दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण गाण्यातला हा मात्र कॅलेंडरची काहीही तमा न बाळगता दिसण्यात फार फरक न पडता असाच दिसतो.<<<<<
अनिल कपूर का हा?

आता अजून एक क्लू देते:
या पिक्चर मधला एक सह कलाकार आधी कामं करायचा, पण त्याच्या राज्याच्या लढाईसाठी त्याने अभिनय सोडला आणि पूर्ण वेळ चळवळीला वाहून घेतलं.
पूर्वीच्या काळी तसा प्लस साईझ चा जास्त ट्रेंड, पण या पिक्चरची नायिका मात्र उंचीत व्यवस्थित आणि त्या काळाच्या मानाने बारीक.
हा नाही, पण याच्या सारखे मध्यमवर्गीय गोंडस सालस नायक वाले बरेच चित्रपट तुम्ही पाहिले असतील.
या चित्रपटात नायक नसलेला अजून एक कलाकार समांतर आणि कमर्शियल सिनेमात सारखाच लोकप्रिय आहे.
या चित्रपटात नायक नसलेला एक कलाकार मृत आहे.

अजून एक हिंटः
सहकलाकाराच्या आडनावात त्याचे राज्य आहे.

अभिनय सोडलेले - राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा
काळाच्या मानाने बारीक पण उंच - स्मिता पाटील, शिल्पा शेट्टी, पूजा बात्रा, सोनाली बेंद्रे ( हिच्यावर खूप जीव होता), श्री देवी, करिश्मा कपूर सगळ्याच लंबूटांग आणि शेवग्याच्या शेंगा . ऐश्वर्या राय बच्चन , तंबू इत्यादी
समांतर आणि धंदेवाईक सिनेमात लोकप्रिय - नसिरूद्दीन शाह, ओम पुरी, कुलभूषण खरबांदा,

या यादीत एक पिक्चर बसतोय ज्याचे नाव आहे तजुर्बा. यात नासीर, स्मिता पाटील आणि राज बब्बर आहेत.
यातले आमच्याकडे कोण आलेत ते नंतर बघून सांगतो.
आताची हिंट आता बघितली.

म्हणजे आडनाव एक तर
राजस्थानी, बंगाली किंवा कर्नाटकी असू शकेल.

मी अनु,
तुमच्या हिंट देण्याच्या शैलीमुळे मला एका मांत्रिकाची आठवण येऊ लागली आहे. त्याच्याकडे एक शोभायंत्र होतं. त्यात बघितलं की तो ते फिरवायचा आणि प्रश्न विचारायचा. त्या आकृतीवरून उत्तर तयार होत असतानाचा पुन्हा फिरवायचा, मग पुन्हा, मग पुन्हा, पुन्हा पुन्हा पुन्हा.... त्याच्या या खेळात माझ्यासारखे आत्मे मग हरून त्याला वश होत मग तो त्यांना बाटलीत बंद करत असे.
तुमचा असा काही इरादा नाही ना ? विचारलेलं बरं आधीच.

ही कंबर कोणा नायिकेची नाही. ही नाचणारी पाहुणी कलाकार किंवा गाण्यातल्या साईड कलाकाराची अल्प स्क्रीन टाईम वाली साईड हिरॉईन आहे.
Happy
कंबरेत काय ओळखीचं वाटलं बरं ?
सिनेमा बघत असल्यास : शू!!!! कुठे बोलायचं नाही.लोकांना ओळखूदे.

आत्मा; तुमच्यावर आहे Happy बाटलीचे झाकण उघडे दिसल्यास लांब रहा.

कोणीतरी माझं कोडं सोडवा हो Happy
या धाग्यावरचा ते कोडंरुपी बोळा निघून पाणी वाहतं होऊ दे.
अजून क्लू हवेत का?

परत क्लू: (माझे आधीचे क्लू इथे चिकटवते)
"१. या पिक्चर मधला एक सह कलाकार आधी कामं करायचा, पण त्याच्या राज्याच्या लढाईसाठी त्याने अभिनय सोडला आणि पूर्ण वेळ चळवळीला वाहून घेतलं.
पूर्वीच्या काळी तसा प्लस साईझ चा जास्त ट्रेंड, पण या पिक्चरची नायिका मात्र उंचीत व्यवस्थित आणि त्या काळाच्या मानाने बारीक.
हा नाही, पण याच्या सारखे मध्यमवर्गीय गोंडस सालस नायक वाले बरेच चित्रपट तुम्ही पाहिले असतील.
२. या चित्रपटात नायक नसलेला अजून एक कलाकार समांतर आणि कमर्शियल सिनेमात सारखाच लोकप्रिय आहे.
३. या चित्रपटात नायक नसलेला एक कलाकार मृत आहे."

१. मुद्दा क्र. १ वाला तुम्ही जास्त पाहिला नसेल, पण त्याचं राज्य शोधायचा प्रयत्न करा.
२. मुद्दा क्र. २ वाला माणूस शक्यतो पंजाबी/सीख भूमिकात दिसतो.
३. मुद्दा क्र. ३ वाल्या माणसाला तुम्ही बर्‍याच ९०ज विनोदी मालिका व चित्रपटात पाहिले असेल. तो मृत आहे, अविवाहितच राहिला.

ओमपुरी चिरंजीवी जुही चावला नाही.
क्र. १ च्या आडनावातले राज्य )किंवा राज्याचा भाग)कोणते आहे बरं?
क्र २ ला पण तुम्ही बर्‍याच जुन्या दूरदर्शन मालिकांमध्ये आणि सध्या सध्या कोच म्हणून पाहिले असेल.

Pages