दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिल जलता है तो जलने दे- मुकेश यांचे पहिले गाणे पहिली नजर ह्या चित्रपटासाठी. ( सैगल ह्यांच्या प्रभावामुळे)

रमड यांचं कोडं सुटलेलं नाही अजून. बरं एक सोप्पं कोडं.
चित्रात दिसणारा हिरो ओळखू आला असेल तर खूपच सोप्पं. आणि या भूतलावर असा कोण आहे ज्याने याचे सिनेमे पाहिलेले नाहीत ? तर ओळखा लगेचच.
Amitabh.jpg

ओके!
पिक्चरचा हिरो मॉडेल होता/आहे. हिरवीणीचा हा पहिलाच पिक्चर.

रमड, तो "मुसूमुसू हासी द्यो मलैलाई" का असलंच काही तरी अतर्क्य गीत असलेला सिनेमा आहे का? >>> नाही. मल्टिपल हिरो हिरविण वाला पिक्चर नाहीये.

मला मॉडेल्स पैकी जॉन अब्राहम आणि अर्जुन रामपाल नायक झाल्याचे माहिती आहे. अजून मॉडेल-हिरो माहिती नाहीत. (कबीर बेदी होता खून भरी मांग मध्ये. पण त्यात गणपतीबाप्पा नव्हता!!)

अमिताभच्या देख लो इष्क का मरतबा गाण्याच्या शुटिंगच्या वेळी धर्मेंद्रचा हेअरड्रेसर रजेवर होता की काय? Lol

सगळ्यांची उत्तरे चूक Proud
अजून एक क्लू देते. तरीही नाही सुटलं तर मी उत्तर देईन.
या पिक्चरला विशाल भारद्वाजचं म्युझिक आहे आणि गुलजारची गीतं. Happy आता बहुधा सोपं होईल कोडं.

आत्मा, ही अशी कोणी नाही.
पण गाण्यातला हा मात्र कॅलेंडरची काहीही तमा न बाळगता दिसण्यात फार फरक न पडता असाच दिसतो.

Pages