४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

LGBTQABCDXYZ+*~•%÷√,> वगैरे लोकांना डोक्यावर बसवणे >>>
पोलिसांना फंड करणे बंद >>> सिरियसली, भ्रम कुणाला झालाय याबद्दल मलाच भ्रम झाला आता Happy
असंबद्ध बरळणे, वाक्यातील करता, कर्म, क्रियापद, विशेषण ह्यांचा मेळ नसणे, निरर्थक काहीतरी बोलणे >>> एकदम देजावु झाले Lol हेच सगळे मी म्हटल्याचे आठवत होते फक्त आधीच्या अध्यक्षांना Happy

रेड स्टेट्समध्ये स्त्रियांना लिगली प्रोटेक्ट करण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत.
डेमोक्रॅटना स्त्रियांवर होणारा अन्याय दिसत नसावा किंवा वर लिहिलंय तसं inclusion साठी स्त्रियांनी(च) तडजोड करावी अशी अपेक्षा असावी. मुलींसाठी असलेल्या स्पोर्ट्स स्कॉलरशिप पण ट्रान्स घेऊन टाकतात असं वाचलं.
आता फक्त ५००० वर्षांपासून ट्रान्सलोकांवर स्त्रियांनी अन्याय केला अशी काहितरी थिअरी मांडून reverse discrimination केस establish करून justify करणं बाकी आहे. तेही होईल.

स्त्रियांना प्रोटेक्ट करणारे रेड स्टेट लग्नाचे वय कमीच ठेवतात, मिनिमम वय १६ किंवा १७ करायला पण विरोध करतात.

https://www.google.com/amp/s/www.newsweek.com/tennessee-bill-proposes-el...

https://www.google.com/amp/s/www.nbcnews.com/news/amp/ncna1050471

https://www.google.com/amp/s/www.independent.co.uk/news/world/americas/l...

वाह स्त्रियांचे रक्षक.

अफलातून प्रायॉरिटी ऑर्डर आहे स्त्रियांच्या काळजीची रेड स्टेट्स मधे. अ‍ॅबॉर्शन, लेस्बियन्स वगैरे पेक्षा अ‍ॅथलेटिक्स मधे भाग घेणार्‍या आणि त्यातही जेथे ट्रान्स शी स्पर्धा करावी लागेल अशा स्त्रियांचे प्रश्न आधी.

मी खरे म्हणजे डेम्स मधे जो सामाजिक प्रश्नांबद्दल, आणि कॅम्पेन नॅरेटिव्ह बद्दल जो टोटली गंडलेला प्राधान्यक्रम आहे त्याबद्दल पोस्ट लिहायला आलो होतो पण रेड स्टेट्स मधे स्त्रियांचे प्रोटेक्शन पाहून टोटल फुटलो Happy

> रेड स्टेट्समध्ये स्त्रियांना लिगली प्रोटेक्ट करण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत.
बापरे ! इतके भयंकर वाक्य वाचायला मिळेल असे वाटले नव्हते ! रेड स्टेट्स नी गर्भपातावर बंदीच आणली आहे, आता तर ते सुप्रीम कोर्टापर्यंत धडक मारत आहेत. एखाद्या १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला व ती गर्भवती झाली तरी तिने बाळ जन्माला घतलेच पाहिजे, अन्यथा तिच्यावर खटला दाखल करायचा बलात्कार्‍याला अधिकार !

काय ते स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे स्त्रीवादी रिपब्लिकन्स... वाह वा. एकापेक्षा एक कर्तृत्व...
ट्रान्स लोकांना स्पोर्ट्स मध्ये दडपायला फक्त स्त्रियांचे हक्क सुचतात. आणि लग्नाच्या वयावर बंधन नको कारण तो व्यक्तिगत हक्कावर बंधन आहे म्हणे. आणि शाळेत मुलांना "जसे इतरांना आई आणि वडील असतात तस काहींना दोन आई किंवा दोन वडील असू शकतात" हे सांगायला मात्र कायद्याने बंदी.

Classroom “instruction” could mean eliminating books with L.G.B.T.Q. characters or historical figures. But “classroom discussion” is broad. That could discourage a teacher from speaking about gay families with the whole class, even if some students have gay parents.

The bill also targets mental health and counseling services — a place where students often have difficult conversations about gender identity and sexuality, especially if they struggle to talk about those conversations at home.

https://www.google.com/amp/s/www.nytimes.com/2022/03/23/us/what-does-don...

गर्भपात ह्या विषयी दोन टोकाची मते आहेत. एक मत असे की गर्भावस्थेत असताना जीवाला आपले अस्तित्व असते आणि ते संपवणे म्हणजे मनुष्य हत्या. दुसरे टोक हे की अगदी बाळंत झाल्यावरसुद्धा बाळाला ठार मारण्याचा हक्क मातेला असला पाहिजे.
https://www.cnn.com/2019/01/31/politics/ralph-northam-third-trimester-ab...
(कदाचित मूल अंगावर पीत असेल तोवर आईला त्याला ठार मारण्याचा हक्क असावा असेही महिला हक्काबद्दल "जागरुक" असणारे लोक म्हणतील. फक्त कमीत कमी वेदना होऊन बाळाला संपवता आले तर त्यातल्या त्यात बरे!) गर्भपात हा बर्थ कंट्रोल म्हणून वापरला जावा ह्याबाबत प्रो चॉइस लोक आग्रही दिसतात. (इथे कुणी आई आपल्या बाळाला मारूच कशी शकेल वगैरे भावनेला हात घालणारे डायलॉग मारू नयेत. कायद्याने मुलाला काही संरक्षण असावे का ह्याबद्दल चर्चा आहे.)
माझ्या मते गर्भपात हे अपवाद असावेत. बर्थ कंट्रोल नाही. जेव्हा गर्भपात नको इतका सुलभ केला जातो तेव्हा तो नको तिथे वापरला जातो. प्रत्येक गर्भपात हा बलात्कारित वा पीडित स्त्रीला केलेली मदत असते असा कांगावा करू नये. ती वस्तुस्थिती नाही.
गर्भ नक्की किती वयाचा असताना गर्भपात कायदेशीर असावा हा विषय क्लिष्ट आहे. हे बरोबर आणि हे चूक असे सरळ उत्तर सांगता येणे कठिण आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने जे काही ठरवले जाईल तेच मानावे. दुसरा काही उपाय दिसत नाही.
दुसरी बाजू ही की बालकाच्या जन्माकरता पिताही जबाबदार असतो तेव्हा त्याचे मत विचारात घ्यावे की नाही ह्याबद्दल फार चर्चा वाचलेली नाही. पण ते घेतले जावे असे मला तरी वाटते. स्त्रीस्वातंत्र्याच्या कल्पनेत हे बहुधा बसत नसावे.

