४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>
फॉसी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहे, त्याच्या सांगण्यावर विश्वास नाही. म्हणून सरसकट विरोध. त्याचा मुद्दा तुम्ही खोडून काढत का नाही? तुम्हीहि लिहा लेख शास्त्रीय मासिकात, बघू किती लोक तुम्हाला खरे मानतात.
<<
फॉची जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ? वा? खरे तर ह्या महान विभूतीला असे वाटते की तो स्वतः मूर्तीमंत विज्ञान आहे. किंबहुना विज्ञान हा एक देव आहे आणि त्याने फॉची च्या रुपात एक आणि एकमेव आणि अखेरचा प्रेषित पाठवलेला आहे. विज्ञानदेव कधी प्रेषिताला मास्क निरुपयोगी आहेत असे सांगतो, तर कधी दोन चार मास्क घाला असे सांगतो तर कधी यापुढे यावच्चंद्रदिवाकरौ मास्क घालायचा असे सांगतो. अर्थात सामान्य लोक प्रेषित जे काही सांगेल ते ऐकतात. शास्त्रीय मासिकात वा अन्य कुठे प्रेषिताबद्दल लिहिले तर त्याला दगडाने ठेचून किंवा अन्य मार्गाने नष्ट करायचा कायदा येईल बहुधा! आणि विज्ञान हा एकमेव देव आहे, दुसरा कुणीही नाही आणि फॉची हा त्याचा एकमेव प्रेषित आहे दुसरा कुणीही नाही, अशा प्रार्थना रचून त्या समस्त सरकारी शाळांतून विद्यार्थ्यांना पाच सहा वेळा म्हणायला लावाव्यात!
असो.
फौची साहेबांनी चीनी प्रयोगशाळेला घातक व्हायरस निर्माण करण्याकरता मोठ्ठी देणगी अमेरिकन करदात्यांच्या सौजन्याने दिली होती. आणि नंतर काही कायदेशीर पळवाटा काढून कानावर हात ठेवले. एका महान महान वैज्ञानिकाच्या ह्या वागण्याबद्दल काय मत आहे?

<<<कुठल्याही मुद्द्याला मुद्याने उत्तर न देता त्याला तुच्छ समजणे, शिव्या घालणे, ब्रेनवॉश इ. ठरवणे, अकारण बिनबुडाची शेरेबाजी ह्यालाच थयथयाट, आकांडतांडव म्हणतात. >>>
अगदी बरोबर.
या देशात हे असे फार होते. विशेषतः डेमोक्रॅट.
हे लोक सीडीसी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, एनायएच, इ. सर्वांवार डोळे मिटून विश्वास ठेवतात.
न्यायाधिशांनी निर्णय दिला की निवडणुकीत काही घोटाळा नाही, बायडेन जिंकला, लगेच यांनी विश्वास ठेवला.
निवडणुका खोट्या, न्यायाधिश खोटे, सगळे साले चोर!!
व्हॅक्सिनवाले सगळे चोर. एफडी ए, फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन - सगळे चोर. सर्वांनी मिळून कपट केले - खोटे सांगितले.
प्रसिद्ध होणारे सगळे आकडे खोटे आहेत.

फक्त मी भिंत बांधीन नि मेक्सिको त्याला पैसे देईल, मी ओबामाकेअर रद्द करून त्याच्या ऐवजी एक उत्तम हेल्थ केअर सिस्टीम देईन असे सांगणारे खरे - त्यांच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवावा! कारण सांगितल्याप्रमाणे त्याने कुठल्यातरी देशातली अमेरिकन एम्बेसि कुठे तरी हलवून जगावर कधीहि न फिटणारे उपकार केले आहेत, त्यामुळे तुमच्या जीवनात आमूलाग्र फरक झाला असणार.

