४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Let's go Brandon!
गेल्या काही महिन्यात हा जयघोष प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
ज्यांना माहीत नाही त्यांच्याकरता.
Alabama राज्यातील कुठल्याशा प्रसिद्ध कार रेसिंग च्या प्रसंगी लोक f*** जो बायडन अशा घोषणा देत होते. वृत्तनिवेदिके ने जाणूनबुजून किंवा गैरसमज झाल्यामुळे ते let's go Brandon म्हणत आहेत असे जाहीर केले. तेव्हापासून Let's go Brandon हे बायडन ला दिलेल्या मूळ शिवीचे नकली सभ्य रूप बनले आहे. पुढच्या निवडणुकात हे वाक्य गाजणार आहे. Maga जसे २०१६ च्या निवडणुकीत होते तसेच!
Looking forward to it!
Let's go Brandon!

<<<योजना पटत नसतील तर टिका टिप्पणी करा पण भ्रमिष्ट, म्हातारचाळ असले शाब्दिक हल्ले कशासाठी>>>
त्यांच्या लाडक्या राष्ट्राध्यक्षाला काय काय वैयक्तिक शिव्या दिल्या होत्या ते आठवा. त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर, वैयक्तिक उद्योगधंद्यांवर पण टीका!!
अर्थात त्याच्या बाबतीत योजना नसून केवळ वल्गना होत्या हा भाग वेगळा.
शिवाय वैयक्तिक हल्ले, खोटे बोलणे, हे तर त्यांच्या पक्षांचे हुकुमी एक्के आहेत, दुसरे काय येते त्यांना? वल्गना, मि यंव नि , मी त्यंव, दुसर्‍यांना शिव्या, नाहीतर भिंत बांधा.
पुढच्या निवडणुका (झाल्या तर) नक्कीच गाजणार आहेत. असा धूमधडाका होईल, की बी एलेम ची चळवळ, नि जानेवरी ६ म्हणजे केवळ १५ सेकंदांचे ट्रेलर!!! त्यापुढे निक्सनने जे केले होते ते हास्यास्पद बालिश!! रस्त्या रस्त्यावर गोळीबार, लुटालूट!! याच त्यांच्या योजना! त्याच्यावर टीका कराल, तर सरळ गोळी!!
लै धम्माल राव!!!
आपण कुठल्या तरी अफ्रिकेतल्या किंवा दक्षिण अमेरिकेतल्या लहानश्या देशात आहोत असे वाटेल.

असंबद्ध आणि निरर्थक बोलण्याच्या बाबतीत येथील काही सदस्य भ्रमिष्ट बायडनच्या वरताण बोलत आहेत.
कुणाचे समर्थन करतो आहोत कुणाचे खंडन कशाचा कशाला पत्या नाही!
आनंद्या आनंद गडे!

हीच तर मायबोलीची गंमत!
अक्कल असती तर लोक इथल्या वादांमधे (?!) कशाला पडले असते.
वेळ घालवायला बरे असते मायबोलीवर येणे.

>Let's go Brandon!<<
यातलं सार्कॅझम सोडा, डाय्हार्ड/फेंसवरचे डेम्स तरी हि घोषणा (लेट्स गो बाय्डन, अ‍ॅटलिस्ट Wink ) द्यायला तयार आहेत? अ‍ॅटलिस्ट माबोवरचे; कुठे गेले ते? परत बिळात, संधीसाधु साले...

वर रिनुएबल एनर्जीचा मुद्दा आला आहे. फ्रॅकिंग बॅनबाबत बाय्डनची कँपेन दरम्यान केलेली घोषणा, आणि त्यानंतर बाय्डन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने केलेला फॉलोथ्रु, यावर कोणि डायहार्ड/सिटिंग ऑन द फेंस डेमक्रॅट प्रकाश टाकु शकेल काय...

