४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद वेमा. एखादा बाफ शोधतच होतो Happy

जॉर्जिया मधल्या निवडणुकीसंबंधी कायद्यातील बदलांबद्दल काय मत लोकहो? डिसेंबर मधे ट्रम्प अ‍ॅण्ड को समोर ठामपणे उभा राहिलेला तेथील गव्हर्नर ब्रायन केम्पने नुकतेच हे बिल साइन केले. त्याने राज्यातील असेम्ब्लीला बरेच अधिकार मिळाले आहेत. ही असेम्ब्ली सध्या रिपब्लिकन असल्याने पुढच्या निवडणुकीत हे लोक त्यांना सोयीच्या नसलेल्या काउण्टीमधे बर्‍याच काड्या घालू शकतात. त्यावर आत्ता टीकाही होत आहे. पण हा कायदा उद्या तेथे असेम्ब्लीमधे डेम्स आले तर ते ही हेच उद्योग करू शकतील याची भीती रिपब्लिकन्सना नाही का? "मौका सभी को मिलता है" सिच्युएशन होउ शकते.

सर्वसाधारणपणे निवडणुकीच्या लॉजिस्टिक्सबद्दलचे अधिकार काउण्टी लेव्हलच्या बोर्ड कडे असतात. मेल-इन मते व अ‍ॅब्सेण्टी मते कधीपासून ते कधीपर्यंत स्वीकारायची, त्यातील सह्यासंबंधी नियम, आयडी प्रूफ हवे की नको, ड्रॉपबॉक्स किती व कोठे असावीत वगैरेबद्दलचे नियम. या बोर्डाच्या वर राज्याचा निवडणूक बोर्ड असतो. त्यात राज्यातील असेम्ब्लीचे काही सभासद असतात. अशी ही पॉवर ची चेन आहे.

या कायद्याद्वारे झालेला एक बदल म्हणजे यापुढे राज्याचा बोर्ड काउण्टीच्या बोर्डाचे निर्णय फिरवू शकेल. त्या बोर्डाकडे जास्त पॉवर आली आता. दुसरे म्हणजे राज्यातील बोर्डात स्टेट असेम्ब्लीचे यापुढे बहुमत असेल. म्हणजे इलेक्शन बोर्ड ही वेगळी संस्था इतके दिवस होती ती तितकी आता स्वतंत्र नसेल. तत्कालीन स्टेट असेम्ब्लीचे त्यावर बरेच नियंत्रण राहील. या बोर्डावरून रॅफेन्सपर्गरला हटवण्यात आले आहे. गव्हर्नर केम्पइतकाच हा रॅफेन्सपर्गरही ट्रम्पच्या विरोधात ठाम राहिला होता. यालाच ट्रम्पने फोन करून "आणखी मते शोध" सांगितले होते. त्या पूर्ण प्रोसेस मधे रॅफेन्सपर्गर आणि केम्प या दोघांच्या विरोधामुळे जॉर्जिया डेम्स कडे राहण्यात खूप मदत झाली. किमान तेथील प्रोसेस उगाच खूप लांबली नाही.

त्यामुळे जेव्हा हाच रॅफेन्सपर्गर म्हणतो की हे नवीन नियम Discriminatory नाहीत तेव्हा ते सिरीयसली घेउन जास्त खोलात जाउन वाचले पाहिजेत. यातील सर्वात जास्त चर्चा झालेला नियम म्हणजे मतदानाच्या रांगेतील लोकांना अन्न व पाणी न देण्याबद्दल. त्याचे टेक्स्ट वाचले तर घाईघाईत आणलेला नियम वाटतो. मतदान केंद्रापासून १५० फुटापर्यंत व रांगेतील लोकांपासून २५ फुटांपर्यंत कोणीही इतर व्यक्ती अन्न किंवा पाणी आणू शकणार नाही ("इतर व्यक्ती" हे महत्त्वाचे. सेल्फ सर्विस वाला किऑस्क असू शकेल - पण तो ही पोलिंग सेण्टर वाल्यांनी ठेवला तरच. इतरांना परवानगी नाही. मतदानाला येणारे लोक स्वतः आणू शकतात). यातले डेमोक्रॅट नॅरेटिव्ह असे आहे की मतदान केंद्रे कमी, ड्रॉपबॉक्स संख्येने कमी यामुळे जेथे ब्लॅक्स जास्त आहेत तेथेच रांगा जास्त असतात. या नियमामुळे अजून वोटर सप्रेशन होईल. यातील गृहितकांमधे किती तथ्य आहे माहीत नाही. याबद्दल रॅफेन्सपर्गर म्हंटला की मागच्या वेळेस अन्न/पाणी देतानाही लोक प्रचार करत होते. पण ट्रम्पला मत द्याययला निघालेले पण केवळ पाणी देताना एखाद्याने बायडेनला मत द्या असे सांगितल्यावर मत बदलणारे लोक असे किती असतील?

