सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अशा तक्रारींची महाराष्ट्रातील लिस्ट दिली तर मायबोलीच्या सर्व्हरची क्षमता संपेल. योगिनी स्वतः दखल घेऊन कारवाई केली नाहीये, 'कोणीतरी' तक्रार केली आहे.
इथे कंगनावर लाईव्ह टीव्हीवर कारवाई सुरू झाली जी घरी बसून असणाऱ्या महाविकासआघाडी सरकार मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांच्या इच्छेनुसारच झालेली आहे आणि सर्वांनीच लाईव्ह पाहिली, कोणीही एका फोनवर थांबवू शकलं असतं ना पण थांबवायचं नव्हतंच.

उत्तर प्रदेशात माध्यान्ह भोजनात मुलांना रोटी आणि नमक देतात ही बातमी दिली म्हणून पत्रकाराला अटक होते. पण त्यात दयाळू योगींचा काही हात नाही. कफील खान महोनोन महिने तुरुंगात असतो. त्यातही दयाळू योगींचा हात नाही.

रिपब्लिकचे पत्रकार झाले म्हणजे त्यांना वाटेल ते करायची मुभा आहे. कोणाच्या घरात घुसायची. दमदाटी करायची. त्यांना अडवणार्‍यांनाच अटक करायला हवी

काश्मीर , केरळनंतर आय टी सेल महाराष्ट्राबद्दल द्वेष भाव ना पसरवण्याच्या उद्योगाला लागली आहे.

कंगनाने वापरलेले पी ओ के, पाकिस्तान, बाबर सेना हे शब्द वेगळं काही सांगत नाहीत.

जंटल रिमाइंडर. सुशांत सिंग तो बहाना था. असली मक्सद विरोधी पक्षांची राज्य असलेल्या सरकारांना त्रास देणं हाच आहे.

उद्धव ठाकरेंवरचं कार्टून शेअर केलं म्हणून निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली म्हणे. (मी नाही म्हणे- अतुल भातखळकरनी ट्विट केलंय.)

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1304411651349737479?s=20

कार्टून शेअर करतोय फ्याशिष्ट म्हातारा..अशीच अद्दल घडवली पाहिजे या लोकांना- अशा पोस्ट्स येणार का आता? की परत वाडोखु?

कार्टून शेअर करतोय फ्याशिष्ट म्हातारा..अशीच अद्दल घडवली पाहिजे या लोकांना- अशा पोस्ट्स येणार का आता? >>>>>>
अशी मारहाण केल्याने मते वाढतील असा सैनिकांचा गैर समज दिसतोय !
अगोदरच त्या महिले बरोबर वाद वाढवून इज्जत घालवली , आता अशा मारहाणीच्या केसेस करून सेनेची कु प्रसिध्दी च होणार आहे पण हे समजून घेण्याची बुध्दी सैनिका ला नसते आणि संपादक तर सैनिकांच्या पुढचे !
कालच्या एपिसोड संपल्याचे संपादकांच्या घोषणे
नंतर सेनेचे नष्टचर्य संपले असे वाटले होते .
कसं व्हायचं देवा या सेनेचे !

राज्यात महाविकासआघाडी सरकार आहे. सरकारच्या सर्व पराक्रमाचे श्रेय काँग्रेस, राकॉ , सेना तिघांचं आहे. एकट्या सेनेचं नाही.
खरं तर जुने बाळासाहेबांच्या वेळचे शिवसैनिक कुठेच दिसत नाहीत. ते गप्प आहेत किंवा आता मागे पडलेत.

सेनेचे काही होत नाही.
खासगी करणं,उद्योग पती ची कर्ज आणि त्या मुळे dubnarya बँका,बेरोजगारी,धार्मिक उन्माद आणि त्या मधून होणारा हिंसाचार...
ह्या मुळे भारतीय जनता पार्टी च dubel हे नक्की.
सेना आहे तशीच राहील.