मला कोविडचे राजकारण करायचे नाही. हे राजकारण करणार्‍यांना उत्तरादाखल आहे.
ट्रम्प च्या कारकीर्दीत मार्च २०२० ते जानेवारी २१ एवढ्या काळात ४३० हजार अमेरिकन कोविडला बळी पडले. लिबरट मिडिया तेव्हा जणूकाही प्रत्येक मृत्युला ट्रम्प जबाबदार असल्याच्या थाटात 'ट्रम्प लायड् , पीपल डायड्' म्हणून बोंबटत होते. म्हातारबाच्या कारकिर्दीला आता अकरा महिने झाले. म्हणजे जवळपास तेवढाच काळ. आणि आज व्हॅक्सिन हाताशी असताना मृत्यु संख्या झाली आहे साडेआठ लाख! शिवाय गेल्या काही दिवसांत रोज जवळपास अर्धा मिलियन लोक संक्रमित होत आहेत. आणि पाळीव मिडिया चिडिचुप्प.
कोविडला "शट डाऊन" करण्याच्या वल्गना करणार्‍या म्हातारबाने सत्तेवर येऊन काय दिवे लावले हे कोणी अभ्यासू लिबरल मंडळी सांगू शकतील काय?

भ्रमिष्ट बायडनच्या जोडीला कायम एखाद्या चेटकीसारखे विकट हास्य करणारी भीषण कमलाबाई आहे.
सध्या त्या दोघांत स्पर्धा आहे कोणाची लोकप्रियता जास्त रसातळाला गेलेली आहे ह्याची! कधी ह्याचे पारडे जड तर कधी तिचे
कमलाबाई ना बॉर्डर झार अर्थात सीमेवर भ्रमिष्ट राष्ट्रपतींनी सुरू केलेले बेलगाम, बेताल, बेकायदा घुसखोरीचे सत्र हाताबाहेर जाऊ लागले आहे तिथे काहीतरी करावे म्हणून कमलाबाई सारखी "सक्षम" स्त्री नेमली आहे. त्या बाईने एकदा कसेबसे रडत रखडत सीमा रेषे पाशी जाऊन म्हणे काही पाहणी केली. त्यातून काय उजेड पाडला ते देवालाच ठाऊक!
कमलाबाई अध्यक्ष पदाच्या प्राथमिक निवडणुकीतून ज्या वेगाने पाय उतार झाली त्यावरून त्यांची कुवत कळायला हवी होती. पण निव्वळ त्वचेचा रंग, लिंग, वंश योग्य रकान्यात असल्यामूळे भ्रमिष्ट बायडन ने तिला vp म्हणून निवडले. बाकी काही नाही.

<<<मला कोविडचे राजकारण करायचे नाही>>>
अनुमोदन. हा वैद्यकीय विषय आहे.

माझ्या ओळखीचे अनेक डॉक्टर, नर्सेस हॉस्पिटलमधे काम करतात, त्यांच्या सांगण्यावरून <व्हॅक्सिन हाताशी असताना> न घेणारे लोक आहेतच व मेलेल्यांत त्यांची संख्या जास्त आहे.
माझा अर्थातच त्यांच्यावर विश्वास नाही.
हे वैद्यकीय लोक, मिडीया, निवडणूक अधिकारी, सी आय ए या सर्वांवर विश्वास ठेवावा की नाही हे कळत नाही.
मी फॉक्स बघितले नाही किंवा क्यू अनॉन काय म्हणतात तेहि मला माहित नाही. त्यामुळे सत्य काय आहे हे मला फक्त मायबोलीवरून कळते.
पुटीन खरे सांगतो.
नेहेमी सत्य तेच बोलणारा एकच राष्ट्राध्यक्ष लाभला होता. त्याला सर्व निवडणूक अधिकार्‍यांनी नि लोकांनी हाकलून दिले!

<< अ‍ॅटलिस्ट माबोवरचे, कुठे गेले ते? परत बिळात, संधीसाधु साले...>>>
ते कशाला येतील आता इथे? त्यांचे काम झाले, त्यांनी मते दिली, त्यांचा माणूस जिंकला.
आता इथे फक्त जो जिंकला त्याला शिव्या द्यायच्या.
<<<शिवाय गेल्या काही दिवसांत रोज जवळपास अर्धा मिलियन लोक संक्रमित होत आहेत. आणि पाळीव मिडिया चिडिचुप्प.>>>
मिडिया चिडीचुप्प, तरी तुम्हाला कःळले?

