Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
I am just wondering whether
I am just wondering whether till date this lady found Republic channel totally unbiased, hungry for truth and just in SSR case it lost its way or whether Republic was like this from day one but she never bothered. I am also curious to know which unbiased and सत्यांवेषी channel she will join .
साधना, तुमची पोस्ट वाचून
साधना, तुमची पोस्ट वाचून लक्षात आलं की ती नक्कीच खोटं बोलत असणार. इतक्या उशिरा तिने अँक्शन घेतली म्हणजे नक्कीच त्या पत्रकार मुलीचाच इश्यू असणार. नाहीतर तिने पहिल्याच दिवशी चॅनल सोडलं असतं. माझ्या डोळ्यात अंजन घातल्या बद्दल धन्यवाद.
तिला तिचा एम्प्लॉयर काय आहे
तिला तिचा एम्प्लॉयर काय आहे हे आता कळले का हा प्रश्न मला पडला आणि नोटीस पिरियड संपायच्या आधी, म्हणजे रिपब्लिक तिच्या उरलेल्या दिवसांच्या पगाराचे काही बरेवाईट करेल याची भीती न बाळगता तिला सो मि वर येऊन सांगावेसे वाटले याचे आश्चर्य वाटले. आजवर रिपब्लिकसाठी तिने जी पत्रकारिता केली त्यात कुठेही काहीही चूक दिसले नाही?
असो, अंजन पडले तर चांगलेच आहे. दृष्टी सुधारेल.
तुम सब लोग मिलके एक लेडीज को
तुम सब लोग मिलके एक लेडीज को टारगेट कर रहे हो
काही अपवाद सोडले तर मी सर्व
काही अपवाद सोडले तर मी सर्व राजकारणी आणि त्यांच्या पक्षांचे "सब घोडे बारा टक्के" ह्यात मोजमाप करतो. ह्याच्यावर जाऊन एखादी हुकूमशाही रेजिम स्थानिक सरकार पाडण्यासाठी-एखादी निवडणुक जिंकण्यासाठी आख्खी मीडिया सुपारी देऊन कोणावर सोडत असेल तर आपल्या राज्याच्या-मुख्यमंत्र्याच्या बाजुने उभे राहायला हवे. सोमीवर मराठी लोकांचा उद्धार नाही पाहिला का आज ?बिचाऱ्या पोस्टमनलाबी नाय सोडला. कंगनाचे बांधकाम पाडून सेनेने मोठी घोडचुक केली आहे. एवढी वर्षे राजकारणात काढूनही ठाकरेंचे डोके काम देत नाही का ? बीजेपी थिंकटॅंक - रेशीमबागवाले काय सामाजिक प्रयोग करतील भरोसा नाही.
ती बया अशीही येडीच दिसते. कश्मिरी ब्राह्मण-अयोध्या असले तिच्या तोंडचे शब्द वाऱ्याची दिशा स्पष्ट करतात. आपल्याला कुत्रं चावलं तर आपण कुत्र्याला थोडी चावतो ? #स्मृती २.० (बीटा)
जिद्दू+१००.
जिद्दू+१००.
जिद्दु,
जिद्दु,
मराठीच्या मुद्द्यावरून भाजपला, फडणविसना विरोध नेहमीच केला आहे. पण ठाकरेंच्या नव्या पिढीचा मराठीशी काही संबंध नाही. त्यांचे मित्रमैत्रिणी बॉलिवुडचे अमराठी हायफाय लोक, प्राधान्य मुंबईच्या नाईट लाईफला, शिक्षण- विचार इंग्रजीतून आणि पोस्टर केम छो वरळीचं! मध्यमवर्गीय परिस्थितीशी काहीच संबंध नसल्यामुळे राहुल गांधींप्रमाणेच सामान्य माणसाशी कनेक्ट करता येत नाहीये.
त्यामुळे आता मराठीच्या मुद्द्यावरून सेनेला त्यांनी काहीही केलं तरी सपोर्ट करत राहावा अशी परिस्थिती आहे का? ज्यांच्यासोबत सत्तेत बसलेत त्यानी परप्रांतीय बिल्डर कंत्राटदार लॉबीला मोकळं कुरण दिलं नाहीये का?