बाकी ते २०२० इलेक्शनबद्दलचे डॉमिनियनने जे खटले दाखल केलेत ते अजून सुरू आहेत. परवाच सिडनी पॉवेल म्हंटली की तेव्हा ती जे सांगत होती ते "तथ्य" नव्हते तर "क्लेम्स" होते. फॉक्स ने बहुधा याच कारणाकरता लू डॉब्जचा शो रद्द केला असावा.

बातमीच्या मथळ्यात कॉजल काही नाही.
खुद्द बातमीतच "Gun sellers have said that President Joe Biden’s threat to use executive action to expand background check requirements and possibly ban the sale of semi-automatic firearms like the popular AR-15 is driving sales. House and Senate Democrats are also pushing anti-gun legislation, especially in the wake of two mass shootings last month." म्हटलंय. नेहेमीचंच आहे हे. स्टिम्युलस चेक्स 'हे' कारण नाही.

लिबरल मीडिया आता '"UK/brazil/ south Africa/india variant" असे शब्द लिबरली वापरत आहेत.
हे तेच लोक आहेत ज्यांचा वुहान व्हायरस, चायनीज व्हायरस असे शब्द वापरायला विरोध होता. म्हणजे तसं करणं त्यांच्या दृष्टीने 'रेसिस्ट' होतं.

सनव, त्या उद्गारांमागचा , विशेषतः ज्या व्यक्तीने सुरूवात केली होती त्या व्यक्तीच्या बोलण्यामागचा अँडरटोन मह्त्वाचा होता. कृपया ती साधी वाक्यरचना होती असे म्हणून नका. अजूनही एशियन एमेरिकन्स वर अ‍ॅटॅक होत आहेत.

बायडनने जो काही बट्ट्याबोळ चालवला आहे तो अपेक्षेप्रमाणेच आहे. देशाच्या सीमा खुल्या करुन कुठल्याही सोम्यागोम्याला कुठल्याही देशातून अमेरिकेत घुसण्याची मुभा देणे. इमिग्रेशन कायदे खड्ड्यात घालणे. चलनफुगवटा वाढता वाढता वाढे अशा प्रकारे चालू आहे.
अमेरिकेत तेल उपसायला बंदी घातल्यामुळे पेट्रोल अफाट महाग केले आहे. मग ओपेककडे जरा उत्पादन वाढवा अशी भीक मागून पाहिली. ओपेकने वाटाण्याच्या अक्षता लावल्या.
सप्प्लाय चेन चे वाटोळे झाल्यामुळे अनेक ठिकाणी दुकाने ओस पडली आहेत. सणवार जवळ येत आहेत. थंडी येत आहे. सामान्य लोकांचे हाल कुत्रा खात नाही अशी लक्षणे दिसत आहेत.
व्हर्जिनियाच्या निवडणुकीत बायडन सरकारच्या पार्श्वभागावर सणसणीत लत्ताप्रहार झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना दहशतवादी ठरवायचा बिनडोक प्रकार बायडनच्या न्याय मंत्रालयाने केला त्याचे उत्तम फळ त्यांना मिळाले! जी निवडणूक डेमोक्रॅट च्या खिशात आहे असे मानली जात होती, ज्यात अनंतकोटी ब्रह्मांडनायक ओबामा जातीने येऊन प्रचारात उतरले होते त्या निवडणुकीत हार पत्करावी लागली!
२०२२ मधे मिळणार्‍या आणखी मोठ्या लत्ताप्रहाराची आणि कपाळमोक्षाची (आणि २०२४ ची) ही नांदी आहे असे मानू या.
बायडन आणि त्याचे सरकार नको इतके डाव्या बाजूला झुकत चालले आहे. सरकार हे नोटा छापणारे मशीन आहे अशी समजूत करुन अब्ज काय, खर्व काय निखर्व काय वाट्टेल त्या रकमेच्या योजना पास करत चालले आहे.
एकीकडे बायडनचा म्हातारचळ वाढत चालला आहे, भ्रमिष्टपणाची उदाहरणे नित्य नियमाने दिसत आहेत. दुसरीकडे दोन नंबरच्या कमलाबाई अकलेचे तारे तोडत आहेत. परवा नासाच्या शास्त्रज्ञांकडे झाडांमधे वर्णद्वेष असतो का ते शोधून काढा अशी लाडकी विनवणी करताना दिसल्या. तिकडे दक्षिण सीमेवर उत्पात होतो आहे आणि त्याची जबाबदारी म्हातारबाबाने आपल्याला दिली आहे हे विसरून ह्या ताई मुलाबाळांमधे बागडणे, नको तिथे वर्णद्वेष शोधणे, फ्रेन्च वैज्ञानिकांसमोर अकारण फ्रेन्च हेल काढून बोलायचा प्रयत्न करुन स्वतःला हास्यास्पद बनवणे हे प्रकार चालू आहेत. एकंदरीत हे सरकार म्हणजे साक्षात आनंदीआनंद आहे!

