Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑप्शन ट्रेडिंग करताना ग्रीकचा अभ्यास नसेल किंवा असेल पण ट्रेडिंग करताना दुर्लक्ष केले तर प्रॉफिट/ लॉस होईल पण त्यामागील कारण कधीच कळणार नाही.

सुट्या आधीच माहीत असल्याने त्यात टाईम डिके पकडलेला असतो.ट्रेडिंग डे मोजूनच प्रत्येक ऑप्शनची किंमत ठरते.

उदा.
गेल्या गुरुवारी मी एक ऑप्शन विकला, पुढच्या गुरुवारच्या एक्सपायरीचा.
आता दोन ट्रेंडिंग डेज कमी आहेत. 5 ऐवजी तीनच आहेत.
तर प्रत्येक दिवशीचा टाइम डिके आता जास्त असणार ना?

Strangle आणि straddle करताना ग्रीक्सचा विचार करावा लागतो, त्याप्रमाणे लेग ऍडजस्ट करायचो. पण मी volatility आणि Delta यावरच लक्ष ठेवायचो.
आता मी फक्त कॉल्स विकतो, volatility बघतो पण नेहमी पोझीशन घेताना त्याचा उपयोग होतोच असे नाही. मी लॉग करणे सुरू केले आहे, entry, exit करताना volatility आणि डेल्टा किती होता, त्यावरून अंदाज घ्यायला. पण हे करून फक्त दोनच महिने झालेत.

volatility आणि Delta व्यतिरिक्त अजून कुठले ग्रीक्स बघावेत?

आता दोन ट्रेंडिंग डेज कमी आहेत. 5 ऐवजी तीनच आहेत.
तर प्रत्येक दिवशीचा टाइम डिके आता जास्त असणार ना?

सगळे ऑप्शन प्रथम खुले होतात तेव्हाच त्याचे प्रीमियम ठरवताना ट्रेडिंग डे विचारत घेतले जातात. सुट्या जास्त असेल मूळ प्रीमियम कमी.

ऑप्शन्सचा थिटा इंडायरेक्टली सेल पोझिशन आणि हेज पोझिशन घेतली जाते तेव्हा पहिल्या जातो. त्या ऑप्शनमध्ये टाईम व्हॅल्यू किती आहे पाहून. जास्त टाइम व्हॅल्यू सेल पोझिशनला आणि कमी टाइम व्हॅल्यू हेज पोझिशनला.
मग एकदा पोझिशन घेतली की झिजल्यावर प्रॉफिट बुक किंवा टाइम व्हॅल्यू वाढत असेल तर लौकर एक्झिट पाहिल्या जाते.

या व्यतिरिक्त थिटा मॉनिटर करत रहाणे गरजेचे आहे का?

स्ट्रँगल मध्ये वेगा बॅलन्स करता येईल.
निफ्टी आणि बँकनिफ्टीमध्येच ट्रेंडिंग करत असल्याने इतकी उलथा पालथ होत राहते की गामा वरून काही निर्णय घेणे मला तरी कळत नाही.
तरी पण आता तो ही लॉग करून ठेवत जाईन.

https://opstra.definedge.com/strategy-builder

ह्यावर ग्राफ दिसतो , पण आपण पोझिशन घेऊन काही दिवस झालेत तर त्या तारखेची एण्ट्री दाखवुन आजचि पोझिशन कशी दिसणार?

ऑप्शन ATM बघताना स्पॉट बघायचा कि त्या महिन्याचा फ्युचर बघायचा ? कारण एन एस ई च्या वेब साइट वर त्या महिन्याच्या फ्युचरवर बेस्ड असते

ऑप्शन प्राईस वर क्लिक करून ती एडिट करता येते.
तिथे आपण घेतला ती प्राईस टाकायची.
तारीख नाही टाकता येत.
ऑप्शन प्राईस टाकली की करंट लॉस / प्रॉफिट दाखवेल.

नोवेम्बर 38000 कॉलपुट विकून स्ट्रॅण्गल शोर्‍त केले आहे, प्रिमियम २१०० . आता ते १०००० लॉस मध्ये आले आहे.

आज मार्केट थण्ड प्डल्याने अ‍ॅडजस्टमेण्ट केली नाही.

38000 चा इण्डेक्स 39500 आला आहे.

आपल्या कट ऑफ लेव्हलला जर समजा मार्केट पोचलेच , म्हणजे आता 40000 ला , आणि ह्या नवीन लेव्हलला अजुन एक स्ट्रॅडल शॉर्ट केले तर सिनारिओ कसा असेल. अजुन फारसा काळ लोटला नाही, त्यामुळे ह्या नवीन स्ट्रॅड्लचा प्रिमियमही आल्मोस्ट 2100 च आहे.

Index............. old contract P/L points........ new contract P/L points........ profit loss
41000....... -1000....... +1000.......... 0
42000 ....... -2000........ 0........... 50000

अशाच खालीपण दोन लेव्हल निघतील.

पण मार्केट जर ३८००० आणि ४०००० ह्यांच्या मध्येच राहिले तर दोन्ही कॉन्ट्रॅक्ट्स भरपूर नफा देऊन जातील.

याच्यात अजुन एक करता येईल , पहिल्यास्ट्रॅडलला ४०००० चा कॉल बाय करुन प्रोटेक्ट करता येइल.