आपल्याला कुत्रं चावलं तर आपण
आपल्याला कुत्रं चावलं तर आपण कुत्र्याला थोडी चावतो ? +१
सनव, तुमचे हे मुद्दे बरोबर
सनव, तुमचे हे मुद्दे बरोबर आहेत पण त्याचा सध्या चाललेल्या घटनांशी सम्बन्ध नाही. मंत्रालयात प्रत्येक गोष्टीचे रेटकार्ड असून बिल्डरलॉबी कडून सत्ताधारी-विरोधक सर्वांनाच पैसा जातो. ठाकरे-पवारांची ही पिढी माझ्याच वयाची असल्याने त्यांच्या सोशललाईफबद्दलही माहिती आहेच.मी इथे कधीही कोणाच्या समर्थनात काही लिहीत नाही. माझा विरोध उद्योगपती -मोदी-शहा यांनी जे देश डब्यात घालण्याचे उद्योग केले-चालू केलेत त्यांना आहे. वैयक्तिक राहुल गांधी मला चांगले वाटतात. सरकार पाडापाडीसाठी - आपल्या विरोधकांच्या दमनासाठी जे मार्ग वापरले जात आहेत त्याला विरोध आहे.
ओके जिद्दु!
ओके जिद्दु!
तुमच्या अनुभवांचा आदर आहेच. माझा मुद्दा फक्त तुम्ही जे सोशल मीडियावर मराठी लोकांचा उद्धार वगैरे लिहिलंय त्याबद्दल आहे. मी आज अजून बघितलं नाही पण मोस्ट राईट विंग अमराठी लोकांना छत्रपतींबद्दल 500 वर्षातले पहिले हिंदू सम्राट म्हणून प्रचंड गर्व व हक्काची भावना पाहिली आहे. शिवसेनेवर टीका म्हणजे मराठी माणसावर टीका नसते.
मुंबईत बिल्डर- प्रशासन
मुंबईत बिल्डर- प्रशासन-राजकारणी अशी फिक्स साखळी आहे. यात राजकारणी फक्त आलटून-पालटून येतात, बिल्डरलॉबी ही अमराठी आहे आणि पुढेही राहणार. प्रत्येक शीर्षस्थ नेत्यांचे ठराविक बिल्डर आहेत. जसे कि अशोक चव्हाणचा रिद्धी-सिद्धी-रेणुका यापैकी एक नावाचा मोठा बिल्डर आहे, त्यांच्या काळातच नवीन कफ परेड उभा राहिलं. पवारांचे पंचशील-देशपांडे-मगरपट्टा-भोसले-काकडे असे बरेच आहेत. ठाकरेंचे भोसले-हिरानन्दानी-जुने गिरणीवाले आहेत. लोढा-काकडे आणि गॅंग भाजपकडे आहेत. म्हैसकर नितीनचा आहे. नाशिकचा अशोका भुजबळच आहे . अजूनही बरीच नावे आहेत.
माझा मुद्दा फक्त तुम्ही जे
माझा मुद्दा फक्त तुम्ही जे सोशल मीडियावर मराठी लोकांचा उद्धार वगैरे लिहिलंय त्याबद्दल आहे.>>> आज युट्युबवर हिंदी-इंग्रजी वाहिन्यांच्या लाईव्ह प्रक्षेपणात जो लाईव्ह चॅट ऑपशन असतो तो पाहिल्यावर शिवसेनेबरोबर मराठी लोकांनाही शिव्या चालू होत्या. आता ते एकतर आयटीसेलवाले असतील किंवा/आणि अमराठी असतील.
केवळ मुंबई नाही, पूर्ण
केवळ मुंबई नाही, पूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार आहे.
उद्धव ठाकरे भानावर येतील, सावरतील आणि आपलं राजकारण कोण संपवू पाहतंय हे त्यांच्या लक्षात येईल का?
आज युट्युबवर हिंदी-इंग्रजी
आज युट्युबवर हिंदी-इंग्रजी वाहिन्यांच्या लाईव्ह प्रक्षेपणात जो लाईव्ह चॅट ऑपशन असतो तो पाहिल्यावर शिवसेनेबरोबर मराठी लोकांनाही शिव्या चालू होत्या.//
त्या शिव्या विशिष्ट घटनेच्या ट्रिगरमुळे होत्या ना?
