दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Screenshot_20210203-000347~2.png
हे घ्या तोवर

मानवजी
हेच ते विसरलेले गाणे. आता कोडं घालणारीलाच उत्तर ठाऊक नाही असं हे पहिलंच असेल. Lol
शोधतेय मी पण Lol
Picture1.png

ओके सापडलं मला.
हे येऊन गेलं नसेल (दुस-याने घातलेलं मी डाऊनलोड केलं नसेल) तर
आता ओळखू शकता Lol

बिंगो

माझी आठवण काढली इथे?तरीच उचक्या लागतायत मला.
इथली काळी पांढरी कोडी सुटली की एखादं घालते.खंगरी की नाही ते तुमच्यावर बरं का.

मुकेशचा आवाज आहे गाण्यात. नायिका तर दिसतेच आहे. नायकाबद्दल लागले तर क्ल्यु देईन.
नजर वर गाणे आहे.

तरीच उचक्या लागतायत मला. >> Lol

रानभुली, मी पण काही स्क्रीन शॉट्स घेतले होते. त्यातील सगळे दिले, एक राहिलं होतं. ते तीन चार दिवसांनी कुठले तेच मला आठवेना. मी इथे तो स्क्रीन शॉट दिला आणि मी परत गाणं शोधलं आणि क्लू द्यायला म्हणुन इकडे आलो, तो पर्यंत ते सोडवलं होतं इथे.
कोणतं गाणं ते आताही मला आठवत नाही.

मानवजी, युट्यूब वर गाणी बघा. आधी पाहून झालं असेल तर खाली स्क्रोल करत जा. सापडेल (आठवलं तर).
मलाही आत्ता असंच सापडलं.

मानवजी, या गाण्यात स्थिरचित्रं अशी नाहीतच. त्यामुळे स्क्रीनशॉट घेतल्यावर असे हललेले चित्र दिसते.

Picture1_3.jpg

नटी द. भारतीय आहे. डान्सर आहे. बहुतेक त्या वेळी लोकप्रिय पण असावी.
नट ऑल राउंडर आहे. त्याच्या मुलीचा लहान असताना याच्याबरोबर चित्रपट आला होता. मुलगा वेगळ्या शैलीचा गायक. एका चित्रपटात पण काम केलेले. त्यातली सर्वच गाणी गाजली होती.

अनु सही दिशा.
नायक तर अचूक ओळखला. नायिका ओळखली की मग कितीसा वेळ?

ओह हां
आठवले
मी आपली चांगली नाचणारी ब्लॅक अँड व्हाईट मधली बाई इतकेच पहात होते

Pages