४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मुकुंद - या पुढच्या पोस्ट्सही माहितीपूर्ण आहेत! छान लिहीले आहे. बर्‍यापैकी सोप्या शब्दांत लिहील्याने या विषयातील फारशी माहिती नसतानाही समजत आहे.

पण स्वतंत्र बाफच्या मागणीला +१. इथल्या ज्या आहेत त्या पोस्ट्स उडवायची गरज नाही. पण त्या कॉपी करून एक वेगळा धागा उघडलास तर इतर अनेकांनाही वाचता येइल (जे एरव्ही या "राजकारण" ग्रूपवर व या धाग्यावर फिरकत नाही). सर्वच माबोकरांना या माहितीत इंटरेस्ट असेल.

इथे लिहून धागा शुद्धी करच मुकुंद. इथे ते वाचणे ब्रिझ आहे. हे उडवू नको पण नवीन ठिकाणी सुद्धा लिही. आता आणखी लापी वाजवणार नाही, त्यामुळे लिहीच. Proud

जिज्ञासा - चपखल पोस्ट. यात गोम अशी आहे की हे तंत्रज्ञान सतत विकसित होत असते. त्यातून या कंपन्या जे फायदे मिळवतात ते मिळवण्याचेही तंत्र तुम्हाला खूप सखोल माहिती असल्याशिवाय समजत नाही. ती सखोल माहिती शक्यतो अशा क्षेत्रात करीयर करणार्‍यांनाच असायची शक्यता जास्त असते. तुम्ही "इनर सर्कल' मधले असाल तर तुम्हाला हे जास्त समजते. पण मग तोच इनर सर्कल मधला माणूस सरकारी रेग्युलेटरी भूमिकेत याच कंपन्यांना धारेवर धरून आपल्या करीयरचे नुकसान का करेल.

आणि या क्षेत्रात नसलेल्यांना त्यातील अचूक माहितीवर या कंपन्यांशी चर्चा करणेही किती अवघड असते हे झुकरबर्ग व इतर प्रमुखांच्या "हिअरिंग" मधल्या क्लिप्स आहेत त्या बघितल्या की लगेच समजेल. अनेक सिनेटर्स वगैरेंना प्राथमिक माहितीही नसते.

याला उदाहरण म्हणून एनर्जी कंपन्यांचे रेग्युलेशन कसे चालते बघायला हवे. तेथेही साधारण इण्डस्ट्री एक्स्पर्ट्स हेच सरकारी खात्यांमधे असतात. त्यांना त्या रोल मधे ४-५ वर्षे हे काम करायचे, एरव्ही त्यांना कमर्शियल कामातून मिळेल त्यापेक्षा कमी पैसा घ्यायचा आणि आपल्याच क्षेत्रातील लोकांना दुखवायचे - ही तारेवरची कसरत असेल. एकूण थोडे तुम्ही एक पाउल पुढे या, थोडे आम्ही येतो अशा पद्धतीनेच हे चालत असावे. हा केवळ अंदाज.

<<<<< या विश्वाचा पसारा फार मोट्ठा आहे. ट्रंप व बायडन ..................... असावा असे मला प्रामाणीकपणे वाटते.>>
१०० टक्के अनुमोदन.

असे म्हणतात, ज्यांना इतर काही जमत नाही तेच राजकारण करतात. नि आजकालचे राजकारण म्हणजे तर काय, जो उठतो, तो वाट्टेल ते बोलतो.
फक्त दुसर्‍या पार्टीला मूर्ख म्हणायचे, त्यांनी सांगितलेले खोटे वगैरे.

अहो पृथ्वी सपाट आहे नि आर्मस्ट्राँग चंद्रावर गेलाच नव्हता म्हणणारे हे लोक!! कुणालाहि निवडून देतील. फरक काय पडतो, चांगले काम कुणाच्याच हातून होत नाही, कारण आपापसात भांडणे!

आता वुहान व्हायरॉलॉजी लॅब प्रकरण समजावयाच्या/ समजुन घ्यायच्या आधी आपल्याला १९७० च्या दशकात डॉ पॉल बर्ग या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी मधल्या शास्त्रज्ञाने केलेल्या रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीच्या रेव्होल्युशनपासुनचा पुढच्या २०-३० वर्षाचा जेनेटिक्स क्षेत्रात जो प्रचंड वेगात विकास झाला त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे.

पॉल बर्ग व इतर सायंटिस्ट/ लॉयर्स/ डॉक्टर्स/ एथिसिस्ट यांनी त्यांच्या स्वघोषीत सेल्फ पोलिसींगची जरी ग्वाही दिली होती तरी आता प्लाझमिड व रिकॉम्बिनंट डि एनए टेक्नॉलॉजी वापरुन कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या डी एन ए मधे ढवळाढवळ करता येते ही “ जिनी“ बॉटलच्या बाहेर पडली होती! त्याचा उपयोग कोण कसा करेल याच्यावर काहीच नियम नव्हते!