शेंडेनक्षत्र, बाकीच्या बाबतीत माझा अभ्यास नाही परंतू सप्लाय चेन ची मोडकळीस अवस्था ही कुठल्याही (अ‍ॅज इनः रिपब्लिक्स किंवा डेमोक्रॅट्स) पक्षाच्या कारभाराशी संबंधित नाहीये. दुर्दैवाने आज ह्या इंडस्ट्रीत काम करणारे सुद्धा अशा पद्धतीचं ओव्हरसिंपलिफिकेशन करताहेत. पण ही समस्या जटिल आहे आणि कुठल्याच सरकारी यंत्रणेकडे ह्याचं उत्तर नाहीये.

<< एकीकडे बायडनचा म्हातारचळ वाढत चालला आहे, भ्रमिष्टपणाची उदाहरणे नित्य नियमाने दिसत आहेत. दुसरीकडे दोन नंबरच्या कमलाबाई अकलेचे तारे तोडत आहेत. परवा नासाच्या शास्त्रज्ञांकडे झाडांमधे वर्णद्वेष असतो का ते शोधून काढा अशी लाडकी विनवणी करताना दिसल्या. तिकडे दक्षिण सीमेवर उत्पात होतो आहे आणि त्याची जबाबदारी म्हातारबाबाने आपल्याला दिली आहे हे विसरून ह्या ताई मुलाबाळांमधे बागडणे, नको तिथे वर्णद्वेष शोधणे, फ्रेन्च वैज्ञानिकांसमोर अकारण फ्रेन्च हेल काढून बोलायचा प्रयत्न करुन स्वतःला हास्यास्पद बनवणे हे प्रकार चालू आहेत. एकंदरीत हे सरकार म्हणजे साक्षात आनंदीआनंद आहे! >>

------- म्हातारचाळ, म्हातारबाबा, दोन नंबरच्या कमलाबाई.. भ्रमिष्ट, लत्ताप्रहार... आदी शब्दांबद्दल मला आपत्ती आहे. त्यांच्या योजना पटत नसतील तर टिका टिप्पणी करा पण भ्रमिष्ट, म्हातारचाळ असले शाब्दिक हल्ले कशासाठी. Sad

