खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मुंबई : फिट इंडिया अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना शेवग्याच्या पराठाचा उल्लेख केला होता. त्यांनी आपल्या तंदुरुस्तीचे राज ओपन करत सांगितले की, आठवड्यातून किमान दोनदा शेवग्याच्या शेंगाचे पराठे खायला हवेत. आणि मी आहारात शेवगा नेहमी घेतो. (Do you know the fitness mantra of Prime Minister Narendra Modi)

https://www.tv9marathi.com/lifestyle/khana/do-you-know-the-fitness-mantr...

शेवग्याच्या शेंगा खा : मोदीजी

पराठे पानांचे करतात की शेंगांचे ?

गेल्या १ १/५ महीन्यात केलेले पदार्थ. आज खूप दिवसांनी आले ईथे आणि फोटो पाहून मी पण केले upload ... Happy

IMG-20201220-WA0008.jpg
Red velvet cake for anniversary.

20201228_215807.jpg
Thai curry with herb garlic rice.

20201228_215936.jpg
Red sauce pasta with salad and Garlic bread.

20201228_220014.jpg
चिकन रस्सा आणि भाकरी

20201228_220130.jpg
सामोसा चाट (सामोसे आईची स्पेशालिटी आहे)

20201228_220300.jpg
घरी चक्का बनवून पहिलेंदा केलं श्रीखंड. मँगो पल्प वापरला आहे.

20201228_220318.jpg
ओवन मध्ये केलेला कँरेमल कस्टर्ड (caramel custard)

वॉव पिकू सर्वच पदार्थ मस्त. केक भारी झाला आहे.......+१००१.
लग्नाच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! थाई करीची रेसिपी स्वतंत्र धाग्यात येऊ दे.

सगळे पदार्थ एक से बढकर एक .. केक तर सहीच दिसतोय एकदम !!
बाकीही सगळे पदार्थ मस्तच ..
थाई करीची रेसिपी स्वतंत्र धाग्यात येऊ दे +१११

धन्यवाद सगळ्यांना Happy
देवकी.. थँक्स शुभेच्छांंसाठी. So sweet of you!!
थाई करीची टाकते रेसिपी लवकरच.
केक सगळ्यांना आवडला य हे वाचून ईतकं भारी वाटतय.. lockdown मधेच बेकिंग सुरू केलय आणि आता आता छान जमतंय दोन्ही.. बेकिंग आणि क्रीम फ्रॉस्टिंग.. माझा confidence boost up झालाय हे वाचून.

पिकू, खूप सुंदर . मृणाली , पसीट्टू मस्तच

अमुपरी , इथे लिहिलेली हाफ फ्रायची पाकृ वाचून मी करून पाहिलं हाफ फ्राय. अकवायर्ड टेस्ट आहे हे खरं . पहिल्यांदा ट्राय करण्याऱ्याना थोडं अवघड वाटू शकते

पास्ता, थालीपीठ मस्त.. काल आमच्या कडे हा सेम मेन्यू होता. सकाळी साबुदाणा घालून उपासाचे थालीपीठ आणि रात्री पास्ता.
Mrunali पेसरट्टू सहीच... हैदराबाद ची आठवण झाली. तिथे चटणीज् नावाच्या restaurantमधे अशक्य भारी मिळतं हे .. रव्याचा उपमा। बरोबर. सोबत ६ प्रकारच्या चटण्या आणि सांबार. उपमा कच्च्या रव्याचा पातळसर करतात.. फार मस्त असतं.
गाजर हलवा छान दिसतोय..

Pages