४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

“ उन्मत्त, अहंकारी माणसाला अफाट, अमर्याद सत्ता दिली आणि ती टिकावी, वाढावी म्हणून जे काही राजकारण, खोटारडेपणा (वैज्ञानिक संशोधन सोडून बाकी सगळे) हा पाजी माणूस करताना दिसत आहे.”

हे शेंडेनक्षत्रांनी जे काही लिहीले आहे ते डॉक्टर फौचींबद्दल लिहीले आहे का ट्रंपबद्दल? Proud

“सरकारी नोकराने सिनेटरला महामूर्ख म्हणणे - अहंकार, उर्मटपणा, बेदरकारपणा
ॲनॉनिमस आयडीने प्रेसिडेंटला अर्धवट, भ्रमिष्ट, हेकेखोर म्हणणे - फ्रीडम ऑफ स्पीच, लिबर्टी, मूल्ये
सरकारी नोकर फौचीचे रेकॉर्ड्स पब्लिक असणे - प्रत्येकाच्या घरी सकाळी दुधाच्या कॅनबरोबर ते डिलिव्हर व्हायलाच पाहिजेत.
प्रेसिडेंट‌ ट्रंपचे टॅक्स रेकॉर्ड्स पब्लिक नसणे - तो त्याचा प्रश्न आहे, आम्ही त्याला ते विचारणार नाही, त्याचा काही संबंधच नाही मुळी.”

भास्कराचार्य, एक सणसणीत चपराक! Proud

फारेंड, बंगाली बाबाची तंबुतली लॅब! तु महान आहेस! Rofl

>>मुख्य म्हणजे तो एक शास्त्रज्ञ आहे. राजकारणी नव्हे.<<
व्हेन यु असुम ए पब्लिक ऑफिस, ऑर ए पोझिशन; व्हेदर यु आर ए पोलिटिशन ऑर नॉट, व्हेदर यु लाइक इट ऑर नॉट; यु आर अंडर ए पर्व्यु ऑफ पब्लिक आय...

ट्रंप न्यु इट; होप फौची गेट्स इट - सूनर दॅन लेटर...

कुठल्याही प्रकारे उत्तरदायित्व न बाळगता चीन अमेरिकेकडून पैसा घेतो हे संतापजनक आहे. पण फौची भक्तीत तल्लीन झालेल्या लोकांना ह्यात काही गैर वाटत नाही हे उघड आहे! >>> अहो जरा अमेरिकन सबकॉण्ट्रॅक्टर्स आणि परदेशी कंपन्या यात कसे कामकाज चालते ते समजावून घ्या. इतर चार दोन उदाहरणे पाहा. पाहिजे तर ट्रम्पच्या काळात सुरू झालेल्या योजनांची पाहा. साधारण असलाच प्रकार असतो. चीन काही उत्तरदायित्व दाखवतो का ई गोष्टी फाउचीने इन्व्हेण्ट केलेल्या नाहीत. हे धोके पत्करूनच परदेशातील संस्थांबरोबर कामे चालतात. सरकारी प्रोसेस मधे असंख्य खाचाखोचा असतात, त्रुटी असतात. अमेरिकेने चीन बरोबर राजनैतिक संबंध तर तोडलेले नाहीत. असली डील्स अजून हजारएक सुरू असतील विविध एजन्सीजतर्फे.

मुद्दा हा आहे की अमेरिकेच्या एकूण धोरणाशी हे सगळे सुसंगत होते का, तर तसे काही नव्हते आणि यामागे फाउचीचा हात आहे असले काही पुढे येत नाही. टोटल बकवास आरोप.

जे राजकारणी नाहीत अशा लोकांना अगदी आक्रमक पद्धतीने (म्हणजे प्रश्न विचारायचा, आणि उत्तर द्यायला सुरूवात केली आणि आणखी ओरडून तिसराच आरोप करायचा) कॉर्नर केले तर त्याच्याकडून एखाद दुसरे वाक्य सापडतेच धरून धोपटायला. त्यात विशेष काही नाही. सध्यातरी फाउची आणि त्याच्यावर आरोप करणारे यात विश्वासार्ह फाउचीच आहे.

बाकीच्यांची विश्वासार्हता अगाध आहे. त्यांची माहिती गूगल व फेसबुक अमेरिकन सरकारने पब्लिक ठेवलेली माहिती "लपवते" इतकी आहे. जे जे पब्लिक नाही ते ते सर्व संशयास्पद आहे असा त्यांचा आरोप आहे. मात्र हेच लॉजिक ट्रम्पला लागू होत नाही.

सध्या जे लोक सरकारी एजन्सीज मधून याबद्दल निर्णय घेत आहेत त्यांना धारेवर धरण्यात काही चुकीचे नाही. पण तो वाद "शास्त्रज्ञ विरूद्ध व्हॉटसॅप अंकल" टाइपचा झाला तर काही उपयोग नाही.

इथे दोन उदाहरणे देतो. दोघेही सिनेटर रिपब्लिकन्स आहेत. एक नॉर्थ कॅरोलीना व दुसरा इण्डियाना. त्यांनी ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले ते विचारले जायला हवेत. डेम्स काही साधू लोक नाहीत. त्याबाजूलाही लॉबीज, व्हेस्टेड इंटरेस्ट्स आहेत. पण आरोपच जर बालिश झाले तर हे न्युआन्सेस बाहेरच येणार नाहीत.