बंदरातील युनियनबाजीमुळे बंदरांचे आधुनिकीकरण थांबवले गेले आहे. ह्या युनियन कुठल्या पक्षाच्या आहेत? अर्थातच डेमोक्रॅट.
समस्या जटिल आहे वगैरे ठीक आहे. पण आम्ही सगळ्या जटिल समस्येवरचे उत्तर आहोत असा धोशा लावत म्हातारबाबा सत्तेवर आले आहेत. त्यामुळे कितीही जटिलबिटिल समस्या असली तरी त्याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. झाडांमधे, रस्त्यांमधे, पुलांमधे वर्णद्वेष शोधणारे विचारवंत सत्तेवर असतील तर त्यांना प्रत्येक समस्येत वर्णद्वेष दिसणार आणि तशीच उत्तरे ते शोधत रहाणार!
नालायक, बेजबाबदार सरकारची धोरणे ह्याला कारण आहेत. सामान्य जनतेचे असेच हाल होत राहिले तर पुढच्या निवडणुकीत काय होणार ते उघड आहे. मग समस्या कशी मुळातच जटिल आहे, अमुक एक पक्ष ह्याला जबाबदार कसा नाही वगैरे ट्यांव ट्यांव ट्यांव जनता ऐकून घेईल असे वाटत नाही.

<< झाडांमधे, रस्त्यांमधे, पुलांमधे वर्णद्वेष शोधणारे विचारवंत सत्तेवर असतील तर त्यांना प्रत्येक समस्येत वर्णद्वेष दिसणार आणि तशीच उत्तरे ते शोधत रहाणार!
नालायक, बेजबाबदार सरकारची धोरणे ह्याला कारण आहेत. सामान्य जनतेचे असेच हाल होत राहिले तर पुढच्या निवडणुकीत काय होणार ते उघड आहे. >>

----- किती त्रागा. शांतपणे पुढच्या निवडणूक होण्याची वाट पहायची... आणि टेड क्रूझ किंवा पुन्हा ट्रम्प आहेच.

>>
किती त्रागा. शांतपणे पुढच्या निवडणूक होण्याची वाट पहायची... आणि टेड क्रूझ किंवा पुन्हा ट्रम्प आहेच.
>>
देशाची अर्थव्यवस्था चांगली चालत असताना अट्टाहासाने, आपल्या दुराग्रहापोटी अनेक उद्योगांना टाळे लावून दुरवस्था आणली आणि आता ठणाणा बोंब मारत आहेत. पर्यावरणाच्या नावाखाली जो धुमाकूळ चालू आहे त्याने असलेल्या उद्योगांच्या नरडीला नख लावले जात आहे. ग्रीन उद्योग येणार येणार म्हणून रिकामी आश्वासने दिली जात आहेत. नेते मंडळी खाजगी विमानाने पर्यावरण वाचवायच्या शिखर परिषदेला जात आहेत. जग बुडण्यापासून वाचवण्याकरता एकमेव आशास्थान असे ज्या जागतिक परिषदेला म्हटले जात होते तिथे आपले म्हातारबा सर्वांसमक्ष झोपा काढत होते! किती आशादायक!

"वगैरे ट्यांव ट्यांव ट्यांव जनता ऐकून घेईल असे वाटत नाही." - ह्या वैयाक्तिक मॉकरीची गरज नाही शेंडेनक्षत्र. माझा कुठलाही राजकीय अजेंडा नाही. स्कूल बोर्डापासून ते प्रेसिडेन्शियल निवडणूकांपर्यंत मी आजवर उमेदवार पाहून (पक्ष न पहाता) मतदान केलंय. असो. सप्लाय चेन विषयी मी माझ्या अनुभवातून आलेली निरीक्षणं मांडतोय. ह्या विषयावर मी रिसर्च प्रॉजेक्ट्स / कन्सल्टन्सी सुद्धा केलीय. टेक इट ऑर लीव्ह इट.

"बंदरातील युनियनबाजीमुळे बंदरांचे आधुनिकीकरण थांबवले गेले आहे." - परत एकदा तुम्ही तुमच्या आर्ग्युमेंटला सपोर्ट होईल इतकासा तुकडा काढून घेताय. २००७-०८ पासून ह्या विषयावर इंडस्ट्रीमधे बोललं / लिहीलं गेलंय. दुर्दैवानं ह्या क्षेत्रात कुणीच पायाभूत सुधारणा केल्या नाहीत. ह्यामागे क्वालिफाईड लेबर शॉर्टेज, डेमोग्राफिक चेंजेस (baby boomer generation versus Gen X/Y/Z/millennials), रेग्युलेटरी चेंजेस (FMCSA), टेक्नॉलॉजिकल चेंजेस (Amazon model, digital brokerages, Freight Forwarders) असे अनेक घटक आहेत. पॅनडेमिक हा लास्ट स्ट्रॉ ठरला. ट्रिलियन डॉलर्स च्या इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेजकडून एका मोठ्या कालखंडानंतर ह्या क्षेत्रात काही पायाभूत सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झालीय. तसं झालं तर लगेच नाही, पण भविष्यात काही तरी भरीव फरक पडण्याची अपेक्षा आहे.