<<<सत्तेवर येऊन काय दिवे लावले हे कोणी अभ्यासू लिबरल मंडळी सांगू शकतील काय?>>>
मी लिबरल नक्कीच नाही, व अभ्यासू तर नाहीच नाही. पण दिवे लावून कोविड जाईल असे मला वाटत नाही.
माजी राष्ट्राध्यक्षाने असा काहीसा उपाय सुचवला होता की कुठला तरी दिवा फुफ्फुसात घालून कोविड घालवता येईल, तसेच त्याने इतरहि काही उपाय सुचवले होते, पण मिडियाने ते बरोबर नाही असे सांगितले. त्यामुळेच बरेच लोक मेले नि मिडियावाले लोक उगाचच माजी राष्ट्राध्यक्षाला शिव्या देतात!

<<नन्द्या४३ हा बायडनचाच आयडी आहे याची मला आता खात्री पटली आहे!>>>

नाही हो. माझा पूर्वी झक्की हा आयडी होता. पण खास लोकाग्रहास्तव मी तो काढून टाकला. नंतर बरेच दिवस आयडी घेण्याचा प्रयत्न केला पण जमेना. शेवटी हा आयडी लोकांच्या मदतीने टिकून आहे. माझा पासवर्डसुद्धा मला स्वतःलाच नाही. आपोआप लॉगिन होते म्हणून. नाहीतर मला वेळ घालवायला दुसरे काहीतरी शोधावे लागेल. कदाचित माझा पासवर्ड कुणि हॅक केला असेल तरी तो इथल्या वादात भाग घेण्ञाइतका मूर्ख नक्कीच नसावा.
डुप्लिकेट आय डी, धागे काढणे वगैरे टेक्निकल गोष्टी मला जमत नाहीत.

<<त्यानंतर बाय्डन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने केलेला फॉलोथ्रु, यावर कोणि डायहार्ड/सिटिंग ऑन द फेंस डेमक्रॅट प्रकाश टाकु शकेल काय...>>
डायहार्ड/सिटिंग ऑन द फेंस डेमक्रॅट यापैकी मी काहीहि नाही.
लहानपणी थोडीशी अक्कल असल्याने मी या भानगडीतच पडलो नाही.
पण माझी खात्री आहे की पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांनी ज्याप्रमाणे दक्षिण सीमेवर भिंत बांधून तिथून येणार्‍यांचा कायमचा बंदोबस्त केला, किंवा ओबामाकेअर काढून तिथे एक उत्कृष्ट हेल्थ इन्शुरन्स सिस्टीम केली, तसेच काहीतरी असणार हे नक्की!
पन्नास वर्षांच्या अनुभवावरून हे शिकलो आहे की कुठलाहि पक्ष सत्तेत असला, त्याने काहीहि केले वा केले नाही तरी माझे आयुष्य उत्तम रितीने चालू आहे. खरे तर माझ्या ओळखीच्या सर्वांचेच. सगळ्यांना स्वतःची काळजी घेता येते, राजकारणात काहीहि झाले तरी.
मला फक्त इथे येऊन राजकारणावर वाद घालणार्‍या मूर्ख लोकांची गंमत वाटते नि वेळ घालवायला मी मुद्दाम काहीतरी उलटसुलट लिहितो नि लोक अजून लिहितात. तेव्हढाच माझा मायबोलीला हातभार - जाहिराती मिळतील ना! त्याप्रमाणे इथे खरोखरच जाहिरातीसारखेच चालू आहे.

>त्याप्रमाणे इथे खरोखरच जाहिरातीसारखेच चालू आहे.<<
नंद्याशेठ, अहो "मॅन इज ए पोलिटिकल अ‍ॅनिमल" असं प्लुटो कि अ‍ॅरिस्टॉटल म्हणुन गेला आहे. त्या अनुषंगाने आम्हि सगळे पुरुष आहोत. तुम्हि तर काय - पुरुष नाहि आहात.. महापुरुष आहात... Proud

शेवटी हा आयडी लोकांच्या मदतीने टिकून आहे>>
असू द्या असू द्या हो Happy तिथे व्हाईट हाउसात बसवलेला गुळाचा गणपतीसुद्धा लोकांच्या मदतीने देश हाकतो आहे. नॅन्सीआज्जी, एओसीअक्का, हिलरीकाकू, कमळीताई सांगतील त्या बिलावर सही करायची आणि गाईगाई करायला जायचं. तुमच्यामुळे इथे जरा कॉमिक रिलिफ मिळतोय आणि त्याच्यामुळे देश खड्ड्यात जातो आहे एवढाच फरक.