>>>>गर्भपात हा बर्थ कंट्रोल म्हणून वापरला जावा ह्याबाबत प्रो चॉइस लोक आग्रही दिसतात.

कोण ? गर्भपात करायला ५००$ वर खर्च येतो असे गुगल मध्ये दिसते. बर्थ कंट्रोल म्हणून गर्भपात करा म्हणणारे कोण आहेत ?! त्यांचं कोण ऐकणार आहे का आणि ?

(तुम्हाला इथे बर्थ कंट्रोल म्हणजे नक्की तेच म्हणायचंय का जे मी समजतोय ? कि कंडोम आदी साधने न वापरता, थेट गर्भपातच करायचा ?)

LGBTQIA+ गटाचे स्तोम माजवणे आणि त्यांना वलयांकित करून डोक्यावर बसवणे. ह्यात डेमोक्रॅट पक्ष आघाडीवर आहे ह्यात दुमत नसावे.
नुकतेच एका काळ्या बाईला (केतान्जी) सुप्रिम कोर्टात न्यायाधीश नेमण्यात आले. ती निव्वळ काळी आहे आणि बाई आहे म्हणून बायडनने तिला निवडले असे त्याने अनेकदा ठासून सांगितले आहे. पण ह्या बाईला बाई म्हणजे काय असे विचारले असता तिने असे सांगितले की मला सांगता येणार नाही कारण मी डॉक्टर नाही! (ह्याच चालीवर अमुक एक प्राणी कुत्रा आहे का हे कळायला पशुवैद्यकाचा सखोल अभ्यास असला पाहिजे. अमुक एक वनस्पती गुलाब आहे का ह्यावरता वनस्पती शास्त्राचा प्रकांड पंडित असायला हवे. आकाशातील गोलक हा सूर्य आहे का चंद्र हे सांगायला गहन अभ्यास केलेला खगोल शास्त्रज्ञ असायला हवे असे म्हणता येईल!)
व्हाईट हाऊसमधे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला (व्हिजिटर) आपले सर्वनाम काय आहे ते सांगावे लागते.
अमेरिकन पासपोर्टवर आता स्त्री, पुरुष आणि शिवाय क्ष(X) असे लिंग उल्लेख करता येते. तसेच एका थोर विचारवंताने असे सुचवले आहे की अमेरिकन सरकारने पासपोर्टवरून लिंग हेच हटवावे. अशी चमत्कारिक मागणी का होते आहे? तर ०.०१% पेक्षा संख्येने कमी असणारे LGBTQIA+XYZQWERT!@$%^*{}[]+ (काही चिन्हे, अक्षरे राहिली असली तर माफ करावे!) लोक हे सर्वनामामुळे दु:खी होतात म्हणून उर्वरित ९९.९९% लोकांनी लिंगावर आधारित ही, शी ही सर्वनामे त्यागावीत अशी ही मागणी आहे. भ्रमिष्ट बायडन ती मान्य करण्याची बरीच शक्यता आहे.
शाळेत अल्पवयीन विद्यार्थ्याला लिंग बदल करायचा असेल तर त्या भयानक शस्त्रक्रियेकरता आईबापांना विचारयाची गरज नाही. निव्वळ शिक्षक तो निर्णय घेऊ शकतात असा पुरोगामी विचार काही लोकांनी मांडला आहे त्याला फ्लोरिडाच्या गव्हर्नरने विरोध केलेला आहे. ह्या विरोधाचा पुरोगामी अनुवादी "डोंट से गे बिल" असा होतो. माझा मुलगा पाच सहा वर्षाचा असेल तर त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या एखाद्या शिक्षकाने त्याला लिंगबदल करून घेण्यासाठी मदत करावी असे मी स्वप्नातही मानणार नाही. एक पालक म्हणून ही जबाबदारी सर्वथा माझी आहे. मुळात ज्या वयात लिंग म्हणजे काय हेच पुरेसे माहित नसते, जननेंद्रिये विकसित नसतात त्या वयात असले काहीतरी भयंकर करणे हेच मला अतिरेकी वाटते.

परंतु पुरोगामी डेमोक्रॅट लोकांना असा काही विधीनिषेध नाही. अर्भकाचा गर्भपात झाला नसेल तर जन्म झाल्याझाल्या नर्स किंवा अन्य वैद्यकीय अधिकार्याला वाटले तर तिथेच बालकाचे लिंग बदल करायला ते मागेपुढे पाहाणार नाहीत!