सिनेटर रिचर्ड बर
https://www.youtube.com/watch?v=tkP31Xv3QEk

सिनेटर माइक ब्रॉन
https://www.youtube.com/watch?v=aqMyC9En2Ho

बाय द वे, कालचे ट्रम्पचे अ‍ॅरिझोनातील भाषण कितीजणांनी ऐकले माहीत नाही. नेहमीचे अ‍ॅण्टिक्स होतेच पण त्यामधे ३-४ मिनीटे त्याने नेहमीपेक्षा एकदम वेगळे भाषण केले. एरव्हीची स्वस्तुती व मीडीया, डेम्स ची निंदा या सगळ्या गोंध्ळामधे एकदम कोहिरंट भाषण केले त्याने. अ‍ॅरिझोनाचा भूगोल, तेथील जुने लोक, इतिहास वगैरेवर बराच काळ बोलत होता. हाच तो ट्रम्प का असा प्रश्न पडला Happy एकदम "There is no mountain we cannot climb, there is no summit we cannot reach..." वगैरे वगैरे.
https://www.youtube.com/watch?v=cP8DlVnSUxk

याआधी आठवत नाहीत अशी भाषणे त्याची.

फारेंड, मी परवाच म्हणालो होतो, इथले सगळे मुद्दे व्हॉट्स अ‍ॅप/ क्विनॉन / फेसबुक अंकल यांचे विचार/ म्हणणे प्रमाण मानुन केले जात आहेत. वुहान लॅब कधी कोणी व कशासाठी निर्माण केली गेली याचा गंधही या व्हॉट्स अ‍ॅप अंकल छाप पोस्टी लिहीणार्‍यांना नाही. उगाच कुठेतरी (म्हणजे क्विनॉन/ व्हॉट्स अ‍ॅप/ फेसबुक अंकलने) म्हटले तेच इथे उगाळायचे. ज्यांना खऱच जेनेटिक इंजीनिअरींग/ बायोमेडिकल फार्मा कंपनीजचा इतिहास माहीत असेल

( खासकरुन जेन एन टेक या बायोटेक कंपनीची सुरुवात कशी झाली याचा इतिहास व त्यांनी व्हायरस वापरुन, जेनेटिक स्लायसींग टेक्निक वापरुन त्याद्वारे सिंथेटिक इंसुलिन कसे ७० च्या दशकात तयार केले याचा अभ्यास असेल व त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरींग कसे वेगाने प्रगत होत गेले, त्यानंतर व्हायरस रेप्लिकेशन प्रॉसेसचा स्पिड वाढवायचे प्रयोग , ह्युमन जिनोम प्रॉजेक्ट, व मग त्यानंतर प्रगत देशांमधे व शास्त्रज्ञांमधे झालेले शास्त्रिय व फिलॉसॉफिकल वाद ,मग झालेली वुहान लॅबची निर्मीती हे सगळे जाणुन घ्यायचे असेल)

त्यांनाच वुहान लॅब प्रकरण कळेल. पण तसा अभ्यास करायला वेळ कुठे आहे कोणाला? मग त्यापेक्षा सोप्पे म्हणजे व्हॉट्स अ‍ॅप/ क्विनॉन/ फेसबुक अंकलनी अर्धवट ज्ञानानी पाजळलेले अगाध व क्विक्झॉटिक मुद्देच कसे खरे असे म्हणत इथे दळण दळत बसायचे. आणी मी असे म्हटले की मीच थयथयाट करतो असे खुशाल बोलुन मोकळे व्हायचे! चालु द्यात!

फारेंड, तु बरोबर बोललास. डेम्सही काही साधु नाहीत. मी तर पुढे जाउन हेही म्हणेन की बर्‍याच फार्मा कंपनीही साधु नाहीत. त्याही पैशाच्या लोभापायी वुहान लॅबच्या निर्मीतीला कारणीभुत आहेत. पण त्यात डेमोक्रॅट्स व रिपब्लिकन गव्हर्मेंट्स व दोन्ही बाजुच्या बिझिनेस व फार्मा लॉबीज जबाबदार आहेत. आणी नुसते अमेरिकेचेच नव्हे तर जगातल्या बर्‍याच गव्हर्मेंट्स व फार्मा कंपनीजचे हात या वुहान लॅबमधे पैशाच्या लोभापायी गुंतले आहेत. त्या सगळ्यांच्या वरदहस्ताने अत्ययावत अशी वुहान लॅब निर्माण केली गेली आहे. पण नुसते डेमॉक्रॅट्स व डॉक्टर फौचीलाच अर्धवट ज्ञानाने साप साप म्हणुन काही लोक बडवत आहेत.

<< फौचीलाच अर्धवट ज्ञानाने साप साप म्हणुन काही लोक बडवत आहेत. >>

------ ट्रम्प पराभवाला फौचीने कळत नकळत हातभार लावला होता हे कारण असेल. ट्रम्पने अनेकांचा अपमान केला आहे, बहुतेक प्रकरणांत ट्रम्प लोकप्रियतेवर काही फरक पडला नाही, पण फौचीवर हल्ला केला आणि लोकांना तो तितकासा रुचला नाही. कुंपणावर असणार्‍यांना निर्णय घेण्यास मदत झाली.

छान चर्चा !
To be fair ,
अध्यक्ष वा त्या पदाचे उमेदवार यांनी टॅक्स रिटर्न्स दाखवावेत असा नियम नाही. टेक्निकली ट्रंप यांनी चूक केलेली नाही.
मायबोली सारख्या संकेत स्थळावर व्यक्त होताना आपले खरे नाव जाहीर न करण्याचा हक्क सर्वांनाच असावा, कारणे काहीही असोत.

मी स्वतः ट्रंप समर्थक नाही पण ज्या पद्धतीने त्याला डी प्लॅटफॉर्म केले गेले ते डिस्तर्बिंग वाटते.