>>
मला फक्त इथे येऊन राजकारणावर वाद घालणार्‍या मूर्ख लोकांची गंमत वाटते नि वेळ घालवायला मी मुद्दाम काहीतरी उलटसुलट लिहितो नि लोक अजून लिहितात. तेव्हढाच माझा मायबोलीला हातभार - जाहिराती मिळतील ना! त्याप्रमाणे इथे खरोखरच जाहिरातीसारखेच चालू आहे.
<<
आपली विनोदबुद्धी आणि स्मरणशक्ती वयानुसार क्षीण झालेली दिसते नाहीतर कुणी उपरोधाने काही विधान केले तर ते गंभीरपणे घेऊन एखाद्या बोधवाक्याप्रमाणे वापरले नसतेत. असो. आपण निर्लज्जपणे, निव्वळ वेळ घालवायला आगीत तेल ओतण्याकरताच इथे सहभागी होत आहात असे सांगितलेच आहे तर दोन जोडे माझ्यावतीने हाणले तर वाईट वाटू नये आपल्याला.
असो. भ्रमिष्ट, म्हातार्‍या बायडनच्या बोलण्यातले ८०% असंबद्ध आणि निरर्थक बरळणे असते तसेच आपल्या बाबतीत समजू. तेवढेच आपल्याला आपल्या लाडक्या नेत्याच्या पंगतीत बसल्यासारखे वाटेल.

<<तसेच आपल्या बाबतीत समजू. तेवढेच आपल्याला आपल्या लाडक्या नेत्याच्या पंगतीत बसल्यासारखे वाटेल.>>
तुम्हाला तसे वाटणे साहाजिकच आहे. बर्‍याच लोकांना तसे वाटते. असले अनेक जोडे लोकांनी हाणले आहेत त्यांच्या परीने, त्यात काय? मी नाही मनावर घेत.
मी आपला माझा वेळ जायला लिहितो. लोक इतक्या पोटतिडिकीने राजकारणावर चर्चा करू शकतात याची मला गंमत वाटते.
पण कुठल्याहि पक्षाचा राजकीय माणूस माझा कधिहि लाडका नव्हता, सध्या नाही, नि पुढेहि असणार नाही.

<<<त्याच्यामुळे देश खड्ड्यात जातो आहे एवढाच फरक.>>>
अहो नाही हो, असे काही होणार नाही.
सेप्टेंबर ११, २००१ चा हल्ला, दोन दीर्घकालीन युद्धे, स्टॉक मार्केटचे डिप्रेशन, काळा राष्ट्राध्यक्ष या सर्वाबद्दल बर्‍याच लोकांना वाटले देश खड्ड्यात जातो आहे, पण आपण सगळे त्यातून जगलो नि चांगले मजेत रहातो आहोत.
राजकारण हा काही लोकांचा खेळ आहे, आपण फक्त प्रेक्षक. जुने खेळाडू जातात, नवे येतात, कधी आपला संघ जिंकतो, कधी दुसर्‍याचा.
आपण मनावर घेऊ नये.

काळा राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे नक्की किती लोकांना देश बुडाला असे वाटले ह्याची काही आकडेवारी आहे का? माझ्या आठवणी नुसार ओबामाला उत्तम मताधिक्य मिळाले होते. असो. (आपल्याकडून आकडेवारी वगैरे मिळण्याची अपेक्षा करणे खूपच अवास्तव आहे ह्याची जाणीव आहे. तरी एक rhetorical question म्हणून)
९/११ च्या हल्ल्याने जगभरच्या विमान प्रवासावर कायम स्वरुपी घातक परिणाम झाला आहे. प्रचंड सुरक्षा, तपास ह्यामुळे अब्जावधी डॉलर्स खर्च होत आहेत आणि होणार आहेत. ९९.९९९% टक्के प्रवासी निरुपद्रवी असूनही त्यांना तपासणीच्या दिव्यातून जावे लागत आहे. ह्याला मी एक कणभर खड्ड्यात जाणे म्हणतो.
एक कर भरणारा नागरिक म्हणून आपले पैसे सरकारने वाया न घालवता कमी प्रमाणात, योग्य जागी वापरावेत असे वाटत असेल तर काय चूक.आहे?
लोकशाहीत प्रत्येक नागरिकाने राजकीय घडामोडींचा आढावा घेणे आवश्यक असते. आपला खारीचा वाटा उचलायचा असतो. कुणाला हे निरर्थक चाळे वाटत असतील तर त्यांनी दुर्लक्ष करावे.

