आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बघतोयस काय रागानं, अजान दिलीय वागानं !

छत्रपतींच्या राज्यात मुघलशाही अवतरली, अभिनंदन !! याचसाठी केला होता अट्टाहास ! >>>>>>>
हो ना !
सेक्युलॅरिझम सहन केला असता पण काँग्रेस ला लाजविन इतका लाळ घोटे पना सहन होत नाही .एखाद्या समाजाला इतके डोक्यावर बसवण्याची गरज च काय ? मग सेक्युलॅरिझम बुडवून कुठे ठेवला ?

सगळ्या व्हॉट्स ॲप विद्यापीठात हीच चर्चा चालू आहे .
बरं मित्र परिवार सगळ्या पक्षात विखुरला असल्यामुळे पक्षांच्या चुका आणि त्या वरील प्रतिक्रिया लगेच डोक्यात भिन भीन तात !
ज्या प्रमाणे फडणवीस आणि दादा यांची युती न पटल्या मुळे भाजप विरोधी प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता , त्याच प्रमाणे उस्मान भाईंची गेल्या चारपाच महिन्यातील लाळ घोटे पना सहनशीलता च्या पुढे गेला आहे..

आज आनंद दिघे असते तर?

आज बाळा साहेब असते तर?

बाळासाहेब असते तर आधी त्यांनी किंगमेकरच्या पार्श्वभागावार लत्ताप्रहार करुन हाकलला असता. प्रश्न अजानचा नाहीये, लाळघोटेपणाचा आहे. ज्या वेळी आधी भाजपा बरोबर सत्तेत होते त्याच वेळेस हिंदु-मुस्लिम- ख्रिश्चन- बौद्ध - शीख या धर्मातील धर्मग्रंथांवर आधारीत स्पर्धा घेतल्या असत्या तर काही चान्स होता. आधी मुस्लिमांना शिव्या देऊन मग लाळघोटे पणा करायचा हे अनाकलनीय आहे. याला मतांकरता हांजी हांजी करणे म्हणतात धर्मनिरपेक्षता म्हणत नाहीत.

जर आफ्रिकेतील लोकांना झाड तोडायचं असेल तर ते कुऱ्हाड घेऊन झाड तोडायला जात नाहीत. ते सगळे घोळक्याने झाडाच्या अवतीभवती जमतात आणि झाडाला भरपूर शिव्याशाप देतात. ते ऐकून झाड रडायला लागतं आणि बोलतं मला हे सगळं नका ऐकवू मी स्वतः मरून जातो आणि मरता मरता आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना स्वतःच स्वतःच्या मोळ्या बांधून देतो. त्याचप्रमाणे जर एखाद्या पक्षाला पाडायचं असेल तर मतदानाला न जाता सोशल मीडियावर त्या पक्षाला शिव्याशाप दिले तर तर तो पक्ष स्वतःहून हारतो.

>>आता शेणेच्या प्रत्येक शाखेवर एकादा भोंगा लागलेला दिसेल काय ?<<

शेणा नका म्हणू हो.... धागालेखकाला आक्षेप आहे!
बाकी लोकांची "भाषा" त्यांना सोयीस्करपणे दिसत नाही... पण तुमची दिसेल कारण ते "तटस्थ" आहेत Proud

आणि आज कामात होतो ही काल सांगितलेली पळवाटही चालणार नाही.... आज होते ते इकडे बराच वेळ!