सेना टिकायला हवीच, निदान उद्धवजी अध्यक्ष असेपर्यंत तरी सेनेची गरज व महत्व राहायला हवंच व राहील. पुढे त्यांनी निवृत्त होऊन पुढच्या पिढीला ताबा दिल्यावरचं माहीत नाही.
मला इतकंच दिसलं की भाजपवर fascism वगैरे आरोप करण्यात पुढे असलेले लिबरल्स बंगल्यावर नेऊन मारहाण, सोशल मीडिया पोस्टवरून मारहाण, कोर्टाच्या आदेशाला न जुमानता बांधकाम पाडणं याचं समर्थन करताना सर्वाना दिसले आणि त्यामुळे त्यांचं खरं रूप उघड झालं. बस्स इतकंच.

कंगणाला आठवले सपोर्ट करणार. आणि ही आरक्षणाच्या विरोधात आहे. >>>> आठवलेनी तिला का सपोर्ट केला हे त्याना विचारणे योग्य. त्यानी तिला सपोर्ट केला याचे कारण महाराश्ट्र सरकार आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत आहे म्हणुन असेल.

मला वाटते टीव्ही चॅनेल्स आजकाल बातम्यांपेक्षा भावना भडकावणे आणि द्वेष पसरवणे, एकाच्या आयुष्याची लक्तरे करून दुसर्यांना विकण्याचे काम करीत आहेत. टीव्हीचे दर्शकही नुसते दर्शक न राहता एकेक बाजू निवडून सैनिक झाले आहेत.

<<<जंटल रिमाइंडर. सुशांत सिंग तो बहाना था. असली मक्सद विरोधी पक्षांची राज्य असलेल्या सरकारांना त्रास देणं हाच आहे.>>>+११११

महाराष्ट्राचे नशीब की कोरोना काळात फडणवीस मुख्यमंत्री नाहीयेत.

बाकी एका रात्रीत आरेतील झाडे तोडणे योग्य , अगदी पहाटे सरकार बनवणे योग्य तर नोटीस देऊन अनधिकृत बांधकाम तोडणे अयोग्य कसे?

महाराष्ट्राचे खूप मोठे दुदैव उठा मुख्यमंत्री आहेत.द्वेषाचे राजकारण आणी दडपशाही करणार्या पक्षाला जनता माफ करणार नाही.त्यांचे वाईट दिवस लवकर सुरू होतील.उठा जास्त दिवस मुख्यमंत्री राहणार नाही.हिटलर शाही सहन केली जाणार नाही.कॉंग्रेस सारखा डिसेंट पक्ष कसे काय साथ देतोय कळत नाही.राष्ट्रवादी कुणाबरोबर जायला तयार असते.पण तिही एवढी गुंडशाही करत नाही.गर्वाने घर खाली व्हायला हवंच.उठा माणूस म्हणून ठीक पण मुख्यमंत्री म्हणून आजीबात योग्य नाही.

सनवजी, तुम्ही नेहेमीप्रमाणे लोकांनी न लिहिलेलें वाचून त्यावर टीका करताय. बंगल्यावर नेऊन मारहाण, सोशल मीडिया पोस्टवरून मारहाण, कोर्टाच्या आदेशाला न जुमानता बांधकाम पाडणं याचं समर्थन कोणीही केलेलं नाहिये. आप आदत से मजबूर है.

योगीजी अत्यंत कोत्या मनोवृत्तीचे व fragile ego असलेले आहेत. आपल्या राज्यात दुसराच कुणी लोकप्रिय होतोय, तोही मुस्लीम, यावरून योगीजीची सटकली आणी त्यांनी काफिल खान यांना आधी भ्रष्टचारा च्या केस मध्ये अडकवण्याच प्रयत्न केला आणी मग सी ए ए च्या. काफिल खान च्या भाषणात काहीही द्वेषमूलक नव्हते असे हाय कोर्टनेही लिहिले आहे. बीदर च्या केसचाही सी ए ए शी संबंध नाही.

मूळ विषयाकडे,
सुशांत ने आत्महत्या केली होती असे आता बहुतेक सर्वांना (ज्यांना बिहार निवडणूकीची पोळी भाजून घ्यायची आहे ते सोडून ) पटले असावे.
या निमित्ताने भारतीय समाजमनातील दोन दोष अधोरेखित झाले.

