अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इंडियासारखीच परिस्थिती आहे. विरोधात दहा लोक आणि समोरच्या बाजूने मोदी/ट्रम्प खुर्चीवर सुशेगात बसलेले.
आयेगा तो ट्रम्प!
मला बरणी आजोबा बरे वाटतात तरी समोरच्या बाजूने.

मूर्ती लहान पण कीर्ती महान असे वर्णन करता येईल अशा ब्लूमबर्गबद्दल काय म्हणणे आहे? असेही ऐकिवात आहे की हिलरीबाई ब्लूमबर्गच्या उपाध्यक्ष पदाच्या जोडीदार म्हणून सुचवल्या गेल्या आहेत!

मेयर पीट चांगला वाटतोय.
पण येऊन येऊन येणार कोण, तात्यांशिवाय आहेच कोण .. हेच होणार आहे. त्या तीन चार राज्यांत काय चमत्कार घडला तर!

>>मूर्ती लहान पण कीर्ती महान असे वर्णन करता येईल अशा ब्लूमबर्गबद्दल काय म्हणणे आहे<<
टू अर्लि टु कामेंट. कारण त्यांचा आजवरचा (०८, १२, १६) प्रेसिडेंशियल रनचा विचार करता ते एक तर फेकु कि नको करत उशीरा हॅट फेकतात, आणि एकदा फेकल्यावर माघार घेतात. समर पर्यंत क्लियर होईल यावेळेस त्यांचं काय ठततंय ते... Wink

पीट बुटजज - नांव वियर्ड असलं तरी माणुस सहि आहे. रेसमध्ये टिकला तर डेम्सना हा तारु शकेल...

डोनाल्ड ट्रम्प येतील असे आज वाटते.

बर्नी सँडर्स, जो बायडन, वॉरेन ठिक वाटतात पण टम ट्रम्प समोर टिकणारे हवेत. थोडीफार त्याच्यासमोर टिकण्याची आशा पीट बुटाजज किंवा एमी क्लोबुचर कडे आहे. एमीचे नाव धाडसाने लिहीत आहे. ब्लुमबर्ग गांभिर आहे असे वाटत नाही.

कोरी बुकर (माघार घेतली आहे) आणि पीट बुटाजज माझे आवड्ते पर्याय.

सध्याचे आघाडीचे डेमोक्रेटिक उमेदवार हे अती डावे आहेत असे वाटते. भांडवलशाही ही अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे. त्यालाच हे सुरुंग लावण्याच्या बाता करत आहेत. ट्रंप समर्थक सोडा. पण मध्यममार्गी अमेरिकन लोकांना हे रुचत असेल का? बेकायदा घुसखोर लोकांचे नको इतके उदात्तीकरण, पोलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली समलिंगी, लिंगबदल केलेले लोक , अन्य लैंगिक वृत्ती असणारे लोक ह्यांचे नको इतके कौतुक हे सामान्य लोकांना आवडत नाही असे मला वाटते. सॅन फ्रॅन्सिस्कोमधे लोक आनंदाने हुरळून जातात म्हणून सगळेच अमेरिकन तसे असतील असे नाही. पण हे सॅन फ्रॅन्सिस्कन डेमोक्रॅटिक हे मुख्य प्रवाहातील डेमॉक्रॅट बनू पहात आहेत.
कदाचित ट्रंपद्वेष इतका जास्त आहे की तो करता करता आपण फारच वहावत गेलो आहोत हे विरोधी पक्षाला लक्षात येत नाही बहुधा.
अमेरिकन लोकांमधे काहीतरी दोष आहे म्हणून ट्रंप २०१४ साली निवडून आला अशी एक अहंकारी वृत्ती डेमो मंडळींमधे आहे आपण काही चूक केली म्हणून आपण हरलो असे आत्मपरीक्षण केल्याचे आढळत नाही.