फक्त रँड पॉल, ट्रंप, माईक लिंडेल म्हणतात ते खरे.
आता माईक लिंडेल म्हणतो आहे की तो ३०० मिलियन लोकांवर खटले भरून त्यांना तुरुंगात टाकणार आहे.
वर म्हंटल्याप्रमाणे "त्याला दगडाने ठेचून किंवा अन्य मार्गाने नष्ट करायचा कायदा येईल बहुधा! " तसे झाले तर फारच बरे - सगळ्या डेमोक्रॅट्स ना मारून टाका!! मॅगा, मॅगा!!
त्यामुळे एकदम सगळे प्रश्न सुटतील.

https://vm.tiktok.com/TTPdMT3Y5a/

ही पहा लिबरटांची क्रांती Lol बीएलएमच्या वेळी पाहायला मिळालेल्या हजारो व्हिडिओंपैकी एक. त्या वेळी मूग गिळून बसलेले लोक 6 जानेवारीच्या नावाने शिमगा करताना पाहून खूप करमणूक होते!
काईल रिटेनहाऊस ने गोळ्या झाडून उडवलेले तिन्ही 'क्रांतिकारक' क्रिमिनल रेकॉर्ड वाले निघाले हा काही योगायोग नव्हे Lol

6 जानेवारीला दुःखाचे कढ काढणे, ऊर बडवून घेणे, कराकरा दात खात ट्रम्प आणि पाठी राख्याना शिव्या देणे हे सगळे तर झालेच. पण सुप्रसिद्ध रायनो लिझ चेनी आपल्या बापाला ह्या रुदाली प्रकारासाठी घेऊन आली! आणि तमाम डेमॉक्रॅट त्याच्या स्वागतासाठी पायघड्या घालून रभे होते! डिक चेनी हा साक्षात दैत्य आहे. लोकशाहीच्या नरडीला नख लावायचा प्रयत्न करण्यात ज्याचा सिंहाचा वाटा होता तो ६ जानेवारीच्या नावाने शंख करणार आणि डेम मंडळी टाळ्या पिटणार हे खूपच गंमतशीर होते!
ज्या माध्यमांनी ६ जानेवारी च्या ऊर बडवणीला ठळक प्रसिद्धी दिली त्यांची रेटिंग पार गडगडली. लोकांना असल्या गाडलेल्या मुडद्यांना उक रण्यात काही रस नाही असेच दिसत आहे. लस टंचाई, करोना चे वाढते रुग्ण, महागाई, घुसखोरी, गुन्हेगारी, चलन फुगवटा हे रोज जाणवणारे विषय असताना असली निरर्थक चर्चा कोण बघणार?

>>
कारण सांगितल्याप्रमाणे त्याने कुठल्यातरी देशातली अमेरिकन एम्बेसि कुठे तरी हलवून जगावर कधीहि न फिटणारे उपकार केले आहेत, त्यामुळे तुमच्या जीवनात आमूलाग्र फरक झाला असणार.
<<
उगाच एकच गोष्ट पुन्हा पुन्हा किती उगाळणार? पुरे करा. जेरुसलेमला अमेरिकन वकिलात हलवल्यामुळे आता ट्रंप जगावर तिसरे महायुद्ध लादणार असे छातीठोकपणे सांगणारे तथाकथित जाणकार, त्यांचे काय?
ह्या वकिलातीचे स्थलांतर करण्याचा काहीही परिणाम झालेला नाही. ट्रंपने त्याच्या निवडणुकीत तो मुद्दा फारसा वापरलेला नाही. तुमच्याइतका उगाळलेलाही नाही तेव्हा आपणही हा निरर्थक, कालबाह्य मुद्दा सोडा.

<<<लस टंचाई, करोना चे वाढते रुग्ण, महागाई, घुसखोरी, गुन्हेगारी, चलन फुगवटा हे रोज जाणवणारे विषय असताना असली निरर्थक चर्चा कोण बघणार?>>>
का बरे?
टेक्सास ने गर्भपात विरोधी कायदे केलेच, रँड पॉल फॉची बद्दल काहीतरी करतो आहेच, माईक लिंडेल ३०० लोकांना तुरुंगात टाकणार आहेच. मार्जोरि टेलर ग्रीन ने काइल रिटेन्हाउसला कॉन्ग्रेशनल मेडल द्यावे हा ठराव आणलाच आहे. या सर्वांमुळे वरील सर्व प्रश्न सुटण्यात मदत होईलच ना!
चर्चा हा फक्त डेमोक्रॅट्सचा प्र्रांत आहे - किती महिने नि पैसे वाया घालवले रशिया प्रकरणात? एकदा पुटीनला विचारायचे, तो नाही म्हणाला, प्रश्न मिटला. आपल्या देशातले सी आय ए., एफ बी आय, हे अजिबात विश्वास ठेवण्यालायक नाहीत. त्यांनी बायडेन च्या मुलाची चौकशी केली नाही. युक्रेनमधील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी ट्रंपने काही केले तर त्याला इम्पिच करण्यात वेळ घालवला नाहीतर करोनाचा प्रश्न लग्गेच सुटला असता. म्हणून आता रशिया पुनः युक्रेन च्या मागे लागला आहे तर बायडेन त्याला विरोध करतो!!