उदय,
अहो आजकाल राजकारणात असेच चालते. नुसते "मला तुमचे मत पटत नाही" असे लेचेपेचे उद्गार काढून मते मिळत नाहीत. दुसर्‍याचा जास्तीत जास्त अपमान, त्यान्ना व्यक्तिगत शिव्या दिल्या, "ज्याला तुमची मते पटत नसतील त्याला सरळ गोळी घाला" अशी प्रक्षोभक भाषणे केली की इथली जनता वा वा म्हणून मते देते.
आता पहा, फ्लिन ने म्हंटले अमेरिकेत फक्त ख्रिश्चन धर्म पाहिजे, लगेच जे त्याला मत देणार नाहीत त्यांच्या विरुद्ध "क्रुसेड"म्हणून त्यान्नाहि गोळ्या घाला असे म्हंटल्या जाइल. फक्त ज्यूंना मारणार नाहीत, कारण त्यांच्याजवळ पैसे आहेत.
त्यामुळे आता तुका म्हणावे उगी रहावे नि ट्रंप मिवडून आल्यावर जिझिया कर भरून जिवंत रहावे.
नाहीतर भारतात परत जाण्याची सोय करावी. तिथे भरपूर नोकर ठेवून स्वतः मायबोलीवर नाहीतर व्हाट्स अ‍ॅप वर अकलेचे तारे तोडावेत.

शेंडे, इथे ठणाणा करणे, बोंब मारणे, कांगावा करणे, ट्यांव ट्यांव ट्यांव - वगैरे हे सगळे तुम्हीच करताय. इतरांच्या पोस्ट मधे ते नाही. डावे, जेथे तेथे डिस्क्रिमिनेशन शोधणारे वोक पब्लिक, स्वतःला लिबरल समजणारे पण विरोधी मते जराही सहन न करणारे - यांच्यापेक्षा सनातनी/कॉन्झर्वेटिव्ज परवडले अशी अवस्था अनेकदा येते. पण इथे तुमच्या पोस्ट मधेही तसाच टोन आहे. मी सांगतोय तेच एक जागतिक सत्य आहे, आणि कोणी काही पटवून द्यायचा अगदी समंजसपणे प्रयत्न केला तरी त्यावर ट्यांव ट्यांव ट्यांव, बोंबा वगैरे.

बायडेन मुळात सत्तेवर येउ शकला कारण तो बर्‍यापैकी रिझनेबल आहे. डेम्स मधे प्रभावी असलेल्या वोक लोकांना किंवा सोशालिस्ट पब्लिकला लिमिट मधे ठेवू शकणारा सध्यातरी तोच एक आहे. पण तो त्यांचा मोठा बेस आहे. अधूनमधून त्यांना चुचकारावे लागते. ते कोणाला चुकले आहे. "There are some fine people on both sides" आठवा Wink

ह्या विषयावर मी रिसर्च प्रॉजेक्ट्स / कन्सल्टन्सी सुद्धा केलीय >>> फेफ, on social network, detailed research is no match for highly adamant opinion हे सूत्र लागू पडते Happy

मला वाटतं ट्रम्पला 'तात्या' म्हणताना किंवा तो आपल्या मुलीबरोबर झोपतो अशी कुजबूज करताना ज्यांना गुदगुल्या झाल्या असतील त्यांनी 'म्हातारबा' बाबत काही म्हणण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे.
Let's go Brandon! Happy

"on social network, detailed research is no match for highly adamant opinion हे सूत्र लागू पडते " - Lol खरंय फा.. विसरलो होतो.. असो.. चालू दे. राजकारण हा माझा प्रांत नाही.