त्याचप्रमाणे जर एखाद्या पक्षाला पाडायचं असेल तर मतदानाला न जाता सोशल मीडियावर त्या पक्षाला शिव्याशाप दिले तर तर तो पक्ष स्वतःहून हारतो.>>>> Proud पण मी हे सेनेच्या बाबतीत करणार नाही, काकांच्या साठी करेन. Proud

काका ओ काका, काका , काका

तसे काकांना अजून तीन वर्षे लय भारीयेत. मग मज्जाच मज्जा ! Proud

मामुंचा गुरु बदलला. Proud

तो पर्यंत तडफडणविसाच्या चेल्या-चपाट्यांची तडफड अशीच अव्याहतपणे सुरु रहणार यात शंकाच नाही..!! Biggrin

तडफड नाही हो , उलट मज्जाच मज्जा येत आहे !
तीन वर्ष हे सरकार पडूच नये अशीच आमची खूप इच्छा आहे . फुकट चे एन्टरटेन्मेंट बंद पडावे असे कोणाला वाटेल ? Happy
संपादक च राज्य सभा सदस्य असून देखील किरकोळ गोष्टीत रोज रोज डरकाळ्या मारणे आणि उठा चे महत्वाचे निर्णय न घेता दर पंधरा दिवसांनी फेसबुक वर उंटावरून शेळ्या हाकणे , इतकी मोठी मेजवानी कोणाला नको आहे .
काँग्रेस चा निरुपम डोक्यावर पप्पू चा हात असल्या शिवाय उठा वर विनाकारण टीका करतोय का ?
पण हे त्याची टीका प्रसाद म्हणून गोड मानत आहेत .

आघाडीत असून सहकारी पक्षा ला पोत्यात घालून बुक्क्यांचा मारल्यावर काय होत ते आता ऊठा ला नक्कीच कळले असेल Happy

तोंड दाबुन बुक्क्याम्चा मार नुसताच नाहीये काही. तर सहन होत नाही आणी सांगता ही येत नाही अशी अवस्था झाल्याने अनुयायी जाम पिसाळलेत. Biggrin

अनाजी पंतुकड्याचीच पिलावळ किती, कशी आणि का पिसाळली आहे हे समस्त माबोकरांना दिसत आहे... Biggrin

चालु द्या धुळवड.. उद्या येतो भेटायला..! Wink

समस्त माबोकरांना दिसत आहे >>>>>>>
हे मात्र संपादक सारखं वागणे झाले !
तमाम महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे म्हणायचं आणि
वास्तवात कोणत्या तरी पक्षाबरोबर युती केल्या शिवाय सत्ता स्थापन करू शकत नाही .
Happy

समस्त माबोकरांचा सध्या फक्त आणी फक्त पिसाळावरच डोळा आहे. Proud

कारण स्वराज्य उलथवण्यात त्याचा पण हात होता.
नुसते अनाजी अनाजी करुन ओरडत राहील्याने जाम घसा बोटे दुखत असतील. काही दिवसांनी नाही जी ! नाही जी ! असे शब्दच उमटतील. Biggrin

या सरकारने केलेली २ विकासाची कामे सांगा असा प्रश्न कोणी विचारला तर पंचाईत होईल वाघाची.

काहीही झाले कि केंद्राच्या नावाने रडायचे, फेबु लाईव्ह करायचे किंवा मग मुलाखत मुलाखत खेळत बसायचे. याच्या पेक्षा आरोग्यमंत्र्यांनी नक्कीच खूप जबाबदारीने काम केलं, त्यांचे नक्कीच कौतुक झाले पाहिजे. बाकी नुसतेच नावाला ठाकरे सरकार ... फक्त आम्ही तिघा एकत्र आहोत याचाच गमजा... अरे पण एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी नक्की काय केलात? तुमचे विकासाचे vision काय ... ते काही नाही नुसते अंगावर याला तर शिंग मारू, याला पालथा पाडू, त्याला फोडू एवढेच?? अरे त्याला कोणीतरी आठवण करून देण्याची गरज आहे कि तू गल्लीतला गुंड नाही तर एका जबाबदार पदावर बसलेला आहेस. या पेक्षा रागा बरा वाटायला लागतो, निदान नीट करमणूक तरी करतो ... खरंच बाळासाहेब असते आज तर काय म्हणाले असते

{{{ त्याला कोणीतरी आठवण करून देण्याची गरज आहे कि तू गल्लीतला गुंड नाही }}}

इतकं धडधडीत खोटं कोण बोलणार?

गुंडा बरोबर फडणवीसचा पक्ष 35 वर्षे होता की.

पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा

असा सुविचार आहे ना ?

तिन्ही लोक म्हणजे नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा का ?

देवळं उघडली तरी अजून हे पंतुकडे इकडे पडीक कसेकाय?
कोरोनामुळे तिकडचा धंदा बसला वाटत Biggrin

गुंडा बरोबर फडणवीसचा पक्ष 35 वर्षे होता की.
>>>>>

मला हेच दोन्ही पक्षांचे कळत नाही.
एवढे वर्षे तुम्ही एकमेकांसोबत होतात. आणि आता वेगळे होताच दोघांनाही एकमेकातले ईतके दुर्गुण दिसू लागले? याचा अर्थ दोन्ही पक्ष सत्तेसाठीच त्यांच्या स्वतःच्या मते वाईट असलेल्यांसोबत् जुळवून राहत होते ना?
मग त्याच न्यायाने आता सत्तेसाठीच सेना आणि दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यात.
त्याच न्यायाने सत्तेसाठीच पवार फडणवीस यांनी घाईघाईत शपथविधी उरकलेला.
पक्षीय राजकारण हे असेच असते. हे समर्थक समजून का घेत नाहीत. की समजूनही न समजल्यासारखे करतात.
राजकारण्यांना बदलू द्या तळी आणि करू द्या या बोटाची थुंकी त्या बोटावर. आपण का करावे..
उद्या भाजपा आणि शिवसेना एकत्र नाही येणार याची खात्री आहे का कोणाला शंभर टक्के?

@ BLACKCAT - तुमचा अभ्यास कमी पडला हे स्पष्टच आहे. या सुविचारात गुंडा याचा अर्थ पराक्रमी असा आहे संधीसाधू नाही. फडणवीसा बरोबर हा नाही तर त्याचा बाप होता. बापाच्या पुण्याईवरच तर सगळे दुकान सुरु आहे नाहीतर फोटो दुकानातील खुर्चीचा मिळाली असती मंत्री पदाची नाही

उद्या भाजपा आणि शिवसेना एकत्र नाही येणार याची खात्री आहे का कोणाला शंभर टक्के? >> बाळासाहेब असते तर काँग्रेस बरोबर युती झाली असती?

फडणवीसा बरोबर हा नाही तर त्याचा बाप होता.

कायच्या काय

मोठे ठाकरे नोव्हेम्बर2012 ला गेले
युती नोव्हेम्बर 2019 ला तुटली

गुंडा बरोबर फडणवीसचा पक्ष 35 वर्षे होता की. >>>>>>
हे नव्हते ! यांची लोक होती हो सत्तेत , सतत खिशात राजीनामे घेवून फिरायची .
आणि महाराज कुठे ? तर म्हणे जंगलात गेलेत फोटोग्राफी करायला !
Lol
त्या काका ला कसे ही करून राज्यावर कंट्रोल ठेवायचा होता म्हणून केली बुजगावण्याची नेमणूक !

>>या सरकारने केलेली २ विकासाची कामे सांगा असा प्रश्न कोणी विचारला तर पंचाईत होईल वाघाची.<<

याच्यावर कुणीही बोलणार नाही.
असाच प्रश्न सातवी ड ला विचारला होता.... किमान त्याने प्रामाणिकपणे कबूल तरी केले की त्याला सांगता येणार नाहीत म्हणून!
बाकीचे बसलेत गोल गोल जिलेब्या पाडत!

९ हजार कोटी पाण्यात?
'जलयुक्त शिवार अभियान' या योजनेचा मूळ उद्देश भूजल स्तर वाढवण्याचा होता. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. या योजनेवर सुमारे ९ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही पाण्याची अपेक्षित पातळी वाढली नाही. तसे ताशेरेच कॅगच्या अहवालात ओढण्यात आले आहेत. त्याच आधारावर ठाकरे सरकारने या योजनेची चौकशी सुरू केली आहे. फडणवीस व भाजपला हा खूप मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/jalyukt-shivar-maha...

Pages