गेल्या सहा वर्षात राजकारणाइतका दुसरा विनोदी विषय दुसरा कुठलाहि नाही. त्यापुढे सगळे विनोदी सिनेमे, टीव्ही सिरियल्स फिक्क्या पडतील.
कारण काय, राजकारणात खर्‍या खोट्याची तमा नसते, कुणिहि काहीही बोलावे, ऐकणारा नि विश्वास ठेवणारा भेटतोच.
सगळे मिडियावाले खोट्या बातम्या सांगतात म्हणायचे की झाले, आपलेच म्हणणे पुढे दामटायला मोकळे. विशेषतः ज्यातले आपल्याला कळत नाही, जसे व्हॅक्सिन, व्हायरस, लस त्याबद्दल आपल्याला हवे तसे आकडे खरे मानायचे, इतर खोटे म्हणायचे, नि त्याचा आधार घेऊन काही पण विधाने करायची!

Trump राज्य करत होता तेव्हा कोविड ची आकडेवारी मोठ्या हिरीरीने माध्यमे सांगत होती. आता बायडन च्या राज्यात जेव्हा रुग्णाची संख्या Trump ला मागे टाकून चौखूर दौडू लागली तेव्हा माध्यमांना साक्षात्कार झाला की ही आकडेवारी अवाजवी फुगवली आहे!
चालायचंच.

ज्यांना फौची च्या पायाचे तीर्थ पिऊन विज्ञानाचा सन्मान केल्याचे समाधान अनुभवायचे असेल त्यांनी ते जरूर अनुभवावे.
माझ्या लेखी फाऊची हा एक खलपुरुष आहे. कधीतरी निदान हाकलून दिले जावे आणि कोर्टात खेचून त्याच्या खोटारडेपणा ची अद्दल घडावी अशी इच्छा आहे. Rand Paul ला त्याकरता शुभेच्छा.

फाउचीसाहेबांनी केलेला कॅन्सास सिनेटर मार्शलचा एपि़क टेकडाउन पाहा Happy एका सिनेटरला फायनान्शियल माहिती "पब्लिक" आहे म्हणजे नक्की काय असते हे माहीत नाही हे महान आहे. त्यानंतर "बिग टेक कंपनीज" ती लपवत आहेत हे आणखी त्यावर अगाध ज्ञान.
https://www.youtube.com/watch?v=wMHvhz2sTb8

मुळात हा वाद "शास्त्रज्ञ विरूद्ध व्हॉट्सअ‍ॅप अंकल" स्टाइलचा वाटतो.

https://www.marshall.senate.gov/newsroom/press-releases/breaking-sen-mar...
ही ह्या फौची प्रकरणाची दुसरी बाजू. प्रेषित फौची छातीठोकपणे असे सांगतो की माझे आर्थिक व्यवहार सर्वांसाठी उपलब्ध आहेत. पण प्रत्यक्षात
ती कागदपत्रे मिळवण्याकरता अनेक सव्यापसव्ये करावी लागली असे मार्शल म्हणतो. कोण खरे बोलत आहेत हे आपापल्या परीने ठरवा!

एक सरकारी नोकर, एका लोकनियुक्त प्रतिनिधीला, आपल्याबद्दल अप्रिय बोलतो म्हणून महामूर्ख वगैरे शेलकी विशेषणे वापरणे (चारचौघात, भर सभेत) ह्यातून फौचीचा अहंकार, उर्मटपणा, बेदरकारपणा स्पष्ट दिसतो.
जर २०२२ नोव्हेंबरमधे लाल लाट आली तर फौचीची उचलबांगडी होईल अशी आशा आहे.

