आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्यात अवघड अवस्था होती रोहीत पवारची. बिचार्‍याला मोकळपेणाने हसता पण येईना सेनापतींच्या एंट्रीवर. >>>>>>
सेनापती च्या त्याच त्याच लकबी वर काल महाराष्ट्र खळखळून हसला ! आणि संपादक च्या ही !!!!
खरं म्हणजे असेल कार्यक्रम म्हणजे राजकारणी लोकासाठी एक आरसा च आहे .
आणि साबळे च्या धाडसाचे कौतुक करावे लागेल , काय बिनधास्त स्क्रिप्ट लिहिले होते , वा !!
फडणवीस /अजित चे दोन दिवसाचे सरकार स्थापन पाडल्या मुळे स्टेज वर एकमेकाकडे न बघणे , काकांनी अजित ला मारलेला टोमणा ' जाताना सांगून जात जा ! '
विनोद बुद्धी खिलाडूवृत्ती शाबूत असलेले लोकच यातील आनंद घेऊ शकतात ! जो आनंद सुजय आणि रोहित घेत होता !!!!!!
पण खिलाडू वृत्ती वडापाव वाल्यांकडे शिल्लक आहे की नाही येत्या दोन तीन दिवसात कळेल !

वडापाववाले काय,
तुमच्या भाजपाचे 35 वर्षे हमबिस्तर होते ना ते

अनानी पंतुकड्याची विचारधारा बाळगणारे दुसर्‍यांकडुन खिलाडुवृत्तीची अपेक्षा करतात यातच त्यांच्या फसलेल्या राजकारणाचा पंचनामा झालेला दिसतो.

वडापाववाले काय,
तुमच्या भाजपाचे 35 वर्षे हमबिस्तर होते ना ते >>>>
सेनेने भाजप ' तलाक ' देईना म्हणून ' खुला ' करून घेतला आणि आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर हलाला केला आहे !!!!!
Happy

हलाला कसा ?

पुन्हा भाजपाबरोबर केला तर हा हलाला होईल

नाहीतर , हा दुसरा ब्याह आहे, असे म्हणावे लागेल

तुमचे फडणवीस आता ब्रह्मचारी

तडफडणवीस आता भाजीपाला कायमचे सत्ताभ्रष्ट करणार यात शंकाच नाही... असो.. अनाजी पंतुकड्यांना हेरुन बाजुला काढणार्‍या राजकारणाचा विजय झाला असेच म्हणावे लागेल..! Biggrin

तडफडणवीस आणि चंपा यांछे भाजपला मोठे करण्यात काय योगदान आहे..? शिवसेनेच्या बुडाखाली फोफावणार्‍या पक्षात हे दोघे आरामात पहुडले होते तेव्हा इतर जणांनी खास्ता खाऊन पक्ष वाढवला अन जेव्हा सत्ता मिळाली तेंव्हा हे दोन भगंदर मोक्याच्या जागा हेरुन बसले.. त्याच जागांचा माज चढला अन अगदी तोंड काळे करुन सत्तेतुन पायौतार झाले... ते पुन्हा कधिही न उठण्यासाठीच..!

Dj, तुम्ही मायबोली प्रशाशकाकडून सुपारी घेतली आहे का सगळे धागे बंद पडण्याची Happy

धागे बंद का पडतील..? उलट टीआरपी वाढतो म्हणा... Biggrin

विपु वाचलीत की नाही तुम्ही..?? Rofl नसेल वाचली तर इथे पेस्ट करतो :

16 December, 2020 - 08:20

जास्त वाद घालु नका. जनावरे आहेत आजूबाजूला. त्यांना चिखलात आणी शेणात लोळायची सवय आहे, तुम्ही उत्तर द्याल तसे ते वराह अजून माजत जाईल. ( मी ब्लॅक कॅट बद्दल बोलत नाही ) त्यांच्या आई बापांचे ते घरातले संस्कार आहेत, आणी ते वारंवार दाखवुन देतात. टेक केअर .
--------------------------------------------------------------------

अहो, त्या वैनींना सांगा... वैचारीक उकीरड्यात आजवर पहुडलेल्या कुजकट माणसांना नीट लायनीवर आणतो आम्ही.. आणि संस्काराबद्दल नाकाने कांदे सोलु नका म्हणावे... शेजारच्या बिल्डिंगमधल्या घरापर्यंत डोकावण्याचे संस्कार शिकवलेल्या आई-बापांच्या मुलांकडुन संस्कार शिकण्याची तर मुळीच गरज नाही.! Wink

Pages