चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परिपूर्ण ( optimum) तापमान ...... बरोबर

२ उत्तरे झालीत + अजून क्ल्यू देते ---- रेसिपी म्हटले की :
** मुख्य घटक दर्जेदार नसेल तर कृतीला यश कमी मिळते उदा. शरबती गहू, बासमती तांदूळ, वाईनसाठी द्राक्षे.
** मुख्य पदार्थाआधी काही प्रक्रिया करावी लागते उदा खमंग भाजणे, आंबवणे, मोड काढणे, मॅरिनेट करणे.
** उप घटकांची निवड आणि सुयोग्यता उदा बेकींग करायचे तर सोडा की बेकींग पावडर की यीस्ट; सच्छिद्र न झालेला पाव्/केक पाहून मग बेकींग पावडर / यीस्ट ची एक्स्पायरी डेट चेक करणे हे होतच असते

१ गाईऐवजी म्हशीचे दूध घेतले कारण त्यात प्रथिने आणि फॅट जास्त.
२. दूध उकळून घेतल्याने त्यातले जीवाणू मारले गेले.पाश्चरायझेशन.
३. दूध चांगले तापवल्याने त उष्णतेमुळे दुधाच्या रेणूंना गती मिळाली व दूध फाटल्यावर पनीरचे गोळे होण्याची प्रक्रिया जलद झाली
४. सायट्रिक अ‍ॅसिड सरळ दुधात न घालता थोड्या पाण्यातून घातल्याने ते दुधात लवकर व सगळीकडे मिसळले गेले.

नाय बा..... गृहिणी बाया माणसं कशाला एन्झाइमच्या फंदात पडतील ?

@ भरत तुम्ही आता दिलेले २ क्ल्यू टिपलेत बरोबर, आता तिसरा बघा काय म्हणतोय. की कोडे संपले.

leavening नाही.
पनीर बनवताना त्याचा रोल नाही. पनीरचे रसगुल्ले बनवताना मात्र लोण्यासारखे मऊ होईपर्यंत रगडावे लागते. ते leavening म्हणता येईल. तिसर्‍या क्ल्यूत उपघटकाच्या क्षमतेबद्दलही काही म्हटलेय. तो सोडा / बेपा / यीस्ट हा मुद्दा अलाहिदा.

Draining

Draining >>>>> नाही

Strength of coagulant solution >>>>> बरोबर भरत. Happy
झाले पाचही मुद्दे. कोड्याची यशस्वी सांगता झालेली आहे !!
कुमार सर, मानव अथक प्रयत्नांनी मजा आणलीत खेळात. भरत नावडता विषय असून मस्त खेळलात....
कुमार सर, मानव, भरत, वावे, अस्मिता --- सार्‍यांना धन्यवाद.

पाच कोणते ते एकदा तुमच्या शब्दांत लिहा.

पनीर तयार करणे हा आवडता विषय आहे. तुमच्या कोड्यामुळे त्यातलं विज्ञान आणि प्रक्रियेतले बारकावे समजून घेता आले.

आता मी कुठून कॉपी मारली ते सांगतो.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3551056/

यात रिव्हर्स ऑस्मॉसिस हेही दिलंय. तो काय प्रकार आहे ते मला कळलेलं नाही.

छान रचली होती कोडी.
मजा आली सोडवताना.
विज्ञान शिक्षणाचा रंजक प्रकार.

रिव्हर्स ऑस्मॉसिसनेही पनीर तयार करता येत असावे. ती वेगळी पद्धत होईल. सेमीपर्मिएबल मेम्ब्रेन मधुन पाणी निघून जाऊन पनीर उरत असेल.

धन्यवाद मानव. मला वाटले होते तांत्रिक चुका निघतील की काय..., सगळे विषय अथ ते इति माहीत नसतात ना...

पनीर कोडे --
कृती -- आज मात्र तिने डाएट मनाआड करून म्हशीचे फुलक्रीम दूध लिटरभर घेतले.
गाईऐवजी म्हशीचे दूध घेतले कारण त्यात प्रथिने आणि फॅट जास्त. // Fat level in milk
हे भाजीत खायच्या पनीरसाठी. मिठाईसाठी गायीचे दूध वापरतात. ते पनीर जास्त मऊ व कमी स्निग्धांश असलेले असते.

कृती -- सतत ढवळत व्यवस्थित उकळले;
उकळून घेतल्याने त्यातले जीवाणू मारले गेले.पाश्चरायझेशन.
दूध चांगले तापवल्याने त उष्णतेमुळे दुधाच्या रेणूंना गती मिळाली व दूध फाटल्यावर पनीरचे गोळे होण्याची प्रक्रिया जलद झाली
Heat pre-treatment + सतत ढवळल्याने फार दाट साय येऊन दुधातील स्निग्धांश कमी होणे टळले. याने पनीर क्रीमी झाले.