उगाच उठून रोज कोणी मराठी माणसाला शिव्या द्यायचा नियम केलेला नाहीये.
हे सगळे 'अ'मराठी लोक छत्रपती शिवाजी महाराज ते डॉ आंबेडकर सर्व मराठी राज्यकर्त्यांचं नेत्यांचं ऋण मान्य करणारे, लताबाईंपासून सचिन पर्यंत सर्व मराठी कलाकार, खेळाडू यांना डोक्यावर घेऊन बसणारे असेच असतात. अगदी सेनेवर टीका करतानाही बाळासाहेबांबद्दल मात्र इमोशनल होत असतात.
महाराष्ट्र द्वेष हा नवीन नाही
महाराष्ट्र द्वेष हा नवीन नाही खूप जुना आहे.
जास्त करून उत्तर भारतीय राज्य जी पूर्णतः महाराष्ट्र वर अवलंबून आहेत.
येथून हकालपट्टी केली तर त्या राज्यात पोट भरत नाही म्हणून गृह युद्ध होईल.
किती ही शिव्या दिल्या तरी त्यांना महाराष्ट्र शिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही.
English चॅनल वर पण ह्या लोकांनी मराठी लोकांना शिव्या द्यावेत ह्याचा फायदा महाराष्ट्र ला होईल पूर्ण दक्षिण भारत उत्तर भारतीय लोकांच्या विरूद्ध जाईल .
कारण महाराष्ट्र सारखी वेळ त्यांच्या वर भविष्यात येईल ह्याचा त्यांना अंदाज आहे.
दक्षिणी राज्य बरोबर महाराष्ट्र नी युनियन बनवावी.
आणि ह्या सर्व राज्यांनी एक व्यावे
राम मंदिर च्या पाठी पडू नये.
{{{ दक्षिणी राज्य बरोबर
{{{ दक्षिणी राज्य बरोबर महाराष्ट्र नी युनियन बनवावी. }}}
हटाव लुंगी, बजाव पुंगी आठवतं का?
असा जर प्रत्येक व्यक्तीने
असा जर प्रत्येक व्यक्तीने राज्या पुरता विचार केला तर .....

प्रशांत भूषण चे बोलणे बरोबर होते
" काश्मीर ला स्वातंत्र्य देऊन टाका"
हळू हळू अखंड भारताचे तुकडे झाले तर चालतील का ?
बरं झाले तुमच्या सारखा विचार करणारे लोक खूप कमी आहेत
त्या त्या राज्यांचा विकास झाला पाहिजे हे बरोबर !!!!
सर्वात प्रथम या राज्यातील राज्यकर्त्यांनी परराज्यातील कॉन्ट्रॅक्टर ला काम देणे बंद करावे .
सत्तेत सहभागी असलेली काँग्रेस असे करून देईल का ?
आणि यात राममंदिर चा प्रश्न कोठून आला ?
मग तिथे चर्च बांधले पाहिजे का ?
महाराष्ट्र ! महाराष्ट्र असे तुमच्या प्रत्येक प्रतिसाद मध्ये ठासून लिहलेले असते , मग राज्य राज्यातील
वादविवाद मध्ये राममंदिर पणाला लावण्याचे विचार कसे काय डोक्यात येतात बुवा
हेमंत, तुनळीवर इंग्रजी
हेमंत, तुनळीवर इंग्रजी वाहिन्यांचे दोन दिवसांतले जादा व्ह्यूज असणारे विडिओ पाहिले तर कमेंटबॉक्समध्ये शिवसेनेच्या समर्थनात आणि अर्णब-कंगना विरोधात मराठीबरोबरच दाक्षिणात्य नावे असणारे युजरनेम्स पाहायला मिळतात.
ती खूप जुनी घटना आहे .
ती खूप जुनी घटना आहे .
आता परिस्थिती बदलली आहे .
दक्षिण ची राज्य आर्थिक विकास करत आहेत,शिक्षणात आघाडीवर आहेत.
उत्तरेच्या राज्य सारखी मागास आणि बेशिस्त नाहीत.
रोजगार निर्मिती करत आहेत.
उत्तरेची राज्य फक्त कामगार ची निर्मिती करत आहेत.
काळा ची गरज आहे .
दक्षिण कडील राज्याशी युनियन करणे.
