Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज मार्केट फार वाढत नव्हते
म्हणून उद्याच्या एक्सपायरीचा 42000 चा कॉल 55 ला शॉर्ट केला
आजच 15 रु झाला म्हणून बाय केला , 3 लॉट , 2800प्लस

मंथली शॉर्ट स्ट्रेडलमध्ये एडजस्टमेंट करण्यापेक्षा , कट ऑफ लेव्हलला आले की लॉस बुक करून नवीन स्ट्रेडल इनिशिएट करायचे,

38000 चे स्ट्रेडल 40000 ला आल्यावर 8000 लॉस बुक करून नवीन सुरू केले असते तर आज त्यात प्रॉफिटमध्ये आलो असतो.

सगळ्यात आधी गुरुवारी नाहीतर शुक्रवारी एक शॉर्ट स्ट्रँगल करायचा. समजा १८००० मार्केट आहे तर १८००० चा PE आणि CE शॉर्ट करायचा आता समजा तर पुढच्या दोन तीन दिवसात वाटलं प्रकरण हाताबाहेर जातंय तर ज्या बाजूला मार्केट गेलंय समजा १८२५० च्या आसपास मार्केट गेलं तर प्रॉफिट मध्ये असणारा PE बुक करायचा आणि १८००० च्या CE चा त्यावेळी जो काय प्रीमियम असेल त्याच प्रीमियमचा PE शॉर्ट करायचा म्हणजे एक मोठ्या रेंजचा स्ट्रॅडल तयार होईल आणि आपलयाला पुढच्या एक दोन दिवसात १००० च्या आसपास प्रॉफीटमध्ये बाहेर निघता येईल.

नाही समजले

इतक्या मोठ्या प्रीमियमचा पुट ऑप्शन म्हणजे नेमका कितीचा?

18000 चा सीई पिइ मिळून समजा 400 प्लस 400 , 800 होते

मार्केट 18300 गेल्यावर लगेचच कॉल समजा 700 झाला

पुट 300 होता, तो 100 पॉईंट नफ्यात बुक केला

आता कॉल 700 आहे , तर 700 चा पुट म्हणजे कुठला ? कॉल डीप आयटीएम होऊन बसला आहे , तर मग 700 चा पुटही तितकाच आयटीएम असणार

मला वाटते , 18500 वगैरेचा पुट असेल तो,

मग जे होईल ते शॉर्ट स्ट्रेडल होणार नाही, ते शॉर्ट गट होऊन बसेल. रेंज मध्ये फरक पडणार नाही, उलट पुट कडची बाजू अजून वर येईल, long कडचीपण जास्त वर जाणार नाही , कारण तो पुट त्याच्या ऑलरेडी वरचाच असणार आहे

तुम्ही बरोबर बोलताय कायतरी घोळ झालेला दिसतोय माझ्या स्ट्रॅटेजीत. या आठवड्यात परत सिम्युलेशन करायला पाहिजे. मी सोमवारी 18050 CE आणि 18150 PE चा कॉल शॉर्ट केला. मार्केट तेव्हा 18000च्या आसपास असेल. आज मार्केट वर गेलं तेव्हा 18150 PE प्रॉफिट बुक केला आणि 18550ची नवीन पोझिशन घेतली.
IMG_20211027_171525.jpgIMG_20211027_171542.jpg

Adjustment मुळे गट gut झाले आहे

आयटीएम कॉल व आयटीएम पुट शॉर्ट झाले आहे व प्राईस मध्ये आली आहे , पण स्ट्राईक मध्ये गॅप आहे 2100 व प्रीमियम आहे 2200 Proud

म्हणजे प्राईस अशीच मध्ये राहिली तर 100 पॉईंट , 2500 रु नफा

1 शॉर्ट लेग आधी उडवून 12500 नफा आला आहे

dead-cat-bounce-2008_big.jpg

तीन दिवसांपूर्वी निफ्टी फ्युचर शॉर्ट, हेज १८००० कॉलने.
आज सकाळच्या डिप मध्ये मग १८००० चा १७५०० लेग चेंज केला जर मार्केट उलटे फिरले तर प्रॉफिट प्रोटेक्ट करायला.
हेच रिलायन्स मध्ये केले, आधी २६०० कॉलचा हेज होता तो २५०० चा केला होता सकाळी. सकाळी १६ हजार प्रॉफिट होते.

दुपारी मग परत डिप येऊन मार्केट अजून खाली जात नाही असे दिसले. तेव्हा प्रॉफिट बूक केले, 2:15 ला.

स्टॉपलॉस vs हेज: हेज मध्ये ४०-५०% प्रॉफिट निघते. आणि मूव्ह मोठी पाहिजे १.५ % तरी, नाहीतर प्रॉफिट निघत नाही.
मूव्ह जेवढी मोठी तेवढी प्रॉफिटची टक्केवारी हळूहळू वाढत जाते.

पण हेच जर हेज ऐवजी स्टॉपलॉसने केले असते हेज मध्ये जेवढी रिस्क होती तेवढी ठेवून तर परवाच स्टॉपलॉस हिट झाला असता, हाती धोपटणे आले असते.

तुमचे धोपटणे , आमचे gutणे

आमच्या सखाराम gutणेला दोन्हीकडून बोळा लावायचा आहे, काय करावे ?

दोन महिने हातात पैका नसणार, घराची जीएसटी भरायची आहे.

मार्केट करेक्शन मोड मध्ये, वर खाली होतेय. तेव्हा सध्या कॉल/पुट विकणे थांबवले.
मार्केट वर आले की शॉर्ट ट्रेड्स घेतोय.
आज परत निफ्टी फ्युचर आणि रिलायन्स फ्युचर शॉर्ट करून अनुक्रमे 17600 CE आणि 2400 CE ने हेज केले. रिस्क अनुक्रमे 6500 आणि 4500 एक्सपायरीला. त्याआधी मूव्ह बघून exit झाल्यास रिस्क याच्या 50-60%.