कधी नव्हे ते SNL (सॅटर्डे नाईट लाइव्ह) ह्या अतीपुरोगामी कार्यक्रमातही (बहुधा नाईलाजाने) बायडनचे विडंबन करणारे एक केविलवाणे, दयनीय प्रहसन सादर केले गेले. वास्तविक बायडन सारख्या अर्धवट, भ्रमिष्ट, हेकेखोर माणसावर विनोद करणे हे अत्यंत सोपे असायला पाहिजे ( Jokes simply write themselves!) परंतु वोकपणाची परिसीमा गाठणार्‍या पुरोगामी लोकांकडून चांगले विनोदी लिहिले जात नाही. इथेही तसेच झाले.
अत्यंत सुमार, कोमट, मिळमिळीत प्रहसन सादर झाले.
ट्रंपवर, त्याच्या कुटुंबियांवर निर्दयपणे क्रूर विनोद करणारे इथे मात्र मऊ मेणाहूनी असल्याचा प्रत्यय आला.

सरकारी नोकराने सिनेटरला महामूर्ख म्हणणे - अहंकार, उर्मटपणा, बेदरकारपणा

ॲनॉनिमस आयडीने प्रेसिडेंटला अर्धवट, भ्रमिष्ट, हेकेखोर म्हणणे - फ्रीडम ऑफ स्पीच, लिबर्टी, मूल्ये

सरकारी नोकर फौचीचे रेकॉर्ड्स पब्लिक असणे - प्रत्येकाच्या घरी सकाळी दुधाच्या कॅनबरोबर ते डिलिव्हर व्हायलाच पाहिजेत.

प्रेसिडेंट‌ ट्रंपचे टॅक्स रेकॉर्ड्स पब्लिक नसणे - तो त्याचा प्रश्न आहे, आम्ही त्याला ते विचारणार नाही, त्याचा काही संबंधच नाही मुळी.

Proud

टोटली! Happy

पगार वगैरे "पब्लिक" आहे याचा एक स्पेसिफिक अर्थ असतो. सिनेटरला तो माहीत असायला हवा. त्याची व्याख्या फाउची ठरवत नाही. पब्लिक माहिती वर्तमानपत्रासारखी आपोआप घरी येत नाही. पण जनरल पब्लिकने ती कशी मिळवावी याचे ठरलेली प्रोसेस असते. ती प्रोसेसही फाउची ठरवत नाही. OMB व इतर असंख्य एजन्सीज ठरवतात. त्यातले काय रिडॅक्ट करायचे, कोणती माहिती किती काळात जनरल पब्लिककरता उपलब्ध करायची हे सगळे ठरलेले असते. यातले एकदम एक दोन गोष्टी "चेरी पिक" करून "बघा! काहीतरी गडबड आहे" म्हणून रान उठवून द्यायचे आणि पब्लिकला येडे बनवायचे असले उद्योग सुरू आहेत. आधी २०२० च्या निवडणुकीबद्दल झाले, आता हे.

सरकारी बजेटमधून फंडिंग केलेल्या सर्व एजन्सीजना याबद्दल नियम असतात. ते एखादा रॅण्डम फाउची किंवा मार्शल बदलू शकत नाही. आता हे लोक त्याचे नोकरीचे कंत्राट वगैरे मागायला निघाले आहेत. ते NIH/NIAID देत नसेल तर त्यावर तोडग्याचीही प्रोसेस असते. तीच चालू असेल. म्हणे FY2021 चा पगार किती आहे हे उघड नाही. FY2020 चा आहे ना? २०२१ चे "सरकारी" वर्ष ऑक्टोबर मधे संपले. त्याची आर्थिक माहिती जेव्हा पब्लिक होत असेल तेव्हा होईल. ती काय फाउचीने दाबून धरली आहे का? कोणतीही सरकारी व्यक्ती असे करू शकत नाही (ट्रम्प सोडून) हे माहीत असून सुद्धा पब्लिक पेडगावला चालले आहे.