गुजरात मधून जेव्हा गेल्या
गुजरात मधून जेव्हा गेल्या वर्षी उत्तर भारतीय ना हाकलून द्यायची मोहीम चालू केली गुजराती लोकांनी तेव्हा ते गुजराती लोकांना ते शिव्या देत होते .
न्यूज चॅनेल वर.
बेशिस्त लोकांना शिस्त लावायला गेली की त्यांच्या बुध्दी च्या capacity नुसार ते फक्त शिव्याच देवू शकतात .
जिद्दु सगळ्या प्रतिसादांना
जिद्दु सगळ्या प्रतिसादांना +१११११
हेमंत यांची मांडणी विस्कळित आणि प्रतिपादन far fetched असले तरी त्यात तथ्य वाटते. आजकाल हिंदीभाषकांचे जे दक्षिणेविरुद्ध ध्रुवीकरण झालेले दिसते आणि जी सर्वश्रेष्ठत्वाची आक्रमकता दिसते ती मला भयावह वाटते. ते इतरांच्या रूढी, पद्धती, रीतिरिवाज, भाषा यांचा अजिबातच मान राखत नाहीत किंवा भाव देत नाहीत. दूरच्या भविष्यात विंध्याच्या अलीकडे आणि पलीकडे अलगतावाद मूळ धरू नये म्हणजे झाले. पोट्टी श्रीरामलु यांचे आत्मदहन आणि त्याआधी आणि नंतरचा शिवाय हे उदाहरण घेऊन इतरत्र झालेला हिंसेचा उद्रेक यामुळे भाषावार प्रांतरचना करावी लागली, पण आता कधी कधी वाटते की तेव्हा लोक एकमेकांची भाषा, संस्कृती जाणत होते, तिचा आदर राखत होते हे एकाअर्थी समाजात समरसता राखण्यासाठी उपयुक्त होते.
ता. क. पुरवणी : आणि उत्तरेची लोकसंख्या दक्षिणेच्या मानाने भरमसाट वाढत असताना उत्तरेतून सत्तेपुरते एकगठ्ठा खासदार निवडून आणणे सोपे जाईल आणि काही ज्वलंत प्रश्नांवर त्यांचा अनुनय केल्याने फायदा होईल. आणि हा फायदा दृष्टिपथात असताना त्यांना सत्य समजावून सांगणे अथवा त्यांचे प्रबोधन करणे हे दूर कोपऱ्यात फेकले जाईल.
काँग्रेस पक्षाचा संयुक्त
काँग्रेस पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र चळवळविरोधी इतिहास आणि नंतर सत्तेत असताना महाराष्ट्र राज्यात परप्रांतीय लोकांना पसरलेलं रेड कार्पेट पाहता या पक्षाच्या लोकांनी मराठीचा मुद्दा आता बोलावा यासारखा दुसरा विनोद जगात नसेल. चालू द्या एकंदरीतच.
राज्य घटना चे जनक dr
राज्य घटना चे जनक dr Babasaheb Ambedkar हे खूप दूर दृष्टी चे होते ह्याचा प्रत्यय आता येत आहे.
लोकसभा च्या सभासद ची संख्या वाढवता येत नाही राज्य घटनेनी त्याला प्रतिबंध केला आहे.
अतिशय शिस्ती चा दक्षिण भारत आणि पश्चिम भारत लोकसंख्या नियंत्रित करेल आणि बेशिस्त उत्तर भारत लोकसंख्या वाढवेल हे त्यांना अगोदर च माहीत होते.
लोकसंख्या वाढली की प्रतिनिधी वाढतील केंद्रात वर्चस्व निर्माण होईल फालतू राज्यांचे ह्याची जाणीव घटना निर्माण झाली असावी
त्या मुळे लोकसभे च्या जागा वाढवता येणार नाहीत अशी अट आहे.
हे विभाजन खूप पूर्वी च झाले आहे.
इकॉनॉमिक टाइम्स मध्ये खूप वर्षा पूर्वी ह्याचा उल्लेख केला आहे तसे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
भविष्यात
रोजगार निर्माण न करता फक्त कामगार निर्माण करणारा उत्तर भारत आणि सर्व नियम पाळणार प्रगतशील दक्षिण आणि पश्चिम भारत असे विभाजन होईल.