अर्थातच ही खळबळजनक बातमी जगात वार्‍यासारखी पसरली. त्या बातमीने जगातल्या बाकीच्या सायंस कम्युनिटीचेच लक्ष वेधले नव्हते तर अमेरिकेसारख्या भांडवलशाही देशात बर्‍याच व्हेंचर कॅपिटलिस्ट लोकांचेही लक्ष त्याकडे गेले. त्यातल्याच एका अमेरिकन व्हेंचर कॅपिटलिस्टने या रेव्होल्युशनरी टेक्निक व ब्रिटिश बायोकेमिस्ट फ्रेड सँगर( ज्याला पुढे जाउन १९८० मधे डॉ पॉल बर्गबरोबर त्याचे दुसरे नोबेल पारितोषिक मिळाले तोच फ्रेड सँगर!) याने जो इन्सुलिन मॉलिक्युलचा प्रोटिन सिक्वेन्स शधला होता या २ गोष्टींची सांगड घातली व तो युनिव्हर्सीटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅन फ्रॅन्सिस्को मधल्या विख्यात बायोकेमिस्ट/ रिकॉम्बिनंट डी एन ए एक्स्पर्ट हर्बर्ट बॉयर याच्याकडे एक प्रस्ताव घेउन गेला. त्याने हर्बर्टला विचारले की फ्रेड सँगरने जो इन्सुलिन मॉलिक्युलचा सिक्वेन्स शोधला आहे तो सिक्वेन्स लॅबमधे प्लाझमिड्स च्या जेनेटिक मटेरिअलमधे (रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्निक वापरुन) इन्सर्ट करता येइल का? म्हणजे मग तो प्लाझमिड व्हेक्टर म्हणुन बॅक्टेरिअल डी एन ए मधे इन्सर्ट करायचा व मग त्या बॅक्टेरियाने त्या प्लाझमिड व्हेक्टरमधल्या मॉडिफाइड जेनेटिक मटेरिअलच्या बिलिअन्स ऑफ कॉपिज केल्या की आपोआपच इन्सुलिन मॉलिक्युलच्या बिलिअन्स ऑफ कॉपिज आपल्याला करुन मिळतील .त्या ओरिजिनल प्लाझमिडच्या जेनेटिक मटेरिअल्स पासुन( परत एकदा रिकॉम्बिनंट डी एन ए/ डी एन ए स्लायसींगचे टेक्निक वापरुन) मग इन्सुलिन मॉलिक्युलच्या बिलिअन्स ऑफ कॉपीज आपण हार्व्हेस्ट करु शकु का? असा प्रश्न त्याने हर्बर्ट बॉयरकडे केला.

आणी पुढे काय झाले ते सगळ्यांना ठाउकच आहे. हर्बर्ट बॉयर व त्या व्हेंचर कॅपिटलिस्टने मिळुन १९७६ मधे जगातली पहीली बायोटेक कंपनी “ जेन एन टेक“ स्थापन केली व त्या कंपनीने प्लाझमीडमधे रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्निक वापरुन जगातले पहिले आर्टिफिशिअल इन्सुलिन तयार केले! त्या व्हेंचर कॅपिटलिस्टचे नाव होते बॉब स्वॅन्सन!

ही जेन एन टेक कंपनी यापुढे सुरु होणार्‍या मल्टाय बिलिअन बायोटेक इंडस्ट्रिजची नुसती नांदी होती! जगाला कळुन चुकले होते की या जेनेटिक्स च्या क्षेत्रातल्या झापाट्याने होणार्‍या विकासामधे नुसते रोग ट्रिट करायचे अनलिमिटेड पोटेन्शिअल नव्हते तर बिलिअन्स ऑफ डॉलर्स कमावुन द्यायचे पण पोटेन्शिअल आहे.

मग अश्या इंडस्ट्रीमधे जगभरच्या सायंटिफिक बॉडीज व इन्व्हेस्टर्स चे लक्ष वेधले गेले नसते तरच नवल! त्यात मग अमेरिकेच्या एन आय एच( नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ) व त्याच्या अंडर येणारी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शिअस डिझिज या बॉडीजही आल्या! आणी १९८४ पासुन या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेकशिअस डिझिज च्या डिरेक्टर( प्रमुख)असलेया डॉक्टर फाउची यांचा या क्षेत्राशी व त्यात होणार्‍या वेगवान प्रगतीशी अगदी जवळुन संबंध सुरु झाला!

या जेनेटिक्स व रिकाँबिनंट डी एन ए च्या क्षेत्रातल्या प्रगतीमुळे आता वेगवेगळे रोग बरे करण्याची/ ट्रिट करण्याचे अनलिमिटेड पोटेन्शिअल होते. कारण डायबिटिस, हायपरटेन्शन, हिमोफिलिआ अश्या रोगांना कारणीभुत असलेल्या जिन्सचा आता डिटेल मधे अभ्यास करता येउ शकणार होता. ते जिन्स मॉडिफाय करता येतील असे या क्षेत्रामधे पोटेन्शिअल होते. तितकेच नव्हे तर व्हायरल डिझिज, इफेक्टिव्ह व्हॅक्सिन क्रिएशन व प्रॉडक्शन आणी तितकेच महत्वाचे म्हणजे कॅन्सरच्या क्षेत्रातही रेव्होल्युशनरी अश्या ट्रिटमेंटची शक्यता या क्षेत्रातल्या नवनविन विकासामुळे निर्माण झाली होती.