त्या सगळ्यांच्या वरदहस्ताने अत्ययावत अशी वुहान लॅब निर्माण केली गेली आहे. पण नुसते डेमॉक्रॅट्स व डॉक्टर फौचीलाच अर्धवट ज्ञानाने साप साप म्हणुन काही लोक बडवत आहेत. >>> मुकुंद, हो. पण नुसता पैशाचा लोभ वगैरे इतकेच हे नाही. "अमेरिकन इन्टरेस्ट्स" करता हे सगळे केले गेले असेल. मला आश्चर्य वाटते ते असे लागेबांधे पहिल्यांदाच समजल्यासारखे लोक करत आहेत त्याबद्दल.

अध्यक्ष वा त्या पदाचे उमेदवार यांनी टॅक्स रिटर्न्स दाखवावेत असा नियम नाही. टेक्निकली ट्रंप यांनी चूक केलेली नाही. >>> विकु त्याने कॅम्पेन मधे सांगितले होते हे वाचले आहे. पण मुद्दा तो नाही. फाउचीच्या आर्थिक बाबीसुद्धा सध्याच्या कायद्याप्रमाणे/नियमाप्रमाणेच उघड किंवा रिडॅक्टेड आहेत. मग त्याबद्दल इतके रान कशाला उठवायचे. संशयास्पद म्हणाल तर ट्रम्पच्या गोष्टी काही कमी संशयास्पद नव्हत्या.

फाउचीच्या आर्थिक बाबीसुद्धा सध्याच्या कायद्याप्रमाणे/नियमाप्रमाणेच उघड किंवा रिडॅक्टेड आहेत. >> एक्झॅक्टली. विकु तुमच्याकडून ते वाचून जरा आश्चर्य वाटले.

फारेंड, तुझे बरोबर आहे. नुसता पैशाचा लोभ म्हणणे चुकीचे होइल. अमेरिकन इंटरेस्ट( व बाकीच्या जगातल्या धनाढ्य फार्मा कंपनीजचे इंटरेस्ट्स सुद्धा) नक्कीच त्याच्यामागे आहेत. ते इंटरेस्ट कुठले याचा कोणी नीट बारकाइने अभ्यास केला आहे का?

हा सगळा पँडेमिकचा घोळ कशामुळे झाला हे जर तु मला विचारलेस तर मी एका शब्दात त्याचे उत्तर देउ शकतो. यामागचे एकच कारण म्हणजे जगातले प्रगत देश,तिथल्या मोठमोठ्या फार्मा कंपनीज व सायंटिस्ट्स चा “ ह्युब्रस“!

ते कसे याचा विषय थोडा किचकट व गुंतागुंतीचा आहे पण इथे मी थोडक्यात तो समजाउन सांगायचा प्रयत्न करतो. प्लिज बेअर विथ मी!

ते समजुन घ्यायला आपल्याला जेनेटिक्सचा आद्य ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ ग्रेगर मेंडेल पासुन सुरुवात करायला लागेल.

<<<< ते कसे याचा विषय थोडा किचकट व गुंतागुंतीचा आहे पण इथे मी थोडक्यात तो समजाउन सांगायचा प्रयत्न करतो. प्लिज बेअर विथ मी!>>>

ही माहिती वाचायला नक्कीच आवडेल. शक्य असल्यास स्वतंत्र लेख लिहाल का? ह्या धाग्यावर ती पोस्ट हरवुन जाईल.

ग्रेगर मेंडेलला जेनेटिक्सचा फादर म्हटले जाते . बहुतेकांना त्याचे नाव शाळेत जिवशास्त्राचा अभ्यास करताना वाटाण्यांवर प्रयोग करणारा शास्त्रज्ञ म्हणुन माहीत असेल. त्याने असे दाखवुन दिले की पेशींच्या केंद्रात जेनेटिक मटेरिल असते जे वनस्पतीच्या( वाटाण्याच्या) गुणधर्माला जबाबदार असते. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या वाटाण्याच्या झाडांचे कलम करुन नविन हायब्रिड वाटाणा करु शकतो हे त्याने १८५०-६० च्या सुमारास दाखवुन दिले.त्यावरुन त्याने इनहेरिटंसचे ३ लॉज मांडले.

त्याच्या त्या अभ्यासातुन मग जेनेटिक्सचा विषय क्रमाक्रमाने वाढत गेला.

पुढची ५० वर्षे मग बाकीच्यांनी वेगवेगळ्या वनस्पतीवर मेंडेलसारखे प्रयोग करुन कुठे टमॅटोज मोठे, कांदे मोठे, फळ मोठी किंवा जास्त पिक देणारे दाणे असे गुण जोपासत/ शोधत वनस्पती/ फळे/ ग्रेन्सच्या पिकात उत्पादनता वाढवण्यावर व त्या अनुषंगाने होणारा नफा यावर लक्ष देण्यास सुरुवात केली.

मग साधारण १९१० ते १९२० च्या सुमारास अमेरिकेत काँट्रोव्हर्शिअल बायॉलॉजिस्ट चार्ल्स डॅव्हेनपोर्ट याने इंग्लंडमधे १८८५ च्या सुमारास डार्विनचा कझिन फ्रॅन्सिस गॅल्टन याने ज्या “ युजेनिक्स“ या विचारधारेला जन्म दिला होता त्या विचारधारेला उचलुन धरले व त्या विचारधारेला फोफावण्यास सुरुवात केली.

या व्हेरी काँट्रोव्हर्शिअल “ युजेनिक्स” विचारधारेमधे ज्याप्रमाणे वनस्पतीं/फळे/ग्रेन्स कलम करुन व त्यांचे जेनेटिक्स मॉडिफाय करुन आपल्याला हवी तशी फळ, ग्रेन्स, भाज्या आपण तयार करु शकतो तसे ह्युमन जेनेटिक्स मधे ढवळाढवळ करुन हवी ती ह्युमन रेस व हवे तसे ह्युमन्स आपण् का नाही तयार करु शकणार असा मुलभुत विचार होता.म्हणजे फक्त गोरेच, फक्त उंचच, फक्त निळ्या डोळ्याचीच माणसे जन्माला येउ द्यायची वगैरे वगैरे.