आज ईथे ५९८ नवीन प्रतिसाद
आज ईथे ५९८ नवीन प्रतिसाद पाहिले..
कोणी सारांश देईल का या गेल्या ५९८ प्रतिसादांचा.. काय घडामोडी चालू आहेत सध्या?
कपिल शर्माचे घर का पाडले होते
कपिल शर्माचे घर का पाडले होते ?
या पक्षाचे लोक म्हणजे कोण?
या पक्षाचे लोक म्हणजे कोण? आणि साठ सत्तर वर्षात परिस्थिती आणि मत बदलू शकत नाही का? सर्वच पक्षांनी आपापल्या धोरणांत सलग सत्तर ऐशी वर्षे सातत्य ठेवले आहे का?
भारत के प्रत्येक राज्य को
भारत के प्रत्येक राज्य को उसकी जनसंख्या के आधार पर लोकसभा-सदस्य मिलते है। वर्तमान मे यह 1971 की जनसंख्या पर आधारित है। अगली बार लोकसभा के सदस्यों की संख्या वर्ष 2026 मे निर्धारित किया जायेगा। इससे पहले प्रत्येक दशक की जनगणना के आधार पर सदस्य स्थान निर्धारित होते थे। यह कार्य बकायदा 84वें संविधान संशोधन(2001) से किया गया था ताकि राज्य अपनी आबादी के आधार पर ज्यादा से ज्यादा स्थान प्राप्त करने का प्रयास नही करें।
वर्तमान परिपेक्ष्य में राज्यों की जनसंख्या के अनुसार वितरित सीटों की संख्या के अनुसार उत्तर भारत का प्रतिनिधित्व, दक्षिण भारत के मुकाबले काफी कम है। जहां दक्षिण के चार राज्यों, तमिलनाडु, आंध्र प्रदेश, कर्नाटक और केरल को जिनकी संयुक्त जनसंख्या देश की जनसंख्या का सिर्फ 21% है, को 129 लोक सभा की सीटें आवंटित की गयी हैं जबकि, सबसे अधिक जनसंख्या वाले हिन्दी भाषी राज्य उत्तर प्रदेश और बिहार जिनकी संयुक्त जनसंख्या देश की जनसंख्या का 25.1% है के खाते में सिर्फ 120 सीटें ही आती हैं।[5] वर्तमान में अध्यक्ष और आंग्ल-भारतीय समुदाय के दो मनोनीत सदस्यों को मिलाकर, सदन की सदस्य संख्या 545 है।[6]
लोक सभा की सीटें निम्नानुसार 29 राज्यों और 7 केन्द्र शासित प्रदेशों के बीच विभाजित है: -
2026 ल दक्षिण आणि पश्चिम भारताने सर्व राज्यांना सामान प्रतिनिधित्व ह्या बर ठाम राहिले पाहिजे .
लोकसंख्या वर राज्यांना लोकसभेत बिलकुल प्रतिनिधित्व नको
तर राज्यांच्या आर्थिक ,सामाजिक प्रगती वर प्रतिनिधित्व दिले gele पाहिजे.
उत्तर भारताचे प्रतिनिधित्व अजुन कमी केले पाहिजे जो पर्यंत ते सुधारत नाहीत.
लोकसंख्या नैतर मग कशावर
लोकसंख्या नैतर मग कशावर ठरवणार ?
गल्लीत कुणीतरी आमदार खासदार होईल म्हणून सगळी गल्ली चार चार मुले काढेल का ?
ब्लॅक कॅट
ब्लॅक कॅट
बेशिस्त,सामाजिक आर्थिक मागास राज्यांनी
शिस्त बद्ध प्रगतशील दक्षिण आणि पश्चिम भारताच्या जीव वर मज्जा करून उलट त्यांच्या वरच हुकूमत गाजवू नये म्हणून लोकसंख्या च्या आधारावर बिलकुल लोकसभेत प्रतिनिधित्व नको.
अजुन एक तटस्थ आला आज इकडे आणि
अजुन एक तटस्थ आला आज इकडे आणि त्याला लगेच अपेक्षित आयडींकडून वाहवा मिळाली
वाचणाऱ्यांना काय खुळे समजतात काय हे लोक?
आणि एक महोदय तर फुलटू शिक्के मारत सुटलेत
Pages