पण त्यासाठी सबंध डी एन ए मधे हे रोग पुढच्या पिढीत पाठवणारे जिन्स कुठले व त्यांचे लोकेशन कुठे आहे?ह्युमन डि एन ए मधे एकुण जिन्स किती आहेत, त्यांचा एक्झॅक्ट सिक्वेन्स काय?त्या प्रत्येक जिन्समधे न्युक्लिओटाइड्सचा एक्झॅक्ट सिक्वेन्स काय आहे या सगळ्याचा शोध घेणे महत्वाचे होते. थोडक्यात सबंध ह्युमन जिनोम (डि एन ए वरचा सबंध न्युक्लिओटाइड्स सिक्वेन्स) डिकोड करणे क्रमप्राप्त होते हे सगळ्या सायंटिफिक कम्युनिटीला कळुन चुकले व त्यातुन ह्युमन जिनोम प्रॉजेक्ट १९८६ च्या सुमारास सुरु झाला!

क्रमंशः

आता हे लक्षात घेणे अतिशय जरुरीचे आहे की या रिकॉम्बिनंट डी एन ए टेक्नॉलॉजीने नुसता ह्युमन जिनोम प्रॉजेक्टच सुरु झाला नाही. या टेक्नॉलॉजीमुळे व्हायरसच्या जेनेटिक मटेरिअल मधे सुद्धा काड्या घालु शकता येणार होते .म्हणजे लॅबमधे वेगवेगळ्या व्हायरसच्या जेनेटिक मटेरिअल मधे बदल करुन( मुख्यतः कॉमन ह्युमन व्हायरसेस सच अ‍ॅज कोरोना व्हायरस) त्यांचे बिहेव्हिअर, त्यांचे गुणधर्म कसे बदलतात याचा अभ्यास आता सुरु झाला.म्हणजे थोडक्यात व्हायरसेसचे आर्टिफिशिअल म्युटेशन घडवुन आणायचे प्रयोग जगभरच्या व्हायरल लॅब्समधे त्याच सुमारास सुरु झाले . मग तसे वेगवेगळे आर्टिफिशिअली म्युटेट केलेले व्हायरस ह्युमन सेलमधे कसे प्रवेश करतात याचा अभ्यास ते लॅबच्या कंट्रोल्ड वातावरणात ते करु लागले. तसच तसा तो म्युटेट झालेल्या व्हायरसचा अभ्यास केला तर त्यावर इफेक्टिव्ह असे औषध किंवा व्हॅक्सिन कसे बनवायचे याची आधीच कल्पना येउ शकते हे त्यामागचे मुख्य कारण होते. या अश्या संशोधनाबद्दल, तसच व्हायरस “ गेन ऑफ फंक्शन” बद्दल, त्या “ कॉन्ट्रोव्हर्शिअल “ गेन ऑफ फंक्शन“ चे ,टारगेटेड “ जिन थिरपी“ मधले व इतर व्हायरल रिसर्च मधे होणारे फायदे व तोटे व मग त्या अनुषंगाने वुहान व्हायरॉलॉजी लॅब बद्दल पुढे त्याचा आपण आढावा घेणारच आहोत.

पण आधी ह्युमन जिनोम प्रॉजेक्टकडेआपण लक्ष देउयात.

आता हा ह्युमन जिनोम प्रॉजे़क्ट जर पुर्ण झाला तर त्यातुन निर्माण होणार्‍या पॉसिबिलीटीज आणी त्याने निर्माण होणारे परिणाम खुप इंट्रिगिंग होते. पायथॅगोरस व अ‍ॅरिस्टॉल पासुन मनुष्याला कुतुहल होते की एका ह्युमन बिंग पासुन दुसरा ह्युमन बिंग कसा तयार होतो?आपले ट्रेट्स पुढच्या पिढीत कसे जातात? मग पुढे १९ शतके गेल्यानंतर ग्रेगॉर मेंडेलने जेनेटिक मटेरिअल/ ट्रेट्स या विषयाचा पाया घातला व आता १९८६ पर्यंत आपण ते जेनेटिक मटेरिअल डिकोड करायच्या उंबरठ्यावर येउन पोहोचलो होतो! याआधी आपण निसर्गाच्या व एव्होल्युशन्च्या अधिपत्याखाली होतो. वुइ वेअर हेल्पलेस! पण आता? आता आपल्या हातात त्या नैसर्गीक व एव्होल्युशनरी प्रॉसेसचा कंट्रोल करायची चावी आली होती!

पण हा ह्युमन जिनोम डिकोड करायचे काम जिकीरीचे, पेनस्टेकींगली स्लो व महागाचे होते.स्वत: खुद्द वॉट्सन याने या कामाचे नेतृत्व स्विकारले. पण हे काम १९६० च्या दशकात अमेरिकेच्या नासाने सुरु केलेल्या ल्युनार/अपोलो प्रॉजेक्ट सारखे होते. चंद्रावर जायचे लक्ष्य होते पण त्याला लागणारी टेक्नॉलॉजी माहीत नव्हती. त्यांनी ती टप्प्याटप्प्याने अ‍ॅज दे वेंट अलाँग डेव्हलप केली.