<<काळा राष्ट्राध्यक्ष झाल्यामुळे नक्की किती लोकांना देश बुडाला असे वाटले ह्याची काही आकडेवारी आहे का? >>
बर्‍याच लोकांना वाटले देश खड्ड्यात जातो आहे असे लिहीले मी. माझे मत तसे नाही किंवा आहे याला मह्त्व नाही कारण मी सांगितले की मला राजकारणात रस नाही.
<<आपल्याकडून आकडेवारी वगैरे मिळण्याची अपेक्षा करणे खूपच अवास्तवसर्वाबद्दल >>
बरोबर आहे. आजकाल आकडेवारीवर विश्वास ठेवणे कठीण. खात्रीच नाही कोण खरे सांगतो, कोण खोटे. मी फक्त माझ्यापुरती आकडेवारी सां गतो.

म्हातारबा जो निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात ठासून म्हटला होता की मी करोनाचा पूर्ण नायनाट करेन. परंतु तसे काहीही होताना दिसत नाही. आजोबांना आपण तेव्हा काय बोललो होतो ते आठवण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु हे बेजबाबदार, खोटारडे विधान २०२२ च्या निवडणुकीत प्रचारात दाखवले जाईल अशी आशा.
जो आजोबा आणि कमळीबाई असेच "धडाक्यात" काम करत राहोत आणि नोव्हेंबरमधे ह्या नादान अतिरेकी डाव्या बनलेल्या पक्षाची धूळदाण होवो हीच इच्छा!

भ्याँ.... हो ना! माझ्या तर डोळ्यांतलं पाणी खळत नाहीये Sad

एनिहाऊ...
डेमोक्रॅटांचा बुजबुजाट असलेल्या न्युयॉर्क राज्यात टेक्सासच्या दुप्पट संख्येने लोक बाधित होतायत. मृत्यूदरही जवळपास दुप्पट. न्युयॉर्कचे पॉप्युलेशन टेक्सासच्या दोन तृतियांश...
पण आपल्यासाठी ओपिनियन > फॅक्ट्स... फॅक्ट्स वगैरे त्या येडचॅप उजव्या लोकांसाठी!

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी लोकांनी शरिरांत disinfectant इंन्जेक्ट करायला हवे असे उपाय व्हाईट हाऊस प्रेस ब्रिफिंगमधून मिळेनासे झाल्यावर कोरोनावर विजय कसा मिळवणार?

६ जानेवारी, २०२१ ला बंडखोरांनी Capitol वर हल्ला केला होता. संतापाने बेभान झालेल्या समुहा पासून पेन्स आणि नॅन्सी पलोसी किती कमी अंतरावर होते. जर बंडखोरांना यश मिळाले असते तर किती मोठा अनर्थ घडला असता. सर्वच धक्कादायक होते.

आजही ट्रम्प महाशय आणि त्यांचे कोट्यावधी चाहते निवडणूकांत गैरप्रकार झाले होते असाच अपप्रचार करत आहेत. २०२४ मधे ट्रम्प (किंवा त्याच्या विचारसरणीचा) पुन्हा निवडून आला नाही तर ते निकाल स्विकारतील का? नाही स्विकारला आणि भाग#२ कडे वाटचाल सुरु झाल्यास?

लष्करात अनेक वर्षे काम केलेल्या आणि आज सेवेतून निवृत्त झालेल्या तिन अधिकार्‍यांचे मत, भावी काळांत कसल्या संकटांना / अराजकाला सामोरे जावे लागेल याची कल्पनाही करवत नाही.
https://www.washingtonpost.com/opinions/2021/12/17/eaton-taguba-anderson...

