
हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.
माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.
या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!
आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?
सहमत!
पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.
तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.
ठाकरे सरकारचं यशस्वी
ठाकरे सरकारचं यशस्वी वर्षपूर्तीकरता अभिनंदन. इतरांच्या दु:खात सहभागी नाहि, पण सहानुभूती मात्र व्यक्त करतो.
कुबेरांचा लेख वाचलेला नाहि, तरिहि त्या लेखावर प्रतिक्रिया अथवा लेखाचं उत्तर, आत्महत्या असु शकत नाहि. या दुर्घटनेमुळे, दुर्दैवाने एक चूकिचा संदेश दिला गेला आहे...
फडणवीसांचे २ नं चे धंदे नाहीत
फडणवीसांचे २ नं चे धंदे नाहीत.>>>>>>≥>
+१११११
आणि त्यांनी कोणत्याही नैसर्गिक / मानवी आपत्तीत लुटमार ही केलेली नाही.
इथे मात्र ७/१२ करणारे स्वतःची पाठ सतत थोपटून घेत असतात
शिवसेनेच्या वतीने अजान पठण
शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.>>>>>>>>>>

काँग्रेसला नाही सुचले, जे राष्ट्रवादी काँग्रेसला नाही सुचले, जे एमआयएम, आप, मुस्लिम लीग, जनता दल, तृणमूल काँग्रेस, भारतातल्या कोणत्याच राजकीय पक्ष, संस्था, संघटनांना नाही सुचले, इतकेच काय पाकिस्तानलाही जे नाही सुचलं ते शिवसेनेला सुचलंय.
आता पाकिस्तान , काँग्रेस , ओवेसि , ममता या सगळ्यांची पाचावर धारण बसली असेल !
शिवसैनिकांनो तुमच्याही मुलांना सांगता का ह्या स्पर्धेत भाग घ्यायला..? करा यशस्वी हा कार्यक्रम. पक्षाचा कार्यक्रम आहे. यशस्वी व्हायलाच पाहिजे.
छोटा पेगवीनपण सहभागी होणार
छोटा पेगवीनपण सहभागी होणार म्हणे स्पर्धेत, नंतर राऊतांची मुलाखत ठरलेलीच आहे. सगळ्यात चांगले अजाण हे साहेबांना कसे माहिती ते पटवून देतील ...
आता पेगविन म्हणायचं नाही बरं
आता पेगविन म्हणायचं नाही बरं का !

अकबर म्हणू शकता , आणि गुणाचा पुतळा त्याचे वडील हुमायू .....
सल्लागार वजीर .
म्हणजे कस झोळीत भर भरून मते पडणारच !
या साठीच चाललय ना शेवटी हे सगळं ?
काही दिवसांनी गजनी , तैमूर , औरंगजेब , बाबर हे सगळे संत होते आणि त्यांनी केलेल्या संत कार्यावर शाळेतील पुस्तकामध्ये धडे येतील .
इतिहासातील या संता वरील माहिती किती चूकीची आहे , या बद्दल नवीन पुरावे शोधण्याचे काम संपादक वजीर आनंदाने करतील .
नाहीतरी शाकाहारी अंडी आणि लक्ष्मण साठी विद्या ( बुटी नाही बरं का ) हनुमान ने आणली हे पूर्वीचे शोध वजीर च्या नावावर आहेतच .
मग कसले धंदे आहेत त्याचे..??
अरे वा.. आज प्रातःकालीन सभेत नवा शब्द वापरा असं बौद्धीक दिलं गेलंय वाटतं..!! भारीच हां कल्पनाशक्ती.. चौथी फ...!!
वजीर ठाण्यात पिटता पिटता
वजीर ठाण्यात पिटता पिटता वाचला होता, म्हणून लिलावतीत लिला करायला गेला. काय करणार बिचार्या शिव सैनिकांना कायम पांडुरंगाचरणी निष्ठा ठेवावी लागते. यांचे हेच पांडुरंग आता लिला दाखवत आहेत. तशी झाल्यात जमा आहे म्हणा, पण अधिकृतरीत्या सांगु शकत नाहीत, त्यांच्या अनुयायांची आणी पाठिराख्यांची पण झालीय.