वॉट्सन सुद्धा हेच म्हणाला, नो टेक्नॉलॉजी टु डिकोड जिन सिक्वेंस? देन इन्व्हेंट इट! नो मनी? देन रेझ इट! तो स्वतः अमेरिकन काँगेसपुढे वॉशींग्टन डी सी ला पैशासाठी लॉबी करायला गेला व या प्रॉजेक्टसाठी अमेरिकन काँग्रेसकडुन पैशाची मदत मंजुर करुन घेउन आला.

सुरुवातीला जिन सिक्वेंसिंगला लागणारे टेक्निक परत एकदा( तोच!) केंब्रीज विद्यापिठातला ब्रिटिश बायोकेमिस्ट फ्रेड सँगर वअमेरिकेतल्या हार्व्हर्ड युनिव्हर्सीटीतला बायोकेमिस्ट वॉली गिल्बर्ट यांनी शोधुन काढले. पण त्याने काम खुपच हळु हळु होत होते. ह्युमन जिनोम साठी ३ बिलिअन्सच्या वर न्युक्लिओटाइड्स लेटर्स वाचायला लागणार होती. पण सुरुवातीच्या सँगर/ गिल्बर्ट टेक्निकने एका आठ्वड्यात फक्त १०० च लेटर्स वाचता येत होती. त्या वेगात सबंध ह्युमन जिनोम डिकोड करायला हजारपेक्षा जास्त वर्षे लागली असती!

परत आणखी एक गोष्ट म्हणजे ज्या मोजक्या लॅब्समधे हे काम होत होते त्यांना एकमेकांशी कम्युनिकेट करायला त्यावेळेला इ मेल किंवा इंटरनेट उपलब्ध नव्हते. ते एकेमेकांना पोस्टल मेलने हे डिकोड केलेले सिक्वेन्स पाठ्वायचे!

पण नेमके त्याच ९० च्या दशकाच्या सुरुवातीस कंप्युटर्स , इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व इंटरनेटची अतिशय झपाट्याने प्रगती होउ लागली व त्यामुळे जिन सिक्वेन्स रिड करायचा वेगही प्रचंड वाढला!

पण त्यावेळेला दुसरा आणी कळीचा मुद्दासगळ्यांपुढे आला. एन आय एच व जगभरच्या १२ मोजक्या प्रायव्हेट लॅबमधे हे ह्युमन जिनोमचे काम कोलॅबोरेटिव्हली चालु होत.

( त्यात एक लॅब बैजींग ,चायना इथली होती. म्हणजे इथे हे नीट लक्षात घ्या की त्यावेळेपासुन या विज्ञानाच्या शाखेमधे यु एस -चायना सायंटिफिक कोलॅबरेशन चालु होते. हेच पुढे आपण वुहान व्हायरॉलॉजी लॅब व एन आय एच यांच्यात कोलॅबरेशन का व कसे झाले हे पाहणार आहोत!)

आणी त्या कामात हे जे एक एक जिन सिक्वेन्स ते शोधुन काढत होते त्यावर मालकी हक्क कोणाचे? हा मुद्दा सगळ्यांसमोर आला. प्रायव्हेट लॅब्सना माहीत होते की त्यांनी शोधुन काढलेल्या जिन सिक्वेन्सचे जर का त्यांनी पॅटंट घेउन ठेवले तर पुढे जाउन मोठ्या प्रायव्हेट फार्मा कंपनीजना औषधे बनवायला ते पॅटंट ते विकुन टाकु शकतील व तसे करुन ते भरपुर नफा कमवु शकतील.

पण वॉट्सन वॉज अपाल्ड विथ धिस आयडिया! त्याने म्हटले हा ह्युमन जिनोम सबंध मानवजातीच्या उपयोगासाठी आहे व त्यावर कोणाची प्रायव्हेट मक्तेदारी नको! पण त्यावेळच्या खुद्द एन आय एचच्या डिरेक्टरचे मतसुद्धा प्रायव्हेटायझनशिपचे असल्यामुळे वॉट्सनची या प्रॉजेक्टचा लिडर म्हणुन हकालपट्टी झाली.

क्रमंशः

बाय द वे, इथे या लेखांची लिंक लागली आहे म्हणुन एकापाठोपाठ सगळे लेख इथेच लहीत आहे. सगळे भाग झाले की स्वतंत्र बीबी वर कॉपी पेस्ट करुन नविन बीबी उघडीन.

