चित्रखेळ ...

Submitted by हेमंतकुमार on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकाशवृत्ती?>
नाही. ‘वृत्ती’ला दुसऱ्या अक्षरांशी जोडा.

जडत्वनिष्ठ म्हणजे काय?
तारायुगल >>>> मस्त! मला ल वापरून काही सुचत नव्हते
?? आवृती पण काय ते कळत नाही......

मानव दोन्ही बरोबर. फारच छान !
कोड्यात दिलेले सर्व शब्द बरोबर असून ते डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुस्तकातून घेतले आहेत.

काही शब्दांचे इंग्लिश रूपांतर देतो.
आवृत्तीकाल period
तारायुगल binary star
दिशादेशन polarization.

Tarayug ala hota.pan praytna सोडला होता.घरातही प्रश्न पडला होता की काय चाललय हिचे.

छान कोडे.

हे कोडे क्लिष्ट असूनही आपण सर्वांनी त्यात मनापासून भाग घेतलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे .
सर्वांना धन्यवाद देतो.

Submitted by साद on 31 July, 2020 - 11:26>>
साद, डॉ. नारळीकरांचं 'आकाशाशी जडले नाते' हे पुस्तक का?
माझ्याकडे आहे ते पुस्तक. त्यांनी 'तारायुगुल' असाच शब्द वापरलाय. पण तुमचा गैरसमज होणंही स्वाभाविक आहे कारण पुस्तकाच्या शेवटी 'पारिभाषिक शब्दसूची - इंग्रजी -मराठी' मध्ये binary stars ला मराठी प्रतिशब्द म्हणून तारायुगल छापलं आहे.
बाकी पुस्तकात सगळीकडे तारायुगुल आहे.
(हा प्रकार कुमार सरांच्या दुसऱ्या लोकप्रिय धाग्याला साजेसा आहे Wink )

वावे,
>>>>कारण पुस्तकाच्या शेवटी 'पारिभाषिक शब्दसूची - इंग्रजी -मराठी' मध्ये binary stars ला मराठी प्रतिशब्द म्हणून तारायुगल छापलं आहे. >>> होय, बरोबर. मी इथूनच घेतले.

वेगळ्या विषयावरचे कोडे..... छान वाटले. धन्यवाद साद.
क्लिष्ट नव्हते पण शास्त्रीय संज्ञा मराठीतून अजिबात माहीत नाहीत.
जडत्व = inertia माहीत असूनही जडत्वनिष्ठ = inertial सुचले नाही
शब्दांचे इंग्लिश रूपांतर पाहून अरेच्या हे होय असे झाले.

तारायुग्म आणि तारा युगल एकच का? >>>>> प्रश्न लिहीपर्यंत उत्तर आलेही. धन्यवाद कुमार सर.

छान कोडे. खुराक मिळाला.
आता युगल / युगुल चा फडशा पडून टाकू !
.........................
युगल

द्वय
-न. जोडी; युगल; युग्म. समासांत दुसर्‍यापदीं योजतात.
दाते शब्दकोश
जुळा
वि. १ जावळा; जुवळा; आवळ्याजावळ्यापैकीं एक. २ दुहेरी; आवळाजावळा; एकमेकास चिकटून उत्पन्न झालेलीं; जोडीनें एकत्र वाढणारीं (दोन फळें). 'जुळा आंबा, केळें.' [सं. युगल]
दाते शब्दकोश
जुळा juḷā a (युगल S) Twin, जुळा आंबा, जुळें केळें.
मोल्सवर्थ शब्दकोश
.........................................
युगुल
युगुल n A pair, couple.
वझे शब्दकोश
युगुल yugula n S poetice युगूळ n A pair, brace, couple.
मोल्सवर्थ शब्दकोश

मज्जा आली.
वर उल्लेख केलेल्या शब्दकोशांच्या
व इतरही शब्दकोश ज्याचा संदर्भ म्हणून उपयोग करता... त्यांच्या links देता येतील का.
शब्दाची व्युत्पत्ती शोधायला काय वापरता ?

देशन वापरून अजून काही शब्द आहेत का बघते.
कसा वापरायचा नीट कळेल म्हणजे.

अवनी ,
१ लाख ६८ हजार शब्दांचा बृहद्कोश यंदाच्या महाराष्ट्र दिनी प्रकाशित झाला.

https://bruhadkosh.org/
जरूर लाभ घ्या !

धन्यवाद !
एकाच शब्दाचा विविध कोशांतला अर्थ एकाच वेळी पाहता यावा यासाठी छानच सोय झाली की !

देशन वापरून अजून काही शब्द आहेत का बघते
नवीन Submitted by अवनी on 31 July, 2020 - 12:02 >>>>
शब्दकोशांच्या बाबतीत मी जाणकार नाही. पण दिशादेशन बाबत सांगते.
दिशादेशन = दिशा + देशन नाही
दिशा + आदेशन = दिशेचे आदेशन
आदेशन = आदेश देणे / सूचित करणे इत्यादि
दिशादेशन = polarization --- इथे अर्थ होईल एखाद्या दिशेने वळण्यासाठी भाग पाडणे या अर्थी

मंडळी,
आणि काही जुन्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दांसाठी छापील शब्दरत्नाकरची मजा काही वेगळीच आहे.
इथे बृहद मध्ये बहुतेक त्याचा समावेश नाही.

Pages