पण अश्या घातकी विचारसारणीमुळे ह्युमन जेनेटिक व्हरायटी कमी होउन जास्त म्युटेशन्स होउ शकतील व हे एथिकली बरोबर नाही अशी जगभरच्या बर्‍याच सायंटिस्ट्सना भिती वाटु लागली म्हणुन “ युजेनिक्स” विचारसरणीला जगभरच्या त्यावेळच्या सायंटिस्ट्सनी वेळीच लगाम घातला.

पण हा युजेनिक्सचा विषय हिटलरच्या वाचनात तो १९२० नंतर जेव्हा तो तुरुंगात होता तेव्हा आला होता. मग पुढे तो जेव्हा जर्मनीचा चॅन्सेलर झाला तेव्हा वांशीक सुपिरिअ‍ॅरीटीचे खुळ त्याच्या डोक्यात या “ युजेनिक्स“ विचारसारणी त्याच्या वाचनात जी आधीच आली होती त्यामुळेच आले. त्याप्रमाणे त्याने मग डॉक्टल मेंगेलच्या नेतृत्वाखाली नाझी राजवटीमधे युजेनिक्सच्या नावाखाली असंख्य भिषण प्रयोग करायला सुरुवात केली होती. हिटलरने खुले आम “ युजेनिक्स” थिअरी उचलुन धरली होती. थँक गॉड हिटलरचा व नाझी विचारसरणीचा पाडाव झाला व परत एकदा जगभरच्या सायंटिस्टनी युजेनिक्स विचारसरणीला सप्रेस केले.

जोपर्यंत दुसरे महायुद्ध संपले तोपर्यंत इथे जेनेटिक्स विषयात प्रचंड वेगात प्रगती होत होती. १९५० च्या दशकात वॉट्किन्स आणी क्रिक या २ शास्त्रज्ञांनी डी एन ए चे डबल हेलिक्स मॉडेल तयार केले.

डी एन ए चे २ स्ट्रँड असतात ( २ आर एन ए) त्यावर स्ट्रँड्सवर वेगवेगळ्या सिक्वेन्सचे न्युकिओटाइड्स असतात त्याला जिन्स म्हणुन संबोधतात. ते जिन्स माणसाला वेगवेगळे गुणधर्म देतात( उंची, डोळ्यांचा रंग, कांतीचा रंग वगैरे). त्याचप्रमाणे हेच जिन्स माणसाला काही रोगही अनुवांशिकतेने देउन शकतात.

आता यापुढे जिन सिक्वेन्सिंग, जिन स्प्लायसींग, रिकाँबिनंट डी एन ए टेक्नॉलॉजी, आर एन ए रेप्लिकेशन , जेनेटिक एनजिनिअरींग, सिंथेटिक इन्सुलिनची निर्मिती, हटिंग्टन कोरिआ व अजुन २००० जेनेटिक रोगांवरचे संशोधन व त्यातुन होउ शकणारा आर्थिक नफा व तश्या रोगांवर होउ शकणारी मात, ह्युमन जिनोम प्रॉजेक्ट अश्या एकामागुन एक गोष्टी वेगात घडत जातात . त्या घटनाक्रमात विषाणुंचा कसा मोठा हातभार आहे हे आपण पुढच्या पोस्ट मधे बघु व त्याचा आढावा घेउ. खरी गंमत तर पुढे आहे.

क्रमंशः

तर हे विषाणु आणी जेनेटिक संशोधन यात नेमका काय संबंध?

सगळ्यांना हे माहीत असेलच की विषाणुमधे फक्त आर एन ए हा एकच स्ट्रँड असतो व विषाणुला रेप्लिकेट व्हायला होस्टची जरुरी असते. साध्या शब्दात समजावयाचे म्हटले तर विषाणु स्वतः च्या जिवावर रिप्रोड्युस होउ शकत नाही. तो होस्ट सेलमधे प्रवेश करतो व मग होस्ट सेलच्या न्युक्लिअसमधले जेनेटिक मटेरिअल वापरुन स्वतःच्या आर एन ए स्ट्रँडचि प्रतिकृती,म्हणजेच स्वतःच्या फटाफट कॉपीज बनवतो.

जगातल्या बहुतांशी व्हायरसचे होस्ट बॅक्टेरिया असतात. बॅक्टेरिया सिंगल सेल एंटीटी असल्यामुळे त्यांच्यात प्रवेश करायला व्हायरसना तुलनेने सोपे असते.असे व्हायरस-बॅक्टेरियामधल्रे द्वन्द्वयुद्ध निसर्गात बिलिअन्स ऑफ यिअर्स पासुन चालु आहे. त्यात कधी व्हायरस जिंकतात तर कधी बॅक्टेरिया जिंकतात. बॅक्टेरिया त्यांचे सेल मेंब्रेन बदलुन व्हायरसला प्रवेशाला मज्जाव करतात. मग व्हायरसही म्युटेट होउन बॅक्टेरियामधे प्रवेश करायचा परत प्रयत्न करतो. हे असे निसर्गात अविरत चालले असते.

जरी बहुतांशी व्हायरस सिंगल सेल बॅक्टेरिया होस्ट म्हणुन वापरत असले तरी काही काही व्हायरस इतर पशु पक्षींच्या सेलमधेही प्रवेश करु शकतात.