पोलिस डिफंडिंग. डेमोक्रॅटिक पक्ष हा डिफंड द पोलिस हे बोधवाक्य उराशी कवटाळून निवडणुका लढवत होता. कमलाबाईंनी व्यासपीठावरून उच्चरवाने तसे म्हटले आहे. बायडनचा मेंदू अल्पकाळ काम करतो. उरलेला वेळ डेमोक्रॅटिक पक्षाची चांडाळचौकडी म्हणून प्रसिद्ध असणार्या चार बायका सरकारी धोरण ठरवतात (निदान त्यावर प्रभाव पाडतात). (ए ओ सी, ओमर, तलिब, प्रेस्ली) ह्या चौघी डिफंड द पोलिस ह्या मोहिमेच्या खंद्या आधारस्तंभ आहेत आणि होत्या. जॉर्ज फ्लॉईड नामक थोर, मानवी हक्काकरता आमरण लढणार्या योद्ध्याच्या खुनानंतर समस्त डेमोक्रॅटिक पक्षाचे लहानथोर नेते तोंडाला फेस येईपर्यंत पोलिसांना हटवा, डिफंड द पुलिस म्हणून आरोळ्या ठोकत होते.
परंतु जसजसे विशेषतः डेमोक्रॅटिक राज्या, शहरात गुन्हेगारी ओसंडून वाहू लागली आहे आणि निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत आणि सामान्य नागरिकांना ही वाढती भयानक, बेलगाम गुन्हेगारी "तितकीशी रुचत नसावी" असे सुचवणार्या जनमत चाचण्या निकाल जाहीर करत आहेत तसतसे भ्रमिष्ट म्हातारबा अचानक पोलिसांच्या बाजूने बोलू लागले आहेत. पण हे ढोंग आहे.

ओके मग एक्स्ट्रीम लेफ्ट्ची वाक्ये ही डेमोक्रॅट्सची प्रातिनिधिक धोरणे आहेत असे तुम्हाला म्हणायचे असेल तर त्या लॉजिकने तात्या अजूनही प्रेसिडेण्ट आहे, २०२० ची निवड्णूक चोरलेली आहे, ६ तारखेला तेथे ट्रम्प सपोर्टर्स नव्हते, तर अँटिफाचे लोक होते, डेम्स वाले लहान मुलांना खातात वगैरे ही रिपब्लिकन्सची प्रातिनिधिक मते होतील Happy

प्रत्येक साइडला असले नट्स असतात. बहुतांश सेण्ट्रिस्ट लोकच धोरणे ठरवतात.

रिपब्लिकन्सची प्रो चॉईस मतं आततायी आहेत म्हणून डेमोक्रॅट लोकांची स्त्रीविरोधी धोरणं योग्य ठरत नाहीत. हा विषय अधिक व्यापक आहे.

कमला हॅरिस ही नट (इंग्रजी) जातकुळीतली असली तरी उपराष्ट्रपती आहे. विशेषतः बायडन हतबल, हतबुद्ध आहे हे स्पष्ट दिसत असताना अशा प्रकारे कुणीतरी अतिरेकी डावा माणूस सरकारी धोरणे ठरवत असेल हे तितके अवघड वाटत नाही. (ट्रंप आवडो वा नावडो पण तो असा कठपुतळी नव्हता हे नक्की!) चांडाळचौकडी ही डेमोक्रॅटिक पक्षाची थिंक टँक समजली जाते. अनेक बाबतीत ( उदा अतिरेकी हिरवी धोरणे) सरकार त्यांचीच री ओढते. त्यामुळे उगाच कुठल्या उजव्या डोकेफिरू लोकांचे उदाहरण इथे लागू नाही. तसेच आता डेमोक्रॅटिक लोक सत्तेवर आहेत त्यामुळे उजव्या माथेफिरूंची सबब टिकणार नाही.

<<<ट्रंप आवडो वा नावडो पण तो असा कठपुतळी नव्हता हे नक्की!>>>
अनुमोदन.
तो स्वतःच्या विचाराने, स्वतःला वाटेल तसे निर्णय घेत असे. ते निर्णय चांगले का वाईट यावर जग बुडेस्तोवर चर्चा केली तरी काSSही फरक पडत नाही. देशासाठी काय चांगले नि काय वाईट यावर एकमत होणे कठीण. ७२ दशलक्ष लोकांच्या मते तो देशासाठी चांगला होता, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याला मत देणारे सगळेच काही वेडे नव्हते!
दुर्दैवाने आजकाल रिपब्लिकन पक्षातील खरे चांगले, अक्कलवान लोक आहेत ते मिडीयात दिसत नाहीत. दिसतात ते क्यू-अनॉन, टकर कर्ल्सन, बोबिट नि मर्जोरि टेलर ग्रीन.

>>एखाद्या १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला व ती गर्भवती झाली तरी तिने बाळ जन्माला घतलेच पाहिजे, अन्यथा तिच्यावर खटला दाखल करायचा बलात्कार्‍याला अधिकार !<<
ब्लो समथिंग आउट ऑफ प्रपोर्शन या वाक्प्रचाराला यापेक्षा चांगलं उदाहरण मिळुच शकत नाहि. किंवा अ‍ॅबॉर्शनचा कायदा नेमकं काय म्हणतो याचा ओ कि ठो (मराठीत घंटा) यांना माहित नाहि. इदर केस, परंपरेला जागुन यांनी विनोद निर्मितीत निराशा केलेली नाहि...