{बाबा आमटेंच्या आनंदवन मधील
{बाबा आमटेंच्या आनंदवन मधील संचालक शीतल आमटे यांनी गिरीश कुबेर वर टीकास्त्र सोडून आत्महत्या केली !!!!!!}
घाणेरडी आणि नीच मानसिकता. ८ ऑगस्ट रोजी हे पत्रं लिहिलं होतं. एखाद्या माणसाच्या मृत्यचा वापर करून अजेंडा पसरव्हायचे निलाजरे काम चालले आहे!
Youtube वर thinkbank नावाचा
Youtube वर thinkbank नावाचा एक चॅनेल आहे.... तिथे विविध वृत्तपत्र संपादकांनी विश्लेषण केलेय सरकारच्या एका वर्षाच्या कामगिरीचे!
घाणेरडी आणि नीच मानसिकता. ८
घाणेरडी आणि नीच मानसिकता. ८ ऑगस्ट रोजी हे पत्रं लिहिलं होतं. एखाद्या माणसाच्या मृत्यचा वापर करून अजेंडा पसरव्हायचे निलाजरे काम चालले आहे >>>>>>
वाड्मय भुरट्या चोर कुबेर आणि त्याच्या पाठी राख्याना कसली आलीय लाज ?
तिथे विविध वृत्तपत्र
तिथे विविध वृत्तपत्र संपादकांनी विश्लेषण केलेय
>>>>
हल्ली ही जमात विकली गेलेली असते असे जाणवते.
कोणी तटस्थ असतील त्यांची नावे द्या. मग त्यांचीच मते ऐकता येतील.
फेकुच्या राजवटीत विकले गेले
फेकुच्या राजवटीत विकले गेले नाही असे काही आहे का ऋन्मेषा..!
>>हल्ली ही जमात विकली गेलेली
>>हल्ली ही जमात विकली गेलेली असते असे जाणवते.<<
हे असले चष्मे घालून बघणार असशील तर नको बघूस!
आणि जरी बायस्ड असतील तरी दोन्ही बाजूंनी मते मांडणारे लोक दिसले त्या चॅनेलवर.... सगळे ऐकून घ्यायचे.... शेवटी कोण facts सांगतोय आणि कोण गोल गोल बोलतेय ते कळतेच की आपल्याला!
>>कोणी तटस्थ असतील त्यांची नावे द्या. मग त्यांचीच मते ऐकता येतील.<<
सगळीकडे कसे २१ अपेक्षित पाहिजे तुला.... अभ्यास कर जरा
पत्रकारच जर विकला गेला असेल
पत्रकारच जर विकला गेला असेल तर सत्य कसे ओळखावे?
मागेही माझा या आशयाचा धागा होता.
आणि मी हा आरोप एका पक्षावर करत नाहीयेच. सगळेच पक्ष असे करू शकतात. किंबहुना करत असावेत. एकच बातमी जेव्हा टोटली दोन भिन्न गोष्टी फॅक्टस म्हणून सांगतात तेव्हा खरे फॅक्ट काय हे कसे ओळखणार? चार पाच ठिकाणी बातम्या वाचून मेजॉरीटी ठरवायची का?
आता त्या सुशांत केसमध्येच ईतक्या उलटसुलट बातम्या कानावर आल्या की काय सत्य काय असत्य कळेनासे झालेय. तुम्ही सांगू शकाल ठामपणे सत्य त्यामागचे?
त्या एबिपी माझाचा 'माईक'
त्या एबिपी माझाचा 'माईक' संज्या रौतच्या कमरेला सतत बांधून ठेवलेला असतो की काय, अशी शंका सध्या यायला लागलेय. सकाळी उजाडले नाही तोच संज्याचे एकादे तरी लेटेस्ट स्टेटमेंट "ब्रेकींग न्युज"च्या नावाखाली खपवत असतात ते एबिपी माझाचे 'दलाल' पत्रकार(?)