आज एक स्प्रेड केले.

मार्केट 39200 ला होते , म्हणून 38500 चा 3 नोव्हेंबर चा कॉल शॉर्ट केला आणि 11 नोव्हेंबर चा बाय केला.

ओपस्त्रावर हे मोठ्या रेंज मध्ये प्रोफीटेबल दाखवत होते, पण तसे काही अजून तरी दिसत नाही, मार्जिनदेखील ओपस्त्रात दाखवले त्यापेक्षा जास्त लागले आहे. ऑपस्त्रात फक्त 20 हजार मार्जिन दाखवते , प्रत्यक्षात 45000 दाखवले आणि आता 53000 दाखवत आहे.

पण ह्या विकली ऑप्शन मध्ये अजून भरपूर टाइम व्हॅल्यू आहे, कदाचित उद्या पर्वा प्रॉफिट दाखवेल.

ह्यात लॉस किती होऊ शकेल? जर 1.5 % ने स्पॉट वाढत गेली आणि तसतसे अजून एक एक स्प्रेड 39000, 39500 असे वाढवत नेले , विकली एक्सपायरीपर्यत , तर काय होऊ शकेल ? बुधवारी फायनल थर लावायचा, 3 दिवसात जास्तीत जास्त 2000 पॉईंट इकडेतिकडे होईल.

माझ्या मते एका स्प्रेडमध्ये मेक्सिमम 2500 लॉस होऊ शकेल , त्यापेक्षा जास्त होणार नाही. त्यामुळे स्टोप्लॉस लावायचा नाही.

मार्केट खाली पडले तर हे स्प्रेड फार मोठे प्रॉफिट देऊ शकते , त्यामुळे तो विचार करायची गरज नाही, त्या परिस्थितीपण 500 पॉईंट खाली खाली थर रचत रहायचे.

ऑफ टाइम मध्ये हे ऑप्शन जास्त लिक्विड दिसत नाहीत, पण प्रत्यक्ष मार्केट सुरू असताना लिक्विड असतात

आज तरी 2300 लॉस आहे.

Screenshot_2021-11-01-18-35-17-045_com.android.chrome.png

आजपण मार्केट वाढल्यावर 39000 ला अजून एक लावणार होतो , पण केले नाही. सोमवार ते बुधवार आधी फक्त बघणार आहे

39000 चेही आयटीएम ऑप्शन्स लिक्विड आहेत

जवळच्या एक्सपायरीचा ऑप्शन झिजल्या शिवाय कॅलेंडर स्प्रेडमध्ये प्रॉफिट दिसत नाही. जर स्पॉट ३९७०० हजारच्या खाली राहिला तर उद्या EOD पर्यंत प्रॉफिट दिसायला लागेल 1500 - 2000 च्या आसपास. दोन्ही प्रीमियम मधला फरक हा मॅक्स लॉस जो 5000 आसपास दिसतोय.
पण मॅक्स लॉस मोठी मूव्ह आली तर होईल, 41000 च्या वर किंवा 37500 खाली. त्याच्या आत 2500 च्या जवळपास असेल.

ब्या नि स्पॉट 39763 आहे

3 वाल्यात 250 पॉईंट टाइम व्हॅल्यू आहे
11 वाल्यात 450 पॉईंट टाइम व्हॅल्यू आहे.

राउंड फिगरवाले 38500 , 39000 वगैरे लिक्विडीटी चांगली दाखवतात , अधलेमधले असतात ते फारच वरखाली असतात

प्रॉफिट लहान असला तरी चालेल पण एकदा पोझिशन घेतली की जास्त हेज करायची भानगड मागे नाही लागली पाहिजे. Strangle आणि कॅलेंडर स्प्रेड एकीकडे लांबचा डोंगर त्याखाली लॉस आणि दुसरीकडे नजर जाईल तिथवर सपाट हिरवं प्रॉफिट पठार या दोन स्ट्रॅटेजी मला बऱ्या वाटतात.

Proud

ते शोधण्यातच तर इतके 20 पानांचे डिस्कशन झाले आहे

स्ट्रेडल चांगली स्ट्रॅटेजी आहे , पण एडजस्टमेंटला जास्त मार्जिन लागते

काल HDFC Securities चा फोन आला, (त्यांचे ट्रेडिंग अकाउंट आहे माझे पण dormant आहे.) 199/ year ला derivatives 20₹ per order करू, अकाउंट रीऍक्टिव्हेट करा.

मग शेअरखानला फोन केला, तुम्ही का करत नाही असे, तुमच्या 60₹ per lot मुळे मी झिरोदा वापरतोय आता HDFC वापरेन मग रेंज ब्लॉकिंगचाही प्रॉब्लेम नाही.
तर त्यांनी लगेच ब्रोकरेज 15₹ / lot केले.

पण झिरोदात जसे GTT Order आहे तसे शेअर खान मध्ये नाही. Derivatives मध्ये stoploss ट्रेड घेतल्यास, stopLoss ऑर्डर रोज एक्सपायर होते आणि रोज नवी लावावी लागते. तेव्हा stop loss ऑर्डर्स साठी झिरोदा वापरेन.

ह्यावर ब्रोकरेज किती जाईल ? ०.०३% किंवा २० रु यापैकी जे कमी असेल ते.
म्हणजे साधारण ५०००० रु खरेदीवर १५ रु , दोन्हीकडुन ३० रु

Pages