shendenaxatra,
तुम्ही निवडणुकीला उभे रहा. तुम्ही २०२२ मधे निवडून या नि सरळ बायडेन ला इम्पीचच करून टाका. लगोलग ट्रंप ला राजा म्हणून घोषित करून टाका! अगदी अमेरिकन गोरे नाहीतरी बर्‍यापैकी गोरे असाल, तर खुशाल गन घेऊन डेमोक्रॅट्स ना मारून टाका. ट्रम्प्च्या राज्यात निर्दोष असाल.
<<<<<तो आपल्या मुलीबरोबर झोपतो अशी कुजबूज करताना>>>>
हे मी मायबोलीवर वाचल्याचे आठवत नाही. खरे तर कुठेच नाही. कदाचित् आल्टर्नेट फॅक्ट असेल. किंवा क्यू वाल्यांनी सांगितले असेल.
बाकी नैतिक अधिकाराचा नि राजकरणाचा अर्थाअर्थी संबंध २०१५ पासूनच तुटला आहे.

हे मी मायबोलीवर वाचल्याचे आठवत नाही. खरे तर कुठेच नाही. कदाचित् आल्टर्नेट फॅक्ट असेल. किंवा क्यू वाल्यांनी सांगितले असेल.>>>
इथली पहिली दोनतीन पानं वाचून पहा बरं! बरं चर्चाही इतक्या संभावितपणे केली आहे की एखाद्या कॅज्युअल रीडरला खरंच काही तरी आहे असं वाटावं Wink

म्हातारबाचा दोन ट्रिलियन डॉलर्सचा दौलतजादा जो मॅन्चिन या डेम सिनेटरनेच हाणून पाडला. बिल्ड बॅक बेटर म्हणे.
a tax rebate that will offer up to $12,500 to anyone buying a zero emissions car>>> मी मागे 'बायडनकेअर' मार्फत मोफत टेस्ला वाटाव्यात असं विनोदाने लिहिलं होतं. ते खरंच करायला निघाला होता खुळा Sad

यातलं राजकारण (कोण बरोबर कोण चूक ) सोडून द्या. पण एकूण $१२,५०० रिबेट हा फारसा अवघड नाही किंवा कमीच आहे. मी स्वतः २०१९ मधे निस्सान लीफ ३६,००० ची कार , सगळे रिबेट मिळवल्यावर १८,००० मधे मिळवली. ७५०० फेडरल+ २५०० स्टेट + ५००० आमची इलेक्ट्रीक युटिलिटी + २००० निस्सानचा रिबेट (फ्री रिचार्ज साठी) + १००० डिलर रिबेट. आणि हे कुठलीही फार घासाघीस किंवा आटापिटा न करता. जुनी कार देणगी दिली त्याबद्दल आणखी $३००० टॅक्समधे वाचले ते वेगळे. हे सगळे टेस्ला साठी मिळत नव्हते. पण एकूणातच फक्त सरकार नाही तर इतके सगळे zero emissions car साठी मदत करत होते तर कार घेण्याचा निर्णय खूपच सोपा झाला.
पण एकदा २ वर्षे ही कार वापरल्यावर , पुढची कार , १० वर्षांनी ,कुठलाही टॅक्स रिबेट नसला तरी zero emissions car घेईन असे सध्यातरी म्हणतो आहे. Once you experience electric and see other benefits , it is difficult to go back to gas powered.

