Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इडली, चटणी, सांभार.
इडली, चटणी, सांभार.
इडली आणि मृणाली चे डोसे .
इडली आणि मृणाली चे डोसे ..मस्त...सगळेच फोटो प्रचंड तोंपासू आहेत..
अक्षय तृतीया आजचा लंच मेनू
अक्षय तृतीया - (नंतरच्या रविवारी बनविलेली आम रस पुरी आणि वांग + बटाटा + टोमॅटो ची सुक्की भाजी
आजचा लंच मेनू : इडली, चटणी, (घरी बनविलेली) ,टोमॅटो सेव भाजी (कॅन्टीन च्या महाराज ची कृपा).
अजनबी, छान, इडली मध्ये काय
अजनबी, छान, इडली मध्ये काय नाचणी वगैरे मिसळले आहे का? रंगावरून वाटले.
नाही मानव जी , माझ्याकडे
नाही मानव जी , माझ्याकडे पांढरी उडदाची डाळ न्हवती, म्हणून अक्खे काळे उडीद काल भिजत घातले आणि जमतील तेवढी साले काढून मिक्सरला दळून घेतली म्हणून थोडा रंग उतरला इडलीत. (हा... हा.... हा ....) बॅटर रेशनचे तांदूळ, काळी उडदाची डाळ आणि मेथी दाणे यापासून बनविले होते, छान स्पंजी,जाळीदार बनल्या होत्या इडल्या .
इडल्या....भयानक सुंदर इडल्या
इडल्या....भयानक सुंदर इडल्या आहेत सगळ्यांच्या! मला इडली आणि डोसे अतिशय आवडतात. ब्रेकफास्ट- लंच -डिनर -स्नॅक्स कधीही खाऊ शकते आणि कितीही दिवस सलग.
आता इडल्या करणं आलं
रानभुली, सर्व पदार्थ बघून- लक्षात ठेवून कमेंट दिल्याबद्दल धन्यवाद!
बाजरी चे डोसे मस्तच दिसताहेत
बाजरी चे डोसे मस्तच दिसताहेत !! चटणी पण छान !!
रेसिपी सांगाल का दोन्ही ची ?
इडल्या....भयानक सुंदर इडल्या
रिपीट
धन्यवाद !
धन्यवाद !
बाजरी चे डोसे मस्तच दिसताहेत !! चटणी पण छान !!
रेसिपी सांगाल का दोन्ही ची ?>>>>
नवा पाककृती धागा काढलाय. इच्छुकांनी कृपया लाभ घ्यावा.

इडली, सांभार, आमरस पुरी..
इडली, सांभार, आमरस पुरी.. भारी आहेत सगळे पदार्थ..!
मृणाली.. छान प्रयोग करतेस आहारात...
बाजरी डोसा रेसिपी मस्त..!
कुणी रेसीपी विचारली की पडत्या
कुणी रेसीपी विचारली की पडत्या फळाची आज्ञा मानून लगोलग पाकृ विभागात पाकृ धागा काढुन लिहावी.
जास्त लोकांपर्यंत पोचते, मायबोलीच्या पाकृ ऍप मध्ये दिसते, शोधायला सोपी जाते.
कुणी रेसीपी विचारली की पडत्या
कुणी रेसीपी विचारली की पडत्या फळाची आज्ञा मानून लगोलग पाकृ विभागात पाकृ धागा काढुन लिहावी.>>>>>>>

लिहिते नव्या धाग्यात.
अरेच्या इडली, डोसा ह्यांचेच
अरेच्या इडली, डोसा ह्यांचेच जास्ती फोटू दिसतायेत.
प्राजक्ता माझही अगदी असंच आहे.
मी इडली, डोसा हे दिवसातल्या कोणत्याही वेळेस आणि कितीही खाऊ शकते.
मी गतजन्मी सौंद इंडियन होते की काय असा संशय येतो
कैरीच लोणचं.
कैरीच लोणचं.
हे वर्षभराच नाही घातलं.
तात्पुरतं घातलंय.
इडल्या....भयानक सुंदर इडल्या
इडल्या....भयानक सुंदर इडल्या आहेत सगळ्यांच्या! मला इडली आणि डोसे अतिशय आवडतात. >>+१
लोणचं बघूनच तोंपासू!
फालूदा
फालूदा
मस्त ! फालूदा प्रचंड आवडीचा.
मस्त ! फालूदा प्रचंड आवडीचा. आमच्याईथे बरेच ठिकाणी मिळायचाही छान. फक्त माझे पोट गच्च होऊन जाते
फालुदा मस्त
फालुदा मस्त
कैरीचे लोणचे तोंपासु... मला घरी बनवलेले च कैरी लोणचे आवडतं..सोपं आहे का बनवणे??असेल तर सांगा न रेसिपी.
लोणचे , फालूदा एकदम भारी...
लोणचे , फालूदा एकदम भारी...
लोणच , मस्त.
लोणच , मस्त.
फालुद्याने डोकं खराब झाले... का आले मी इथे.
कच्ची पपई आहे काय होईल ?
कच्ची पपई आहे
काय होईल ?
वा..लोणचं, फालूदा आणि
वा..लोणचं, फालूदा आणि प्रेझेंटेशन.. सगळंच छान
कच्ची पपई आहे काय होईल ?>>>
कच्ची पपई आहे काय होईल ?>>>> कच्ची पपई किसून घ्या आणि थालीपीठ बनवा. कांद्या ऐवजी पपई घालायची.
भाजी पण बनवू शकता. जीर मोहरी मिरची आणि हिंग कढीलींबाची फोडणी.
लोणच, फालूदा मस्त !!!!!!!
काल नवीन आयटम ट्राय केला ..
काल नवीन आयटम ट्राय केला .. जेली केक
एक छोटीशी गडबड झाल्याने फिनिशिंग थोडी गंडली पण टेस्ट मात्र कमाल झालेली. कधी नाही ते मी गोड पदार्थ असून तुटून पडलो
.
आणि हा वर आलेल्या ईडल्यांना
आणि हा वर आलेल्या ईडल्यांना आमचा झब्बू.. तसा माझा कमी आवडीचा प्रकार. मी ईंडलीपेक्षा घावणा डोसा लव्हर.. फक्त ईडली फ्राय तेवढी आवडीची. मात्र चटणी छान झाल्ली असल्याने सोबत चहाचा घोट घेत घेत खाल्या पोटभर
.
स्टीमर मस्त आहे.
स्टीमर मस्त आहे.
जेली केक पण भारी.
अमच्याकडे पण आज इडल्या:
अमच्याकडे पण आज इडल्या:

इडल्या मस्त, इडली रवा कि
इडल्या मस्त, इडली रवा कि तांदळाच्या आहेत मानव?
तयार घरगुती इडली बॅटर आणले.
तयार घरगुती इडली बॅटर आणले.
ते बहुतेक तांदळापासून केलेले बॅटर आहे.
आज इडली डे आहे..
Pages