कुणा ना कुणाच्या बातम्यामुळे मनही बधीर झालंय?

या कशाच्याविना किंवा सगळ्यां सहीत आयुष्य चालूच रहाते. इतकंच खरं. सगळं असेल तर ते ही आवडतंच. नसेल तर त्यात गोड मानून घेता येतं. हे नसेल तर गोड वाटणे जमायला कदाचित थोडा वेळ लागतो, जो व्यक्तिपरत्वे बदलेल कदाचित.
पण चिकन, मासे, वर्तमानपत्रे, ब्रेड, चपला, मल्टिप्लेक्स, मिक्सर, आइस्क्रीम, रेस्टॉरंट मधलं जेवण हे सगळं शक्य नाही म्हणून न करणे म्हणजे गरजा संपल्यात म्हणणे बरोबर आहे का?
माझ्या पुरतं बोलायचं तर गरजा बदलल्या. त्या सुद्धा लीस्ट रेझस्टंट पाथने ट्यून झाल्या. इतकंच. मार्ग काढला बस. लाँग रन मध्ये काय होईल? आरामदायी जे यातलं आवडलं ते आणि जे पूर्वीचं आवडायचं ते निवड केलं जाईल. जीवाला कमीत कमी तोशिष ही माणसाची परिस्थिती बदललेली नाही. बदलणार ही नाही. >> अगदी हेच लिहायला आले होते.

छान धागा आहे.

बाहेर जाणे कमी झाले, अगदी आवश्यक असेल तरच. दिवसातून अनेकवेळा हात साबणाच्या पाण्याने, नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करायची सवय लागली... स्वच्छता आणि अतिरेकी पणा यातला समतोल साधायला अनेक महिने लागले.

रोजच्या दिनक्रमांत काही नव्याने भर पडली - दररोज न चुकता वल्डोमिटर , Johns Hopkins Univ वर भेट देणे
https://coronavirus.jhu.edu/map.html
https://www.worldometers.info/coronavirus/

मग दुपारी दोन वाजता आमच्या राज्याच्या कोविड संबंधातली आकडेवारी बघायची... या आकडेवारीला विशेष महत्व कारण त्याचा थेट परिणाम माझ्यावर आणि माझ्या परिवारावर होणार असतो. बाधितांची आकडेवारी कुठल्या बाजूला ( वर / खाली) झुकणार आहे... याचे संकेत अंदाज ( qualitative ) २४ तास आधी मिळतात.

जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य कधीतरी जाणार असतोच हे प्रत्येकाला माहित असतेच. पण जाण्याच्या निव्वळ विचाराने, त्या भितीपोटी - तो समोर असलेला आज , वर्तमानही, व्यावस्थित जगत नाही. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा परिवारासोबत मोकळ्या मनाने चर्चा करायचा प्रयत्न केला/ करतो, माझे अचानक काही झाले तर ? बॅक अप प्लॅन असायला हवा (आर्थिक स्वावलंबन ).

वॅक्सिन घेतले, जमेल तसे इतरांनाही ते घेण्याचा आग्रह करतो...

कोरोनामुळे एक मोठा जोरदार झटका मिळाला आहे.... पण मनुष्य यातून नक्कीच सावरणार आहे... शेवटची लाट ओसरल्यानंतर (कधी हा लाख मोलाचा प्रश्न आहे) दोन वर्षात जग होते तसे पुर्वव्रत होण्यासाठी धडपडेल... कपडे, फॅशन.... वायफळ खरेदी हे मनुष्य स्वभावाचे विशेष गुण आहेत, त्यांना कोरोना मुळे काही काळ मुरड घालावी लागली तरी कायमची ठेच पोहोचणार नाही.

