कोरोनामुळे तुम्हाला जीवनातील कोणकोणत्या गोष्टींचा फोलपणा कळाला..?

Submitted by DJ....... on 18 May, 2021 - 04:19

कोरोना काळ सुरू होऊन आता वर्ष होऊन गेलं. कोरोना भारतात येण्याआधी जीवनात सर्व काही सुरळीत चालू होतं. सकाळी उठलं की आधी जॉगिंग.. घरी येऊन आंघोळ.. झटपट आवरून चहा.. वर्तमानपत्र.. करता करताच ऑफिसची बस गाठण्याची धांदल. ऑफिसमधे सर्वकाही वर्षानुवर्षं जसं सुरू होतं अगदी तसंच तेंव्हाही सुरु होतं... संध्याकाळी पुन्हा ऑफिस ते घर.. घरी आलं की मुलांचा कल्ला.. संध्याकाळी जेवायला काय भाजी/कालवण बनवायची यावर खल.. जेवण झालं की टी.व्ही. आणि नंतर शतपावली झाली की झोप अस किती सुखाचं आयुष्य सुरू होतं असं वाटण्यासारखी परिस्थिती.. कधी एखाद्या वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीत एस.टी.ने गावी जाणं.. कधी चुकुन एखादी सहल.. पाहुणे-राऊळे.. स्नेहभोजने.. डी-मार्ट्च्या वार्‍या.. दर रविवारी मंडई मधली भाजी/फळे खरेदी.. दुकानांतली/मॉलमधली नवीन खरेदी.. कधी मित्रांसोबत ट्रेकिंग.. अगदी सगळं कसं सुखनैव सुरु होतं.

कोरोना जेव्हा पहिल्यांदा भारतात आला तेव्हा पुढे असं लॉकडाऊन वगैरे होईल अन आयुष्य पुर्णपणे बदलेल असं आजिबात वाटत नव्हतं. इतर साथीच्या रोगांप्रमाणे भारतात कोरोना जास्त हातपाय पसरू शकणार नाही अन भारतीयांची प्रतिकार शक्ती प्रबळ असल्याने इथे त्याचा टिकाव लागणार नाही असं बोलता-बोलता बरेच आप्त-स्वकीय-मित्र-स्नेही म्हणायचे. परंतु झालं उलटंच. नाही नाही म्हणता कोरोना कधी सर्वात जास्त चर्चेचा विषय झाला हेही कळालं नाही अन सुखनैव सुरु असलेल्या जीवनाला अचानक ब्रेक लागला. ब्रेक लागल्यानंतर सुसाट पळणारी जीवनाची गाडी एकदम संथ गतीने चालू लागली..

कोरोना मुळे आयुष्याला प्राप्त झालेल्या या संथ गतीत बर्‍याचशा गोष्टी जीवनात नसल्या तरी चालतात याचा साक्षातकार होऊ लागला. ज्या गोष्टींशिवाय जगणं अशक्य होईल असं वाटत होतं तो केवळ गोडगैरसमज होता हे आता ध्यानी येतं अन आपण मनातचं हसतो..

उदाहरणार्थ :
१) सकाळी उठल्यावर वर्तमान पत्र हवंच हवं या गृहितकाला छेद जाउनही आता वर्ष झालं. वर्तमान पत्र नसलं तरी चहाचा घोट आरामात घशाखाली उतरतो हा नवाच शोध कोरोना आल्यामुळे लागला असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.

२) चिकन्/मटण्/मासे अगदी महिना-महिना खायला मिळाले नाही तरी काहीही बिघडत नाही याचाही शोध लागला.

३) घसा दुखेल्/सर्दी होईल या कोरोना लक्षणांच्या भितीने का होईना पण सलग दोन वर्षं आईस्क्रिम खायला मिळालं नाही म्हणुन देखिल काहीही बिघडलं नाही.

तुम्हाला असे काही अनुभव आलेत का की ज्या गोष्टी कोरोना काळ सुरु व्हायच्या आधी फार गरजेच्या वाटत होत्या अन आता त्या गोष्टी जीवनात नसतील तरी फार काही बिघडत नाही. असतील तर शेअर करा Bw

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< भारतीय माणसाच्या किमान बुद्धीमत्तेवर असल्याच्या माझ्या विश्वासाचा फोलपणा सिद्ध झाला आहे. माझा भारतीय समाजमनाच्या समजूतीच्या कुवतीवर फार विश्वास होता. आज मात्र मला तसं वाटत नाही. >>>>>>>

माझा कधीही नव्हता पण करोनाकाळात सुरवातीला वाटले की लोक जरा शहाणे होतील. पण तोही फोल ठरला. मी सध्या ज्या गावी राहते ते तथाकथित थंड म्हणून प्रसिद्ध आहे (गेले तीन महिने गरमीने मरतोय इथे, इथल्या पर्यावरणाची वाट ग्लोबल वॉर्मिंग व स्थानिक या दोघांनीही उत्साहाने व आनंदाने लावलीय. )... इथे सप्टेंबरपासून टूरिस्ट मंडळींचा महापूर आलेला, तो मार्चपर्यंत होता. लोक घरात बसून कंटाळलेले पण म्हणून मास्क कचऱ्यात टाकून थेट हिल स्टेशन गाठावे? मलातर फेब्रुवारीला वाटायला लागले होते की आता करोना संपलाच. युरोपातुन तेव्हा दुसऱ्या लाटेच्या बातम्याही यायला लागलेल्या पण बाहेर लोकांची गर्दी काही थांबत नव्हती. आता परत पूर्ण थांबलीय. >>

------ दोष केवळ लोकांचाच आहे असे मला वाटत नाही. हो आता लोकांनी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास टाकला याला लोकांचा दोष मानत असलात तर लोकांचे चुकलेच... एक वेळा नाही दोन वेळा.

