खाऊगल्ली - आजचा मेनू - (३)

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला Happy

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कार्ळ्याची चटणी मस्त.
Mrunali भेंडीची भाजी आणी छोले आहेत का मस्त ताट.
लावण्या रव्या चे लाडु मस्त. वरती काय आहे पुरया का कडाकणी?

बेकिंग आपला प्रांत नव्हे..पण मुलीच्या हट्टापायी म्हटलं एकदा ट्राय मारूयात..
ख्रिसमस बेकिंग..स्ट्राॅबेरी क्रिमचीज केक.. सुरूवात बरी होती..
2C5659E7-1F9C-4BDB-9A14-D0CAB9B5DF4C.jpeg

पण त्यानंतर क्रिमचीज आणि स्ट्राॅबेरीला थंडीत घाम सुटला..4C888EDC-2E88-45B6-BB12-2720D3BCC942.jpeg

1608825573818.jpg

बर्गर पार्टी

1608825625117.jpg

या पानावर मृणाल ने केलेली भेंडी याचीच चर्चा वाचली म्हणून मागच्या पानावर बघायला गेले तर सगळे फोटो दिसत आहे पण भेंडीचा काही दिसत नाहीये .
इडली च्या प्रमाणासाठी धन्यवाद मृणाल !

पुऱ्या , लाडू , केक छान दिसत आहेत .

बर्गर तोंपासू .

BB9BA1B5-A811-49E3-A971-4A444C9A8608.jpegपहिल्यांदा शेवयाचा उपमा ट्राय केला तेव्हा उप्पीट सारखा केला. कदाचित पाणी जास्त झाले असावे, सोलापूर ला पूर्वी सिनेमाची पोस्टर्स भिंतिवर लावायला खळ करत तसा झाला. आता शेवया उकळत्या पाण्यात गॅस बंद करून पाच मिनिटे ठेवून मग ड्रेन केल्या.

छान शेवयाचा उपमा!
पहिल्यांदा माझेही असंच झाले होते पण आता झाकण न ठेवता शिजवते..मोकळा होतो.

मला खरं जेन्युनली डाऊट होता.. मी ते फॉक्स लाईफ वगैरे वर बघते ते एग प्रकार बहुतेकदा असेच हाफ फ्राय वाले असतात..मग ते कच्चं कच्चं लागत नाही का??

शाकशुका मस्त !

मृणाली तुम्ही हाल्फफ्राय आणि ब्रेड नाही खात का? माझा तर जगात फेव्हरेट नाश्ता. विशेष म्हणजे जास्त त्रास न घेता मलाही करता येते ही जमेची बाजू. त्यामुळे भूक लागली की केले हाल्फफ्राय.. पण पावासोबतच खायला हवे. भात चपाती कामाची नाही तिथे.

हो अजून थोडंसं शिजायचंय पण जास्त नाही.. चमचा लागला की अंड्यातला बल्क छान ओघळला पाहिजे.. वरून थोडंसं चीज भुरभूरायचं की झालं

Kazumi काय काय आहे ताटात फीश आहे का? शाकशुका मस्त दिसत आहे. माझी मावशि असाच शाकशुका सारखा प्रकार करते पण त्याला ती बफाट असे बोलते .

भूर्जी,आम्लेट पाव/ब्रेड खाते..पण हाफ फ्राय नाही खाल्ले कधी...

चमचा लागला की अंड्यातला बल्क छान ओघळला पाहिजे>>>>>>हेच झेपणार नाही Proud

हेच झेपणार नाही > हो खरेय. नाही झेपत हे प्रत्येकाला. माझ्या शाकाहारी बायकोने जेव्हा पहिल्यांदा अंडे खायला म्हणून लग्नानंतर माझ्याकडे काहीतरी बनवून मला खाऊ घाल अशी फर्माईश केली तेव्हा मी मुर्खासारखे तिला हाल्फफ्राय खाऊ घातले, पुन्हा सहा महिने अंडे खायचा विचार केला नाही तिने Happy

Pages