चित्रखेळ ...

Submitted by हेमंतकुमार on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आठवतील Bw
शेतीचे प्रकार असा विचार करा

जिरायती शेती , कोरडवाहू शेती हे ह्यात सापडले नाही Sad
५. प्रदीर्घ.. असे काही आहे का ?
काही शब्द काहीही उपयोगाचे अक्षर नसलेले आहेत का उगाचच , का प्रत्येक शब्दात आहेच उपयोगी अक्षर ?
मी तीच अक्षरं विचारात घेत आहे जे तुम्ही otherwise घेतलेच नसते असे वाटायला वाव आहे Happy

प्रत्येक शब्दात आहेच उपयोगी अक्षर ? >>>
होय. काही शब्दांत एकाहून अधिक अक्षरेही असतील.

प्रदीर्घ.. असे काही >>> योग्य दिशा ...
...
पर्यावरण आणि शेती यांची सांगड घाला !

आता घेऊया ‘शेती’ हा विषय.
खाली ७ निरर्थक वाक्ये दिलेली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात दिलेल्या विषयाचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या वाक्यापुढील कंसात दिली आहे. ती संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी नाही. त्यामुळे अक्षरे कशी उचलायची हे तुम्ही ठरवा.
असे विषयाशी संबंधित ७ शब्द तयार करा. ते झाल्यावर आणि खालीलप्रमाणे मांडल्यावर असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल :
(१ २ ३ ४ ) शेतीचे ( ५ ६ ७ ) आहेत.
...............................
१. राधानगरी अक्षरधाम धरणामुळे आरक्षित (५ अक्षरी शब्द)
२. विसराळूपणा गाणाऱ्याकडच्या मनकवडा (४)
३. विकासकामे अनैतिकतेमुळे मार्गिकेतून दचकतात (५)
४. शनिवारवाड्याकडे अराजपत्रित साधकद्वय (५)
५. शालीवाहन मर्घमुनींच्या कारणपरत्वे प्रदीपराव (५)
६. निष्पक्षपणे दारोदारीच्या रणामधून दुरिताचे (५)
७. गणिकेसाठी अमंगळाच्या हितकारक (४) .
Submitted by कुमार१ on 14 July, 2020 - 22:07

४, ६ बरोबरच
मानव, तुम्ही आता सोडताय का इतरांसाठी Bw

हो.

अंतिम वाक्य हे विशिष्ट शेतीच्या परिणामाबद्दल आहे, हे एव्हाना लक्षात आले असेल. त्या दृष्टीने उरलेल्या शब्दांचा विचार करा. प्रत्येक शब्द काही अगदी ‘शेतातला’ असा नाही!

होय

अयोग्य शेतीशी निगडित असावेत >>>

बरोबर. ते दोन्ही शब्द एकत्रित वाचल्यावर अयोग्य शेतीचे एक विशेषण तयार होईल.
क्र १ चा शब्द जो कोणी अधिक मदतीशिवाय सोडवेल, तो खरा मायबोलीकर !

सकाळी भेटूयात .
खात्री आहे की तोपर्यंत कोडे संपलेले असेल !

सर्वांचाच खेळ छान झाला. सुरुवातीस मानव यांनी कोंडी फोडली आणि मग पुढे तुफान फटकेबाजी केली. सर्वोत्तम खेळ !
मधल्या फळीत अस्मिता आणि मंजूताई यांनी चांगला किल्ला लढवला.
अखेरीस स्वप्नील यांनी छान विजयी चौकार मारला आणि खेळाची सांगता झाली.

धारणाक्षम हा शब्द मी श्री. द. महाजन यांच्या लेखातून घेतला होता. तो सोडवला गेल्याचा आनंद आहे.
सर्वांना धन्यवाद

Pages