इथे आधी लिहीत आहे कारण या बीबीवर डॉक्टर फाउचींबद्दल फॅक्ट्स शिवाय बरेच उलटसुलट बोलले गेले आहे. ज्या फॅक्ट्सच्या आधारे त्यांच्यावर इथे ( सेनेट हिअरींग मधेही ) जे आरोप केले जात आहेत ते “ प्रॉजेक्ट व्हेरीटस“ सारख्या व्हेरी शेडी व एक्स्ट्रिम राइट विंग आयडिओलॉजीवाल्यांनी केलेल्या डिस्टॉर्टेड फॅक्ट्स वर आधारीत आहेत. ते अश्या फॅक्ट डिस्टॉर्शन साठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे आधीचे टार्गेट्स प्लान्ड पॅरेंटहुड, एन पी आर, अ‍ॅकॉर्न वॉशिंग्टन पोस्ट वगैरे अश्या लिबरल ऑर्गनायझेशन होते/ अजुनही आहेत. त्यांचे होल मिशन मेनस्ट्रिम मिडिया व लिबरल विचार करणार्‍यांना/ सायंसमधे बिलिव्ह करणार्‍यांना डिस्टॉर्टेड मिस इन्फर्मेशन व कॉन्स्पिरसी थिअरीजनी डिस्क्रेडिक/ डिस्ट्रॉय करायचे. डॉक्टर फाउचींबद्दलही ते तेच करत आहेत. कॅन्सास सेनेटर मार्शल डॉक्टर फाउचींवर जे बिनबुडाचे आरोप करत होते ते त्या प्रॉजेक्ट व्हेरीटसने जी खोटी घाण गोळा केली आहे त्यावरुन व वर ज्या विषयावर मी लिहीत आहे त्या विषयाचा त्यांना गंधही नसल्या मुळे करत होते. नो वंडर डॉक्टर फाउची कॉल्ड हिम मोरॉन!

<< स्टॉक्स काय भयानक कोसळलेत. कुठेतरी वाचलं होतं की स्टिम्युलस पॅकेजचा परिणाम आहे. हे खरे असेल का? >>

------- वर जाणारा स्टॉक हा कोसळणारच असतो... कधी कोसळणार हाच कळीचा प्रश्न असतो आणि त्याचे खात्रीशीर उत्तर कुणालाही सांगता येत नाही.

मुकुंद छान माहिती मिळत आहे. माझ्यासाठी मेजवानीच आहे... Happy

नवा बाफवर एकत्रीत माहिती मिळणार आहे हे वाचल्यावर जिव भांड्यात पडला.

प्रोजेक्ट व्हेरितास वरची timbah on toast ची तीन भाग डॉक्युमेंटरी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि पर्दाफाश करणारी आहे.

सीडीसी (सेंटर फॉर डिसिज कंट्रोल) ह्या संस्थेने कोविड, लस ह्याबद्दल मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला आहे. पण सोयिस्कररित्या १८ ते ४९ वयोगटातल्या लोकांबद्दलचा डेटा दाबून टाकला आहे. म्हणजे बहुतांश, कार्यरत असणार्‍या अमेरिकन नागरिकांबद्दल कुठलाही डेटा देण्यास नकार. वा! किती पारदर्शक कारभार! किती वैज्ञानिक दृष्टीकोन! अशामुळे लोकांना लस, सरकार, त्याचे आरोग्य खाते, त्यांचे विविध संदेश ह्याबद्दल कित्ती कित्ती विश्वास वाटेल नाही का?

हे तथाकथित वैज्ञानिक, विज्ञानाने सांगितलेले लोकांपर्यंत पोचवत नाहीत तर राजकारण, समाज कारण, अर्थकारण असल्या नको त्या विषयातले जाणकार बनून आपल्याला योग्य वाटेल तेवढेच निवडक लोकांपर्यंत पोचवत आहेत. असल्या ढोंगी, विज्ञानाला वेठीस धरणार्या लोकांच्या मुसक्या आव़ळून तुरुंगात टाकले पाहिजे म्हणजे पुढच्या अधिकार्‍यांना असा उन्मत्तपणा करायचे धाडस करवणार नाही.

फौचीला लस बनवणार्‍या कंपन्या रॉयल्टी देत असतील तर त्याची लॉयल्टी कुठे असेल हे ओळखणे अवघड नाही. ज्यांना डोळे मिटून घ्यायचे असतील आणि फौची ला विज्ञानाचा नि:स्सीम, एकनिष्ठ, एकमेव उपासक समजायचे असेल त्यांनी ते जरूर समजावे. सगळ्यांवर ती सक्ती नाही.

https://www.msn.com/en-us/health/medical/cdc-under-new-scrutiny-for-coll...

<< सीडीसीचा सर्कारी कारभार जो काय आहे त्यावरची टीका ठीक आहे. पण सीडीसीमधे फाउची कोठून आला? >>
------फाउचि डोक्यात फिट्ट बसलेला आहे.

मला नाही वाटत की शास्त्रज्ञ लोक असे माहिती दाबून ठेवतात. पण सिडीसी मधे राजकरणी लोक असतातच.
जनतेने दिलेल्या पैशातून सरकार त्यांना मदत करते, मग सरकार लुडबूड करणारच. माझ्या मते राजकारणी लोक ठरवतात काय सांगायचे नि काय नाही. शास्त्रज्ञ काय करणार?
नि शास्त्रज्ञांबद्दल अविश्वास पसरवण्याचे काम हे शास्त्रज्ञ नसलेले लोकच पसरवतात.
आता राजकारणी म्हणाल तर कुठल्याहि पक्षाचे लोक बदमाष. सगळ्या गोष्टीचे राजकारण.
असे ठरवूनच टाकले असेल की प्रत्येक बाबतीत काहीतरी दुष्ट कटकारस्थान आहे तर गुरुत्वाकर्षणाने खाली पडलेल्या गोष्टी बद्दल हि काहीहि अफवा उठवता येतील. हे म्हणजे गॅलिलिओ ला छळणार्‍या चर्चसारखे. कारण गॅलिलिओ ने सांगितले पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