२८ जानेवारीला, World Economic Forum मधे , पंतप्रधान मोदी यांचे सुप्रसिद्ध भाषणात ३:०० र्‍या मिनीटा नंतर एका... ३:३६ नंतर विशेष कान द्या " दुनियाकी १८% आबादी.... भारतने कोरोना पर प्रभावी नियंत्रण करके पुरी दिनिया को मानवता को बडी त्रासदी से बचाया है... "
मग वॅक्सिन तयार करणारी जगातली मोठी यंत्रणा, मोठी निर्यात यासाठी स्व त : ची पाठ थोपटली.
https://www.thequint.com/news/india/in-january-pm-modi-had-expressed-ind...

आता दुसर्‍या लाटेच्या आधी लक्षावधी लोकांना एकत्र आणणार्‍या कुंभमेळ्या सारख्या जत्रेला परवानगी कुणी दिली ? अगदी १५ एप्रिल पर्यंत हजारो - लाखो शाही स्नाने चालली होती.
https://theprint.in/india/kumbh-mela-to-be-suspended-akharas-in-talks-as...

पाच राज्यातल्या निवडणूका घेणे आणि तिथे जाऊन मेगा Superspreading event जाहिर प्रचार सभा घेणे यातून जनतेला कुठला संदेश दिला गेला ? मोदी, बॅनर्जी, यांच्या सभांना लाखोंची गर्दी येत होती. अशा किती प्रचार सभा झाल्या असाव्यात?

एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यापर्यंत (१७ ता), पंतप्रधान मोदी यांच्या सभा होत होत्या... १७ एप्रिल ला देशामधे २६१, ००० पेक्षा जास्त लोकांची कोरोना+ अशी नोंद झाली आणि त्याच दिवशीच्या आसनसोल मोदी सभेला लाखोची गर्दी होती. अशा केवळ १५- २० महासभा मोदी यांनी केवळ बंगाल राज्यासाठी घेतल्या आहेत? लहान प्रचारसभा घेण्याचा निर्णय किती उशिरा घेतला होता... तो पर्यंट महाउशिर झाला होता.

बंगाल निवडणूका आठ टप्प्यात एव्हढ्या दिर्घकाळ घेण्याचे प्रयोजन ? यातून कोरोना प्रसारा विषयीचे महाअज्ञान आणि जनतेच्या सुरक्षेसंबंधात
गांभिर्याचा अभाव होता का येनकेन प्रकारे सत्ता स्थापण्यासाठी स्टार प्रचारक मोदी यांचे वेळापत्रक संभाळणे याला प्राधान्यक्रम महत्वाचा वाटला ?

मग लग्नसमारंभ, सोहळे, सण... जत्रा, लग्नाचे सुवर्ण/ हिरक/ रौप्य मओह मोहोत्सव आहेतच.

वॅक्सिन खरेदी बाबतचा करार कधी , कुठल्या तारखेला झाला?
भारतात तयार होत असतांना... सरकारला देशातल्या जनतेसाठी का विकत घेण्याची सुबुद्धी झाली नाही. अगदी जानेवारी २०२१ पर्यंत करार केलेला नव्हता.

मागच्या वर्षीच फायझरने परवानगी Drugs Controller General of India कडे मागितली होती, पण काही कमतरता आढळली (ट्रयल भारतात झाल्या नाहीत - हे कारण तेव्हढेही मजबूत नाही) म्हणून नाकारली.... मग फायझरने अर्जच मागे घेतला....
https://www.hindustantimes.com/india-news/pfizer-seeks-emergency-use-aut...

चर्चा करुन कमतरता / सोडवता आली असती. १४० कोटी लोकांना लसी पुरविण्याचे दुसरे काही उपाय ( back up plan B, plan C) होते का ? नाही म्हणायला आरोग्य मंत्र्याने रामदेवासोबत कोरोनिलची जाहिरात केली होती.
कोरोनिल किंवा कोवॅक्सच्या कुठे चाचण्या झाल्या होत्या जेव्हा ते देणे सुरु केले होते ? clinical trials चे निकाल येण्याअगोदरच ते लोकांना देणे सुरुही केले होते... मग तोच न्याय फायझर ला का नाही लावला? ज्यांना शक्य आहे त्यांनी तर लसी घेतल्या असत्या...

आता इस्पितळे, आणि साधे ऑक्सिजन बद्द्ल काय लिहावे? केअर फॉर PM च्या फंडातून परवानगी दिली पण खरेदी करण्याची जबाबदारी केंद्राकडेच (आरोग्य खाते) ठेवली होती.... मग का नाही विकत घेता आले? अगदी पाणि नाकातोंडात गेल्यावरच अचानक एप्रिल मधे परवानगी.

केअर फॉर PM फंडातून विकत घेतलेले व्हेंटिलेटर्स चालत नाही, बंद पडतात... कुणी बनविली ? कुणाकडून विकत घेतली? कंत्राटदार कोण?

