दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण मनिषाचे गाणे वाटले होते पण कोडे दिले होते लावण्या ने आणि तिने उत्तर दिले उर्मिला. रानभुली ने उत्तर दिले मीनाक्षी शेषाद्री. मला अग धाग्यावर आहे असे वाटले.

आता हे घ्या एकदम सोपे माझ्याकडून
20210602_125915.jpg

1. हे नायक नायिका नाहीत
2. नायक नायिका पैकी एक जण जगात नाही
3. पिक्चर आपटला आहे
4. खलनायक नायिकेकडे आशाळभूत नजरेने पाहत असतो आणि नायिका संतप्त नृत्य करत असते अश्या स्टाईल चं गाणं आहे
5. खलनायक जगात नाही.
6. गुगल लेन्स वापरायचं नाही बरं का!!

Screenshot_2021-06-02-16-54-00-732_com.google.android.youtube.jpg

ह्यात??? अगं तुला हयात म्हणायचं आहे का? Lol ह्यात म्हणजे ह्या गाण्यात नाही असं आहे का नाहीतर?

हेहेहे
आळशीपणा टायपिंग चा गुगल इंडिक वर.मनातल्या मनात बरोबर वाचा.
सुधारलंय बघा.आता 'जगात म्हणजे वॉटर जग मध्ये का' वगैरे फाटे फोडू नका हां Happy

तो माणूस विंदू/बलराज आनंद/मुकेश खन्ना यापैकी कोणीही नाहीये.
आणि ती स्त्री कै/पै दिव्या भारती नाहीये Happy
क्लू चा मुद्दा नंबर 1 वाचल्यास लक्षात येईल की ते बहुतेक एक्स्ट्राज पैकी आहेत.
आता बाकी क्लू घेऊन अभ्यास चालू करा.

१. जगात नसलेल्या खलनायकाची बायको, मुलं अभिनयाशी संबंधित
२. या चित्रपटात दुसरं गाजलेलं गाणं आहे ते एका लोकगीतावरुन घेतलं आहे.
३. या गाण्यासारखेच साधारण कपडे असलेली याच नायिकेची वेगवेगळ्या चित्रपटात अजून २ गाणी आहेत.
४. नायक एक बाल कलाकार पण होता.
५. चित्रपटाचे नाव बॉलीवूड इतिहासात रिपीट झाले आहे.

ओह
मला असं का बरं वाटलं असेल
मी चुकीचा पेपर काढल्या बद्दल सर्वाना एक एक पैठणी स्कार्फ.
श्रद्धा ला पैठणी बॅग(त्यात तिला सगळ्या साड्या ठेवता येतील)

Pages