शेवटची लाट ओसरल्यानंतर (कधी हा लाख मोलाचा प्रश्न आहे)
>>>>

मग दुसरा आजार येईल.. मग तिसरा.. सोबत ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलते पर्यावरण आपली तासायला आहेच. धर्माच्या आधारावरचा द्वेषही वाढला आहे. माणसं उठता बसता तडफडून मरू लागली तरी या धर्माभिमान बाळगण्यातील फोलपणा कोणाला कळणार नाही. आज प्रत्येकाला एकमेकांवर कुरघोडी करायची आहे. थोडक्यात आता आपण मनुष्यजातीच्या अंताकडे चाललो आहोत हा विचार माझ्या मनात बळावला आहे. तर तिथे रडत भेकत टाहो फोडत जाण्याऐवजी हे आपलेच कर्म आहे म्हणत राम जानेच्या शाहरूखसारखे बिनधास्त याला सामोरे जावे असे मी माझ्यापुरते ठरवलेय Happy

माणसं उठता बसता तडफडून मरू लागली तरी या धर्माभिमान बाळगण्यातील फोलपणा कोणाला कळणार नाही. >> मला वाटतं धार्मिक पर्यटन कमी झाल्यामुळं धर्माचा अन पर्यायाने देवांचा जो अवडंबर माजवला जात होता त्याला कसा का असेना आळा बसला आहे. कदाचित आहारी गेलेले थोडेफार यातुन शहाणे होतील.


मला वाटतं धार्मिक पर्यटन कमी झाल्यामुळं धर्माचा अन पर्यायाने देवांचा जो अवडंबर माजवला जात होता त्याला कसा का असेना आळा बसला आहे.

+११११

<< राम जानेच्या शाहरूखसारखे बिनधास्त याला सामो >>
----- ऋन्मेऽऽष वरचे दोन्ही प्रतिसाद लाजबाब, आवडले.

<< मला वाटतं धार्मिक पर्यटन कमी झाल्यामुळं धर्माचा अन पर्यायाने देवांचा जो अवडंबर माजवला जात होता त्याला कसा का असेना आळा बसला आहे. कदाचित आहारी गेलेले थोडेफार यातुन शहाणे होतील. >>
------ काही फरक पडेल असे वाटत नाही. फार थोड्या लोकांना फरक पडेल... त्यांचे मतपरिवर्तन होईल. पण तेव्हढ्याच काळात त्यापेक्षाही जास्त संख्येने पाटी कोरे असलेले लोक अंधभक्त ( नव अंधभक्त) बनतील. म्हणजे भक्तांच्या संख्ये मधे net gain होणार आहेच.

मोदी- शहा- भिस्त यांचे खेळ चालणार आहेतच. शांतता प्रिय जनता आणि सोबत भक्त गण दोघेही भरडले जाणार आहेत. कोरोनापेक्षाही हा धार्मिक / जातीय विखार जास्त धोकादायक आहे... भारत देशाचा क्रमांक एकचा शत्रू.

माझे पहिल्या लोकडाऊन मध्ये गळलेले केस परत येईपर्यंत दुसरा लोकडाऊन लागला.. आता परत गळायला लागले आहेत.. आता मनात हि भीती दाटली आहे कि.. अजून किती लाटा येतील आणि जाताना माझे केस घेऊन जातील..
कोरोनामुळे माझे फोन कॉल्स वाढले..मनात आले कि पटकन बोलून घेते.. आणि कोणाचा कॉल आला तर हातातले काम सोडून ५ मिनिटे तरी समोरच्याशी बोलून घेते..

वस्तूंची गरज आधीपासूनच फारशी नव्हती. ऑनलाइन भाज्या,किराणा घरपोच येतो आहे हे बरंच आहे. माणसांना भेटणे ही माझी मानसिक गरज आहे हे मला लॉकडाउनमुळे समजले.पूर्वी मी स्वतःला माणुसघाणी समजायचे. नेमकी लॉकडाउनआधी नवर्याची बदली झाली. नव्या ठिकाणी माझ काम सुरू करता आले नाही. फार ओळखी, नातेवाईक नाही. मुलाची शाळा नवीन. मी आधीचे आयुष्य मिस करते. आता नव्या ठिकाणी मैत्रिणी मिळाल्या आहेत पण आता परत लॉकडाउन.
भरत म्हणतात तसा बधिरपणा नाही आला,प्रत्येक जवळच्या माणसाचा मृत्यू घाव घालतोय. कधी संपणार हे सगळे माहीत नाही.