अमेरिकन लोकांमधे काहीतरी दोष आहे म्हणून ट्रंप २०१४ साली निवडून आला अशी एक अहंकारी वृत्ती डेमो मंडळींमधे आहे आपण काही चूक केली म्हणून आपण हरलो असे आत्मपरीक्षण केल्याचे आढळत नाही. >> +१

मेयर पीट चांगला वाटतो आहे पण तो गे आहे हा त्याच्या विरोधी मुद्दा ठरू शकेल conservative मतदारांमधे.
बर्नीबाबा अति डावे आहेत. जरी नॉमिनेशन मिळाले तरी ट्रंपला हरवणे त्यांना खूपच अवघड आहे.
बाकी कोणी आत्तातरी फारसे लक्षवेधी वाटत नाहीत.

>>आपण काही चूक केली म्हणून आपण हरलो असे आत्मपरीक्षण केल्याचे आढळत नाही<<
काहि चूक केली असं म्हणण्यापेक्षा बदलते डायनॅमिक्स ओळखण्यात ते कमी पडले, अथवा पार्टिच्या धोरणांनुसार त्यांनी त्याकडे डोळेझाक केली असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. बाकि ट्रंपद्वेषाचा फोकस त्याच्या शेलक्या ट्विट्सवर सुरु होउन तिथेच संपत असल्याने तो इन्सब्स्टँशियल ठरतो. इंपिचमेंटचा फियास्को हे ताजं उदाहरण. या पठ्ठ्यालाहि कळुन चूकलंय कि कुठलं बटन दाबलं कि विरोधक चवताळुन गळाला लागतात, आणि शेवटि त्याचाच फायदा करुन देतात... Wink

२०१६ मधे ट्रंप निवडून आल्यावर आता अमेरिका संपली, अमेरिकेत मोठी यादवी होणार, अल्पसंख्य लोकांचा नरसंहार होणार, निदान त्यांना अमेरिकेत जगणे अवघड होणार, २०२० मधे निवडणुकाच होणार नाहीत वगैरे अनेक भाकिते करुन झाली होती. निदान असले काहीही घडलेले नाही हे तरी डेमॉक्रॅटिक पक्ष कबूल करेल का?
अर्थात "ती" भिंत ट्रंप बांधू शकलेला नाही. मेक्सिकोने पैसे देणे तर दूरच! पण निदान काही प्रमाणात बांधकाम तरी सुरू आहे असे वाटते.

ट्रंप सारखं नेतृत्व आल्यानं दहशतवाद बराच आटोक्यात आला आहे. किम जोंग ची वळवळ कमी झाली आहे. इराण सुध्दा नमला आहे आणि इमरान खान ची दयनीय अवस्था झाली आहे.

मायबोलीकर बर्नीच्या प्रचारात इतके गुंतले आहेत की इथे कुणी फिरकतच नाहीये बहुधा! असो.
कालच्या डिबेटबद्दल काय मत? ब्लूम्बर्गने चर्चेत शिरकाव केला आणि येताच तमाम लोक त्याच्यावर तुटून पडले! म्हणजे तो चांगलाच आघाडीवर असला पाहिजे. एलिझाबेथ वॉरन बाई तर डोके गमावलेल्या मुरारबाजीप्रमाणे लढत आहेत. कारण तसे काही केले नाही तर त्यांना लवकरच काढता पाय घ्यावा लागणार आहे! (पुन्हा एकदा श्वेतवर्णीय लोकांनी एका मूलनिवासी अमेरिकन व्यक्तीला नामशेष केले असेच इतिहास म्हणेल! असो).

ब्लूमबर्ग जर डेमॉक्रॅटिक उमेदवार बनला तर एक म्हातारा, श्वेतवर्णीय, न्यूयॉर्कवासी अब्जाधीश आणि दुसरा म्हातारा, श्वेतवर्णीय, (माजी) न्यूयॉर्कवासी अब्जाधीश अशी शर्यत असेल!

जे २०१६ मध्ये झालं तेच होणार. ट्रम्पविरुद्ध फक्त बोलणार पण मत त्यालाच देणार. सगळया गोऱ्या लोकांचा छुपा पाठिंबा आहे त्याला.

सगळ्या गोर्या लोकांचा अमुक तमुक म्हणजे सगळे गोरे लोक एकाच मापाने मोजणे आहे. हा एक प्रकारचा वंशवाद आहे (racism). मला तो मान्य नाही. असो.