१ Misogyny : मुलगा व मुलाचे कुटुंबिय हे नेहेमीच बरोबरच असतात. त्यांनी संगितलेले वाक्य ब्रम्हसत्य म्हणून स्वीकारले पाहिजे. त्यांनी एफ आय आर मध्ये केली विधाने चक्क खोटी निघाली तरी ही "मुलीकडच्यांनी पडते घ्यायला हवे"
"मेरा बेटा ऐसा कर ही नही सकता, वो जरूर उस चुडैल की साजिश है जिसने उसपे काला जादू किया होगा"
मुलाने गांजा घेतला तर तो क्यूट, खट्याळ, नटखट, खोडकर. मुलीने घेतला तर कुलटा, विषकन्या, ई ई.
मुलगी नेहेमी gold digger असते पण मुलगा serial womanizer असत नाही.

२ ढोंगीपणा: एके काळी आपल्याकडे गर्भपात बेकायदा होते. "आमचे औषध गर्भवतीनी मुळीच घेऊ नये, एका दिवसात गर्भपात होईल" अशी वार्निंग असलेल्या जाहिराती येत असत. समझने वाले को इशारा.... अधून मधून एखाद्या गर्भपातात आईचा जीव जाई मग पोलिसाला चिरीमिरी ...
१९६० च्या सुमारास गर्भपात कायदेशीर झाले.
आज गांजाची तीच अवस्था आहे. रियाला ५६ ग्रॅम गांजावरून आत टाकले आहे. एखादे इंजिनियरिंग होस्टेल झाडून काढले तर कचर्‍यात यापेक्षा जास्त गांजा मिळेल. समाजात एखादी समस्या ( मग ती गर्भपाताची असो , डिप्रेशनची असो वा गांज्याची) आहे हे प्रांजळपणे मान्य करून त्यावर रिझनेबल उपाय करण्यापेक्षा ती समस्या नाहिच्च आहे मुळी, असे म्हणून तोंड वाळूत खुपसणे.

ED, NCD, CBI या संस्था जर टी व्ही अँकर्स कडूनच आदेश घेणर असतील तर मग ते formalize तरी करूयात.
या सर्व संस्थामध्ये सुपर डायरेक्टर हे डायरेक्टर च्या वरचे पद निर्माण करून त्यावर आर्णब, नविका, राहूल शिवशंकर, ई ई लोकांची नेमणूक करावी.

लोक कशाचीही तुलना कशाशीही करतात.
आरेतील वृक्षतोड आणि कंगनाच्या बांधकामावर हातोडा याची तुलना? Rofl

बाकी एकूणच पोस्ट करमणूक करणारी आहे Wink

सेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर नी एस आर ए मधील बळकवलेल्या फ्लॅट मध्ये ऑफिस थाटल्याचे आणि मंत्री परब यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाचे कागदपत्रे किरीट सोमय्या नी जाहीर केली .

अशा करू या यांचे हि बांधकाम पाडले जाईल !

भारतीय (ठराविक) समाजमनात अजुन काही दोष आहेत:
फसवा तटस्थपणा
मानभावी वैचारिकता
सरसकटीकरणाचा सोस
शिक्केमारुपणा
आत्मपरीक्षणाचा अभाव
इत्यादी इत्यादी

