दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धा , मुद्दाम पुढचा क्ल्यु दिला नाही. कारण एव्हढा तुम्हाला पुरेसा होईल हे आता अनुभवाने ठाऊक झालेलं आहे. Lol

दोषी तर हेमंतदाच. कोणत्याही प्राणीमात्रासाठी टेंम्टींग गाणं बनवावंच कशाला? आमच्या हिमेश च्या वाट्याला बऱ्या जात नाहीत त्या!

'ते' गाणं आता ऐकलं आणि पाहिलं. गायिकेचा हुद्दा, पार्श्वभूमी, पैसे, राजकारण लक्षात न घेता एक साधा नवा म्युझिक आल्बम म्हणून पाहिलं. फारसं आवडलं नाही. आवाजाच्या टेक्सचर ला सूट होत नाही. मूळ जुनं गाणं अजून ऐकलेलं नाही.
गेटप, लोकेशन्स आवडली.
(तांत्रिक बाबी म्हटल्या तर गाणं म्हणताना बॅकएन्ड ला झालेली तोंडं व्हिज्युअल्स मध्ये आली नाही पाहिजेत. सर्वांनी २ मिनीट ६ सेकंद च्या एक्स्प्रेशन्स वर चूक काढली आहे. ड्रेस सुंदर आहे पण मध्ये मध्ये हॉट ड्रेस मुळे थोडा बावरलेपणा चेहर्‍यावर दिसतोय.छान चिक हॉट कपडे असले तरी स्वतःला गाणं म्हणताना कोणत्याही कोनातून कॅमेरा आला तरी तितकंच कम्फर्टेबल वाटेल असे ड्रेस निवडले पाहिजेत.स्वतःच्या आवाजाला कोणती गाणी छान वाटतील याचा अभ्यास वाढवला पाहिजे.गाणी थोडी हॅपनिंग हवीत, श्वेता शेट्टीची,उषा उत्थुप किंवा आलिशा ची असायची तशी.इंटेन्स स्लो गाणी ऐकताना झोप येते, ए आर रहमान आणि इतर अगदी थोड्यांची सोडून.) एक प्रयोग म्हणून चांगलं आहे. नंतरची गाणी चांगली असू शकतील. ए आर रहमान बरोबर एकदा गाऊन पाहिलं पाहिजे(मी नाही)ट्तो आअवाजाला सुटेबल गाणी बनवतो.

मी अनु, छान लिहीलंय.
गेले दोन तीन दिवस झुम झुम ढलती रात ऐकतेय आणि बघतेय सुद्धा. हेमंतकुमार यांचा आवाज मला लता इतकाच हॉण्टिंग वाटतो. गूढ आहे. दर्द पण आहे. हिंदीतला शब्द आठवतोय. अजीबसी कशीश. झुम झुम संपलं की हे आपोआपच लागतं गाणं. Happy (कोहरा - मूळ सिनेमा हिचकॉकचा रिबेका)

गाण्याचं पिक्चरायजेशन लिरिक्स प्रमाणे नको का? म्हणजे एक रात होके निडर.. किंवा रात हसीन ये चांद हसीन ला काही अर्थ नाही का? कारण ह्या बाइंच गाणं चक्क उन्हात वैगेरे आहे Happy असो पुढचं गाणं. @ रानभूली झूम झूम इथे दिलं होतं मी मागे. माझं पण एकदम आवडत आहे.

आत्ता आठवला शब्द. व्याकुळता. अजीबसी कशीश पेक्षा छान आहे हा शब्द.
बाईंच्या गाण्यात हेमंतदांचा टोन आलाय पण नेमकं वरचं मिसिंग आहे.
मी आत्ता पाहीलं ते गाणं.
नव्या रूपाचा उत्सव , नवलाई नव्याची असं काहीतरी चालू आहे.
तिथे गाण्याला अनुरूप सिनेमॅटोग्राफी वगैरे अ‍ॅप्लिकेबल नाही होत.
स्त्रीहट्ट !! Lol

गाणं असं ऐकायला थोडी जास्त मजा येते..
https://www.youtube.com/watch?v=2RuGHdv-aaI&t=548s

ओएसआर वाले चक्रम आहेत. मला त्यीपेक्षा जॅबी, आणि तोही अचारा बरोबर असतानाच आवडतो.अचारा खूप चांगलं समजते.

Screenshot_20210216-120312.jpg
खूप सोपं.. नाचता येईल असे... हिरो फिल्मी कुटुंबातील , नटी बाहेरची... प्रसिद्ध आहे. इथे हनिमून चे प्लॅन चालले आहेत.

Pages