आज लोक कोरोनामुळे मरत नाही आहेत, तर बेडच मिळाला नाही, ICU मधे जागाच नाही आणि मिळाली तरी ऑक्सिजन मिळाला नाही... ट्रिटमेंटच नाही म्हणून मरत आहेत.

मेल्यानंतरही त्यांची सुटका होते का? नाही... स्मशानातही जागा नाही... तिथेही रांगा... दाह संस्कार परवडत नसणारे मग नदीमधे किंवा वाळू मधेच मृतदेहाला पुरवत आहे.... अगदी १- फुटावरच? कुत्र्यांना खाण्यासाठी ठेवले ? हे सर्व उघडकीला आल्यावर मोदी / भिस्त यांना स्वत: च्या इमेजची चिंता ?

आपल्या घोड चुकांमुळे रोज लाखो लोक मरत आहेत, त्यांच्या मृत्युला आपली नियोजन शून्यता कारण आहे हे सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ आहे.... चुका मान्य करणे राहिले दूर.... अशाही परिस्थितीत रडण्याचे नाटक कसे जमते?

उदय, यथा राजा तथा प्रजा आणि यथा प्रजा तथा राजा या दोन्ही गोष्टी सत्य असतात.
हे कोरोनाचं संकट ही येणाऱ्या इकॉलॉजिकल कोलॅप्सची नेट प्रॅक्टिस वाटते मला. ज्या वन टाईम नैसर्गिक आपत्तींची आपल्याला सवय आहे उदाहरणार्थ भूकंप, पूर, वादळ, ढगफूटी असे acute संकट हे असणार नाही. दुष्काळ ओला आणि सुका, रोगराई, प्रदूषण, तपमानवाढ या सारख्या chronic समस्या अधिकाधिक गंभीर होत जातील. Top down आणि bottom up हे दोन्ही approach या कोरोना काळात फेल गेलेले आपण पाहिले - जागतिक पातळीवर आणि देशाच्या किंवा राज्यांच्या पातळीवर देखील.
याचे मुख्य कारण failure of the system to recognize and give space and freedom for the expertise in the field to operate आहे.
सध्याचे केंद्र सरकार हे पर्यावरण रक्षण आणि संरक्षण या मुद्द्याला least priority किंवा de-prioritize करणारं सरकार आहे. तेव्हा आपण top down approach मध्ये सुरूवातीलाच पिछाडीवर आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. Bottom up approach अधिक पक्का करत राहणे मात्र आपल्या हातात आहे. Also, remember that we are just mitigating the situation. Prevention ची वेळ केव्हाच निघून गेली आहे. Reduce your consumption, be local and sustainable, and spread the word हा किमान bottom up approach आपण ठेवू शकतो.

अमेरिका सोडून योरप आणि इतर बहुतेक देशांच्या अगदी सर्वोच्च स्तरावरील राज्यकर्त्यांनीसुद्धा स्वतः सर्व नियम कठोरपणे पाळून जनतेसमोर आदर्श ठेवला. जनतेचे विज्ञाननिष्ठ प्रबोधन केले. सर्व शासनयंत्रणा आणीबाणीच्या काळातसुद्धा शिस्तशीरपणे आणि समतेने राबवली. वशिलेबाजी, भ्रष्टाचार, काळाबाजार, धमक्यांचे फोन ह्या गोष्टी रोग आणि रूग्णव्यवस्थापनात घुसू दिल्या नाहीत. लोकशिक्षण केले ;आणि नागरी नियम अंगवळणी पाडून घेतलेल्या समाजाने ते शिक्षण, नवीन नियम, नवीन वैद्यक चटकन आत्मसात केले.
आम्ही (आणि अर्थात आमचे नेते) अजूनही hunters & gatherers अशा भटक्या विमुक्त समाजव्यवस्थेतच अडकून राहिलो आहोत.
सुव्यवस्थित नागरी यंत्रणा म्हणजे काय, ती कशी चालवावी, त्यासाठी लोकांनी काय करायला हवे ह्याचे भान आपल्या समाजाला नाही. आम्ही झुंडीने जगतो, पाटील, मुखिया, ठाकूर, सरपंच ह्यांच्या तालावर नाचणे आम्हांला आवडते आणि भागही पडते.
etc etc etc etc etc etc etc etc etc etc etc etc etc etc

एका उत्तम अश्या लसीकरण केंद्रात रांगेतल्या लोकांसाठी अंतर सोडून खुर्च्या ठेवल्या होत्या. एकेकाने उठून आत जावे हे व्यवस्थित सांगितले गेले होते. लसीकरण सुरू होईपर्यंत लोक चुळबुळत का होईना बसले होते. पण ते सुरू होताक्षणी सगळ्या खुर्च्या धडाधड इतस्ततः ढकलून सगळ्यांनी क्यूबिकल बाहेर एकच गर्दी केली. अनेक क्यूबिकल्स होत्या आणि सिक्युरीटीचे लोक लोकांनी कुठे जावे ते ओरडून ओरडून सांगत होते. तरीसुद्धा दिसेल त्या पहिल्या कॅबिनसमोर धावण्याची शर्यत सुरू झाली. काही कॅबिन्स ओस पडल्या होत्या आणि एखाद दुसऱ्या माणसासाठी उघडलेले लशीचे बॉक्स लोकांची वाट पाहात होते. शेवटी बळाचा वापर करून लोकांना पांगवावे लागले. प्रचंड नाखुशीने, संतापाने, अन्यायग्रस्त भावनेने शेवटी लोक विखुरले. नाहीतर उघडलेल्या बॉक्समधले उरलेले डोस वाया गेले असते.
ह्या सगळ्यांमध्ये सुरक्षित अंतराची ऐशी की तैशी झाली हेवेसां नलगे.