नि अमेरिकेतले लोक म्हणजे काय विचारता? अनुभवतोच आहोत! पिझ्झागेट काय, हिलरी काय नुसती बोंब, पुरावा काही नाही! तरी बरे विरुद्ध पक्षाच्या लोकांनी इतक्यांदा चौकशी करून काही सापडले नाही तरी आपले आहेच - लॉक हर अप म्हणे!!
ट्रंपला तर म्हणे तो ज्या दिवशी तो व्हाईट हाऊस सोडेल त्याच्या दुसर्‍या दिवशी तुरुंगात! डोंबल!! वर्ष होऊन गेले, तो मजेत नि बाकीचे उगाचच तावातावाने भांडताहेत!
काहीतरी बावळट गोष्टी ऐकायच्या नि त्याबद्दल तावातावाने भांडायचे!!
मज्जा आहे न् काय!

<<<फाउचि डोक्यात फिट्ट बसलेला आहे.>>>
नुसता मत्सर हो.
स्वतः नालायक. काही कर्तुत्व नाही. कितीहि बोंब मारा, कुणी विचारत नाही. जे करायचे ते करतातच. मग जळजळ!
कार्ल्सन नि हॅनिटी एव्हढ्या बोंबा मारतात - काही होत नाही! मग चरफड.
फाउचीला रॉयल्टी मिळते. का न मिळावी? कदाचित् त्याने पूर्वी संशोधन करून काही पेटंट मिळवली असतील, कन्सल्टिंग करून मोबदल्यात रॉयल्टी मागितली असेल. याबद्दल काय माहिती आहे का?
दुसर्‍याला शिव्या देण्याबद्दल रॉयल्टी देणारा शोधा - तुम्हालाहि मिळेल. जळता कशाला?

आज गॅस भरायला गेलो तर हे दिसलं. ?>>> ३.९९ हे कुठल्या स्टेट मधे आहे? आमच्याकडे शेल मधे ५.२० आहे, कॉस्टको त्यातल्यात त्यात बर

असामी, तुम्ही कमालच करता
उगाच लॉजिक काय, खरे काय असले प्रश्न काढता. असले काही नसते, जे दनाद्दन तोंडाला येईल ते बोलायचे! फक्त दुसर्‍या पक्षाला शिव्या द्यायच्या ! लॉक हर अप! मेक्सिको विल पे फॉर द वॉल!! तुम्ही बोला ऐकणारे आहेतच!
मायबोलीवरपण.
<<<टिरियनभौला आमचा प्रवक्ता कुणी बनवलं?>>> हे पाहिलत का? काय संबंध त्याचा नि राष्ट्राध्यक्षाचा? पण दिले एक ठोकून!

टिरियनभौला आमचा प्रवक्ता कुणी बनवलं?>>> हे पाहिलत का? काय संबंध त्याचा नि राष्ट्राध्यक्षाचा?>>>
अहो काका हा धागा म्हणजे जो बायडण नावाच्या एका माणसाचा अप्रायझल रिपोर्ट नव्हे. राजकारण ही लेफ्ट वि. राईट, वोकनेस वि. कॉमनसेन्स, भोंगळ लिबरलिझम वि. ट्रॅडिशन, दुष्ट वि. सुष्ट Wink अशा अनेक धाग्यांची एक गुंतवळ असते. ॲज फार ॲज आय ॲम कन्सर्न्ड, या धाग्याच्या छत्रीखाली या सगळ्यांची चर्चा करायला हरकत नाही. तसं नसेल तर ॲडमिन सांगतीलच. ॲडमिनला माझी पोस्ट अवांतर वाटली असती तर त्यांनीच उडवली असती. तुम्ही कशाला कुरकुर करताय?
तुम्ही अमेरिकेत आलात तेव्हा डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्सवरची शाईसुद्धा वाळली नव्हती Biggrin आजच्या राजकारणाचे कंगोरे तुमच्या आकलनाबाहेरचे आहेत, म्हणून असे प्रश्न पडतात. एका गोर्‍या पोलिस अधिकार्‍याने एका काळ्या माणसाला मारलं, या घटनेचा पद्धतशीरपणे वापर करून देशभर उन्माद का निर्माण केला गेला, आणि त्याचा ट्रम्प प्रेसिडन्सीशी संबध का जोडला गेला, असा प्रश्न तुम्हाला पडला होता का कधी?

>>भोंगळ लिबरलिझम <<
मोरोबा, हा शब्दप्रयोग अतिशय आवडलाय. इथले बरेच नमुने याप्रकारात मोडणारे आहेत; तुमच्या ध्यानांत हे कदाचित आलं असेलंच... Wink

राज, ” भोंगळ लिबरलिझम“ शब्दाने एवढा हुरळुन जाउ नकोस. जगात जितके “ भोंगळ लिबरल्स“ असतील तितकेच “भोंगळ कन्झरव्हेटिव्ह्स “ सुद्धा आहेत/ असतील हे न समजण्याइतके तु व मोरोबा “ नाइव्ह” नसावेत अशी मी अपेक्षा करतो. Happy

आणी मोरोबा, इथे वयावरुन कोणाला कोपरखळ्या प्लिज मारु नका. मुद्द्यांवरुन इथे जरुर चर्चा होउ देत.

