Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज साडेनऊ हजार प्रॉफिट झाले, PE चा स्टॉपलॉस हिट होऊन.
आज बजेट लक्षात नव्हते, नाही तर एक लॉंग स्ट्रेडलपण घेतला असता.

तुम्ही एक नोट केले का?
गेल्या शुक्रवार पासून volatiliy जास्त आणि ATM प्रीमियम आजही सकाळी ७०० च्या घरात होते. त्यात ७५ स्टॉपलॉस म्हणजे फक्त १०% च.

हो.
ह्या विकली एक्सपायरीचे प्रिमियम त्याच रेंज मधे होते.

या महिन्याचे Intraday Banknifty Straddle चे रिपोर्ट कार्ड

नफा:- ३१,५३८/- ( एक लॉट ट्रेड करुन व ब्रोकरेज वजा करुन)

यात मला खरे तर २५,७३८/- नफा झाला कारण आज माझी पुटची ऑर्डर एक्झिक्युट झालीच नाही. एकच ऑर्डर एक्झिक्युट झाली आणि तिचा स्टॉप लॉस हिट झाला. वर दिलेला नफा ती ऑर्डर जर एक्झिक्युट झाली असती तर झालेला नफा आहे.
मागच्या महिन्यात पण एक दिवस असाच गेला.

या महिन्यात मी मध्येच एक ऐवजी दोन लॉट्स शॉर्ट करणे सुरू केले.

फक्त एक लॉट शॉर्ट केला असता तर नफा: 32500
एकुण नफा (काही दिवस दोन लॉट्स शॉर्ट केले ते धरून): 38700

यातून ब्रोकरेज वजा केले नाही.
सेटअप आधी सारखेच.

गेले काही दिवस volatility एवढी आहे की short straddle चे रोज दोन्ही स्टॉप लॉस हिट होताहेत.

माझ्या सेट अपचा Historical Max loosing streak ४ आहे. गुरूवार नफ्यात गेला. शुक्रवार, सोमवार आणि आज स्टॅाप लॅास हिट झाला. सलग ८-१० वेळा स्टॅाप लॅास हिट झाला तर काय करायचे ते विचार करावा करावा लागेल.

गेले काही दिवस दोन्ही स्टॉपलॉस ११:३० च्या आत हिट झाले की मी ती मूव्ह पूर्ण झाली असे वाटले त्या नव्या स्पॉटच्या ATM ला परत पेपर ट्रेड एंट्री घेतली. लॉस थोडा ते बऱ्यापैकी रिकव्हर झाला (एकदा पूर्ण रिकव्हर झाला.) असे एकुण ८ वेळा सलग झाले. काल मग खरंच तशी रीएंट्री घेतली तेव्हा मात्र त्याचेही दोन्ही स्टॉपलॉस हिट झाले. Proud

याचे बॅकटेस्टिंग नाही करता येणार पण.

अजून एक विचार आला की यात जरा टेक्निकल ऍनालिसिस वापरायचं का? म्हणजे ते अगदी ठसठशीत असेल तर.
जसे गॅप ओपनिंग मोठे आहे आणि त्यात गॅप फिल झाली. (यात एकाचा स्टॉपलॉस हिट होऊन दुसरा चांगला नफा देत असतो.) आणि मोठी मूव्ह होऊन डबल टॉप किंवा डबल बॉटम गाठले. अशा वेळी ३:२० पर्यन्त न थांबता बाहेर पडायचे. याचेही बॅकटेस्टिंग नाही करता येणार.

गेले काही दिवस दोन्ही स्टॉपलॉस ११:३० च्या आत हिट झाले की मी ती मूव्ह पूर्ण झाली असे वाटले त्या नव्या स्पॉटच्या ATM ला परत पेपर ट्रेड एंट्री घेतली. लॉस थोडा ते बऱ्यापैकी रिकव्हर झाला (एकदा पूर्ण रिकव्हर झाला.) असे एकुण ८ वेळा सलग झाले. काल मग खरंच तशी रीएंट्री घेतली तेव्हा मात्र त्याचेही दोन्ही स्टॉपलॉस हिट झाले. Proud
याचे बॅकटेस्टिंग नाही करता येणार पण.>>>>

येऊ शकेल

जसे गॅप ओपनिंग मोठे आहे आणि त्यात गॅप फिल झाली. (यात एकाचा स्टॉपलॉस हिट होऊन दुसरा चांगला नफा देत असतो.) आणि मोठी मूव्ह होऊन डबल टॉप किंवा डबल बॉटम गाठले. अशा वेळी ३:२० पर्यन्त न थांबता बाहेर पडायचे. >>>>

डबल टॅाप किंवा डबल बॅाटम कोड लिहिणे ट्रिकी आहे. बाकी शक्य आहे.

हम्. मी डेटा घेण्यास पाच सहा जणांना मेल केले.
पण एकही ऑफर आली नाही (भलतीच ऑफर घेऊन मात्र दोन जण मागे लागले होते.) तेव्हा अजुन स्टॉकमॉक वापरतोय पॉईंट्स शिल्लक आहेत तोवर.

या महिन्याचे Intraday Banknifty Straddle चे रिपोर्ट कार्ड

तोटा- ३१,४६१/- ( एक लॉट ट्रेड करुन व ब्रोकरेज वजा करुन)

या महिन्यात तीन वेळा एकच ऑर्डर एक्झिक्युट झाली. त्यामुळे तोटा जास्त आहे. जर त्या तीन ऑर्डर एक्झिक्युट झाल्या असत्या तर बहुतेक नफा १५,०००/- च्या आसपास राहीला असता.

या महिन्याचे Intraday Banknifty Straddle चे रिपोर्ट कार्ड
तोटा- ४७९४/- ( एक लॉट ट्रेड करुन व ब्रोकरेज वजा करुन)

तुम्ही ज्या वेळी ट्रेडिग करता त्या वेळी कोणता सेटप वापरता ...

एका वेळी कश्या कश्या वर नजर ठेवता ?

मला ५ चर्ट पहावे लगतात ....

तरीही सध्या स्काल्पिन्ग वर गाडी आहे
१०के वर ३०० प्रो.

Pages