जिज्ञासा - सहमत आहे...
(जेव्हा) दोष फक्त लोकांनाच दिला जातो (आणि मोदी / भिस्त यांच्याबद्दल चकारही नसतो) तेव्हा वाईट वाटते.... कोरोनाबद्दल आजुनही आपल्यला पुर्णपणे आकलन झालेले नाही आणि तो नियंत्रणांत आला आहे अशी वाटण्याची परिस्थिती पण नाही आहे. दुसरी/ तिसरी लाट ओसरल्यावरही सावध रहायलाच हवे.

परिस्थिती गंभिर आहे... पण जे काही करता येण्यासारखे आपल्या नियंत्रणांत आहे ते केल्यास दाहकता नक्की कमी झाली असती.

<< ह्या सगळ्यांमध्ये सुरक्षित अंतराची ऐशी की तैशी झाली हेवेसां नलगे. >>

------ बस पकडण्यासारखे आहे... सर्वांनी रांगेत उभे राहिले, तर कमी वेळांत सर्व लोक बस मधे प्रवेश करतात, असा मला अनुभव आहे.
पण पाच लोक एकाच वेळी बसमधे प्रवेश करण्याचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा संपुर्ण प्रवेशाचा रस्ताच बंद होतो.

अशी परिस्थिती का आणि केव्हा होते? सर्वांनाच वॅक्सिन मिळणार आहे यावर त्यांचा विश्वास नाही. लोकांना शिस्त असायला हवी, त्यांचे असे वागणे चुकत आहे. केंद्र हाताळणारांनी लोकांची अशी मानसिकता समजायला हवी... आणि त्यावर काय उपाय योजता येतिल जेणेकरुन असा गोंधळ होणारच नाही.

विज्ञाननिष्ठ आणि नागरी भान असलेली समाजव्यवस्था इथे नाही. तशी ती उभारण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट समाज जसा आहे तसाच रहाण्यात शासनाला फायदा दिसतो आहे असे वाटू लागले आहे.

फोलपणा कशाने आणि कुणाला कळाला ?

मी लहान असताना आम्ही दरिद्री मधे मोडत होतो. तिथून दोन वेळचं खायला मिळणे इथपर्यंत प्रगती झाली. या ब-याच मोठ्या कालखंडात आम्ही सरकारी दवाखान्यावर अवलंबून असायचो. गंभीर आजार असेल तर जिल्ह्याच्या, शहराच्या ठिकाणी धाव घ्यायची. मी स्वतः दोन वर्षांचा असताना काविळीतून वाचलो. पण माझ्या आजूबाजूच्या काहींची मुलं कावीळ व अन्य आजारांनी गेली. त्या वेळी सरकारी रूग्णालयात माझा नंबर लागला. ज्यांचा लागला नाही त्यांना पैशाअभावी मृत्यू सहन करावा लागला.

दुसरीकडे पैसे असल्याने खासगी हॉस्पिटल्समधे जाऊन आजारांवर मात करणारे लोक होते. आपण सुरक्षित आहोत ही भावना त्यांच्यात होती. रहायला सुरक्षित जागेत , सुरक्षा व्यवस्था असलेले घर यामुळे दंगल किंवा अशा वेळीही आपण सुरक्षित आहोत असे वाटत होते. कालांतराने मी या वर्गात सामील झालो. या सुव्यवस्थेचे पैसे चुकवण्यात काम करण्यात बिझी झालो. माझ्याकडे गावाकडचे थोडे लांबचे असलेले नातेवाईक वगैरेंच्या मंगलकार्यात जायला वेळ उरला नाही. पण दुं:खात जात होतो. हळू हळू ते ही कमी झाले. माझ्या मुलांना, बायकोला मी सुरक्षित ठेवू शकत होतो. मी चारचाकी वाहनात प्रवास करत असल्याने सायकलवर जाणारे, दुचाकीवर जाणारे यांच्या मृत्यूबद्दल काही वाटेनासे झाले. काही काळाने मनाने या नोंदी स्विकारणे बंद केले. माझे एक जग निर्माण झाले. या जगात होणा-या दु:खद घटना तुलनेने कमी होत्या.

बाहेरच्या जगातही रोज उठून कुणी घाऊक संख्येने मरतंय असे नव्हते.
मात्र कोरोनाने अनेक वर्षांनी माझ्या सुरक्षित जगाला तडा दिला. या आधीच्या ज्या महामा-या होत्या त्याला जमाना झालेला होता. सुदैवाने अलिकडच्या काळात आलेल्या काही महामा-या माझ्यापर्यंत आल्या नाहीत. किंवा लस आल्यानंतरच त्या आल्या. स्वाईन फ्ल्यु माझ्या जगापर्यंत आला नाही. त्या आधीच लस आली. पण अनेक ठिकाणी स्वाईन फ्ल्युने तांडव केले. मात्र अशी भीती कधी वाटली नाही.