बर्नीने नेवाडाही जिंकले. डेमॉक्रॅटिक प्रस्थापित हे थोडे कमी लेखत आहेत. कारण त्यांना हा भस्मासूर (सोशलिस्ट) डेमॉक्रॅटिक पक्षाचा चेहरा बनायला नको आहे. पण बर्नीची लोकप्रियताच इतकी आहे की ते अवघड होत आहे.

हिलरीच्या वेळेस जशी लबाडी केली तशीच काहीतरी कारस्थाने करुन ह्याहीवेळेस बर्नीचा पत्ता कट करायचा डाव रचला जात असेल!

जो बायडनने बर्नीचा वारू जो चौखूर उधळला होता तो सध्या थांबवला आहे. साउथ कॅरोलिना बायडनच्या खिशात जात आहे.
आता सुपर ट्युसडेला काय होते ते बघू.
एकंदरीत डेमोक्रॅटिक पक्षाला असणारा बर्नीविरोध जास्त ठळक दिसत आहे. बर्नी, बायडन आणि ब्लूमबर्ग हे (तीन बकार!) मुख्य खेळाडू शर्यतीत आहेत असे वाटते.

>>बर्नी, बायडन आणि ब्लूमबर्ग हे (तीन बकार!) मुख्य खेळाडू शर्यतीत आहेत असे वाटते.<<
हो. पीट बुटजजने माघार घेतली. बाकि उरलेलं महिला मंडळ हळुहळु गळेल; इट्स जस्ट ए मॅटर ऑफ टाइम. एक मतप्रवाह असा वाचनात आला कि ब्लुमबर्गला पुढे करुन हिलरी बाई मागच्या दरवाज्याने रेसमधे भाग घेणार आहेत. गुड रिडंस! आता डेम्स्नींच ठरवलंय ट्रंपला फोर मोर इयर्स द्यायची तर यावर आपण काय बोलणार... Happy

एमी क्लोबुचर बाईही बाहेर पडल्या असे दिसते. एलिझबेथ वॉरन कितीवेळ तग धरते ते पाहू.
उद्या ब्लूमबर्गसाठी मोठी कसोटी आहे.

सुपर ट्युसडे पार पडला! बर्नी आणि बायडनची चुरशीची लढत आहे (किंवा आधुनिक मराठीत कांटे की टक्कर!). बर्नी आजोबांनी आपलाही प्रभाव जाणवून दिला आहे. तमाम माध्यमे बायडनला झुकते माप देताना दिसत आहेत.
ब्लूमबर्गने फार प्रभाव पाडलेला नाही. बहुधा त्याला बाहेर पडावे लागेल.
बायडनने तुलसीबाईला उपाध्यक्षाकरता निवडले तर एक वेगळेच वळण लागेल! पण बहुधा अन्य कुठल्या अतीडाव्या, अल्पसंख्य गटातील महिलेची वर्णी लागणार.

बायडनना सुपर ट्युसडेत मिळालेले यश बघून आणि त्याहीपेक्षा ब्लूमबर्गचा फारसा प्रभाव पडला नाही यामुळे जरा 'हुश्श!' झाले! मला बर्नी नको आहे.

का बर्नी नको आहे? त्याने तरुण मतदार तसे एकहाती मोबिलाइज केले. तो कदाचित ब्रेथ ऑफ फ्रेश एअर ठरला असता.
साउथ कॅरोलिनाचे ब्लॅक वोटर्स बर्नीच्या विरुद्ध का गेले असतील? केवळ ओबामाची पुण्याई?

मलाही बर्नी भरवशाचा वाटत नाही स्वाती. कॉलेज फी माफी करणार आहेत पण कसे? रिअ‍ॅलिस्टिक आहे का ते? सोशिअलिस्ट एकंदरच मला डेंजरस वाटतात.

मलाही बर्नी भरवशाचा वाटत नाही स्वाती. कॉलेज फी माफी करणार आहेत पण कसे? रिअ‍ॅलिस्टिक आहे का ते? >> जशी भिंत बांधली जाते आहे तसेच असणार. Happy

पण तसं लोक ओबामाबद्दलही म्हणत होते हेल्थकेअर रीफॉर्मवरून. निदान बदलाच्या दृष्टीने प्रयत्न तरी सुरू होऊ शकले असते. बायडन स्टॅटस को मेन्टेन करेल फक्त! जिंकला तर!