>>ओके मग एक्स्ट्रीम लेफ्ट्ची वाक्ये ही डेमोक्रॅट्सची प्रातिनिधिक धोरणे आहेत असे तुम्हाला म्हणायचे असेल<<
बरं मग तसं नाहि? आय्ला, एव्हढं रामायण घडतंय तरी रामाची सीता कोण?... Lol

>>>नुकतेच एका काळ्या बाईला (केतान्जी) सुप्रिम कोर्टात न्यायाधीश नेमण्यात आले. ती निव्वळ काळी आहे आणि बाई आहे म्हणून बायडनने तिला निवडले असे त्याने अनेकदा ठासून सांगितले आहे. पण ह्या बाईला बाई म्हणजे काय असे विचारले असता तिने असे सांगितले की मला सांगता येणार नाही कारण मी डॉक्टर नाही!

हा प्रश्न जज ला विचारणे हे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. जजचा हा एरिया नाही. जजने कायद्याची माहिती पूर्ण ठेवणे हे अपेक्षित असते. केतनजी ब्राऊन बाई कोणत्याही बाजू ने पहिले तरी पूर्ण क्वालिफाईड आहेत. बिडेन काहीही बोलला असला तरी, त्यांचे कवालिफिकेशन पहिले असता she is absolutely qualified for the job. not only that if you look at her experience, SHE IS ABSOLUTELY THE MOST QUALIFIED PERSON ! (see video.) (इतर नऊ जजेस पैकी एकानेही आजपर्यंत पब्लिक डिफेण्डर म्हणून काम केले नाहीये. फक्त ब्राऊन ह्यांनीच केले आहे.)
आणि सुप्रीम कोर्टात जज नेमण्याचे प्रिव्हिलेज आपल्या पोलिटिक्सचा जज नेमणे यासाठी वापरण्यात काय हरकत आहे ? ट्रम्प ने कॅवॅनॉफ आणि बॅरेट नेमलेले ते का उगीच ?
आणखी डिटेलवार आर्ग्युमेन्ट इथे पहा.

केतनजी ब्राऊन सर्वात जास्त क्वालिफाईड सुप्रीम कोर्ट जज आहेत. https://youtu.be/kOdsdNqjRMo

>>हा प्रश्न जज ला विचारणे हे अत्यंत खोडसाळपणाचे आहे. जजचा हा एरिया नाही. जजने कायद्याची माहिती पूर्ण ठेवणे हे अपेक्षित असते.
<<
ह्या बाईंनी इतके मूर्ख उत्तर दिल्यामुळे हे खोडसाळ वगैरे कांगावा करणे चालू झाले आहे. बाईंनी हिंमत दाखवून हा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नाही असे काही न म्हणता मी डॉक्टर नाही हे बिनडोक उत्तर का दिले बरे? आणि बायडन (बिडेन नाही!) ज्या प्रकारे ट्रान्स लोकांना डोक्यावर चढवत आहे त्यावरुन कधीतरी तुरुंगात, सैन्यात कुठेतरी कुणी विकृत स्वतःला बाई म्हणवून घेईल स्त्रियांच्या सहवासात जाईल आणि बाथरुम वा अन्य कुठेतरी गैर प्रकार करेल तेव्हा हा इसम बाई म्हणवणे कायदेशीर आहे का हा प्रश्न नक्की ऐरणीवर येईल. व्हर्जिनियात हा प्रकार एका शाळेत आधीच घडलेला आहे.

दुसरी गोष्ट बायडन (बिडेन नाही!) ह्याने जज निवडताना कुठलाही उमेदवार ठरलेला नसताना काळी पाहिजे आणि बाईच पाहिजे असे अनेकदा ठासून सांगितले होते. त्यामुळे त्याला बाकी कुठल्याही क्वालिफिकेशनशी काही मतलब नव्हता. पहिला फिल्टर हा काळे असणे आणि दुसरा बाई असणे हाच असणार हे आधी ठरले होते. त्यामुळे आता कितीही शिरा ताणून ही बाई खूप खूप खूप दर्जेदार जज आहे वगैरे ओरडले तरी हे सत्य् आहे की अनेक क्वालिफाईड उमेदवार निवडून त्यातली एक काळी आणि बाई निवडली असे नाही. अनेक काळ्या बाया निवडून त्यातली जज म्हणून बरी अशी कुणी निवडली आहे. डिस्क्रिमिनेशन ह्याहून काय वेगळे असते?

परिणाम काय झाला- सर्वात कवालिफाईड व्यक्ती जज झाला. संपला विषय.

आणि पोलिटीकली अलाइन्ड व्यक्ती निवडून देणे हाच निकष असतो. सर्वात क्वालिफाईड असेल तर ते चेरी ऑन टॉप झाले. आजतागायत सगळे जज आपल्याला हव्या त्या पोलिटिकल विचारांचेच नेमले गेले आहेत, मग ते कमी क्वालिफिकेशनचे का असेनात. इथे तर बाई सर्वात क्वालिफाईड पण आहेत, त्यामुळे मुळात रडायचे कारण नाहीये. उगाच बायडन ह्यांव म्हणला आणि त्यांव म्हणाला* करत तक्रार करायची असेल तर खुशाल करा, पण काय उपयोग होणार नाही. Real world impact काय झाला- सर्वात योग्य व्यक्ती जज पदी बसला. Inspiringly, ती व्यक्ती सुप्रीम कोर्टात जज होणारी पहिली कृष्णवर्णीय महिला आहे, आनंदाचा क्षण आहे हा.

मी डॉक्टर नाही चा अर्थ हा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही असाच होतो की ! आणखी काय वेगळा अर्थ होतो म्हणे मी डॉक्टर नाही असे म्हणण्याचा ?!