कोरोनाने पहिल्यांदाच वर्षात जितके मृत्यू होतात ते एका लाटेत खूप कमी कालावधीत दाखवले. त्यामुळे भीती आहे. कोरोनाचा इलाज नाही हे भीतीचे कारण आहे. अत्यंत कमी कालावधीत रूग्ण वाढल्याने खासगी हॉस्पिटल्समधेही बेड मिळत नाही अशी स्थिती आहे. ही स्थिती सरकारी हॉस्पिटल्समधे आर्थिक स्थितीनुसार रोजची आहे. ती मला अनेक वर्षांनंतर भोगावी लागतेय. माझ्यासहीत अनेकांना. त्यामुळे मनातल्या सुरक्षिततेला तडा गेला. माझ्या बायो बबल मधे मृत्यूने शिरकाव केला आहे. त्यामुळे भीतीने लॉकडाऊन केला गेला. लॉकडाऊन मुळे अनेक गोष्टींसाठी आपण कित्येकांवर अवलंबून आहोत याचा साक्षात्कार झाला. तर किती अनावश्यक गोष्टींच्या आहारी जाऊन आपण त्यासाठी पैसे मोजतो आणि तेच पैसे कमावण्यासाठी वेळ खर्च करतो याची जाणिव होतेय.

शेवटी ही लाटच आहे. कोरोनावर औषध आले की सगले सुरळीत होऊन ही फोलपणाची चर्चा फोल होईल. पुन्हा माझ्या बबलच्या बाहेर लोक मरत राहतील. अपघात, युद्धे, दंगली, महापूर, चक्रीवादळे अशा कारणांनी मृत्यू होतच राहणार. मृत्यू तितकेच राहणार. फक्त त्याची टाईमफ्रेम जास्त असल्याने धसका कमी असेल. ते त्या त्या भौगोलिक परिस्थितीत आहेत, माझ्या बबलमधे मला धोका नाही याची मला जाणीव असेल. मग पुन्हा मी नेहमीप्रमाणेच माझे रूटीन फॉलो करेन.

पा आ, तुमचा प्रतिसाद, त्यातली बबल ची संकल्पना अगदी शब्द न शब्द पटली.
आणि असे बबल आपण स्वतःभोवती तयार होऊ दिले याची भीतीही वाटली.

जेव्हा सिस्टिम्स फेल व्हायला लागतात तेव्हा असे बबल फुटायला सुरूवात होते. माझ्याकडे पैसे आहेत, माझ्या चार ओळखी आहेत पण तरीही जेव्हा हवा असलेला अॉक्सिजन, औषधं किंवा लस मिळू शकत नाही तेव्हा हे सिस्टीम फेल्यूअर झालेले असते. आता या महामारीत आपण पाहिले की माणसांनी उभ्या केलेल्या काही सिस्टीम्स फेल झाल्या. अशावेळी आपल्याला असं वाटतं की हे फेल्यूअर टाळता आलं असतं तर! पण जेव्हा निसर्गाची सिस्टीम फेल व्हायला लागेल तेव्हा कोणतेच बबल्स टिकणार नाहीत. आज लस नाही, औषधं नाहीत ही समस्या आहे - उद्या पाणी नाही, अन्नधान्य नाही, रोजचे हवामान एवढे उष्ण आहे की माणसाच्या शरीरात असलेली नैसर्गिक यंत्रणा काम करत नाही अशा समस्या असणार आहेत. त्यावेळी काय करणार आहोत आपण? विचार करा कारण ती वेळ तुमच्यावर नाही पण कदाचित तुमच्या मुलांवर किंवा नातवंडांवर येणार आहे. पृथ्वीवरचे रिसोर्स लिमिटेड आहेत आणि आपण त्यांचा इतका विनाश करतो आहोत की परिस्थिती पूर्ववत होणे काही ठिकाणी अशक्य आणि काही बाबतीत फार कठीण होत चालले आहे.
पेपरमध्ये एका बेटावरच्या माकडांची गोष्ट आली होती की संकट आलं तेव्हा त्यांच्यातल्या सामाजिक एकोप्याने त्यांना संकटाचा सामना करायला मदत केली. आपल्याला या संकटाचा सामना करायचा असेल तर निसर्गाशी फटकून वागणं कमी करायला लागेल. केवळ माणसांमधला आपसांतला एकोपा वाढून उपयोग नाही. निसर्गाची हानी = माणसाच्या अस्तित्वाला धोका हे समीकरण जोवर आपल्या प्रत्येक कृती आणि विचारामागे असणार नाही तोवर आपण योग्य दिशेने वाटचाल करत नाहीओत असं समजा.

पारंबीचा आत्मा खूप छान प्रतिसाद

वर काही प्रतिसादात भारतीयांच्या किमान बुद्धीमत्तेवर घेण्यात आलेली शंका मलाही खटकली. किंबहुना त्यातील भारतीय हा शब्द खटकला.