आणी मोरोबा, तुम्ही जे म्हणता “ राजकारण ही लेफ्ट वि. राईट, वोकनेस वि. कॉमनसेन्स, भोंगळ लिबरलिझम वि. ट्रॅडिशन, दुष्ट वि. सुष्ट Wink अशा अनेक धाग्यांची एक गुंतवळ असते.“ ते वाचुन असे वाटते की तुम्हीसुद्धा शेंडेनक्षत्रांसारखे या जगाला व या जगातल्या माणसांना एकदम “ बायनरी“ मोडमधुनच बघता. तुम्ही राजकारणात जे अनेक धागे म्हणत आहात ते धागे “ अ“ विरुद्ध “ ब“ असे न बघता “ अ“ ते ब“ मधे एक मोट्ठा स्पेक्ट्रम आहे अश्या द्रुष्टीकोनातुन बघा.

हा धागा बायडन नावाचा असला तरी इथे युक्रेन युद्ध सुरु झाल्याच्या संदर्भात ट्रंप बद्दल २ शब्द लिहींणे प्रस्तुत वाटले. ट्रंपमधे अनेक दुर्गुण होते पण तो स्ट्रिट स्मार्ट आहे/ होता हे नक्की. काल जेव्हा जर्मनीने रशिया- जर्मनी ऑइल लाइन रद्द /स्थगीत केली त्या लाइनला २०१८ मधे त्याने शुद्ध “ मुर्खपणा“ म्हणुन संबोधले होते. जर्मनीने स्वतःचे सगळे कोल प्लांट्स व न्युक्लिअर प्लांट्स बंद करुन रशियाच्या ऑइल वर विसंबुन राहायचा निर्णय घेतला. तेव्हा ट्रंप नेटो चिफला खवळुन म्हणाला होता की तुम्ही रशियाला ट्रिलिअन्स ऑफ डॉलर्सचा फायदा करुन देंणारी ऑइल लाइन बांधुन रशियाच्या ऑइलवर विसंबुन राहणार, तुम्ही रशियाचे मिंधे होणार व त्याच रशियापासुन तुमचा बचाव करायला अमेरिका नाटोचा भार उचलणार. दॅट डझ नॉट मेक सेन्स!

आज त्याचे भाकीत खरे ठरले. रशिया व पुटीनला माहीत आहे जर्मनीच्या व सगळ्या युरोपच्या नाड्या (रशियन तेलावर विसंबुन राहील्यामुळे) आवळल्या गेल्या आहेत व रशियाने जर युक्रेन( युक्रेनच काय, पुढे जाउन पुटीन बेलारुस, उझबेकिस्तान, लिथुवेनिया, आझारबाझान हेही!) गिळंक्रुत केला तर युरोप( व अमेरिकाही) षंढासारखे बसुन राहतील.

कारण अमेरिकेत आजतरी अजुन एका मेजर युद्धाला सामोरे जायचे पॉलिटिकल विल नाही. दुसर्‍या माहायुद्धानंतरच्या एकाही युद्धात अमेरिकेला यश आलेले नाही. नुकतेच ते इराक/ अफगाणिस्तानातुन होरपळुन माघार घेउन परत आलेले आहेत. त्या युद्धातले व्हेटरन्स( माजी सैनीक) रोज २०/ २० असे आत्महत्येने मरत आहेत. जे मरत नाहीत त्यातले असंख्य व्हेटरन्स ड्रग्स/ अल्कोहोल च्या नादाला बळी पडले आहेत, पी टी एस डी, अँक्झायटी, डिप्रेशनच्या बळी पडले आहेत. त्यामुळे अमेरिका जुजबी टोकन ( रशिया) विरोधी सँक्शन्स शिवाय काहीच करु शकत नाही. आणी त्या सँक्शन्समुळे रशियाला अपाय होण्या ऐवजी अमेरिकेलाच त्याचा फटका बसणार आहे. स्टॉक मार्केट इन्फ्लेशनमुळे करेक्शन टेरीटरीमधे होते ते आता युक्रेन वॉरमुळे रिसेशन टेरीटरी मधे चालले आहे. या वॉरमुळे अ‍ॅव्हेरेज अमेरिकन बेजार होणार आहे. आता तरी गॅस ५ ते ५.५ डॉलर्स पर गॅलन आहे. तो समर पर्यंत ७ ते ८ डॉलरही होउ शकतो. म्हणजे स्टॉक मार्केट कोलॅप्स व गॅसचा भाव या दुहेरी कैचीत पुटिनने अमेरिकेला पकडले आहे.

(एवढे होउनही अमेरिकेत जिज्ञासा म्हणते तसा गॅस व ऑइलवर डिपेंड् न राहता आपली जिवनशैली बदलण्याचा विचार कोणी करणार नाहीत. इथे प्रत्येकाला एस यु व्ही व भले मोठे ४ बाय ४ ट्रक्स चालवायला लागतात!)