काही थोडे व्हायरस असेही आहेत की ते ह्युमन सेलमधे प्रवेश करु शकतात. उदा. हेपॅटायटीस व्हायरस, एच आय व्ही व्हायरस, पोलिओ व्हायरस, व्हॅरिसोला झॉस्टर( चिकन पॉक्स), व्हॅरिओला व्हायरस( स्मॉल पॉक्स) रोटा व्हायरस, हर्पिस व्हायर्स, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, इन्फ्लुएन्झा ( फ्ल्यु) व्हायरस,चिकन गुनिया व्हायरस, डेंग्यु व्हायरस, इबोला व्हायरस वगैरे वगैरे.

गंमत अशी आहे की या जगात अवकाशात जेवढे तारे आहेत त्याच्यापेक्षा जास्त व्हायरस आहेत पण फक्त २०० च्या आसपासच व्हायरसेस ह्युमन्स ना त्रास देउ शकतात. असे का?

याचे एक कारण मी वर दिलेच आहे. ९९.९९९९९९९९९ व्हायरसेसना बॅक्टेरियासारखे सिंगल सेल होस्ट त्यांच्या रेप्लिकेशनच्या कामासाठी सोप्पे पडतात. आता असा विचार करा की होस्ट सेलमधे प्रवेश करायचा असेल तर त्या होस्ट सेलच्या सेल मेंब्रेनची चावी त्या व्हायरसला सापडली किंवा तयार करता यायला पाहीजे तरच त्या व्हायरसला त्या होस्ट सेलमधे प्रवेश मिळु शकतो. जितकी ऑर्गॅनिझम व त्यांचे सेल कॉम्प्लेक्स तेवढे चावी बनवण्याचे काम कठीण.

आता तुम्ही म्हणाल की या व्हायरस रेप्लिकेशन व या चाव्यांचा जेनेटिक इन्जिनिअरींगशी,जेनेटिक रिसर्चशी, जेनेटिक बायो फार्मा कंपनीजशी काय संबंध?

लेट मी एक्सप्लेन!

क्रमंशः

मुकुंद, खूप रोचक माहिती. मस्त लिहिताय. पण प्लीज वेगळा बाफ काढा ना, नंतर शोधायला, शेअर करायला सोपे होईल.

हो नक्कीच वेगळा बाफ हवा.

कारण "सगळ्यांना हे माहीत असेलच की ..." ने सुरू होणारी माहिती सुद्धा मला माहीत नाही व कदाचित अनेकांना नसेल Happy

मुकुंद, तुमच्या अतिशय रंजक शैलीत recombinant DNA technology आणि सध्याची फार्मा इंडस्ट्री याबद्दल लिहीत आहात. याचा नंतर वेगळा धागा नक्की करता येईल. जसे data analytics, machine learning, artificial intelligence इत्यादी बद्दल घडते आहे तसेच या life sciences मधल्या प्रगती बद्दल घडते आहे. लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांच्या आकलनाच्या पलीकडे यातील बऱ्याच गोष्टी गेल्या आहेत. त्यामुळे regulating these tech and pharmaceutical companies has become out of the usual realm of democracy. आणि हे अशावेळी घडते आहे जेव्हा या कंपन्यांना regulations असण्याची आवश्यकता सर्वात जास्त आहे.

<<मुकुंद वेगळा बाफ असू दे रे. लवकर लिही>>
खरच, इथे लिहून काही उपयोग नाही.
इथले राजकारणावर बोलणारे लोक खरे खोटे यात भेद करत नाहीत, आपलेच खरे म्हणायचे.

फॉची ने पैसे दिले म्हणे! सगळे पैसे काँग्रेस देते. फॉची ने म्हंटले म्हणून लगेच पैसे दिले का? नि आता बोंबलताहेत, तेंव्हाच का नाही बोंबलला काँग्रेसमधे? बरोबर आहे, या विषयात जाम अक्कल नाही, काय बोलणार? आता काहीतरी बोलायचे म्हणून बोलायचे!

<<होप फौची गेट्स इट>> काही गरज नाही त्याला. त्याला काही निवडून यायचे नाहीये, किंवा काही लपवायचे पण नाही.
ट्रंप ची गोष्ट वेगळी. त्याला निवडून यायचे असल्याने तो काय वाट्टेव्ल ते बोलतो. सगळेच राजकारणी तसे करतात.

सध्या राजकारण म्हणजे हट्टीपणा, भांडणे एव्हढेच आहे. अश्याने काहीहि कामे होणार नाहीत.

सध्या जे चालले आहे ते काही ठीक नाही. ट्रंप नको म्हणून बायडेनला मते दिली. मागे हिलरी नको म्हणून ट्रंपला. असला प्रकार चालला आहे.
पुनः बायडेन नको म्हणून दुसर्‍या कुणाला तरी. कामे काहीहि होणार नाहीत, फक्त आपापसात भांडत बसतील.

आपले आपले पैसे नि तब्येत सांभाळून रहा - मग राजकारणाकडे लक्ष न देता, बाकी अनेक चांगले विषय आहेत लक्ष द्यायला.

नविन बा. फ. उघडण्याबद्दल, ते हलवाहलवीचे काम आता नेमस्तकांच्या हातात आहे. मी इथल्या पोस्ट्स उडवु शकत नाही.

तुम्हा सगळ्यांना हे जे काही माझ्या अल्पमतीने मी लिहीत आहे ते आवडत आहे हे सांगीतल्याबद्दल धन्यवाद.

