आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला एक वर्ष झाले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2020 - 02:54

हो, फेसबूक मेमरीच आली आहे तशी.
माझी पोस्ट होती पिझ्झा खात सेलिब्रेट करायची. तेव्हा त्यावर प्रतिक्रिया आलेल्या की चार-सहा महिन्यात ढोकळा खायची तयारी ठेव. हे पिझ्झा-वडापावचे नाते फार टिकणार नाही. पण टिकले. त्यांनी टिकवून दाखवले.

माझ्यामते याचे सर्वाधिक श्रेय श्री उद्धव ठाकरे यांना जाते.

या काळात सेनेच्या हिंदुत्ववादावर बरीच टिका झाली. या सरकारमध्येही सर्वात जास्त टिका उद्धव ठाकरेंनाच झेलावी लागली. जसे राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यावर होतात तसे ईमेज खराब करायचे वैयक्तिक हल्ले झाले. पण ते विशेष रिॲक्ट झालेच नाहीत. भारी संयम!

आता सरकार टिकवणे याबद्दल कसले कौतुक? ते तर केलेल्या कामांवरून झाले पाहिजे ना?

सहमत!

पण सध्याच्या कोरोनाच्या संकटात एक स्थिर सरकार देणे हे सुद्धा फार गरजेचे होते असे मला वाटते. ते जमवले याबद्दल अभिनंदन.

तळटीप - मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक नसून वरची फेसबूक पोस्ट विनोदाच्या अंगाने टाकलेली. जिला सर्व पक्षीय मित्रांनी लाईक केलेले. हा धागा मात्र विनोदाच्या अंगाने नसून प्रामाणिक मत आहे. येथील सर्वपक्षीय सभासदांनी आपले प्रामाणिक मत नोंदवावे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy
आणि ' शिव सेनेचे काय होणार ? ' हा पण सर्वासाठी वाचन मात्र झालाय का ?

Submitted by वटवृक्ष on 29 November, 2020 - 10:33
सांगा कुणी तरी ?

अशा रितीने जनतेच्या फसवणुकीचे वर्ष पार पडले.

प्रथमच असे सरकार असेल जे रोज एकाच गोष्टच सांगत आले आहे कि आमचे सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहे. पहिलाच मुख्यमंत्री आहे जो फक्त आपल्याच वृत्तपत्राला मुलाखती देतो किंवा फेबु लाईव्ह करतो. ज्याने घरात बसून WHO चे अध्यक्षपद जवळ जवळ मिळवलेच होते... Lol Lol Lol

कोथळा, खंजीर, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा पेंग्विन, महाराज, आम्ही, आमचे, तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी ब्ला ब्ला ब्ला....

अश्या रितीने एकमेकांना मुलाखती देत गप्पाष्टक सादर केले. मध्येच एकटेच फेसबुकावर येऊन दुसर्‍या लोकांना बेडुक वगैरे उपमा देऊन झाल्या. पण आपण स्वतः कोणत्या प्राण्यासारखे वागलो ते लक्षात घेतले नाही.

किती रे बाबा मी हुश्शार करत धोपाटणे घेऊन स्वतःची व बडबड्याची पाठ थोपटली. वा वा ! वा वा !

उद्धव यांना मुमं होऊन एक वर्ष झालं त्याबद्दल त्यांचं आणि सरकारचं हार्दिक अभिनंदन..!

आणि हो, भिजलेल्या १०४ पोत्यांचं ओझं वर्षभरापासुन वहाणार्‍या एका वैदर्भीयन गर्दभाच्या अन त्याच्या पाठिराख्यांच्या दु:खातही सहभागी.. Proud

Biggrin

पिसाळाच्या वंशजाला मतदारांशी गद्दारी करुन आलेल्या सरकारचे कौतुक असायचेच Proud

बाकी वेगवेगळ्या विचारवंतांनी चांगला सत्कार केलाय ठिकठिकाणी सरकारचा Rofl

https://www.loksatta.com/mumbai-news/shivsena-pandurang-sakpal-to-organi...

शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं आहे. मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी एका बसीरत ऑनलाइनशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी अजानला विरोध करणंही चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यावरुन भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे

https://www.loksatta.com/mumbai-news/shivsena-pandurang-sakpal-to-organi...

. दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यावरुन भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे >>>>>>>

शिवसेनेचे सेक्युलॅरिझम असेच वाढो .
पण लक्षणीय फरक पडला आहे , उठा आणि आठा चे व्यक्तिमत्त्व खास करून सेक्युलॅरिझम साठी च जोपासल्या सारखे वाटते , त्यामुळे या बातमी चे आश्चर्य वाटत नाही .
त्याच प्रमाणे इथून पुढे सेनेनी महाराष्ट्रात निर्माण केलेली हिंदुत्वाची पोकळी राज भरून काढीन असे दिसतंय .
फक्त इथून पुढे कोणत्याही निवडणुकीत आघाडी फुटू नये , अन्यथा सेने ला आत्ता पर्यंत च्या भूमिका वरून यू टर्न घेणे अवघड जाईल .

त्यांचे आजोबाही सेक्युलरच होते

वडील भाजपाच्या नादाने हिंदूसम्राट झाले होते , राम मंदिर आणि महाराअष्टर काबीज करणे ह्यासाठी भाजपाने त्यांच्या भगव्या वस्त्रांचा गैरवापर करून घेतला

भाजप्यांनी निकालानंतर भाज्यपालाच्या सहमतीने सर्वात आधी स्वतःच्या गा.डीला दादांची मांडी लाऊन पहाटे पहाटे शपथ घेतली अन तीर्थ प्राशन केले तर ते सुचिर्भुत पुण्यकर्म... आणि शिवसेनेने काँग्रेस आणि राकाँ सोबत कॉमन मिनिमम अजेंडावर १५-१५ दिवस बैठकांवर बैठका घेऊन पैशांचा कसलाही अपव्यय न करता साध्याशा कार्यक्रमात सर्वांसमक्ष दिवसाढवळ्या शपथ घेतली तर ते महापाप होय..??

भाजप्यांचं हे एक बरंय... सर्वात आधी स्वतः शेण खातील अन मग दुसर्‍यांची तोंडं हुंगुन कुणी कुणी शेण खाल्लंय ते सांगत फिरतील... Biggrin Biggrin Biggrin

ज्यांना भाषेवर आक्षेप होता ते धागामालक कुठे गेले?>>>>>>. ते स्वतःच्या सोयीने त्यांचे नियम तयार करतात. आता ते इथे फिरकायची शक्यता शून्य.

बादवे, सुमालकांचा आदेश असल्याने सेना अशी वागतीय. सुमालक कोण हे समजून घ्या. आघाडी सरकार टिकेल कारण सुमालकांना गुरु चांगला आहे, पण सुमालकांनी , गड्याला उतरवले तर सुमालिका पदावर येईल. ( तिथे पण भेलकांडत नाही गेली म्हणजे मिळवले) सुमालिका मु झाली की उसुमालक परत उमु होतील सिलसिला जारी राहील. मग ऑलरेडी झालेले असल्याने बरीच परीवर्तने होतील.

दुसर्‍यांच्या चुका दाखवताना आपल्या देवेंद्राने कुणाच्या साथीने दीड दिवसाचे राज्य भोगले ते का लपवताय..? कृष्णाजी भास्कर सारखे.. Proud

वर्ष पुर्ती बद्दल अभिनंदन... सुरुवातीला जरा संयमी वगैरे वाटत होते.. पण आताशा तेच तेच बोलणं आणि त्या पदाला न शोभणारी वक्तव्य करण आती होतयं असं वाटायला लागलं आहे. हे.मा.वै.म.

कुजबुज मोहीम कशी चालवली जाते याचं प्रत्यक्षीकच सर्वांसमोर दाखवल्याबद्दल धन्यवाद..!! Biggrin

लाजले वाटतं.. अजुनही मनाची शिल्लक आहे हे पाहुन भरुन आलं...!! Rofl

कुजबुज मोहीम कशी चालवली जाते याचं प्रत्यक्षीकच सर्वांसमोर दाखवल्याबद्दल धन्यवाद..!! >>>>>>>
बघा बघा कोण बोलतंय !
Lol
फडणवीस च्या मिसेस बद्दल सतत कुजबुज करून दमले वाटतं !

त्याला कुजबुज नाही म्हणात महाशय. त्याला संदर्भासहीत स्पष्टीकरण म्हणतात..!! Biggrin

ते सर्वांनी आधी टीवीवर पाहिलेलं असतं.. नाही म्हणजे दाखवणार्‍यानेच दाखवलेलं असतं..!! Rofl

>>ते सर्वांनी आधी टीवीवर पाहिलेलं असतं<<
अहो मग त्या मटा वाचायला सांगतायत त्याला का कुजबूज म्हणताय म्हणे?
जरा तरी काहीतरी लॉजिक लावा हो.... दरवेळी कशाला हात दाखवून अवलक्षण?

>>अजुनही मनाची शिल्लक आहे हे पाहुन भरुन आलं...<<
या गोष्टी कुणी कराव्यात? ज्याला इथुन हाकलून दिलय तरी लोचटपणा करत आलेल्या आयडीने? Rofl

Pages