*- बायडन च्या वक्तव्यावर इतका किस पाडणारे लोक ट्रम्प च्या विचारमौक्तिकांना मात्र गादीखाली सारत. ("तो मूर्खासारखं काहीतरी बोलतो, पण काम चांगलेच करतो !) जर बायडन म्हणला असेल की बाईंची नेमणूक केवळ कृष्णवर्णीय महिला म्हणून झालीये तर त्याचे हे बोलणे मूर्खपणाचे आणि शत्रून्ना विनाकारण ऍमो देणारे आहे ह्यात शंका नाही. मुख्य म्हणजे खुद्द ब्राऊन बाईंसाठी त्याचे हे बोलणे मानहानीकारक आहे- when she is more than qualified for the job.

>>परिणाम काय झाला- सर्वात कवालिफाईड व्यक्ती जज झाला. संपला विषय.
आजिबात नाही क्ष व्यक्तीला अमुक एक व्यक्ती "सर्वात क्वालिफाईड" वाटली म्हणून ते त्रिकालाबाधित सत्य ठरत नाही. ते फक्त तुमचे मत आहे. वस्तुस्थिती असेल असे नाही. आपण काय निकष लावून ही बाई सर्वात जास्त क्वालीफाईड आहे असे जाहीर करत आहात? बायडनने निवडले म्हणून?
अनंतकोटी ब्रह्मांड नायक ओबामाजी असे म्हणाले होते की हिलरी क्लिंटन ही सर्वात जास्त क्वालीफाईड राष्ट्राध्याक्ष असेल. पण लोकांनी तसे मानले नाही.

>>मी डॉक्टर नाही चा अर्थ हा प्रश्न माझ्या अखत्यारीत नाही असाच होतो की ! आणखी काय वेगळा अर्थ होतो म्हणे मी डॉक्टर नाही असे म्हणण्याचा ?!
आजिबात नाही. पुरुष स्त्री ओळखायला डॉक्टर असावे लागत नाही. जसे कुत्रा मांजर ओळखायला पशुवैद्य असायला लागत नाही. जसे बालक आणि प्रौढ व्यक्ती ह्यातील फरक ओळखायला पिडियाट्रिशियन असायला लागत नाही.
डोळे आणि कान ह्यातील फरक समजायला डोळ्यांचा वा कानाचा डॉक्टर असायला लागत नाही. केवळ ट्रान्स लोकांना दुखावायचे नाही आणि आपण कसे वोक आहोत हे संबंधित डाव्या लोकांच्या मनावर ठसवायचे म्हणून हे बिनडोक उत्तर दिले गेले हे उघड आहे.

>>Real world impact काय झाला- सर्वात योग्य व्यक्ती जज पदी बसला. Inspiringly, ती व्यक्ती सुप्रीम कोर्टात जज होणारी पहिली कृष्णवर्णीय महिला आहे, आनंदाचा क्षण आहे हा.
<<
पुन्हा तेच. तुमचे मत ती बाई आजवर होऊन गेलेल्या समस्त जजामधे सर्वश्रेष्ट आहे असे असेल तर तुम्हाला लखलाभ असो. मला तसे वाटत नाही. बाईंच्या त्या प्रश्नाच्या उत्तरावरून ह्या बाईचा वोकनेस स्वच्छ दिसून येतो आहे आणि हा चिंतेचा विषय आहे. असो.
अमुक एका वंशाची महिला जज झाली म्हणून आनंदोत्सव करायची काही गरज नाही. प्रत्येक एथ्निसिटीची महिला, मग लेस्बियन, मग ट्रान्स, मग क्वीअर असे गट निवडून त्या त्या गटाचे कुणीतरी नग निवडून हाच किंवा हीच कशी आजवर झालेल्या जजांमधील सर्वात उच्च क्वलिफाईड आहे असे स्वतःच जाहीर करून आनंदीआनंद गडे म्हणून नाचायचे हा आचरट प्रकार आहे.

ॲफरमेटिव्ह ॲक्शन वगैरेंना पूर्ण सपोर्ट आहे. पण शासनाच्या कुठल्याही शाखेच्या सर्वोच्च पदांवर नियुक्ती होताना पात्रता हा एकमेव निकष असला पाहिजे. केतान्जी पात्र नाही असं म्हणायचं नाही, पण म्हातारबाने सुप्रीम कोर्ट जज साठी 'काळी बाई' हाच सर्वात महत्वाचा निकष असेल असं सांगितलं होतं. म्हणजे रुथ बेडन जिन्सबर्ग जर काही दशकं नंतर जन्मल्या असत्या आणि आज सुप्रीम कोर्टच्या शर्यतीत असत्या तर या वृद्धकपि साठी त्या 'चामडी पुरेशी काळी नाही' एवढ्या एका बेसिसवर बाद ठरल्या असत्या!!
ओबामा निवडून आला तो त्याच्या रंगामुळे नाही तर त्या वेळी तो हिलरी पेक्षा बरा कॅंडिडेट होता म्हणून. यापुढे मात्र प्रत्येक अध्यक्षीय निवडणुकीत डेमोरॅटांचं नॉमिनेशन खिरापतीसारखं 'ए गेल्या वेळी मुसलमान झाला बाई, या वेळी ट्रान्स असू दे' किंवा 'व्हाईस प्रेसिडेंट लेस्बियन झाली की गेल्या वेळी, या वेळी नेटिव्ह अमेरिकनच घ्या बाई' असं मायनॉरिटी नुसार वाटलं जाईल. Biggrin
कमळीला खुद्द डेमोक्रॅट पार्टीत फक्त दोन टक्के सपोर्ट होता. ती आता फक्त रंग आणि लिंग एवढ्या दोन निकषांवर आपल्या डोक्यावर बसली आहे. उद्या म्हातारबा टर्म पूर्वीच खपले तर बया फ्री वर्ल्डची लीडर होणार! कशाच्या जोरावर, तर 'कातडीवर भरपूर पिगमेंट्स असणे' आणि 'व्हजायना असणे' या निकषांवर. मज्जा..!!

