आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पुढच्या वेळेस बहुतेक १ टिंब जास्त वाढेल.
Submitted by रश्मी.. on 30 November, 2020 - 08:27 >> हो न... रश्मी.. वैनीचाच आदर्श आहे डोळ्यासमोर..!! Wink

प्रत्येक वाढणाऱ्या टिंबाबरोबर पातळी अजुन घसरतीय Proud
आणि हे लोक स्वाभिमानाच्या गोष्टी करतात.... जनाची नाही निदान मनाची तरी Wink

रश्मी.. वैनीचाच आदर्श आहे डोळ्यासमोर..!! Wink>>> माझा आय डी उडालेला नाही. Proud इथे एक रश्मी होती म्हणून मला २ टिंबे घ्यावी लागली.

माझा आय डी उडालेला नाही. Proud इथे एक रश्मी होती म्हणून मला २ टिंबे घ्यावी लागली.>> सेम पिंच..! Bw

अभिनंदन आणि शुभेच्छा. सरकार ५ वर्षे पूर्ण करो.
फार मजा येते भाषणं / लेख / मुलाखती ऐकायला, बघायला. लॉकडाउन मधे नाहीतर फार बोअर झालं असतं

आता सीबीआय आणि इडी ला बॉर्डर वर पाठवायचय ना?

>>आता सीबीआय आणि इडी ला बॉर्डर वर पाठवायचय ना?<<

अति झाले आणि हसू आले

आता सीबीआय आणि इडी ला बॉर्डर वर पाठवायचय ना? >>>>>>
सी बी आय आणि इडी वरील वक्तव्यावर
वडापाव वर खुश होणारे पाच पन्नास कार्यकर्ते सो मी वर ची बाजू तावा तावाने बाजू मांडतात !
अजुन काय पाहिजे संपादक ला ?
Happy
आणि मातोंडकर च्या हिंदू धर्मा विरुद्ध वक्तव्यावर पण तोच वडापाव कार्यकर्त्यांचे तोंड बंद करतो

https://www.youtube.com/watch?v=OSQfE6qwGM4

काही म्हणा. हा व्हिडीओ मला तुफान आवडला. ते राष्ट्रवादीचे मांजर स्वतःच्याच नादात आहे आणी कोंग्रेसवालं एकदम शांत आणी तटस्थ आहे. सेम कंडिशन आता पण आहे. Proud

काही म्हणा. हा व्हिडीओ मला तुफान आवडला. ते राष्ट्रवादीचे मांजर स्वतःच्याच नादात आहे आणी कोंग्रेसवालं एकदम शांत आणी तटस्थ आहे. सेम कंडिशन आता पण आहे. >>>>>>>
अल्टिमेट .....
Lol
अगदी सेम कंडीशन !

फुल्ल टू जोकर गिरी चाललीय संपादक ची !
ना शान , ना आत्मसन्मान !
आणि उठ सूठ भाजप वर डाफरणार , बर डाफरून खुश कोण होतंय ? तर वडापाव वर खुश होणारे ! हे बघण्याची पण तसदी संपादक घेत नाही .
सेनेचे कट्टर कार्यकर्ते / मतदार संपादक च्या चाळ्या वर नाराज असतील आणि ते लाथ घालतील त्यावेळीच डोळे उघडतील .

त्या नारायण राणेंना सध्या गप्प करण्याची गरज आहे. उठसुट पत्रकार परिषद घेऊन व बिनबुडाचे आरोप करुन स्वत:चेच हसू करुन घेतायत सध्या ते. किरिट सोमय्या निदान कोर्टात तरी गेलेत पण हे राणे वायफळ आरोप करत सुटलेत.

इथे जमलेले रसिक वाचक आणि माननीय अध्यक्ष महोदय. आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मिरजेत एक पद्मावती नावाची नवीन डोसा गाडी सुरू झाले. तिथे पुरी कुर्मा मस्त मिळतो. डोसा पण चांगला असतो त्याच्याकडे लाल ठेचा पण मस्त असतो. सगळ्यांनी लाभ घ्यावा. तो गाडीवाला माझ्या चांगलाच ओळखीचा झालाय आणि हुशार पण आहे. मला लांबूनच बघून डोसा टाकायला सुरवात करतो. असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.

बाबा आमटेंच्या आनंदवन मधील संचालक शीतल आमटे यांनी गिरीश कुबेर वर टीकास्त्र सोडून आत्महत्या केली !!!!!!

ज्यांना भाषेवर आक्षेप होता ते धागामालक कुठे गेले?>>>>>>. ते स्वतःच्या सोयीने त्यांचे नियम तयार करतात. आता ते इथे फिरकायची शक्यता शून्य.