पण ते दोष असणाऱ्यांना ते फारसे मान्य नसते Wink

सर्व मीडिया गांजा (हिंदी मीडिया काही चॅनल सोडून) मारून तर्र झालीय .
सुशांत,रिया,शर्मा,उध्दव ह्याच्या वर च 24 तास प्रक्षेपण चालू आहे.
लोकांना कुढल्या तरी फालतू विषयात गुंतवायचे मध्येच चीन ,पाकिस्तान ची फोडणी द्यायची .
तरी जनतेला नशा आली नाही तर मुस्लिम कसे वाईट आहेत कसे देशाचे दुष्मान आहेत ह्या वर चर्चा ठेवायची( किती तरी वर्ष मुस्लिम राज्यकर्ते दिल्ली च्या तख्तावर बसले होते आणि त्यांनी तुकड्यात असलेला भारत एक च राजवटी खाली आणायचे प्रयत्न केले हे सत्य नाकारून ते झाकणा र आहे का.
धार्मिक तेढ निर्माण करायची आणि जिंकून यायचे एवढच काम bjp ni केले आहे.
देशाच्या चांगल्या चाललेल्या संस्था विकणे,बँकाची कर्ज फक्त बुडवण्यासाठी उद्योग पती ना वाटणे,जास्ती जास्त सरकारी क्षेत्रात खासगी कारण करणे,.
कामगारांचे हक्क ला सुरुंग लावणे,.
लोकांना आर्थिक संकटात टाकून ठराविक लोकांचा विकास करणे.
देशाची अवस्था खराब होत आहे आणि मीडिया फालतू विषयाचे प्रक्षेपण करून लोकांचे लक्ष सरकार चे उद्योग काय चालले आहेत ह्या वरून hatvat आहे.

गांजा चा मुद्दा बरोबर आहे... कॉलेज मध्ये सगळेच घेतात एकदा तरी... हॉस्टेल मधले तर नक्कीच...

भाजप च्या नेत्याने सैनिकांच्या गुंड शाही बद्दल बोलले की सैनिकांना झटके येतात !
पण संजय निरुपम ने रोज सेनेला सोलून काढलेले चालते .
निरुपम नी केलेली निंदा सेनेला फुले वाटतं असतील , काय करणार मजबुरी का नाम गांधी उगीचच म्हणत नाही .
पाच वर्ष मुखमंत्री पद टिकवायचे असेल तर निरुपम ची निंदा ऐकाविच लागेल !
एकंदरीत दोन्ही संजय महाराष्ट्रातील राजकारणाचे चे कुंड धग धगते ठेवण्याचे काम इमान इतबारे पाडत आहेत !

विकु,
तुमच्याबद्दल नव्हतं हो लिहिलेलं.
आणि जनरल बोलायचं तर समर्थन केलेलं नाही म्हणजे काय? या सरकारचं वकीलपत्र घेतल्यासारख्या रोज समर्थनाच्या पोस्ट्स चालू असतात. मी सरकारच्या अमुक एका स्पेसिफिक कृतीचं समर्थन करत नाही पण ओव्हरऑल सरकारचं समर्थन , प्रचार, advocacy रोज actively करतोय याला काही अर्थ नाही. हे सरकारचे enabler आणि म्हणून प्रत्येक कृतीत पापपुण्याचे वाटेकरी आहेतच.

बिदरची केस सीएए चीच होती. तुम्ही कोणती दुसरी म्हणत असाल तर लिंक द्या.

संजय निरुपम चे पंख काँग्रेस नी छाटून टाकले आहेत सध्या तो कोणत्याच पदावर नाही.
त्या संजय निरुपम ला कुरवाळले तर काँग्रेस खुश होईल आणि त्याला प्रती उत्तर दिले की नाराज होईल असे काही नाही.
काँग्रेस मध्ये निरुपम चे अस्तित्वच नाही.
Bjp कडे तो मोठ्या आशेने बघत आहे

MTNL ची वाट लावली, एलआयसी विकायला काढली,रेल्वे चे खासगी करणं चालू आहे.
बेरोजगारी चरम सीमेवर आहे.
चीन नी भारतीय भूमी ताब्यात घेतली आहे.
नेपाल पण भारताला दम देत आहे.
देशात corona ni उच्छाद मांडला आहे आणि corona चा भारतात प्रवेश बेजबाबदार केंद्र सरकार मुळे झाला आहे.
धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे.
ह्या वर bjp चे गुणगान गात आहेत त्यांनी बोलावे.
सुशांत,रिया चे काय करायचे ते तपास यंत्रणा ठरवतील.