>>>आपण काय निकष लावून ही बाई सर्वात जास्त क्वालीफाईड आहे असे जाहीर करत आहात?
--------ह्याचे कारण मी वर दिले आहे. इतर जज आणि ब्राऊन ह्यांच्या आजवरच्या कामांच्या अनुभवाची तुलना करा. तो व्हिडीओ बघा, सात मिनिटांचा आहे फक्त. त्यापेक्षा वेगळी माहिती आणि कोणत्या निकषांमध्ये जज ब्राऊन कमी पडतात हे माहित असेल तर नक्की सांगा.

>>>>आजिबात नाही क्ष व्यक्तीला अमुक एक व्यक्ती "सर्वात क्वालिफाईड" वाटली म्हणून ते त्रिकालाबाधित सत्य ठरत नाही. ते फक्त तुमचे मत आहे.
------मत नाही. "पब्लिक डिफेण्डर आणि अपेलेट कोर्टात, सेंटनसिंग कमिशन, डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज म्हणून, सुप्रिम कोर्टाचा क्लर्क म्हणून काम केलेल्या" हे सर्वच्या सर्व निकष पूर्ण करणाऱ्या ह्या एकमेव बाई आहेत. त्यांचे शिक्षण इतर उमेद्वारांप्रमाणे आयव्ही लिगमधूनच झाले आहे. हे घ्या ऑब्जेक्टिव्ह निकष. तुम्हाला दुसरे निकष माहिती असतील तर लिहा.

>>>तुमचे मत ती बाई आजवर होऊन गेलेल्या समस्त जजामधे सर्वश्रेष्ट आहे असे असेल तर तुम्हाला लखलाभ असो.
--------समस्त जजेस पेक्षा श्रेष्ठ आहेत की नाहीत हा गौण मुद्दा आहे. सध्याच्या इतर कँडीडेट्स पेक्षा निःसंशय जास्त अनुभवी आहेत, आणि thats what matters.

>>>>अमुक एका वंशाची महिला जज झाली म्हणून आनंदोत्सव करायची काही गरज नाही.
-------- ठीक आहे की, तुम्ही करू नका आनंदोत्सव साजरा, काही जबरदस्ती नाही. ज्यांना आनंद झालाय ते करतील आनंदोत्सव साजरा, कसे ? आम्हाला होतो बुवा आनंद नवीन माईलस्टोन्सचा. सगळ्यांनाच व्हायला पाहिजे असा काही आग्रह नाही.

>>>बाईंच्या त्या प्रश्नाच्या उत्तरावरून ह्या बाईचा वोकनेस स्वच्छ दिसून येतो आहे आणि हा चिंतेचा विषय आहे. असो.
------तुम्ही करा की चिंता, नो प्रॉब्लेम. ट्रम्प जेव्हा क्लिअरली प्रो लाईफ उमेदवारांना जज करतो तेव्हा सुद्धा अनेकांना अश्या चिंता वाटल्या होत्याच. पण शेवटी आपल्या विचारसरणीचा जज नेमणे हा राष्ट्राध्यक्षांचा प्रिरोगेटिव्ह आहे. त्यावर आज आश्चर्य किंवा संताप करायचे कारण समजत नाही. सगळे राष्ट्राध्यक्ष आपल्या या हक्काचा वापर करत आले आहेत, डेम्सनी तेव्हढा हा अधिकार सोडायचा अशी तुमची अपेक्षा असेल तर ती बावळट आहे. रिपब्लिकन्स सरळसरळ roe v wade overturn करायला जज नेमले पाहिजेत असे म्हणत असतात,आणि काय बोलता ! हल्ली कोणालाही उठूनसुठून वोक म्हणणे हि conservative लोकांची फॅशन आहे, असल्या फालतू शब्दफेकीकडे मी जास्त लक्ष देत नाही.

>>>आजिबात नाही. पुरुष स्त्री ओळखायला डॉक्टर असावे लागत नाही.
स्त्रियांची व्याख्या जजला करायला सांगणे हा प्रश्न खोडसाळ आहे. तुम्हीच कबूल केले की बाईंनी "हा माझा एरिया नाही" असे उत्तर द्यायला हवे होते. मी पॉईंट आउट केले की बाईंनी तेच उत्तर थोड्या एगल्या शब्दात दिले आहे तर तुम्ही दुसऱ्याच रँट मध्ये गेला.

मुळात असला प्रश्न विचारून गॉचा उत्तर मिळवणे हा उद्देश होता. तो हाणून पाडला हे चांगलेच झाले.

>>>आजिबात नाही. पुरुष स्त्री ओळखायला डॉक्टर असावे लागत नाही.
बायोलॉजिकल सेक्स बद्दल तुमचे म्हणणे योग्य आहे. प्रश्न "फिमेल म्हणजे काय" असा नव्हता. "वूमन म्हणजे काय" असा होता. भारत देशात, जिथे ट्रान्स हक्काचे संभाषण अजून सुरु सुद्धा झाले नाही तिथे सुद्धा "स्त्रीत्व" म्हणजे काय यावर दवणीय लेखच्या लेख येत असतात. तिथे अतिशय पोलिटीकली चार्जड व्याख्या ज्याचा कायद्याशी संबंध नाही, जजला करायला सांगणे हा मूर्खपणा आहे. तो प्रयत्न हणून पडला हेच उत्तम.