माझे पहिल्या लोकडाऊन मध्ये गळलेले केस परत येईपर्यंत दुसरा लोकडाऊन लागला.. आता परत गळायला लागले आहेत.. >> हे कसं काय..? लॉकडाऊनमुळे केसांच्या समस्या उद्भवतात हे पहिल्यांदाच ऐकले.

प्रत्येक जवळच्या माणसाचा मृत्यू घाव घालतोय. कधी संपणार हे सगळे माहीत नाही.>>अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशांत रोजची ४०००+ लोक मरत असलेला काळ जवळ जवळ १.५ ते २ महिने होता.. त्यामुळे अजुन एक महिना तरी हे असे भयावह आकडे कदाचित आपणाला बघावे लागतील (काल भारतात ४५२५ गेले..!). गेल्या १४ दिवसात भारतात कोरोनाने ६०००० गेले (अर्थात सरकारी आकडे... खरी परिस्थिती यापेक्षा नक्कीच भयानक असणार)

मृत्यूदर खरंच वाढतोय की अधिकृत मृत्यू मोजणीत सुधारणा झालीय? आणि म्हणुन तो आकडा वाढल्या सारखा वाटतोय?

कोर्टाने फटकारल्यामुळे खोटेपणा करणार्‍या राज्यांनी खरी माहिती द्यायला सुरुवात केली असावी अशी शंका येते.

पण ते असो. कोरोना काळामुळे दरवर्षी उन्हाळ्यात डोंगरावरून करवंदे आणि जांभळे गोळा करून घरोघरी ते विकणारी माणसे या वर्षी दिसली नाहीत. त्यामुळॅ यावर्षी करवंदे खाता आली नाहीत.

माझे पहिल्या लोकडाऊन मध्ये गळलेले केस परत येईपर्यंत दुसरा लोकडाऊन लागला.. आता परत गळायला लागले आहेत.. >> हे कसं काय..? लॉकडाऊनमुळे केसांच्या समस्या उद्भवतात हे पहिल्यांदाच ऐकले.
>>>>>>>>>

हो, हे मलाही कळले नाही. किंबहुना गेल्या लॉकडाऊनमध्ये सलूनची पायरी न चढल्याने माझे केस तुफान वाढलेले. घरच्यांना भिती आहे की मी या लॉकडाऊनमध्येही पुन्हा त्याच वाटेवर तर नाही जात आहे..

मला वाटतं धार्मिक पर्यटन कमी झाल्यामुळं धर्माचा अन पर्यायाने देवांचा जो अवडंबर माजवला जात होता त्याला कसा का असेना आळा बसला आहे.
>>>>>
हे शक्य नाही
वेगळ्या धाग्याचा विषय आहे हा. ईथे धागा भरकटेल..

मला वाटतं धार्मिक पर्यटन कमी झाल्यामुळं धर्माचा अन पर्यायाने देवांचा जो अवडंबर माजवला जात होता त्याला कसा का असेना आळा बसला आहे.
>>>>>
हे शक्य नाही
वेगळ्या धाग्याचा विषय आहे हा. ईथे धागा भरकटेल..

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 May, 2021 - 19:32
Pages
>>>>>>>>> म्हणून मीच याच्यावर आता नवीन धागा काढतो, तिकडे या. Proud

म्हणून मीच याच्यावर आता नवीन धागा काढतो, तिकडे या. P
नवीन Submitted by रश्मी. on 19 May, 2021 - 16:17

काढतो??? लाहोलविलाकुवत ... हे कधी झालं???

Lol लाहोर व्हाया कुवैत जाऊ नका. मीच धागा काढतो हे ऋन्मेष म्हणतोय असे मी त्याच्या मनातले लिहीले आहे. Proud मायबोलीवर अजून तुम्ही रुळला नाहीत. Biggrin

"असण्याची सवय होते आणि नसण्याचीही सवय होते...वस्तूंच्या..माणसांच्या.." हे प्रकर्षाने जाणवले!

Pages