माझे शॉर्ट स्ट्रेडल भयानक लॉसमध्ये आले आहे. -20000

पुट झिजून 200 राहिलाय आणि कॉल 2700 झाला आहे.

उद्या बहुतेक काहीतरी अडजस्टमेंट करेन.

विकली कॉल भयानक महागलेत आणि पुट अगदीच स्वस्त झालेत , नॉर्मली दोन्हीत फारसा गॅप नसतो , पण आता फारच गॅप आहे.

आता नोव्हेंबरचा 38000 PE आहे 296 ला आणि CE आहे 2749 ला

म्हणजे PE मध्ये 296 टाइम व्हॅल्यू आणि CE मध्ये 719 टाइम व्हॅल्यू. दोन्ही मिळून 1015 टाइम व्हॅल्यू.
म्हणजे नोव्हेंबरमध्ये बँकनिफ्टी 40030 + 1015 = 41045 ला क्लोज झाला तर तुमचा आज आहे तेवढाच लॉस असणार.
41000 चा कॉल विकत घेतला तर मग वरचा लॉस प्रोटेक्ट. होईल.
पण आता नोव्हेंबर 41000 CE कॉल ची किंमत आहे 820.
म्हणजे तुम्हाला प्रोटेक्ट करण्यास हा कॉल घ्यायचा असेल तर 820 x 25 = 20,500 किंमत मोजावी लागेल आज. म्हणजे लॉस दुप्पट होइल. एवढी रिस्क घ्यायचीय का?

दुसरा एक विचार:
आता तुमचा लॉस कमी होणे / प्रॉफिट मध्ये येणे हे बँकनिफ्टी खाली गेला तरच शक्य आहे. अजून किती जास्ती लॉस सहन करू शकता उदा. अजून 10000 तर 10000 /25 = 400
2796 + 400 ला स्टॉप लॉस लावा 38000 CE ला.
आणि पुट मध्ये प्रॉफिट बुक करून घ्या. कारण स्पॉट वर गेला तर तो आता काही प्रोटेक्ट करणार नाही फार.
पुट विकून जर मार्केट आदळले तर लॉस लौकर भरून निघेल. आणि 1500 पेक्षा जास्त आपटले तर मूळ फायद्या पेक्षा जास्त फायदा.

मला आज युट्युबवर theta gainers हा चॅनेल सापडला. छान वाटत आहेत व्हडिओ. ऍडजेस्टमेंट कशी करायची हे व्यवस्थित सांगितलंय. असे अजून काही चॅनेल असतील तर सांगा.

माझ्या एडजस्टमेंट फार हफाजहार्डसली झाल्यात
अपुऱ्या आहेत
लॉस वाढतच आहे. 25000 ला पोचलाय

माझ्या मते , कट ऑफ पॉईंट क्रॉस झाल्यावर लॉस बुक करून नवीन लेव्हलला ट्रेड घेणे हीच रिअल एडजस्टमेंट असेल

किंवा , स्ट्रेडलला आयर्न बटरफ्लाय करणे ,

झेरोधात निफ्टी ब्लॉक रेंज जवळपास ६०० -७०० पॉइंट्सची आहे. समजा मार्केट १८००० आहे आणि मला एका स्ट्रॅटेजीची बास्केट ऑर्डर टाकायची आहे त्यात फार otm बाय सेल आहेत. १७००० चा pe बाय आणि १७१०० चा pe सेल करायचा आहे तर कसं करायला लागेल? सगळ्यात आधी वरती १७१०० सेल करायला ठेवायचा आणि त्याखाली १७००० बाय करायला ठेवायचा का? आणि अजून एक विचाराचं आहे ते म्हणजे जर मी १७१०० PE सेल केला तर ब्लॉक्ड रेंजबाहेरचा कोणताही PE मी बाय करू शकतो का?

अजून एक म्हणजे १७१०० PE ३ nov एक्सपायरीचा सेल केला तर त्याच एक्सपायरीचा कोणताही PE बाय करू शकतो कि पुढच्या कोणत्याही एक्सपायरीचा PE बाय करू शकतो(कॅलेंडर स्प्रेड लॉजिक).

आधी सेल केला की मग OTM बाय करता येतो.
म्हणजे बास्केट मध्ये वर सेल पोझिशन ठरवायची खाली बाय.
म्हणजे सेल करायला जेवढी मार्जिन लागते तेवढी आपल्या अकाउंट मध्ये असणे आवश्यक आहे. सेल ऑर्डर execute झाली की तेवढी मार्जिन ब्लॉक होते. मग बाय ऑर्डर execute केली की फायनल तेवढी ठेवून बाकीची मोकळी होते.

हे तुम्ही एक एक ऑर्डर वेगळी execute करा की दोन्ही बास्केट मध्ये करा, सुरवातीला सेल साठी लागणारी मार्जिन लागणारच.

आणि बास्केट मध्ये सेल ऑर्डर वर जरी असली तरी कधी बाय ऑर्डर आधी प्रोसेस होऊन ती रिजेक्ट होऊन मग सेल मात्र execute होऊन बसते. तेवढे लक्ष ठेवून मग बाय ऑर्डर वेगळी execute करावी लागते. त्यामुळे मी OTM ऑप्शन सेल साठी बास्केट वापरतच नाही.

म्हणजे फार otm स्ट्रॅटेजी वापरायची असेल तर बास्केट ऑर्डर टाकून फायदा नाही. आणि त्यामुळे मार्जिन पण नाही मिळणार.

बरोबर.

Pages