Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा...
कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.
वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पडली तरी हिचे तुकडे होत नाही
पडली तरी हिचे तुकडे होत नाही इतकी कठीण असते ह्या विटेला खंग्री वीट म्हणतात! >>>
छान माहिती कृष्णा.
हे माहीत नव्हते. धन्यवाद.
मिथुन आहे का तो?
मिथुन आहे का तो?
मला तर पहिल्या फोटोतला माणूस
मला तर पहिल्या फोटोतला माणूस सलमान खान वाटतो आहे.
ते नाही सांगणार. या चित्रपटात
ते नाही सांगणार. या चित्रपटात शेवटी स्पायडरमॅन पण आहे.
हिरो हिरॉईनची ओळख एका प्रसंगात होते ज्यात तो तिला गुंडांच्या तावडीतून वाचवतो ( आहे कि नाही खंग्री क्ल्यु?)
पण ती फायटिंग संपल्यावर हिरोला चापट मारते आणि तरी तो हसतो.
तुमको देख के झूम गया, लट्टू
तुमको देख के झूम गया, लट्टू की तरह मै घूम गया - इज्जतदार. गोविंदा, माधुरी दीक्षित.
पहिल्या फोटोत थोडं निरखून पाहिल्यावर तो गोविंदा वाटतो आणि इतके विदूषकी, फॅशन faux pas असलेले कपडे माधुरी दीक्षितच जास्त घालत असे, त्यावरून ओळखणे सोपे झाले.
ग्रेट !!!
ग्रेट !!!
श्रद्धा, डोळ्यात अॅप आहे का कुठले ?
हो तर! ऑटो झूम आणि इमेज
हो तर! ऑटो झूम आणि इमेज शार्पनेस वाढवणे अशी दोन apps आहेत. त्याशिवाय सनी देओलचे मसल्स थोडीच दिसले असते आधीच्या कोड्यातले.
(No subject)
गाण्यात पिक्चरचं टायटल आहे.
झीनत अमान
झीनत अमान
हेमा मालिनी
नीतू सिंग
परवीन बाबी
यापैकी एक वाटतेय.
नाही यातली नाही एकपण
नाही यातली नाही एकपण
प्यार का दर्द है मिठा मिठा
प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा.
सही जवाब
सही जवाब
बरंच शोधावं लागलं
बरंच शोधावं लागलं
आधी टिना मुनीम ची गाणी शोधत होते
मग टायटल ट्रॅक शोधले
त्यात हा स्कर्ट टॉप मिळाला.
फॅशन माणसाला कशी तरुन नेते याचं उदाहरण
गाणं छान आहे आशा खय्याम
गाणं छान आहे आशा खय्याम
गाणे ऐकले होते. पण राजेश
गाणे ऐकले होते. पण राजेश खन्ना पूनम धिल्लाँ ही जोडी आहे हे नव्हतं माहीत. बाप लेक वाटतात दोघे.
धागा वर काढण्यासाठी एक सोप्पं
धागा वर काढण्यासाठी एक सोप्पं कोडं.
मराठी चित्रपटातलं लताचं अजरामर गाणं.
काय रानभुली
काय रानभुली

हेच चरण ते अंनंताचे का कायतरी ....
गाता गाता ती झोपून जाईल असे वाटतेय गाण्यात
मी विसरलेच की. तू पण असतेस
मी विसरलेच की. तू पण असतेस इथे ते
हे नक्कीच नवीन आहे. अवघड
हे नक्कीच नवीन आहे. अवघड नाही.

अहो ती लता नाही आशा आहे , हेच
अहो ती लता नाही आशा आहे , हेच ते चरण अनंताचे गाणं आहे
ती लता नाही आशा आहे >> ओह्ह !
ती लता नाही आशा आहे >> ओह्ह !! क्ष्मस्व ! लक्षात आणून दिल्याबद्दल तुमचे आभार.
उत्तर आले असेल म्हणून बघायला
उत्तर आले असेल म्हणून बघायला आले
ओहह हे सुटले नजरेतून! क्लु
ओहह हे सुटले नजरेतून! क्लु हवा काहीतरी.
या गाण्यात प्रत्येक
या गाण्यात प्रत्येक कडव्यानंतर एक मराठी ओळ (कोळीगीत) रिपीट होते.
एकदम नवीन आहे का हे?
एकदम नवीन आहे का हे?
पुरवैया लेके चली मेरी नैया,
पुरवैया लेके चली मेरी नैया, जाने कहां रे
(दर्याचा राजा, देवा हो देवा... रिपीट होणारी ओळ) - दो जासूस
नाही. बरंच मागे.
नाही. बरंच मागे.
दिलं की वो उत्तर!
दिलं की वो उत्तर!
ओह... ही दिसलीच नाही पोस्ट
ओह... ही दिसलीच नाही पोस्ट मला.
अगदी बरोबर !
Pages