सामान्य भारतीय लोकं सामान्य बुद्धीमत्तेची असतील. पण देश चालवणारेही सामान्य बुद्धीमत्तेचे निवडून दिलेत का आपण? दोन लाटांच्या मध्ये जर सरकार क्रिकेटच्या सामन्यांना हजारो प्रेक्षकांना येऊ देत असेल, कुंभमेळे आयोजित करायला परवानगी देत असेल, निवडणूकांच्या प्रचार सभा आणि मोर्चे बिनदिक्कत प्रचंड गर्दी करत पार पडत असतील तर ते पाहून सामान्य जनतेच्या मनातील कोरोनाचे गांभीर्य नाहीसे होणे स्वाभाविकच आहे.
कुठलाही सामान्य माणूस मग तो माझ्यासारखा कधी स्कूलमध्ये सायन्स वायन्स न केलेला सुमार बुद्धीमत्तेचा असो की एखादा अभ्यासू पोस्ट लिहिणारा कुशाग्र बुद्धीमत्तेचा असो, आपल्याला कोणालाच कोरोनाचा विषाणू नेमका काय किती घातक आहे आणि त्यापासून नेमके कसे वाचावे याचे उपजत ज्ञान नाहीये की आपण प्रयोगशाळेत जाऊन त्यावर प्रयोग केले नाहीयेत. आपल्या हातात ईतकेच आहे की सरकारवर विश्वास ठेऊन त्यांच्या सूचना आणि त्यांचे आदेश फॉलो करावेत. जे आजवर कुरकुर न करता केले आहेत. सरकारने जेव्हा जेव्हा जे निर्बंध लादलेत ते पाळले आहेत. कडक लॉकडाऊन लागला तेव्हा घरातच बसलो आहोत. गार्डन खुली झाली तसे मोकळ्या हवेत श्वास घ्यायला बाहेर पडू लागलो. पुन्हा बंद झाली तसे पुन्हा घरी बसू लागलो. पण आपल्याला घरात डांबून जर आपल्या सोयीने आणि फायद्याने प्रशासनच नियम गुंडाळून ठेवत असेल तर लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होणे स्वाभाविकच आहे.

आणि पाश्चात्य जगातली लोकंही काही फार प्रगल्भ आहेत असे नाही. आठवा जेव्हा कोरोना नुकताच थैमान घालू लागलेला आणि तिथे लॉकडाऊन लागलेले तेव्हा त्यांच्याकडे कित्येक ठिकाणी या विरोधात निदर्शने झाली होती. पण आपल्याला त्याचेही कौतुक की त्या लोकांना आपल्या व्यक्तीस्वातंत्र्यावर असा घाला आवडत नाही वगैरे Happy

ऋन्मेष, इतर देशातल्या लोकांच्या बुद्धीमत्तेशी मला तितकं घेणंदेणं नाही जितकं मला माझ्या देशातल्या लोकांच्या बुद्धीमत्तेशी आहे. त्यामुळे मी भारतीय लोकांच्या बुद्धीमत्तेविषयी बोलणं मला गैर वाटत नाही.
भारताची लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनं यांचं आधीच असलेलं व्यस्त (inverse) प्रमाण, यामुळे आपल्या कशाबशा पुरेशा पडणाऱ्या व्यवस्था एकीकडे आणि दुसरीकडे आपलं भौगोलिक स्थान आणि जगात होणाऱ्या बदलांविषयी असलेले अंदाज (tropics becoming more affected and India being a tropical/subtropical country, predicted increase in sea levels and 3 of 4 India's major metro cities being coastal - Mumbai, Kolkata, and Chennai) -
हे सगळं पाहून मला वाटणारी चिंता अनाठायी नाही.
संपादित*
मजकूर अनेक पातळ्यांवर योग्य वाटला नाही म्हणून डिलीट केला आहे. सॉरी.

पारंबीचा आ त्मा, प्रतिसाद आव डला!
जि ज्ञासाचे ब हुतेक प्रतिसाद आवडले, मात्र -
जिज्ञासा, आपल्याकडे जे झाले ते चुकच आहे, पण रुन्मेश चे म्हणणे मला पटले.

तू ज्या आगामी संकटां बद्दल बोल ते आ हेस त्याचा जगभराचा स्रोत आपल्याकडचा नाही..
मी सोसायटीच्याच केस स्टडीसाठी मागे वर्ल्ड बँकेचा डेटा अ‍ॅनॅलाईज केलेला.

आपली लोकसंख्या आणि अमेरिकेची कमी असलेली लोकसंख्या लक्षात घेऊनही त्यांचे एकूण कार्बन एमिशन आणि आपले कार्बन एमिशन ह्यात भरपूर तफावत आहे. आपले बदललेले रहाणीमान लक्षात घेऊनही... (अर्थात हे ४-५ वर्षापूर्वीचे सांगतेय). अर्थातच ही तफावत अर्बन क्लास मुळे नाही तर आपल्याकडे असलेल्या अन्डर्प्रिविलेज्ड क्लासच्या मोठ्या संख्येमुळे तयार झालेली आहे.

इथेही लोकं संधी मिळाली की आहे त्या लाईफस्टाईल क डे जायचा विचार करताहेत.

दुसरं उ दाहरणः
आपला अस्वच्छ दिसणारा देश आणि अतिशय स्वच्छ दिसणारा आणि त्याकरता पॅसिफिक मधे कचरा सोडून तिथल्या मायग्रेशन कॉरिडोरवर आणि पर्यायाने सगळ्याच मरिन स्पिशिज वर प रिणाम करणारा देश - ह्यात कोण शहाणं आणि कोण नाही हे कसं ठरवणार?
तिथे घाण दिसत नसल्याने अनेक महाभागांना आ पण कसे "होलिअर दॅन दाऊ" वाटते हे अनुभवले आहे.

इथेच, मी मागे दिलेल्या गिरीष राऊंताच्या धाग्यावर जाऊन एक्स्टिंक्शन झाले तरी बेहत्तर असे प्रतिसाद आहेतच.