यंदा वोक जमातीच्या कृपेने कॅलिफोर्निया राज्यात एक हॉलिडे शॉपिन्गचा अर्थात सणासुदीच्या खरेदीचा नवाच प्रकार उदयास आला आहे. सोशल मिडियावर अनेक समविचारी लोक उत्साहाने बेत आखतात, एखादे छानसे दुकान हेरतात आणि मग ३०-४०-५० असा मोठ्या संख्येने झुंड करुन हे लोक त्या झगमगीत महागड्या दुकानात प्रविष्ट होतात. त्यांच्याकडे श्रमजीवी लोकांकडे असतात तशी हातोडे, घण, क्रोबार वगैरे हत्यारे, प्रतिकारासाठी पेपर स्प्रे असतात. ती कुशलतेने वापरून काचेच्या कपाटातील माल येनकेनप्रकारेण हस्तगत करुन काही मिनिटात बाहेर पडतात. एकमेका सहाय करु अवघे धरु सुपंथ ह्या विचारांनी भारून गेलेले सहकारी त्यांना घेऊन तिथून अन्यत्र जाण्यास सज्ज असतात. काही मिनिटात लाखो डॉलर्सचा माल भांडवलशाही राक्षसी वृत्तीच्या लोकांकडून हस्तगत करुन तो गरजू लोकांपर्यंत पोचवला जातो. असे धोपट मार्ग सोडून वेगळा पर्याय निवडून शॉपिंग करणारे बहुतांश काळे लोक असतात. साहजिकच ह्याविषयी सन्कुचित, वर्णद्वेष्टे लोक आरडाओरडा करताना दिसतात.
म्हातारा जो आणि त्याचा पक्ष अशा रॉबिन हूड खरेदीला वरदहस्त देतात. अशा बंडखोर, विद्रोही शॉपर्सना कुणी तक्रार केली तरी तत्काळ जामीन मिळेल आणि त्यांचा शॉपिंगचा आनंद हिरावला जाणार नाही ह्याकरता तमाम डेमोक्रॅटिक पक्ष कटिबद्ध आहे.
हा अभिनव प्रयोग कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रॅन्सिस्को ह्या अती प्रगत, कडव्या पुरोगामी शहरात सुरु झाला पण हळूहळू लॉस एन्जेलिस, शिकागो, मिनियापोलिस इथेही ह्या शॉपिंगचे प्रयोग झालेले दिसले.
हा अभिनव प्रयोग यथावकाश अमेरिकेत सर्वत्र दिसू लागेल (फक्त काही वर्णद्वेष्टी राज्ये सोडून!)

म्हातार्‍या जो ला आपली (राजकीय) मृत्युघंटा ऐकू येत असावी. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जी एक दोन वाक्ये ह्या भ्रमिष्टाने नीट उच्चारली त्यात असे म्हटले की मी २०२४ मधे पुन्हा निवडणूक लढवीन पण जर आज मी जसा निरोगी आणि ठणठणीत आहे तसा राहिलो तरच! असा डिसक्लेमर द्यावा लागत आहे हे एक आणि आपण आज ठणठणीत आहोत असे मानणार्या माणसाच्या आरोग्याविषयी कुणालाही शंका वाटणे स्वाभाविक आहे. जो माणूस बोलताना जेमतेम एक वाक्य कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण रानोमाळ भरकटू न देता बोलला तर तमाम माध्यमे "उत्कृष्ट वक्तृत्त्वाचा एक अमोघ आविष्कार" समजून आनंदाने नाचू लागतात ह्यावरून ह्या स्थविर गृहस्थाचा वरचा मजला किती धोकादायक स्थितीत आहे ह्याची कल्पना यावी.

प्रश्न हा आहे की जर सबसिडीची खिरापत वाटणे बंद केले तर बहुतांश लोक ती गाडी जास्त किमतीला घेतील का? लोकांचे पर्यावरण प्रेम तेव्हा कळेल. पण माझ्या मते EV आणि गॅसोलिनवर चालणाऱ्या गाड्या असे दोन्ही पर्याय उपलब्ध हवेत, ज्याला जे हवे ते घेता येईल.

पण याच्या उलट म्हणाजे आता न्यूयॉर्क शहरात नवीन इमारतीत गॅस लाईन वर बंदी. म्हणजे कधी कडाक्याच्या थंडीत ब्लॅकआउट झाला की लोकांचे हाल.

https://www.reuters.com/markets/us/new-york-city-set-ban-natural-gas-new...

Electric गाड्यांबद्दल कोणी (वापरकर्ता) नवीन धागा काढेल का? मला पण काही प्रश्न आहेत यांच्याबद्दल.
तुम्ही लोक बाहेरगावी जायचं असेल तर काय करता ?
पाचेक वर्षांनी बॅटरी रिप्लेस करण्याचा खर्च अवाढव्य असेल नाही?