मुख्य म्हणजे तो एक शास्त्रज्ञ आहे. राजकारणी नव्हे. असल्या काड्या राजकारणी लोक एकमेकांबद्दल कायम करत असतात. तेथे ती फेअर गेम आहे. पण सध्या फक्त कोव्हिड वर ज्याचा फोकस असायला हवा त्याला असल्या उद्योगात गुंतवून ठेवले जात आहे. त्याला सिनेटर्स सारखी शुगरकोटेड उत्तरे देता येत नसतील. ते त्याचे काम नव्हे.

आणि ट्रम्पच्या टॅक्स रिलीज न करण्याबद्दल त्याला सपोर्ट करणारे पब्लिक यात इश्यू शोधत आहेत हे महान आहे.

>>पुरोगामी लोकांकडून चांगले विनोदी लिहिले जात नाही. अत्यंत सुमार, कोमट, मिळमिळीत प्रहसन सादर झाले.>> आकाडंतांडव करण्याच्या कारणात 'एसएनएल मधल्या जोक्सना हसू आलं नाही' असा बुलेट पॉईंट अद्याप कुणाला सुचला नसेल! Biggrin

>>ॲनॉनिमस आयडीने प्रेसिडेंटला अर्धवट, भ्रमिष्ट, हेकेखोर म्हणणे - फ्रीडम ऑफ स्पीच, लिबर्टी, मूल्ये
एका स्वतंत्र नागरिकाचे अधिकार आणि एका सरकारी नोकराचे कामावर असतानाचे अधिकार ह्यात फरक आहे. तो आपल्याला ठाऊक नसल्यास अभ्यास वाढवा.
आणि आपल्या लाडक्या नेत्याचे हे उदाहरण पहा
https://www.washingtonpost.com/politics/military-afghanistan-evacuation-...
बायडन साहेबांनी अफगाणिस्तानात जो राडा केला आहे त्यावर एका सैनिकाने टीका केली म्हणून थोर हृदयाच्या बायडनसाहेबांनी त्याची तात्काळ हकालपट्टी केली.

>>सरकारी नोकर फौचीचे रेकॉर्ड्स पब्लिक असणे - प्रत्येकाच्या घरी सकाळी दुधाच्या कॅनबरोबर ते डिलिव्हर व्हायलाच पाहिजेत.
नुसते छाती ठोकून रेकॉर्ड पब्लिक आहे असे सांगणे आणि प्रत्यक्षात ते मागितले की टोलवाटोलवी करणे ही विसंगती आहे. आमच्या घरी दुधाचा कॅन रोज सकाळी डिलिव्हर होत नाही. स्वतः जाऊन आणावा लागतो आणि रोज नाही आणत. आपण कुठल्या हस्तिदंती मनोर्यात रहाता जिथे आपल्याला रोज डिलिव्हर होतो देवास ठाऊक!

>>प्रेसिडेंट‌ ट्रंपचे टॅक्स रेकॉर्ड्स पब्लिक नसणे - तो त्याचा प्रश्न आहे, आम्ही त्याला ते विचारणार नाही, त्याचा काही संबंधच नाही मुळी.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे टॅक्स रेकॉर्ड पब्लिक असावे असा कायदा नाही. त्यामुळे ते नाकारण्याचा ट्रंपला अधिकार होता. आणि हो, सध्या ट्रंप राष्ट्रपति नाही. त्याचा विषय काढण्याचे काय कारण म्हणे?