>>पत्रकारच जर विकला गेला असेल
>>पत्रकारच जर विकला गेला असेल तर सत्य कसे ओळखावे?<<
हे ठाम मत असेल तुझे तर मग वाचूच नकोस काही!
विषय संपला!
>>चार पाच ठिकाणी बातम्या वाचून मेजॉरीटी ठरवायची का?<<
क्वालिटीला महत्व द्यायचे का क्वॉंटीटीला हा ज्याचा त्याचा प्रश्न
>>तुम्ही सांगू शकाल ठामपणे सत्य त्यामागचे?<<
अश्या घटनात प्रत्येकाचे एक व्हर्जन असते तसे आपले आपले व्हर्जन असण्यात गैर काहीच नाही .... ते सत्य असेल का नाही हे दरवेळ उघड होतेच असे नाही!
तुम्ही कुठल्या आधारावर ते व्हर्जन बनवता ते जास्त महत्वाचे असते!
हे ठाम मत असेल तुझे तर मग
हे ठाम मत असेल तुझे तर मग वाचूच नकोस काही!
विषय संपला!
>>>
सगळेच पत्रकार विकले गेलेत असे कुठे म्हणतोय. काही गेलेत काही नाही. म्हणून तर विचारतोय तटस्थांची नावे सांगा.
अश्या घटनात प्रत्येकाचे एक
अश्या घटनात प्रत्येकाचे एक व्हर्जन असते तसे आपले आपले व्हर्जन असण्यात गैर काहीच नाही .... ते सत्य असेल का नाही हे दरवेळ उघड होतेच असे नाही!
>>>>>
आपापले वर्जन?
मी सत्य आणि फॅक्टबद्दल बोलतोय. कथा कादंबरीबद्दल नाही. जसे की दिलीअकुमारचा देवदास वा शाहरूखचा देवदास. ज्याला जो आवडेल त्याने तो बघा...
सुशांतसिंग प्रकरणातले सत्य
सुशांतसिंग प्रकरणातले सत्य आणि फॅक्ट तू किंवा मी कश्या सांगू शकणार..... त्या सुशांतसिंगलाच माहित असणार किंवा त्याच्या जवळच्यांना!
कोर्टात जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत या सगळ्या बातम्या म्हणजे वेगवेगळी व्हर्जनच नाहीत का?
>>हल्ली ही जमात विकली गेलेली
>>हल्ली ही जमात विकली गेलेली असते असे जाणवते.<<
>>पत्रकारच जर विकला गेला असेल तर सत्य कसे ओळखावे?<<
>>सगळेच पत्रकार विकले गेलेत असे कुठे म्हणतोय<<
तुझ्या तुझ्या मनातला गोंधल आधी निस्तर आणि मग एकदा काय ते ठरले की प्रश्न विचार!
अहो फॅक्टस म्हणजे आजूबाजूला
अहो फॅक्टस म्हणजे आजूबाजूला ज्या ईतक्या बातम्या त्या अनुषंगाने येतात उदाहरणार्थ यात आदित्य ठाकरे यांचे नावही जोडले गेलेले बहुधा. कारण त्या बातम्या ऐकून माझी बायको मला एकदा ठामपणे म्हणाली की आदित्य ठाकरे यांना वाचवायला मुंबई पोलिस धडपडतेय. कारण ती बातमी पुर्णपणे एककल्ली होती. त्यांनी निकालच लावलेला. ते तसे आहेत गृहीत धरूनच त्यांच्या बातम्या होत्या.
सांगायचा मुद्दा हा की सत्य उजेडात आले नाही अजून हे कबूल. पण अनेक शक्यतांपैकी आपल्याला पोसणाऱ्या मालकांच्या सोयीची एकच शक्यता सत्य आहे असे ठरवूनच जर बातम्या येत असतील तर असे व्हर्जन मला या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाकडून अपेक्षित नाहीत.