मुळात वीज कशी बनते? ६०-६५% वीज ही विविध पेट्रोलियमवर आधारित इंधने जाळून बनवली जाते. अमेरिकेत. बाकी देशात जास्त प्रमाण असेल. २०% वीज कोळशावर बनते. म्हणजे पेट्रोल पेक्षा कितीतरी घातक. उरलेली गॅस आणि अन्य फॉसिल फ्युएल्स.
जर समस्त जग पेट्रोलियमवर आधारित इंधने वापरण्यामुळे बुडू घातले आहे असा पर्यावरणवाद्यांचा लाडका सिद्धांत आहे. तर अमेरिकेतील कुठल्यातरी निर्मनुष्य जागी वीज निर्मितीकरता कोळसा, गॅस, डिझेल वगैरे जाळल्याने ही जगबुडी लवकर येणार नाही हे काय अजब तर्कट आहे?
निव्वळ आम्ही टेसात टेसला चालवतो म्हणून समस्त जगताचे ग्रीन हौस गॅसचे निर्माण कमी होते आहे हा दावा हास्यास्पद वाटतो.
वास्तविक अणुशक्ती ही स्वच्छ आहे. त्यापासून जास्त वीज बनू शकते. पण त्याबद्दल पर्यावरणवादी लोकांमधे आकस आहे. एक दोन अपघात झाले असल्यामुळे हा पर्याय कायमचा बासनात गुंडाळला गेला आहे. निव्वळ वारा, सौर हे स्वच्छ, हिरवे स्रोत पुरेसे नाहीत. बेभरवशाचे आहेत.

इथे म्हटलंय

अमेरिके तील वीज उत्पादनापैकी ४०% नैसर्गिक वायूंपासून, २०% अणुऊर्जा , २०% रिन्युएबल , १९% कोळसा आणि १% पेट्रोलियमपासून बनते.

हे प्रमाण एकसंध नाही. उदा. थंडीत उत्तर अमेरिकेत दिवस लहान असतो. तेव्हा सौर ऊर्जा उन्हाळ्याइतकी मिळणे शक्य नाही. शिवाय पाऊस, बर्फ हे सगळे असल्यामुळे ढग असतात.
विविध भागात राज्यांचा प्रभाव असतो. प्रमाण कमीअधिक होते. कोळसा, गॅस, पेट्रोलियम हे सगळे फॉसिल फ्युअल ह्या गटात येते. त्यामुळे ६०% तरी वीज ह्यातून बनते. प्राचीन काळी झाडे प्राणी गाडले गेले त्यांच्यापासून बनलेले इंधन. हे सगळे ग्रीन हाऊस गॅस निर्मितीकरता हातभार लावत असते. नजीकच्या भविष्यात हे सगळे बंद होणार आणि सगळा आनंदीआनंद होणार अशी सुखस्वप्ने पर्यावरणवादी आणि पुरोगामी दाखवत आहेत. पण ते कितपत व्यवहार्य आहे ते काळच ठरवेल.
त्यामुळे एक टेसला चालवा आणि पर्यावरणाचा प्रश्न माझ्या वतीने मी निकालात काढला आहे असे समजा हे तितकेसे पटत नाही. असो.

ही एक थोडी वेगळी आकडेवारी
https://en.wikipedia.org/wiki/Coal_power_in_the_United_States

मला बाकीच्या चर्चेत उतरायचे नाही पण ..
४०% नैसर्गिक वायूंपासून >> हे आहेत ते सुद्धा फ्रॅकींग करूनच येतात - गोबर गॅस नाही. मला स्वतःलाच यामध्ये खुप प्रश्न आहेत. अजूनही बरोबर उत्तर सापडलेले नाही असे वाटते. जर वीज निर्मीती वेगळ्या स्रोतांमार्फत झाली तर वीजेवर चालणार्‍या गाड्या उपयुक्त ठरतील. ते सुद्धा आपापल्या राज्यातील ग्रीड आणि भविष्यातील वीजनिर्मीतीतील गुंतवणूक याचा अभ्यास करून गाडी घ्यावी असे मला वाटते. तसेच तुम्ही घरावर सोलर पॅनल बसवून घेतले आणि तेव्हडी वीज तुम्हाला चार्जींगकरता मिळत असेल तर अगदीच चांगला पर्याय आहे.

आणि त्याचबरोबर पेट्रोलची गाडी घेताना सुद्धा उगीचच ट्रक / एसयुव्ही न घेता साधी सेदान घेतली तर खुप फायदा होऊ शकतो. ( त्यांचा दुसरा फायदा हा रस्त्यावर चालणार्‍यांच्या सेफ्टी मध्ये पण होतो. पण ते अवांतर)

Pages