>>का बर्नी नको आहे?>>
१. मोठ्या बँकांच्या बाबतीत कडक नियम करावेत, त्यांची नीट अंमलबजावणी व्हावी पण जुना नियम आणू नये असे मला वाटते.
२. श्रीमंत अमेरीकन्सवर टॅक्स लावा आणि अजून सोशल प्रोग्रॅम्स आणा या ऐवजी पीट सारखे रुरल अमेरीका आणि वर्कर्स मधे गुंतवणूक करा असे काही असते तर आवडले असते.
३. पेड लिवच्या बाबतीत नुसते एंडॉर्स करणे मला पुरेसे नाही. पक्का प्लॅन हवा.
४. स्लेवरीच्या बाबतीत कंपेनसेशनबाबत अजून अभ्यास करणे एवढेच आहे. म्हणजे तिथे काही वेगळे असे नाही.
५. चार्टर स्कूलला एकदमच विरोध आहे. फॉर प्रॉफिट वाल्यांना विरोध समजू शकते पण ....
६. कॉलेज सगळ्यांना सरसकट फुकट हे मला नको आहे. दोन वर्षांचे कॉलेज ठीक. आमच्या इथे 21st century scholar program मधून राज्य सरकार फी भरणार प्रकारात ४वर्ष वाल्या कॉलेजला पहिले वर्ष-दोन वर्ष कॉलेजला जावून कॉलेज सोडणे आकडेवारी बघितली आहे. मी स्वतः मेंटर स्वयंसेवक म्हणून काम केले आहे.
७. सगळा स्टुडंट डेब्ट कॅन्सल हेही मला मान्य नाही.
८. सगळ्यांना सरसकट शाळेत फुकट जेवण हेही तसेच मान्य नाही. हवेतर फ्री लंच चा परीघ थोडा वाढवा. पण सरसकट फुकट प्रकार नको. त्यापेक्षा १२ व्या वर्षानंतर लाईफ स्कील्स शिकवण्यावर भर देवून , काही प्रमाणात आधार देवून भक्कम उभे रहायला बळ द्या.

अजून लिहेन आठवेल तसे.

साउथ कॅरोलिनाचे ब्लॅक वोटर्स बर्नीच्या विरुद्ध का गेले असतील? केवळ ओबामाची पुण्याई?>> असू शकते. ओबामांनी बायडनना निवडले त्यामुळे विश्वासार्ह वाटले असावे.

जॉन केली फॉक्स बघणार्‍यांबद्दल जे बोलला ते एकंदर कुठल्याही चॅनेल बघणार्‍यांबद्दल लागू होते असे मला प्रामाणिकपणे वाटते.

>> केवळ ओबामाची पुण्याई?<<
प्रमुख कारण आहे बर्नीच्या उधळलेल्या वारुला लगाम घालणं. डेम्स एस्टॅब्लिश्मेंटला (डेए) कल्पना आहे कि बर्नीने कितिहि हातपाय मारले तरी तो ट्रंपसमोर निवडुन येउ शकत नाहि. बाय्डन त्यातल्या त्यात फाइट देउ शकेल. शिवाय बर्नीचा डेमक्रॅटिक सोशलिझम (भारतीय भाषेत गरीबी हटाव) हा कुठल्याहि अँगलने पाहिला तरीहि तो अनअमेरिकन असल्याने प्रेसिडेंशियल निवड्णुक जिंकु शकत नाहि. आयोवा आणि न्यु हँपशरच्या निकालानंतर डेएंच्या पायाखालची वाळु सरकल्याने कोर्स करेक्शनची धडपड चालु आहे...

तात्या हुशार खरेच पण. खूप आधीच त्यांनी बायडनला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला(युक्रेन). बायडनच उमेदवार होणार आणि आपल्याला तो फाईट देऊ शकतो म्हणून तो नकोच हे डोक्यात पक्कं असणार तात्यांच्या.

Pages