आय थिंक वी आर गेटिंग वॉट वी आर क्रिएटिंग फॉर आवरसेल्वज!
खूप वाईट वाटत रोज माणसं मरताना ऐकताना. घरातून बाहेर पडता येत नाही म्हणून माझी फार तगमग होत होती गेल्या काही दि वसात (तसेही आम्ही खूप फिरत नाही, पण हे माणसांशी संपर्क नसणे फार बेक्कार आहे ...) तेव्हा प्रकर्शाने जाणवले की आपल्यामुळे (माणसामु़ळे) जेव्हा बाकीच्या प्राण्यांचे हॅबिटॅट्स, कॉरिडॉर्स, अन्नसाखळी नाहीशी होते तेव्हा त्यानाही ह्याच वेदना असणार आहेत.

नानबा, या कोरोनाने मला झालेला सर्वात मोठा साक्षात्कार काय असेल तर जग हे किती अन्यायकारक आहे हा! करावे तसे भरावे म्हणतो आपण पण तसं कधीच होत नाही खऱ्या आयुष्यात. आत्ताही लसीकरणाच्या बाबतीत आपण खूप मागे राहतोय प्रगत देशांच्या तुलनेत. तिथल्या नागरिकांचा बुद्ध्यांक किती कमी जास्त असला तरी त्यांच्याकडे दरडोई जास्त रिसोर्सेस आहेत त्यामुळे सगळ्याच गोष्टी सोप्या होतात.
जितकं प्रदूषण अधिक तितका पर्यावरण बदलाचा फटका अधिक असा सरळसोट न्याय असता तर मग भारतीयांना किंवा कोणत्याही विकसनशील देशाला ही लढाई सोपी असली असती. पण तसं होणार नाहीये. दुर्दैवाने जे विकसनशील देश आहेत ते बहुतेक सगळे विषुववृत्ताच्या अलीकडे पलीकडे आहेत आणि ह्या भागाला हवामानबदलाचा अधिक फटका बसणार आहे.
जेव्हा आपल्याकडे शक्ती कमी असते तेव्हा मग संकटाशी लढायला युक्ती कामी येते. आता जर देशातली जनता हुशार असेल तर युक्तीने आपला बचाव करेल. कोरोनाच्या काळात आपण काय पाहीलं? आपल्या मूर्खपणाचे प्रदर्शन करण्याची जणू चढाओढ सुरू आहे Sad यात कोणीच अपवाद नाही.
मग आपण येणाऱ्या अवघड काळात कसे काय टिकाव धरू हा मला पडलेला प्रश्न आहे. माझा एक भाबडा आशावाद होता की गावातली माणसं ही फार शिकलेली नसली तरी त्यांच्याकडे एक शहाणपण असतं. गावाकडचा भारत संकटात पटकन जुळवून घेतो. पण माझी ही समजूत पार मोडीत निघाली आहे.

तेव्हा प्रकर्शाने जाणवले की आपल्यामुळे (माणसामु़ळे) जेव्हा बाकीच्या प्राण्यांचे हॅबिटॅट्स, कॉरिडॉर्स, अन्नसाखळी नाहीशी होते तेव्हा त्यानाही ह्याच वेदना असणार आहेत. >> profound thought! Never thought of it this way. मला ही जाणीव करून देण्यासाठी धन्यवाद!

नानबा अगदी पटणारा प्रतिसाद. मानवामुळे निसर्गात इतकी ढवळाढवळ झाली आहे की इतर प्राणी-पक्षी-कीटक यांच्या अधिवासावर किती अतिक्रमण झालं आहे अन त्यामुळे त्या प्राण्यांना-पक्षांना काय वेदना होत असतील हे आपणाला लॉकडाऊनमुळे कळले असं आता पटू लागलं आहे.

मानवामुळे निसर्गात इतकी ढवळाढवळ झाली आहे की इतर प्राणी-पक्षी-कीटक यांच्या अधिवासावर किती अतिक्रमण झालं आहे अन त्यामुळे त्या प्राण्यांना-पक्षांना काय वेदना होत असतील
>>>>>>>>>>
मानवाला आपल्या पुढच्या पिढीत आपल्याच वंशजांना यामुळे काय वेदना होणार आहेत हे कळत नाही तर प्राण्यांच्या वेदना काय कळताहेत. एखादे हरणाचे पिल्लू कुठे खड्यात पडले तर तेवढ्यापुरते भूतदया जागृत होते..
मागे आरेच्या धाग्यातही हाच विषय होता. पण पाचशे झाडे तोडली तर हजार लाऊ कुठेतरी असे म्हटले की आपला विकासाचा मार्ग मोकळा. अधिवासाची वा निसर्गाच्या साखळीची संकल्पना कश्याला कोण लक्षात घेतेय. शेवटी आपले राजकारणही विकासाचेच चालते.