>>कंगनाला 2018 ला नोटीस दिली होती

मग फडणवीसने का नाही पाडली ?<<

कुठल्याही गोष्टीत फडणवीसना आणल्याविना चैनच पडत नाही राव काही लोकांना Wink

बीएमसी, महापौर, मुख्यमंत्री वगैरे बेसिक्स क्लिअर करुन घेत चला जमेल तेंव्हा Lol

MTNL ची वाट लावली, एलआयसी विकायला काढली,रेल्वे चे खासगी करणं चालू आहे. >>>>>>>>

मी त्या गोष्टींचे प्रत्येक वेळी समर्थन करत नाही , पण बी एस एन एल सारख्या आजारी कंपन्या पोसायला सरकार सामान्य लोकांच्या खिशातून च काढून त्या आळशी कर्मचाऱ्यांना देत असते .
आणि बी एस एन एल चे मान्य आहे पण एल आई सी विकायला काढल्याची लिंक टाका ...
बी एस एन एल ची सर्व्हिस इतकी third class होती की त्यांच्या सर्व्हिस वर संतुष्ट असलेला ग्राहकाचा अप्पा बळवंत चौक मध्ये एके काळी सत्कार करण्या पर्यंत गोष्टी गेल्या होत्या !

कोणत्याही सरकारी कार्यालयातील हिडीस फिडीस चे कौतुक करणे म्हणजे सामान्य लोकांचा त्रास वाढवणे होय .
सरकारी कर्मचारी पूर्वी पासून आळशी होते आणि राहणारच आहेत .
खासगी कंपन्यांत काम करणाऱ्यांना विचारा डोक्यावरती टांगती तलवार म्हणजे काय असते , नोकरी जाण्याच्या भीती ने खासगी कर्मचारी तीन तीन माणसाचे काम एकटा करत असतो ......
माझ्या नातेवाईकांच्या ओळखीचे एक व्यक्ती pwd मध्ये सर्व्हिस ला आहे !
काम काय तर pwd च्या सोसायटी ला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीच्या मोटार चे बटन दाबणे , टाकी भरली की बंद करणे !
या कामा साठी तीन शिफ्ट मध्ये तीन कर्मचारी किमान ४८००० पगार असलेले आहेत , ते तिघे ही बटण दाबायला जातच नाही , त्यांनी प्रत्येकी तीन चार हजार देवून एक माणूस ठेवला आहे बटण दाबायला ! हे pwd मधील सर्वांना माहीत आहे , आणि सर्वच बरबट लेले असतात .
कोणतेही सरकारी खाते असो वा कंपन्या कमी अधिक प्रमाणात सर्वत्र हीच परिस्थिती असते .
सरकारी कर्मचाऱ्यांना आपण गाढवा सारखे कष्ट करून अक्षरशः पोसत असतो हे लक्षात घ्या मग तुमचा सरकारी कंपन्या विकण्या बाबत चा विरोध आपोआप कमी होईल !!!
जर तुम्ही सरकारी खात्यात नोकरी करत असाल तर अपवाद आहे Happy

संस्था उभ्या करणे ही एका काळाची गरज असते
त्यांना विविध सवलती, अनुदाने देवून मोठ्या करणे, उभ्या ठेवणे ही त्या पुढच्या काळाची गरज असते
नंतर मोनोपली टाळण्यासाठी, सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी ग्लोबलायझेशन, पर्यायी स्पर्धक उभे राहू देणे ही पण गरज असते
आणि एकदा पर्यायी यंत्रणा उभी राहिली की अकार्यक्षम ठरणारी गुंतवणूक काढून घेवून ती अधिक आवश्यकता असलेल्या क्षेत्रात गुंतवणे ही पण काळाची गरज असते.

देशनिर्माणाचे हे विविध टप्पे आहेत.

पण हे बिगर पिक्चर ज्यांना कळत नाही (किंवा कळते पण त्यांच्या राजकीय विचारधारेला अडचणीचेच असते) असे लोक मग प्रायव्हेटायझेशनच्या नावाने ओरडायला सुरुवात करतात.

Pages