>>
पगार वगैरे "पब्लिक" आहे याचा एक स्पेसिफिक अर्थ असतो. सिनेटरला तो माहीत असायला हवा. त्याची व्याख्या फाउची ठरवत नाही. पब्लिक माहिती वर्तमानपत्रासारखी आपोआप घरी येत नाही. पण जनरल पब्लिकने ती कशी मिळवावी याचे ठरलेली प्रोसेस असते. ती प्रोसेसही फाउची ठरवत नाही. OMB व इतर असंख्य एजन्सीज ठरवतात. त्यातले काय रिडॅक्ट करायचे, कोणती माहिती किती काळात जनरल पब्लिककरता उपलब्ध करायची हे सगळे ठरलेले असते. यातले एकदम एक दोन गोष्टी "चेरी पिक" करून "बघा! काहीतरी गडबड आहे" म्हणून रान उठवून द्यायचे आणि पब्लिकला येडे बनवायचे असले उद्योग सुरू आहेत. आधी २०२० च्या निवडणुकीबद्दल झाले, आता हे.
<<
फौची चे आर्थिक व्यवहार मिळवताना अनेक अडचणी, टोलवाटोलवीचा सामना करावा लागला होता असे ह्या सिनेटरचे म्हणणे आहे त्याने योग्य त्या मार्गाचा अवलंब केला होता आणि त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या. रेकॉर्ड आपोआप घरी यावे असा मूर्ख विचार त्याने तरी मांडलेला नव्हता (जरी प्रेषितसाहेबांनी त्यांना महामूर्ख अशी पदवी दिली तरी!) . हा आपला शोध आहे.

>>मुख्य म्हणजे तो एक शास्त्रज्ञ आहे. राजकारणी नव्हे. असल्या काड्या राजकारणी लोक एकमेकांबद्दल कायम करत असतात. तेथे ती फेअर गेम आहे. पण सध्या फक्त कोव्हिड वर ज्याचा फोकस असायला हवा त्याला असल्या उद्योगात गुंतवून ठेवले जात आहे. त्याला सिनेटर्स सारखी शुगरकोटेड उत्तरे देता येत नसतील. ते त्याचे काम नव्हे.
<<
फौची हा शास्त्रज्ञ आहे राजकारणी नाही हा एस एन एल मधे घालायच्या लायकीचा विनोद आहे. ह्या माणसाने एखाद्या मुरब्बी राजकारण्याला लाजवेल असे राजकारण केले आहे.
चीनशी राजकीय संबंध बिघडू नयेत म्हणून हा व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून निघाला आहे हे गुपित फौचीने काळजीपूर्वक लपवले. कुणी तसे मत मांडले की त्याला तात्काळ कॉन्स्पिरसी थियरी म्हणून झटकून टाकणारा महात्मा वैज्ञानिक तो फौचीच. हे काम वैज्ञानिक करतो का राजकारणी?
चीनला गेन ऑफ फन्क्शन रिसर्च करता अमेरिकेकडून लठ्ठ मदत करुन नंतर गेन ऑफ फन्कशन ची व्याख्या बदलणे हे वैज्ञानिकाचे काम आहे का राजकारण्याचे?
सुरवातीच्या काळात मास्कची टंचाई होऊ नये म्हणून मास्क निरुपयोगी आहेत असे मत मांडणारा माणूस वैज्ञानिक का राजकारणी?
अकारण जानेवारी ६ चा उल्लेख करणारा माणूस वैज्ञानिक का राजकारणी?
काहीही वैज्ञानिक कारण न देऊन ओमिक्रॉनच्या क्वारंटाईन्ची मुदत अर्ध्याने कमी करणारा वैज्ञानिक का राजकारणी?

एका स्वतंत्र नागरिकाचे अधिकार आणि एका सरकारी नोकराचे कामावर असतानाचे अधिकार ह्यात फरक आहे. तो आपल्याला ठाऊक नसल्यास अभ्यास वाढवा. >> अरे वा! मग आपलं अभ्यासाचं पुस्तक मार्शलला देऊन अधिकारांच्या उल्लंघनासाठी फौचीला कोर्टात खेचता येतं का बघा. Lol

पब्लिक एम्प्लॉयर्स त्यांच्या एम्प्लॉयीचे फर्स्ट अमेंडमेंट राईट्स कर्ब करू शकत‌‌ नाहीत.