कृती -- कोमट होऊ न देता कडकडीत गरम असतानाच
परिपूर्ण ( optimum) तापमान = उकळते नाही, कोमट नाही, हवे तितकेच. हे साधारण ७० अंश सेल्सियस असते. // Temperature of Coagulation

कृती -- त्यात मोजून घेतलेले सायट्रिक अ‍ॅसिड अगदी थोड्या पाण्यात विरघळवून घातले. हे करतानाही दूध ढवळायला विसरली नाही.
pH नियंत्रण
सायट्रिक अ‍ॅसिड सरळ दुधात न घालता थोड्या पाण्यातून घातल्याने ते दुधात लवकर व सगळीकडे मिसळले गेले
Strength of coagulant solution
// Type and strength of coagulants

इथे ३ मुद्दे येतात --
१. coagulant चा प्रकार ( सायट्रिक की दही की व्हिनेगर),
२. त्याचे प्रमाण / तीव्रता --- दुधाच्या प्रत्येक लिटरसाठी सायट्रिक अ‍ॅसिड २ ग्रॅम लागते. साधारण १० mM तीव्रतेचे द्रावण होईल इतके प्रमाण आहे हे. उत्तम दर्जाच्या पनीरसाठी pH of coagulation साधारण ५.३ लागतो. तो या प्रमाणाने साधतो. याहून जास्त (५.४ व पुढे ) असेल तर विसविशीत आणि कमी असेल ( ५.१ व कमी) तर दडस पनीर होते.
३. त्याचे दुधात एकसमान मिसळणे जेणेकरून एकसमान coagulation होईल व मागे उरलेल्या पाण्यात प्रोटीन्स किंवा फॅटचा अंश वाया जाणार नाही ( max yield size / min losses)

लक्षात घ्यायचे ५ मुद्दे ---Fat level in milk / Heat pre-treatment / Temperature of Coagulation / pH of coagulation / Type and strength of coagulants.

धन्यवाद कुमार सर. Happy तुम्ही सर्वांनी पण खूप सातत्याने प्रयत्न केले. फार क्ल्यू नाही लागले, पनीर सोडले तर.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3551056/
यात रिव्हर्स ऑस्मॉसिस हेही दिलंय. तो काय प्रकार आहे ते मला कळलेलं नाही.
Submitted by भरत. on 30 July, 2020 - 10:31 >>>

रिव्हर्स ऑस्मॉसिस घरगुती वापरात नाही जमणार. Dairy industryत वापरता येईल.

ऑस्मॉसिस मध्ये २ भिन्न तीव्रतेची (concentration) द्रावणे मध्ये सेमीपर्मिएबल मेम्ब्रेन घालून वेगळी करतात. हा पडदा काही ठराविक रेणु किंवा आयननाच आरपार जाऊ देतात. बाकीच्यांना अटकाव करतात. नॉर्मल ऑस्मॉसिस मध्ये कमी तीव्रतेचे द्रावण ----> जास्त तीव्रतेचे द्रावण असा solventचा प्रवास होतो जोपर्यंत दोन्ही बाजू समान तीव्रतेच्या होत नाहीत. हा ऑस्मॉसिसचा नैसर्गिक कल आहे.

रिव्हर्स ऑस्मॉसिस मध्ये या कलाच्या विरूद्ध हालचाली होण्यासाठी आणि होण्याइतका कृत्रिम दाब निर्माण केला जातो. ज्यामुळे solventचा प्रवास जास्त तीव्रतेचे द्रावण ----> कमी तीव्रतेचे द्रावण असा होतो. परिणामी जास्त तीव्रतेचे द्रावण असलेल्या बाजूला solvent कमी आणि solute जास्त अशी स्थिती होते. शेवटी फक्त solute उरेल.

रिव्हर्स ऑस्मॉसिस पनीर साठी बहुतेक दूध आणि पाणी वापरतील. दुधातील सगळे पाणी मेम्ब्रेनच्या दुसर्‍या बाजूला नेऊन दुधाच्या बाजूला फक्त milk solids उरतील. त्याला ते लोक पनीर म्हणत असावेत.

हे आणि इतर मुद्दे घेऊन पाककृति आणि आहारशास्त्र विभागात वेगळा लेख लिहाल का? की मी लिहू? >>>>
तुम्हीच लिहा. एकदा करून बघा मात्र... ही माहिती थिअरी नको ठरायला.

हा संदर्भ वापरला होता --
http://dairy-technology.blogspot.com/2014/01/factors-affecting-quality-o...
https://www.researchgate.net/publication/324638509_Effect_of_Different_C...
https://www.aqion.de/site/191#acids_name
https://sensorex.com/ph-calculator/

फक्त इतके लक्षात घ्या की pH of coagulation हा वापरलेल्या आम्ल पदार्थच्या pH पेक्षा वेगळी कन्सेप्ट आहे.
pH of coagulation हा दूध + आम्ल या systemचा pH आहे. तो ५.३ +/- लागतो.
वापरल्या जाणार्‍या आम्लाचा pH (दही, लिंबू, व्हिनेगर, सायट्रिक) हा २-३ या दरम्यान असतो.
हे न कळल्याने मी खूप मंडई केली डोक्याची.

आता मी एक वेगळे कोडे देतो. याच्यामध्ये खाली २५ अक्षरे सुट्टी मांडलेली आहेत. त्यातून तुम्हाला प्रत्येकी पाच अक्षरी एकूण ५ खगोलशास्त्राशी संबंधित शब्द ओळखायचे आहेत. या पाच शब्दांची वैशिष्ट्ये अशी आहेत:

१. एकामध्ये अनुस्वार आहे.
२. दोघांमध्ये जोडाक्षरे आहेत.
३. एक शब्द कानावाल्या अक्षराने सुरुवात आणि
४. एक शब्द वेलांटीवाल्या अक्षराने सुरुवात.
( पण ३ व ४ मध्ये जोडाक्षरे नाहीत ).

ता ज दि वृ का

न ग ल ता नि

शा र ड ल का

त्व आ रा त्ती दे

श पुं ष्ठ यु ज

** प्रत्येक अक्षर एकदाच घ्या.

अवनी,
सर्व शब्द पाच अक्षरी आहेत.

अवघड दिसतंय
आकाश ...असा शब्द नसावा. कारण पुढे जुळत नाही

Pages