असे ऐकले की कमलाबाई भावनेच्या भरात असे बोलून गेल्या की दोन महायुद्धे, अणुबॉम्ब हल्ला, पर्ल हार्बर, ९/११ हल्ला ह्या सगळ्यांच्या एकत्रित परिणामापेक्षा जानेवारी ६ चा हल्ला जास्त महाभयंकर आणि विध्वंसक होता.

तरी काही व्रात्य लोक असे म्हणतात की ६ जानेवारीला अमेरिकन लोकशाहीला कायमची बुडवायला निघालेल्या उन्मत्त जमावाने जितके लोक ठार मारले त्याहून जास्त लोक अलेक बाल्डविन ने रस्ट नामक सिनेमाच्या सेट वर स्वहस्ते गोळ्या झाडून मारले!

<< एनिहाऊ...
डेमोक्रॅटांचा बुजबुजाट असलेल्या न्युयॉर्क राज्यात टेक्सासच्या दुप्पट संख्येने लोक बाधित होतायत. मृत्यूदरही जवळपास दुप्पट. न्युयॉर्कचे पॉप्युलेशन टेक्सासच्या दोन तृतियांश...
पण आपल्यासाठी ओपिनियन > फॅक्ट्स... फॅक्ट्स वगैरे त्या येडचॅप उजव्या लोकांसाठी! >>

------- दोन्ही राज्यांचे वल्डोमिटवरचे आकडे बघितले. तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण अशी तुलना करतांना इतरही काही कारणे असतील त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

ओमीक्रॉन फार झपाट्याने पसरत आहे. मग दोन राज्यात एव्हढा फरक का असावा? अनेक कारणे असतील पण ठळक पणे मला दिसलेले एक कारण social distancing... या दोन राज्यातली लोकसंख्येच्या घनते मधे चार पटीचा फरक आहे. न्युयॉर्क राज्यात १६२ माणसे/ स्के. किमी तर टेक्सास मधे हेच प्रमाण ४० माणसे/ स्के. किमी. निव्वळ आकाराने टेक्सास ६ पटीने मोठा आहे आणि न्युयॉर्क मधे घनता काही ठिकाणी जिवघेणी मोठी आहे.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_United_States_cities_by_population...

<<<जितके लोक ठार मारले त्याहून जास्त लोक अलेक बाल्डविन ने रस्ट नामक सिनेमाच्या सेट वर स्वहस्ते गोळ्या झाडून मारले!>>>
अहो तिकडे नका लक्ष देऊ. त्या दोन गोष्टी वेगळ्या. तुम्हालासुद्धा कळत असेल. भावनेच्या भरात काहीतरी लिहून टाकलेत, पण शहाणी माणसे तिकडे दुर्लक्ष करतात. असे वेडेवाकडे पसरवू नये अन्तर्जालावर - सगळे तुमच्या एव्हढे शहाणे नसतात, कशावरहि विश्वास ठेवतात.
जसे बीएलेम शांततापूर्ण (??!!!) निदर्शने करत होते, तसेच ६ ़जानेवारीला कॅपिटॉल वर जाणारेहि शांततापूर्ण (??!!!) निदर्शने करत होते असे म्हणा. थोडी मारामारी व्हायचीच! सगळेच काही महात्मा गांधी नसतात, मुकाट्याने लाठ्या खाणारे.
कमलाबाई सारा पेलीन ची आठ्वण करून देतात.
शिवाय त्या मार्जोरि टेलर ग्रीन, बोबेक, अलेक्स जोन्स यांच्याशी स्पर्धा करताहेत हे लक्षात घ्या. या सर्वांचे बोलणे मनावर घेणारे असंख्य लोक या देशात आहेत, नि इतर अनेक त्यांना पाठिंबा देतात. तेंव्हा कमलाबाई पण दाखवून देत आहेत, हम भी कुछ कम नही, यडपटपणात!!!
आजकाल अमेरिकेत वेडपटपणालाच वा वा म्हणतात!

राजकारणावरून लोकं तावातावाने आपले रक्त का आटवतात, हे मला कधीच कळलं नाही. राष्ट्राध्यक्ष कोण आहे, त्यामुळे सामान्य लोकांच्या आयुष्यात फार काही फरक पडतो का कधी?

Pages