>>
आकाडंतांडव करण्याच्या कारणात 'एसएनएल मधल्या जोक्सना हसू आलं नाही' असा बुलेट पॉईंट अद्याप कुणाला सुचला नसेल!
<<
एस एन एल हा फालतू कार्यक्रम बनला आहे. परंतु पुरोगामी वर्तुळातही बायडनच्या मूर्ख, हेकेखोर, पराभूत कारकीर्दीबद्दल चिंता वाटू लागली असावी ह्याचा पुरावा म्हणून ह्या कार्यक्रमाचा उल्लेख केला. एस एन एल च्या वोक कार्यक्रमातील विनोदामुळे हसू येण्यापेक्षा कार्यक्रमाचे हसू झालेले जास्त अनुभवास येते. त्यामुळे त्यांच्याकडून मनोरंजन वगैरेची फारशी अपेक्षाही नाही.
बुलेट पॉइंट वाचून ट्रंपची नक्कल/टिंगल करणारे अलेक बाल्डविन साहेब आठवले! असो.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे टॅक्स रेकॉर्ड पब्लिक असावे असा कायदा नाही. त्यामुळे ते नाकारण्याचा ट्रंपला अधिकार होता. आणि हो, सध्या ट्रंप राष्ट्रपति नाही. त्याचा विषय काढण्याचे काय कारण म्हणे? >> जेवढा बचाव करायला जावं तितके अजूनच उघडे पडताय. Lol

" ट्रंपवर, त्याच्या कुटुंबियांवर निर्दयपणे क्रूर विनोद करणारे इथे मात्र मऊ मेणाहूनी असल्याचा प्रत्यय आला. " हे इथे आधी कोणी लिहिलं? Proud

"बायडनसायबांच्या टायमाला डॉलरला शेरभर दुद. म्हस दारात पिळून तिच्या आयला!!..."
साश्रुनयनांनी आणि गदगदलेल्या स्वरात काढलेले हे भविष्यकालीन उद्गार मला आत्ताच ऐकू येत आहेत Biggrin

बिल क्लिंटन यांचे माजी सल्लागार डिक मॉरिस यानी असे भाकीत केले आहे की 2024 मधल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत 2016 ची पुनरावृत्ती होईल म्हणजेच तेम्व्हा हिलरी क्लिंटन विरुद्ध ट्रम्प हे उमेदवार असतील.

फाउचीने कसे ते "काळजीपूर्वक लपवले" म्हणे? आणि हा अमेरिकेच्या हिताविरूद्ध ४०-५० वर्षे काम करणारा इसम रीगन, थोरले बुश, क्लिंटन, धाकटे बुश, ओबामा, सर्वज्ञानी ट्रम्प आणि आता बायडेन - कोणालाच समजला नाही, फक्त २०२० निवडणुकीच्या असंख्य वावड्या उडवून प्रत्येक वेळेस तोंडघाशी पडलेल्या पब्लिकला समजला आहे?

फाउचीने वुहानला पैसे दिले म्हणे. इथले वर्णन ऐकून एखाद्याला वाटेल की वुहान लॅब ही एखादी बंगाली बाबा टाइप तंबूतील लॅब असून तेथे एक दिवस फाउची वेष पालटून गेला व त्यांना रोख रक्कम दिली - की काढा एखादा व्हायरस.

फाउची जिचा प्रमुख आहे त्या एजन्सीने एका अमेरिकन कंपनीला कंत्राट दिले. ही कॉमन प्रोसेस आहे. सगळ्या एजन्सीज करतात. त्या अमेरिकन कंपनीने वुहान लॅबला त्यातील कामाचा काही भाग दिला. यातही काही कट वगैरे नाही. वुहान लॅब ही गेली अनेक वर्षे एनआयएच ची मान्यता असलेली, त्यांचे चेक्स पास केलेली लॅब आहे. परदेशी लॅब्जना अमेरिकन सरकारी कामातील भाग द्यायचा असेल तर अनेक चेक्स असतात ते पार करून ते दिले जातात. हे सगळे रुटिन काम आहे. हा रिसर्च "सार्स"चा असल्याने तेथील कंपनीला ते दिले होते. हे सगळे अव्याहतपणे अनेक सरकारी एजन्सीज, त्यांचे कंत्राटदार, त्यांचे परदेशी कंत्राटदार यांच्यामार्फत अनेक दशके सुरू आहे. काही नवीन नाही. हे सगळे बळंच खुसपटं काढण्याचे उद्योग आहेत.