मिट रोम्नी आणि मोजून तीन gop सिनेटर ज्यांनी ब्राऊन ह्यांना मत दिले त्यांना प्रेमाचा व आदराचा मुजरा. ऑब्जेक्टिव्हली पात्रता पाहणारे हे तिघेच रिपब्लिकन. बाकी कोत्ये रिपब्लिकन्स नेमणूक कन्फर्म झाल्यावर चक्क उठून निघून गेले ! टाळ्या वाजवणे राहिले बाजूला, किमान अभिनंदन किंवा पदाचा आदर म्हणून तरी थांबायचे ! ऐतिहासिक क्षण आहे खरोखर- पहिली कृष्णवर्णीय महिला सुप्रीम जस्टीस म्हणून नेमली जाते, रिपब्लिकन्स उठून चरफडत निघून जातात.

एखाद्या १३ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला व ती गर्भवती झाली तरी तिने बाळ जन्माला घतलेच पाहिजे, अन्यथा तिच्यावर खटला दाखल करायचा बलात्कार्‍याला अधिकार ! Rofl

"वूमन म्हणजे काय" असा होता. भारत देशात, जिथे ट्रान्स हक्काचे संभाषण अजून सुरु सुद्धा झाले नाही तिथे सुद्धा "स्त्रीत्व" म्हणजे काय यावर दवणीय लेखच्या लेख येत असतात. तिथे अतिशय पोलिटीकली चार्जड व्याख्या ज्याचा कायद्याशी संबंध नाही,///

पोलिटिकली चार्जड का बरं आहे हा इतका साधासरळ प्रश्न?

कारण काही पुरुषांना (ज्यांची संख्या खरंतर खूप कमी आहे) वाटतं की ते मनाने स्त्री आहेत. आणि त्यामुळे आता त्यांना स्त्री असण्याचे नियम, व्याख्या सर्व काही त्यांच्या सोयीने बदलायचे आहेत.
स्त्रियांची individual आणि collective identity, अनेक पिढ्या लढा देऊन मिळवलेले हक्क, युनिक समस्या आणि त्यासाठी आवश्यक असलेले रिसोर्सेस- हे सर्व केराच्या टोपलीत टाकायला वेळ लागणार नाही लिबरल्सना.

पोलिटिकली चार्जड का बरं आहे हा इतका साधासरळ प्रश्न?
>>> वेड पांघरून पेडगावला ? ट्रान्स व्यक्तींच्या आयडेंटिटी साठी, त्यांच्या अस्तित्वासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी हा प्रश्न पोलइटिकली चार्जड आहे. हा प्रश्न सोशियोलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट, आणि अर्थात, बायोलॉजिस्ट्स ना विचारायला हवा. आणि medical consensus साफ आहे, ट्रान्स लोकांच्या बाजूनेच. तिथे मात्र तुमचा बेन शापिरो म्हणतो, medical consensus पोलिटीकली चार्जड आहे, बायस्ड आहे !

हा प्रश्न पोलिटीकली चार्जड आहे इतके तुम्हाला मान्य आहे का ? जर ते मान्य असेल तर त्या विशयाशी संबंध नसलेल्या व्यक्तीला हा प्रश्न विचारू नये, हा माझा मुद्दा समजून घ्या.

आता हा प्रश्न का पोलिटीकली चार्जड आहे हा पूर्ण वेगळा विषय झाला.

हे बघा- https://news.cornell.edu/stories/2018/04/analysis-finds-strong-consensus...
कॉर्नेल युनिव्हर्सिटी डाव्यांची आहे वैगेरे ऍड होमिनेम घेऊन या आता. पण हे वाचा-
**********
The year-long review screened more than 4,000 studies and identified 56 that assessed whether gender transition improves the mental well-being of transgender individuals. The analysis concluded that 93 percent of the studies found positive effects from gender transition, indicating “a robust international consensus in the peer-reviewed literature that gender transition, including medical treatments such as hormone therapy and surgeries, improves the overall well-being of transgender individuals.”
*********

>>>स्त्रियांची individual आणि collective identity, अनेक पिढ्या लढा देऊन मिळवलेले हक्क, युनिक समस्या आणि त्यासाठी आवश्यक असलेले रिसोर्सेस- हे सर्व केराच्या टोपलीत टाकायला वेळ लागणार नाही लिबरल्सना.

उदाहरणार्थ ? एखादी घटना सांगाल का ? मग मी माझे मत देऊ शकेन, जसे स्पोर्ट्स बद्दल दिले आहे.

अनेक उदाहरणं आहेत की कॉमी.
स्पोर्ट्स. स्कॉलरशीप्स. बेसिक डोर्मीटरी , शेल्टर्स व बाथरूम्ससारखे सेफ स्पेसेस. स्त्रियांसाठी असलेले रिसोर्सेस. अगदी जेलमध्ये पण मनाने स्त्री असल्याचा दावा करून पुरुष रेपिस्ट स्त्रियांच्या जेलमध्ये 'ट्रान्स'फर करून घेतो आणि स्त्रीला assault करतो अशी घटना घडली आहे.

अजूनही अमेरिकेला स्त्री प्रेसिडन्ट मिळालेली नाही. उद्या एखादा पुरुष प्रेसिडन्ट झाला आणि मग त्याने जाहीर केलं- आजपासून मी मनाने स्त्री- call me Addie instead of Adam- तर पहिली महिला प्रेसिडन्ट म्हणून Addie चं नाव घेतलं जाणार का?
हा म्हणजे मूठभर आक्रमक पुरुषांनी स्त्रियांची identity हायजॅक करण्याचाच प्रकार आहे.