मुकुंद, तुमचे विवेचन मला पटले.
<<इथे वयावरुन कोणाला कोपरखळ्या>>
जे आहे ते आहे हो. कधी कधी मते पटली नाहीत म्हणून व्यक्तीवर वैयक्तिक टीका करतातच लोकं! मनुष्यस्वभाव! मायबोलीवर असे बरेचदा होते.
मायबोलीवर मी उगाचच वेळ घालवायला नि पुष्कळदा लोकांना उचकवायला काहीतरी लिहितो.
मग लोक covefefe, ज्यूईश लेसरने सँटावर हल्ला केला वगैरे मुक्ताफळे उधळणार्‍या लोकांच्या बाजूने चवताळून लिहितात.

माझे वय झालेच आहे. तेंव्हा कुणि तसे म्हणाले तर मला त्यात काय वाटत नाही. मी ब्राह्मण आहे म्हणून मला शिव्या देणारे लोक इथे मायबोलीवर आहेत. मी अमेरिकेत रहातो म्हणून सुद्धा खूप शिव्या खाल्ल्या आहेत. मला तोंडावर जरी कुणि काही म्हणाले तरी मी लक्ष देत नाही, तर कुठेतरी मायबोलीवर कुणितरी काहीतरी म्हंटले तर मी कशाला मनाला लावून घेऊ! पण माझ्याबाजूने बोलल्याबद्दल धन्यवाद.
<< आजच्या राजकारणाचे कंगोरे तुमच्या आकलनाबाहेरचे आहेत, म्हणून असे प्रश्न पडतात. >>
हे खरे आहे. आजकाल पैसे, सत्ता यांच्या मागे लागून इतर सर्व काही खोटे झाले आहे.
सायन्स, सत्य, नैतिकता, खरेपण कश्शा कश्शा वर लोकांचे एकमत नाही. ज्याच्या त्याच्यात स्वार्थ बघायचा. ढोंगी पणाला तर मर्यादाच नाही. स्वतः व्हॅक्सिन घेऊन वर व्हेक्सिन घेऊ नका सांगणारे लोक आहेत. राजकारणी आज एक तर उद्या त्याच्याविरुद्ध बोलतात. कशावर विश्वास ठेवायचा?
म्हणून तर मी म्हणतो आपण कशाला इथे डोकेफोड करायची?

काल बराक ओबामा व्हाइट हाउस मधे गेला होता. तेव्हा सगळे लोक त्याच्याशीच बोलायला उत्सुक आहेत व बायडेनकडे कोणाचेच लक्ष नाही - अशी क्लिप कालपासून व्हायरल होत आहे Happy
https://www.youtube.com/watch?v=QGRxVITBGOA

तिथल्या एकालाही ही सिच्युएशन ग्रेसफुली बदलता येइल अशी काही आयडिया सुचली नाही? प्रेसिडेण्ट हा पार्टी स्टार असायची गरज नाही पण जेथे कोठे प्रेसिडेण्ट उपस्थित असतो तेथे तोच (किमान अमेरिकेत) मुख्य असायला हवा. कालच्या इतरही क्लिप पाहताना ओबामालाही ते लक्षात आलेले दिसत नाही.

बाकी त्याची अन-एडिटेड व्हर्जन वेगळी असू शकेल वगैरे सगळे ठीक आहे. पण एकतर अजून दिसली नाही आणि जरी असली तरी यात दिसणारे चित्र फारसे बदलेल असे वाटत नाही.

दोन तीन दिवसांपूर्वी भ्रमिष्ट राष्ट्रपती असे वदले की
"Imagine had the tobacco industry been immune to prostitute being sued, come on!"
ह्याचा अर्थ खंदे समर्थक सांगतीलच. पण मला अनाकलनीय वाटले.
कदाचित आपल्या चिरंजीवांना तंबाखू आणि वेश्या दोन्ही आवडत असल्यामुळे त्यातून Freudian गल्लत घडली असेल!
म्हातारबा जास्तीत जास्त भ्रमिष्ट होऊ लागले आहेत. चक्क सौदी अरेबियाच्या टिव्हीवर ह्या बाबाचे एक विडंबन सादर केले गेले. त्यात कामाला बाईंना नको इतके हुशार दाखवले गेले. पण बायडन ची भरपूर तर उडवली गेली. जायलाच हवी. असल्या पार्ट टाईम मेंदू वाल्या माठाला सर्वोच्च नेता बनवणे घातक आहे.
कमलाबाई चे आणखी वेगळेच प्रकरण आहे. निरर्थक शब्दांची भेंडोळी भिरकावून चेटकी सदृश विकट हास्य करणे ह्यात त्यांचा हात कुणी धरूच शकत नाही. अगदी हिलरीही फिकी पडते!
एका भाषणात "passage of time" ह्या शब्दांचा अनेक वेळा वापर करून एक अत्यंत निरर्थक वाक्यांची माळ बाईंनी गुंफली आहे. आणि हा एक प्रसंग नाही. अनेक सोप्या प्रश्नांना बाईंची meaningless word salad पद्धतीची उत्तरे व्हायरल झाली आहेत.
इतक्या मूर्ख बाईकडे बघून नको, त्यापेक्षा भ्रमिष्ट बायडन परवडला! असा विचार येतो. कदाचित हा त्याचा विचारपूर्वक निवडलेला insurance असावा!
November लवकर अवतरावा अशी इच्छा होत आहे.

Pages