या सर्वांच्या विश्वासार्हतेची लक्तरे गेल्या अनेक महिन्यांत निवडणुकीच्या खटल्यांमार्फत निघालेली आहेत. तो विषय चतुराईने टाळून ही आजकाल नवीन टूम काढली आहे.

या पब्लिकला कसलाही राग येतो. फाउची म्हंटला "I represent science". लगेच उडाला भडका. Of course he represents science. He SHOULD. अमेरिकेच्या व्हायरससंबंधित कामाचा प्रमुख विज्ञानाचे प्रतिनिधित्व नाही करणार तर सर्वांना शब्दशः अंतर्बाह्य सॅनिटाईज करायला निघालेले पूर्वीचे अध्यक्ष करणार काय?

रेकॉर्ड आपोआप घरी यावे असा मूर्ख विचार त्याने तरी मांडलेला नव्हता >>> त्याचीही चणचण नाही. चिंता नको. "बिग टेक कंपन्या" ही माहिती लपवत आहेत असे मार्शलसाहेब म्हंटले आहेत.

वुहान लॅब ही एखादी बंगाली बाबा टाइप तंबूतील लॅब असून तेथे एक दिवस फाउची वेष पालटून गेला व त्यांना रोख रक्कम दिली - की काढा एखादा व्हायरस. >> Rofl

त्याचं काय आहे, ह्यांचा रुडी जिउलियानी असाच गेला होता सिक्रेट मिशनवर युक्रेन आणि हंगेरीमध्ये, तिथल्या लोकांवर दबाव टाकायला. Proud त्यामुळे ह्यांना स्वतःवरून जग ओळखल्याचा भास होत‌ असतो‌ तो असा.

वुहान लॅब ही एखादी बंगाली बाबा टाइप तंबूतील लॅब असून तेथे एक दिवस फाउची वेष पालटून गेला व त्यांना रोख रक्कम दिली - की काढा एखादा व्हायरस. >> हे महान आहे फा Lol

फौची हा एक खोटारडा माणूस आहे. गेन ओफ फंक्शन रीसर्च करता पैसा दिलाच नाही असा तद्दन खोटा दावा करत आहे.
अनेक इमेल्स उघडकीस आल्या आहेत ज्यात फौचीला अन्य काही शास्त्रज्ञांनी हा व्हायरस प्रयोगशाळाजन्य असल्याचे म्हटले आणि फौचीने ते दाबले.
खूप खूप पूर्वीपासून काम करतोय म्हणून इमानदार, विज्ञाननिष्ठ असलाच पाहिजे हा नक्की काय वैज्ञानिक सिद्धांत आहे? अफाट सत्ता हातात आली की भले भले बिघडतात. ह्या महामारीमुळे ह्या उन्मत्त, अहंकारी माणसाला अफाट, अमर्याद सत्ता दिली आणि ती टिकावी, वाढावी म्हणून जे काही राजकारण, खोटारडेपणा (वैज्ञानिक संशोधन सोडून बाकी सगळे) हा पाजी माणूस करताना दिसत आहे.

>>
फाउचीने वुहानला पैसे दिले म्हणे. इथले वर्णन ऐकून एखाद्याला वाटेल की वुहान लॅब ही एखादी बंगाली बाबा टाइप तंबूतील लॅब असून तेथे एक दिवस फाउची वेष पालटून गेला व त्यांना रोख रक्कम दिली - की काढा एखादा व्हायरस.
<<
आपला विनोदनिर्मितिचा प्रयत्न स्तुत्य आहे. परंतु हे घडलेले आहे. फौचीने रँड पॉलच्या प्रश्नांना उत्तर देताना असे काही घडल्याचा साफ इन्कार केला आहे. हे स्वच्छ राजकारण आहे. फौची एक वैज्ञानिक असता तर अशा प्रकारे अर्धसत्य, पूर्ण असत्य, नरोवाकुंजरोवा करायची काहीही गरज नव्हती.
कुठल्याही प्रकारे उत्तरदायित्व न बाळगता चीन अमेरिकेकडून पैसा घेतो हे संतापजनक आहे. पण फौची भक्तीत तल्लीन झालेल्या लोकांना ह्यात काही गैर वाटत नाही हे उघड आहे!

Pages