पण ते इथे लिहीण्याचा प्रपंच यासाठी की डॉ. फाउची सारख्या माणसाला व्हिलन ठरवुन माय पिलो ओनर लिंडल छाप माणसे काय जे वाट्टेल ते बोलतात त्याला प्रमाण मानणारे/मानुन नुसत्या डॉ फाउचीसारख्या विज्ञाननिष्ट माणसाचाच ही माणसे अपमान करत नाहीत तर सबंध विज्ञान क्षेत्रातल्या हार्ड वर्कींग डेडिकेटेड व्यक्तींचा ते अपमान करत आहेत. त्यात मग आपल्या मायबोलिवरच्या जिज्ञासा, रार व इतर कितीतरी जे आपापल्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेउन त्याचा चांगला वापर करत आहेत हेही आलेत.

शेंडेनक्षत्र जी काही बाजु घेउन इथे हिरीरीने लिहीत आहेत ते लिहीण्याचा त्यांना पुर्ण हक्क आहे. पण ते लिहीताना त्यांच्या भाषेतला सुर मला खटकतो. भ्रमिष्ट, थेरडा वगैरे शब्द आपण आपल्या कामा/ मामा/आजोबा/ वडिल भाउ यांना संबोधुन वापरु का? कदाचित या परीला मायबोलिवरच इथे असे किती जण असतील की त्यांचे आइ, वडिल/ काका/ मामा बायडनच्या वयाचे असतील. झालेच तर इथे काही जण चक्क “ फक द बायडन“ ( उर्फ लेट्स गो बायडन) ही जी काही उजव्या बाजुच्या लोकात स्लोगन पॉप्युलर होत आहे त्याचे चक्क समर्थन करत आहेत.

शेंडेनक्षत्रांच्या द्रुष्टीने हे जग बायनरी आहे. अस अगेंस्ट देम! मला फक्त एवढेच दाखवुन द्यायचे आहे की या विश्वाचा पसारा फार मोट्ठा आहे. ट्रंप व बायडन किंवा डेमोक्रॅट्स व रिपाब्लिकन या बायनरी गोष्टींच्या पलीकडेही जग आहे, माणसे आहेत. ती माणसे जगापुढे येत नसुनही त्यांच्या परीने हे जग चांगले चालावे, पुढे जावे यासाठी त्यांच्या दैनंदिन जिवनात सतत झटत आहेत. त्यात तुम्ही आम्ही सगळे आलोत. आणि यायलाच पाहीजेत! नुसते ट्रंप किंवा बायडनने असे म्हटले/ केले यानेच काही इकडचे जग तिकडे होउन प्रचंड उलथापालथ किंवा जगबुडी होत नाही. पण तसे होत आहे म्हणुन कांगावा करणारे संधीसाधु लोक या जगात कमी नाहीत. त्यात डावे व उजव्या विचारसरणीचे , दोन्ही बाजुचे संधीसाधु लोक आली.तो कांगावा समजण्याइतका कॉमन सेंस निदान एज्युकेटेड लोकात तरी असावा असे मला प्रामाणीकपणे वाटते.

झक्कींनी आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त पावसाळे बघीतले आहेत. ते बरोबर बोलतात की हे संधीसाधु पॉलिटिशिअन आम जनतेला कुठलातरी बागुलबोवा त्यांच्यापुढे उभा करुन, त्यांच्यात आपापसात भांडाभांडी लावुन देतात व त्यात स्वतःचा फायदा करुन घेतात.

असो. विषयांतराबद्दल क्षमस्व. पुढच्या काही तासात पुढचे भाग टाकतो. तेही अतिशय रंजक आहेत व तुम्हाला नविन माहीती देउन जातील अशी आशा आहे.

“जसे data analytics, machine learning, artificial intelligence इत्यादी बद्दल घडते आहे तसेच या life sciences मधल्या प्रगती बद्दल घडते आहे. लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनता यांच्या आकलनाच्या पलीकडे यातील बऱ्याच गोष्टी गेल्या आहेत. त्यामुळे regulating these tech and pharmaceutical companies has become out of the usual realm of democracy. आणि हे अशावेळी घडते आहे जेव्हा या कंपन्यांना regulations असण्याची आवश्यकता सर्वात जास्त आहे.”

जिज्ञासा, अगदी अचुक बोललीस!

तर आता या व्हायरस रोल व त्यावर होत असलेले संशोधन याबाबत सांगायच्या आधी हा गुंतागुंतीचा विषय नीट समजवुन घ्यायला थोड आपण परत एकदा दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी जाउ.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात तिकडे हिटलर व “ डेथ एजंट“ डॉक्टर मेंगेल सबंध जर्मनी व त्यांनी ऑक्युपाय केलेल्या देशात सर्रास मानसीक रुंग्ण,जेनेटिक डिफॉर्मिटी असलेले रुंग्ण, न्युरॉलॉजिकल रोग असलेले रुंग्ण असे सगळ्यांना मृत्युच्या खायीत लोटत होते( जेणेकरुन तसल्या प्रजेचे जीन्स पुढच्या पिढीत जाउ नयेत) व तेवढेच नव्हे तर सबंध ज्यु जमातीचाच संहार करुन ते “ युजेनिक्स“ चे तत्व अमलात आणत होते. कारण त्यावेळेला ह्युमन जेनेटिक्स मधे ढवळाढवळ कशी करायची याचे पुर्ण ज्ञान अजुन मिळाले नव्हते व म्हणुन त्यांचा जेनेटिक क्लिंन्सिंगचा “ डिरेक्ट“ अ‍ॅप्रोच चालु होता.