त्यामुळे त्या न्यूज चॅनेल गप्पा आणि फेसबूकवरील चाळीस पैसे म्हणून चिडवले जाणारया पोस्ट वाचण्यापेक्षा मी मायबोली चर्चा वाचणे पसंद करतो.
खरा पुणेकर.माझी पुर्ण पोस्ट
खरा पुणेकर.माझी पुर्ण पोस्ट कोट करा की राव..
ही बघा
हल्ली ही जमात विकली गेलेली असते असे जाणवते.
कोणी तटस्थ असतील त्यांची नावे द्या. मग त्यांचीच मते ऐकता येतील.
>>>>>
पूर्ण वाक्य कोट करुन पण
पूर्ण वाक्य कोट करुन पण त्यातून वेगळा काही अर्थ निघत नाही तेंव्हा असो!
ऋन्मेदा, तोड्मोड करुन आपल्या
ऋन्मेदा, तोड्मोड करुन आपल्या विखारी विचारधारेशी प्रामाणीक रहाण्याचं बाळकडु यांना मिळालेले असते.. जास्त नादी नका लागु त्यांच्या.
Think bank बघ त्यावर दोन्ही
Think bank बघ त्यावर दोन्ही साईडची तसेच तटस्थ वगैरे पण विश्लेषण आहे..... बघून तू ठरव तुला काय झेपतय आणि काय पचतय ते!
भाऊ तोरसेकरांना तटस्थ म्हणणार
भाऊ तोरसेकरांना तटस्थ म्हणणार नाही, ते थोडेसे पाल्हाळिक वगैरे पण आहेत आणि त्यांचा एकंदर राजकीय कल पण माहित आहे पण ते तू म्हणतोयस तसे एककल्ली वाटत नाहीत..... घटनेबरहुकुम विविध पक्षातल्या चांगल्या नेत्यांचे ते कौतुकही करतात आणि चांगल्या गुणांची वाखाणणीही करतात!
पूर्ण वाक्य कोट करुन पण
पूर्ण वाक्य कोट करुन पण त्यातून वेगळा काही अर्थ निघत नाही तेंव्हा असो!
>>>>
तुम्ही मला मराठी चित्रपट बघायला सांगत आहात.
मी म्हणतोय, मराठी चित्रपटांचा दर्जा हल्ली घसरलाय. तुम्हीच काही चांगले असतील तर सुचवा.
आता यावर तुम्ही म्हणत आहात,
चित्रपटाचा दर्जा सगळे चित्रपट बघून तुझे तूच ठरव.
मला या आपल्या उत्तराचा फारसा फायदा नाही.
तरी आपण सुचवलेले फुरसतीने बघतो नक्की. नाही रुचले तर देईन सोडून. हाकानाका.
भाऊ तोरसेकरांना तटस्थ म्हणणार
भाऊ तोरसेकरांना तटस्थ म्हणणार नाही
>>>>
माझ्या कानावरही हे नाव तटस्थ नसलेले म्हणूनच आलेय. मी त्यांचे आजवर काही ऐकले बघितले नाही.
तू कितीही गोलगोल फिर किंवा
तू कितीही गोलगोल फिर किंवा देवदासपासून मराठी चित्रपटापर्यंत कुठल्याही उपमा वापर माझा सल्ला तोच राहील.... सगळे रेडिमेड मिळत नाही..... २१ अपेक्षित सोड!

अभ्यास कर
तरी थोडेफार सुचवले आहे..... मायबोलीवरच्या धुळवडीपेक्षा नक्कीच बरा कंटेंट आहे
माझ्या कानावरही हे नाव तटस्थ
माझ्या कानावरही हे नाव तटस्थ नसलेले म्हणूनच आलेय. मी त्यांचे आजवर काही ऐकले बघितले नाही.>>>> मग बघ. हाकानाका !
Pages