>>मानवाला आपल्या पुढच्या पिढीत आपल्याच वंशजांना यामुळे काय वेदना होणार आहेत हे कळत नाही तर प्राण्यांच्या वेदना काय कळताहेत. एखादे हरणाचे पिल्लू कुठे खड्यात पडले तर तेवढ्यापुरते भूतदया जागृत होते.. >> +१
जन पळभर म्हणतील हाय हाय! आप्त-स्वकीय काय किंवा इतर कोणी प्राणी मेले काय, अगदी नामशेष झाले... तरी माणसाला किंवा कुठल्याच प्राण्याला/ त्यांचा समूहाला तात्कालिन वेदना सोडल्या तर फार काही फरक पडत नाही. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून उत्तम जीवन जगणे, आनंदात जीवन जगणे हे हार्डवायर्ड आहे. जे याहुन वेगळं काही करतात त्यांना आपण मनोविकार ट्रिटमेंट देतो. जे आहे ते स्विकारुन पुढे जा हा आपण बेस्ट पाथ ठरवला म्हणून इथवर आलो.
पृथ्वीचा विनाश होणारे बेंबीच्या देठापासून ओरडले तरी कमीतकमी तोशिष पडता जे काय करता येईल तितपतच सगळ्या देशातील माणसे करणार. 'पुढे ढकलणे' हे माणसाचा स्थायीभाव आहे हे मला कळून चुकले आहे. फार डोक्याला ताप न करुन घेता मी ही आनंदात जीवन जगायचं ठरवले आहे. जे होईल ते वेळ आल्यावर बघू. ते टाळता येणारच नाहीये हे जर विज्ञान सांगतंय तर आजच्या झोपेचं खोबरं कशाला करा? आपण रिस्पॉन्सिबली जगायचा प्रयत्न करा, पण त्याला पायदळी तुडवत जर कधी आनंद मिळणार असेल तर त्याला कधीमधी पायदळी तुडवायला मागे पुढे पाहू नका. शेवटी आनंद सगळ्यात महत्त्वाचा. पर्स्युट ऑफ हॅपिनेस.
शेवटच्या घटका आल्या तर या आनंदाच्या आठवणी साथ करतील, ना की आपण किती पर्यावरण प्रेम दाखवले त्या. हार्श वाटेल, पण इट इज व्हॉट इट इज. दोघांचा मेळ जमला तर तो उत्तम. पण तो मेळच असणार आहे, पर्यावरण रक्षण _नाही_. मी आज श्वास जरी घेतला तरी माझ्या लाईफ स्टाईलने पर्यावरणाची हानीच होणाही, आणि ऑफ द ग्रिड जगण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही.

अमितव, पर्यावरणस्नेही जगणे म्हणजे आनंदाचे जगणे नाही हा एक मोठ्ठा गैरसमज तुझ्या पोस्टमधे दिसतो आहे. एकीकडे व्यक्ती स्वातंत्र्य, empathy, human rights च्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे प्रत्यक्षात जगताना मात्र फक्त आपले "सो कॉल्ड" आरामाचे आयुष्य जगण्याचे राईट्स आपल्याला कसे मिळतील एवढेच पहात रहायचे यातला विरोधाभास जाणवायला लागला की मग खरा आनंदाचा प्रवास सुरू होतो. When you start striving for sustainable life you gain far more happiness than when you are driven by the capitalist manifesto. पृथ्वीवरच्या इतर सजीव निर्जीव सृष्टीला धोका न पोहोचवता एक उत्तम आनंदी, आरोग्यपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगता येतं हेच जर लक्षात आलं नाही तर मग अजून काही तरी मिसिंग आहे.
On the grid आहात की off the grid याने फारसा फरक पडत नाही - consumption किती ते महत्त्वाचे!

आपल्या श्वास घेण्याने पर्यावरणाची हानी होत नाही. पृथ्वीची एक carrying capacity आहे ज्यात सजीवाच्या गरजा या चक्राकार पद्धतीने पूर्ण होतील अशा संरचना विकसित झाल्या आहेत. त्यामुळे हा गिल्ट बाळगणे चुकीचे आहे की मी श्वास घेतला तरी मी प्रदूषण करतो. You are a part of the carbon cycle. Therefore, you must breathe out carbon dioxide.
There is always enough for everybody's needs but not for everybody's greed.

एकीकडे व्यक्ती स्वातंत्र्य, empathy, human rights च्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे प्रत्यक्षात जगताना मात्र फक्त आपले "सो कॉल्ड" आरामाचे आयुष्य जगण्याचे राईट्स आपल्याला कसे मिळतील एवढेच पहात रहायचे यातला विरोधाभास जाणवायला लागला की मग खरा आनंदाचा प्रवास सुरू होतो.
"सो कॉल्ड" आरामाचे आयुष्य जगल्यानेच empathy, human rights किंवा पर्यावरणाला कसा धोका पोचतो किंवा कार्बन फुटप्रिंट वाढतो हे जरा विस्कटून सांगाल का?
माझा एक भाबडा आशावाद होता की गावातली माणसं ही फार शिकलेली नसली तरी त्यांच्याकडे एक शहाणपण असतं. गावाकडचा भारत संकटात पटकन जुळवून घेतो. पण माझी ही समजूत पार मोडीत निघाली आहे.
असं सरसकटीकरण करता येतं? अशा स्विपिंग स्टेटमेंट देण्या अगोदर कोणत्या अनुभवा मुळे हा निष्कर्ष काढला ते पण सांगा. आधी तुम्ही अमेरिकेचा संदर्भ घेत भारतीय लोक कसे बेजबाबदार आहेत हे सांगितले. मग कुणीतरी ते खोडुन काढल्यावर आता गावातल्या लोकांच्या शहणपणावर शंका घेताय. एवढ्या सगळ्या लोकांना जबाबदार धारायच्या आधी तुम्ही स्वतः पर्यावरणासाठी नक्की काय करताय ते पण सांगा म्हणजे भारतातील गावाकडची शहरातली माणसे त्याचे अनुकरण करू.

Pages