पण बाकीकडे जगात चांगल्या मार्गाने जेनेटिक्सवर संशोधन पुढे चालुच होते. त्यात १९४३ मधे कॅनेडिअन बॉर्न अमेरिकन डॉक्टर/ संशोधक ऑस्वाल्ड एव्हरी यांनी दाखवुन दिले की पेशीच्या केंद्रात असलेल्या क्रोमोसोम्समधे डी एन ए मॉलिक्युलच्या रुपात जेनेटिक मटेरिअल असते जे स्पेसिस च्या गुणधर्मांना पुढच्या पिढीत प्रोपोगेट करते. त्याच सुमारास फेमस ऑस्ट्रिअन फिजिसिस्ट डॉक्टर अर्विन श्रोडींगर याने “ व्हॉट इज लाइफ” हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात त्याने असा वादविवाद केला की जर का लाइफ इन्फर्मेशन जेनेटिक मटेरिअल मधे कोड केले असेल तर ते जेनेटिक मटेरिअल फिजिकल फॉर्म मधे सिंपल यट कॉम्प्लेक्स , ड्युरेबल यट फ्लेक्सिबल अश्या रितीने कोड केलेले असले पाहीजे.

(हे जेनेटिक मटेरिअल पेशींच्या केंद्रात क्रोमोसोम्सच्या रुपात साठवले असते हे १९०२ मधे बोव्हेरी- सटन थिअरीमधे प्रोपोज केले गेले होते)

मग मी आधी सांगीतल्याप्रमाणे १९५३ मधे वॉट्सन अँड क्रिक यांनी डी एन ए मॉलिक्युलचे डबल हेलिक्स मॉडेल पब्लिश केले. त्यात त्यांनी डी एन ए मॉलिक्युल हा २ आर एन ए स्ट्रँडचा मिळुन बनलेला असतो असे दाखवले. हे २ आर एन स्ट्रँड्स एममेकांची मिरर इमेज असतात असे त्यांनी म्हटले. ते स्ट्रँड्स फक्त ४ प्रोटीन न्युक्लिओटाइड्सच्या( एडिनाइन, ग्युआनाइन, सायटोसाईन आणी थायमाइन) अगणित रिपिटेशनने जोडलेले असतात. हे डी एन ए चे स्ट्रक्चर सगळ्या सजिवांमधे सारखेच असते. फक्त चार न्युक्लिओटाइड्सचा सिक्वेन्स व क्रोमोसोम्स ची संख्या वेगवेगळ्या स्पेसिस मधे वेगळी असते. थोडक्यात सगळ्या सजीवांचे बिल्डींग ब्लॉक्स सारखेच असतात हेही तेव्हा कळले.

आता हा डी एन ए मॉलिक्युल स्वतः काहीच करत नाही. त्याचे काम फक्त जेनेटिक मटेरिअल स्टोअर करायचे असते. पण आर एन ए मॉलिक्युल मात्र त्यावर असलेल्यान्युक्लिओटाइड्स्च्या सिक्वेंसप्रमाणे वेगवेगळ्या प्रोटिन्सची निर्मीती करतो. हा आर एन चा गुणधर्म तुम्ही नीट लक्षात घ्या. त्याने मग पुढे जेव्हा रिकॉंबिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीबद्दल आपण बोलु तेव्हा ते समजण्यास मदत होइल.

मग जेव्हा ७० चे दशक उजाडले तेव्हा अमेरिकेतल्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सीटीच्या डॉक्टर पॉल बर्ग यांनी मॉलिक्युलर बायोलॉजी व जेनेटिक्समधे फार मोट्ठे योगदान केले. त्यांनी असे दाखवुन दिले की हा डी एन ए मॉलिक्युल लॅबमधे हवा त्या ठिकाणी व हवा तसा कापता येतो व त्याच्या झालेल्या तुकड्यांची कॉपीसुद्धा करता येते! आणी त्या तश्या कॉपी करण्याकरता त्याने चक्क व्हायरस जे इऑन्सपासुन करत आहेत त्या व्हायरसांच्या अ‍ॅबिलिटीचा वापर केला!

मी तुम्हाला आधी सांगीतलेले आठवत असेलच की या जगात युगानयुगे व्हायरसेस बॅक्टेरिआज मधे प्रवेश करुन बॅक्टेरियाजच्या केंद्रात असलेल्या जेनेटिक मटेरिअलचा वापर करुन त्यांच्यात असलेल्या आर एन मॉलिक्युलच्या कॉपीज बनवण्यात हे व्हायरसेस तरबेज झालेले आहेत!

डॉक्टर पॉल बर्ग यांनी काय केले असेल? त्यांनी शोधुन काढलेल्या टेक्निकने त्यांनी नोन व्हायरसच्या आर एन ए मॉलिक्युलमधला मधला तुकडा स्प्लाइस केला व त्या तुकड्या ऐवजी त्यांनी एक प्रोटिन मॉलिक्युलचा तुकडा इन्सर्ट केला. मग त्या अश्या जेनेटिकली मॉडीफाय केलेल्या व्हायरसला त्यांनी तो व्हायरस जे बॅक्टेरियाला इन्व्हेड करायचे काम करतो त्या कामाला लावले. आणी त्या मॉडीफाइड व्हायरसने त्याचे काम चोख बजावले! त्या व्हायरसने बॅक्टेरियात प्रवेश करुन त्याच्या मॉडिफाइड जेनेटिक मटेरियलच्या ( ज्यात तो प्रोटिन मॉलिक्युल इन्सर्ट केलेला होता) असंख्य कॉपिज अवघ्या काही तासात केल्या! कारण व्हायरसने एकदा बॅक्टेरियात प्रवेश केला की त्याच्या पुनर्मितीचा वेग जबरदस्त असतो!एकाचे एक कोटी व्हायला वेळ लागत नाही! म्हणजे आता डॉक्टर बर्ग यांना आयत्याच (अलबत व्हायरसने करुन दिलेल्या!) त्या प्रोटिन मॉलिक्युलच्या अगणित कॉपीज करुन मिळाल्या! आता फक्त परत त्या कोट्यावधी व्हायरसचे मॉडिफाइड जेनेटिक मटेरिअल स्लाइस करायचे व त्या इन्सर्टेड प्रोटिन मोलिक्युलच्या कोट्यावधी कॉपिज हार्व्हेस्ट करायच्या!

