चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, होय.
आता ५ अक्षरे कमी झाली आहेत. आता तुम्हाला नक्की येईल. Bw

ही आहेत सर्व उत्तरे:

१. त्यांच्याबद्दल - अरुण शेवते (व्यक्तिविशेष)
२. कोरडी भिक्षा - श्री. वि कुलकर्णी (कथासंग्रह)
३. रेशीमबंध -डॉ. यू म पठाण (लेखसंग्रह )
४. जगण्यातील काही - अनिल अवचट (आत्मवृत्त)
५. कांचनकण- शिवाजी सावंत ( ललित)
६. स र वा - व्यंकटेश माडगूळकर ( लेखमालेचे पुस्तक)

या नव्या खेळात तुम्हाला सहा मराठी चित्रपटांची नावे ओळखायची आहेत. त्यासाठी दोन प्रकारची माहिती दिली आहे :
A. चित्रपटाच्या नावांची अक्षरसंख्या अशी आहे;

२ चित्रपट पाच अक्षरी,
३, ४ , ६ आणि ७ अक्षरी प्रत्येकी एक .

B. वरील सहा चित्रपटांत मिळून भूमिका केलेल्या कलाकारांची नावे एकत्र मिसळून पुढे दिली आहेत :

चंद्रकांत कुलकर्णी, संग्राम समेळ, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे, विक्रम गोखले, आदिती देशपांडे, सोनाली खरे, शिल्पा तुळसकर, संयोगिता भावे, मधुरा वेलणकर, स्पृहा जोशी.

* आता तुम्ही असे करायचंय :

वरील कलाकारांच्या यादीतून एक अभिनेता आणि एक अभिनेत्री अशी एकाच चित्रपटात काम केलेली जोडी निवडायची. मग त्या जोडीची सांगड योग्य त्या अक्षर संख्येशी घालून चित्रपट ओळखायचा. नावातील जोडाक्षर हे एकच अक्षर धरले जाईल.

* उत्तरांना क्रमांक नाही. ‘कलाकार जोडी आणि चित्रपट’ असे एकत्र लिहा.

** एक जोडी वापरून ते उत्तर बरोबर ठरले की ती जोडी पुन्हा वापरू नका.

सोनाली खरे, सुबोध भावे - हृदयान्तर >> बरोबर.

पिंपळ >> चूक. नटी वेगळीय.
.......................
आता 'सोनाली खरे, सुबोध भावे' ही जोडी वजा झाली.

आता या जोड्या राहिल्या :

संग्राम समेळ, दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, आदिती देशपांडे, शिल्पा तुळसकर, , स्पृहा जोशी.

आणि
३, ४ व ७ अक्षरी.

अस्मिता , चूक.
जोडी उचलायची आहे आणि अक्षरसंख्याही जुळवा.

सोहळा
विक्रम गोखले , शिल्पा तुळसकर

वा, छानच.
अगदी बरोबर .
मजा आली
धन्यवाद !

वर ९.३६ला दोघांचे प्रतिसाद एकसमयी धडकले !
कोड्यात कुठेही पर्यायी बरोबर उत्तर आले नाही हेही विशेष.

आता घेऊया ‘शेती’ हा विषय.
खाली ७ निरर्थक वाक्ये दिलेली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात दिलेल्या विषयाचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या वाक्यापुढील कंसात दिली आहे. ती संबंधित वाक्याच्या ब्दसंख्येइतकी नाही. त्यामुळे अक्षरे कशी उचलायची हे तुम्ही ठरवा.

असे विषयाशी संबंधित ७ शब्द तयार करा. ते झाल्यावर आणि खालीलप्रमाणे मांडल्यावर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल :

(१ २ ३ ४ ) शेतीचे ( ५ ६ ७ ) आहेत.
...............................

१. राधानगरी अक्षरधाम धरणामुळे आरक्षित (५ अक्षरी शब्द)

२. विसराळूपणा गाणाऱ्याकडच्या मनकवडा (४)

३. विकासकामे अनैतिकतेमुळे मार्गिकेतून दचकतात (५)

४. शनिवारवाड्याकडे अराजपत्रित साधकद्वय (५)

५. शालीवाहन मर्घमुनींच्या कारणपरत्वे प्रदीपराव (५)

६. निष्पक्षपणे दारोदारीच्या रणामधून दुरिताचे (५)

७. गणिकेसाठी अमंगळाच्या हितकारक (४) .

Pages