>>>>>

आज सोमवार होता.
आज ऑफिस होते.
आता घरी आल्यावर धागा उघडला.

असो

राजकारणाच्या धाग्यावर भाषेची पातळी नेहमीच घसरते. म्हणूनच सुरुवातीलाच विनंती केली होती.

असो,
जर तुम्हाला वाटत असेल की हवी तशी भाषा वापराने हा ज्याचा त्याचा हक्क आहे तर ओके. माझी चुक झाली. मी माफी मागतो.

पण गलिच्छ भाषेला गलिच्छ भाषेतच प्रत्युत्तर देणे जरूरी असते असे मला वाटत नाही. जर आपला मुद्दा स्ट्राँग असेल तर त्यावरच फोकस ठेवणे उत्तम. माझ्यासारखे वाचक वैयक्तिक चिखलफेक नाही तर मुद्द्याचे वेचायला ईथे येतात. आणि तुम्हा जाणकारांकडून त्याचीच अपेक्षा आहे. धन्यवाद Happy

इथे जमलेले रसिक वाचक आणि माननीय अध्यक्ष महोदय. आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मिरजेत एक पद्मावती नावाची नवीन डोसा गाडी सुरू झाले. तिथे पुरी कुर्मा मस्त मिळतो. डोसा पण चांगला असतो त्याच्याकडे लाल ठेचा पण मस्त असतो. सगळ्यांनी लाभ घ्यावा. तो गाडीवाला माझ्या चांगलाच ओळखीचा झालाय आणि हुशार पण आहे. मला लांबूनच बघून डोसा टाकायला सुरवात करतो. असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.>>>>>>> Rofl Rofl बोकलत तुम्ही असेच येत जा. Proud खूप रिलॅक्स वाटते. Proud

पण गलिच्छ भाषेला गलिच्छ भाषेतच प्रत्युत्तर देणे जरूरी असते असे मला वाटत नाही. जर आपला मुद्दा स्ट्राँग असेल तर त्यावरच फोकस ठेवणे उत्तम. माझ्यासारखे वाचक वैयक्तिक चिखलफेक नाही तर मुद्द्याचे वेचायला ईथे येतात. आणि तुम्हा जाणकारांकडून त्याचीच अपेक्षा आहे. धन्यवाद>>>> अरे बाबा , तुझ्यात पेशन्स आहेत. तू पातळी सोडत नाहीस हे माहीत आहे. पण तुला मागेच सांगीतले होते की राजकारण सोडुन कोणताही धागा काढ. जाम कलगीतुरा पेटतो इथे. Proud

आणि रुन्मेषचा बंद पडलेला धागा जोरदार धावू लागला.
पावा वाजवत मुकुंदाने गोपीना दूर दूर घेऊन जावे तसे रुन्मेष-काळमांजर-डीजे इथल्या मंडळींना दूर दूर घेऊन गेले. Proud

बाबा आमटेंच्या आनंदवन मधील संचालक शीतल आमटे यांनी गिरीश कुबेर वर टीकास्त्र सोडून आत्महत्या केली !!!!!!>>>>> जे झाले ते खूपच दु:खद आहे. Sad पण डॉ शीतल यांनी अश्या नीच लोकांकडे लक्ष न देता, त्यांना कोर्टात खेचायला हवे होते. काय मिळाले असे करुन, स्वतः तर त्या गेल्या पण त्यांच्या कुटुंबाला भळाळत्या आणी कधी बर्‍या न होणार्‍या वेदना देऊन गेल्या. Sad

कुबेरांना कोणते आत्मिक समाधान मिळाले हे त्यांनाच ठाऊक.

सनव Lol

कुबेरांनी ( लेखाचे लेखक तेच होते का नाही लक्षात नाही ) आनंदवनातील आर्थिक व इतर बाबींबाबत लेख लिहीला होता की डॉ शीतल आमटे मनमानी करतात म्हणून.

कोणते आत्मिक समाधान मिळाले हे त्यांनाच ठाऊक.>>>>>>

शीतल आमटे साठी वडपाव सैनिक रस्त्यावर येणार नाहीत कारण दुसऱ्या बाजूला गिरीश कुबेर सारखा ( वाड्मय चोर ) आहे जो सेनेची तळी उचलून धरण्यात पटाईत आहे .
तसेच ज्या आनंद वन मध्ये बहिष्कृत कुष्ठरोगी सन्मानाने जीवन जगत होते त्या आनंद वन मध्ये
संपादक आणि उठा ला ७/१२ च्या संधी दिसत असतील .....

Pages