>>>>स्पोर्ट्स- मान्य आहे, सिस महिलांसाठी वेगळ्या स्पर्धा घ्या.

>>>>जेल्स- सेम वरचे. ट्रान्स स्त्रियांना वेगळ्या कक्षात ठेवावे. त्यांना पुरुषांसोबत ठेऊ नये हे मान्य करण्यास हरकत नसावी.

>>>>बाथरूम- अमान्य. ट्रान्स स्त्रियांकडून स्त्रीयांवर(^१) अत्याचार होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याउलट, ट्रान्स हा असा समाजघटक आहे ज्यांच्यावर सर्वात जास्त गुन्हे घडतात. आपापल्या identified जेंडरच्या बाथरूम मध्ये जाण्यास परवानगी असावी असे स्लाईट मेजोरीटी: ५१% अमेरिकन्सचे मत आहे. स्त्रियांमध्ये हि टक्केवारी आणखी जास्त हा सुखद भाग आहे- ५५%. Whopping ६७% तरुण अमेरिकन्सना सुद्धा लिबरल बाथरूम पॉलिसी पटते(^२). सरकारी निर्णय यावर आधारित असावेत. प्लस, सिस स्त्रियांसाठी वेगळे आणि ट्रान्स स्त्रियांसाठी वेगळे बाथरूम असले तरी ओकेच आहे.
त्याउप्पर, खाजगी संस्थांनी बाथरूमची रचना कशी करायची हा त्यांचा प्रश्न असावा.
(१)--------- https://ovc.ojp.gov/sites/g/files/xyckuh226/files/pubs/forge/sexual_numb...

(२)--------- https://www.pewresearch.org/fact-tank/2016/10/03/americans-are-divided-o...

->>>>>>स्कॉलरशिप ट्रान्सस्त्रियांना स्कॉलरशिप्स मध्ये सहभागी करायचे असेल तर बहुदा जेंडर अफर्मेशन सर्जरीज, HRT असावे लागते. तसे नियम नसतील तर असावेत. ह्या गोष्टी metally, physically आणि financially खर्चिक असतात हे अतुम्हाला मान्य असेल.त्यामुळे स्कॉलरशिप साठी कोणी ट्रांसिशन करेल हि भीती अनाठायी आहे.

>>>>पहिली महिला प्रेसिडन्ट म्हणून Addie चं नाव घेतलं जाणार का?
काय प्रॉब्लेम आहे असे होण्यात ? जर ट्रान्स स्त्रिया ह्या स्त्रिया आहेत असे accept केल्यास ट्रान्स स्त्रियांच्या अचिव्हमेंट्सना स्त्रियांच्या अचिव्हमेंट्स म्हणण्यात काय वाईट आहे ? बरं, पहिली ट्रांसवूमन प्रेसिडेंट म्हणा, आणि जेव्हा सिसवुमन असेल तेव्हा सिसवुमन प्रेसिडेंट म्हणा, खुश ?
These are such non issues !

>>>हा म्हणजे मूठभर आक्रमक पुरुषांनी स्त्रियांची identity हायजॅक करण्याचाच प्रकार आहे.
म्हणजे काय ? ह्याने काय रियल वर्ल्ड नुकसान होते ? "आक्रमक" पुरुषांनी हा तुमचा गैरसमज आहे. कोणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या आणि केवळ एक्सेप्टन्स शोधणाऱ्या कित्येक ट्रान्स स्त्रिया तुम्हाला ऑनलाइन दिसतील. पहा ट्विटरवर.

तुम्हाला मुद्दे पटले आहेत Happy
पण डेम्समधील decision makers ना यातलं काहीही मान्य नाही. रेड स्टेट्समध्ये स्पोर्ट्स प्रोटेक्शन बिल्स आली. निळ्या स्टेट्समध्ये नाही.

Addie-adam अशा व्यक्तींना पहिली ट्रान्स प्रेसिडन्ट, पहिली ट्रान्स अमुक तमुक असं खुशाल म्हणा पण महिलांच्या आयडेंटिटीचं appropriation नको.

पियर्स मॉर्गनला एकदा डिबेटमध्ये कोणीतरी सिस मॅन म्हणालं तर तो उखडून म्हणाला मी सिस बिस काही नाही मी फक्त मॅन आहे. तर एका अतिअल्पसंख्य समुदायासाठी बाकीच्या नॉर्मल लोकांच्या मॅन, वुमन अशा identity च्या मागे सिस असा शब्द लावणं हाही एक पॉवरफुल मायनोरिटीसाठी मेजोरीटीला वेठीला धरण्याचा प्रकार आहे. त्याना ट्रान्स म्हणा. बाकीच्यांना जस्ट विमेन किंवा मेन म्हणा ना. सिस, ब्रो हे भावंडाना म्हणा आपापल्या.

डेम्स मध्ये nuts आहेत हे कबूल. पण तुमच्या ज्या चिंता आहेत त्या फारच, म्हणजे फारच मायनोरीटी प्रसंगांबाबत आहेत- जेल काय, स्पोर्ट्स काय, स्कॉलरशिप काय.

Gop मधल्या नटस मुळे फार गंभीर चिंता आहेत- जेंडर रिअफर्मेशन सर्जरी किंवा HRT वर बंदी घालणे, कन्व्हर्जन थेरपी पुश करणे, गे कपल्स ना आडोप्शन करण्यास बंदी घालणे, गे मॅरेज वर बंदी घालणे इत्यादी.
त्यामुळे माझा स्टान्स क्लिअर डेमोक्रॅटिक आहे.

Pages