अश्या रितीने अमेरिकेच्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सीटीमधे व्हायरसच्या मदतीने रिकॉम्बिनेशन डी एन ए. टेक्नॉलॉनीचा जन्म झाला!

पण आता ही डी एन ए मधे ढवळाढवळ करायची टेक्नॉलॉजी सगळ्या जगासमोर आली तेव्हा हे मनुष्यजातीला वरदान आहे की शाप या मुद्द्यावर जगभरच्या एथिसिस्ट,सायंटिस्ट, आम जनता , पॉलिटिशिअन्स या सगळ्यात हिटेड चर्चा होउ लागल्या! सुज्ञ वाचकांना त्याचे कारण कळले असेलच! कारण गेली ९० वर्षे “ युजेनिक्स” ची महाभयंकर विचारसरणी फक्तथिअरॅटिकली शक्य होती पण डॉक्टर बर्ग यांच्या प्रयोगाने हे सिद्ध झाले की अशी जर व्हायरसच्या डी एन ए मधे ढवळाढवळ करता येते तर तशी ह्युमन डी एन ए मधे पण ढवळाढवळ करुन त्या टेक्नॉलॉजीचा “ गैरवापर युजेनिक्स” सारखी कॉन्ट्रोव्हर्शिअल विचारसरणी पुढे करण्यासाठी सुद्धा काही जण करु शकतील!

तसच तेव्हा बर्‍याच जणांनी असाही मुद्दा उपस्थित केला की अश्या व्हायरसच्या जेनेटिक मटेरिअल मधे ढवळाढवळ केली तर पुर्वी ह्युमन्सना निरुपद्रवी असलेला व्हायरस त्याचे गुणधर्म बदलुन माणसांमधेच नवीन बरी न करता येइल अशी रोगराइ पसरवु शकेल! कारण मी मागच्या पोस्टमधे सांगीतलेले आठवत असेलच की ९९.९९९९९९९ टक्के व्हायरसेस ह्युमन्सना निरुपद्रवी असतात. पण जर का त्यांच्या नैसर्गीक जेनेटिक मटेरिअलमधे लॅबमधे माणसाने जर ढवळाढवळ केली तर ते नविन ( आल्टर्ड केलेले) व्हायरस मनुष्यामधे रोगराइ निर्माण करु शकणार नाहीत याची खात्री काय? व ती खात्री कोण देणार? (साउंड्स फॅमिलिअर नाउ? हाउ पँडेमिक बिकॉज ऑफ न्यु अँड नॉव्हेल व्हायरस कॅन स्टार्ट विदाउट मिनींग टु स्टार्ट?)

पण त्याच टेक्नॉलॉजीचा उपयोग वैद्यकिय क्षेत्रात जेनेटिक रोग बरे करण्यासाठी सुद्धा करता येइल असाही विचार बरेच जण करु लागले. जर का डी एन ए सिक्वेन्समधे डिइफेक्टिव्ह जिन सापडला की जो त्या जेनेटिक रोगाचे कारण आहे तर तश्या जिनला स्प्लाइस करुन टाकुन तो रोग बरा करु शकता येइल असा विचार मेडिकल कम्युनिटीमधली बरीच लोक करु लागली.

आता हा एथिकल/ फिलॉसॉफिकल/ सायंटिफिक/ मेडिकल तेढा सोडवायचा कसा? म्हणुन मग स्वतः खुद्द डॉक्टर बर्ग यांनी त्यांच्या शोधाचा वाइट वापर होउ शकतो याला मान्यता दिली व स्वतः पुढाकार घेउन १९७४ मधे कॅलिफोर्नियात असिलॉमार इथे या विषयावर चर्चा व तोडगा काढण्यासाठी मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट्स, डॉक्टर्स, लॉयर्स यांची एक बैठक घेतली. या नविन रिकाँबिनंट डी एन ए. टेक्नॉलॉजीच्या सेफटी गाइडलाइन्स कश्या आखायच्या हा या बैठकीमागचा उद्देश होता. त्यात त्यांनी असा ठराव केला की आपणच आपले पोलिस बनायचे व एथिकली या टेक्नॉलॉजीचा वापर व पुढे विकास करायचा! चाणाक्ष वाचकांच्या यातला फोलपणा व सायंटिस्ट लोकांचा “ह्युब्रस” चटकन लक्षात आला असेलच! Happy

आता यापुढचा या विषयाचा इतिहास व प्रवासही अजुन रंजक आहे. तो कसा त्याचा उहापोह आपण पुढच्या भागात पाहु.

क्रमंशः

<<कदाचित या परीला मायबोलिवरच इथे असे किती जण असतील की त्यांचे आइ, वडिल/ काका/ मामा बायडनच्या वयाचे असतील.>>

अहो मीच बायडेनच्या वयाचा आहे.
पण मायबोलीवर मला शिव्या देणारे अनेक लोक असले तरी माझ्या आर्थिक, शारीरिक, मानसिक परिस्थितीवर कसलाहि फरक पडत नाही. विशेषतः राजकारणावर बोलणे ही नुसती गंमत असे मी मानतो, माझ्यापुरते.
काही लोक असे लिहितात की जणू ट्रंप, बायडेन, फॉची हे दररोज त्यांच्या घरी चहा प्यायला येतात त्यामुळे त्यांनाच खरे काय ते कळते! तर अश्या लोकांना गंभीरतेने कसे घ्यायचे?

Pages