चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज
६ - ए मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम... भरत व्यास >>>
बरोबर, मस्त !
भरत, देतो संदर्भ ..जरा वेळात..

भरत व्यास हिन्दी फ़िल्मों के प्रसिद्ध गीतकार थे। इनका जन्म ६ जनवरी १९१८ को बीकानेर मे हुआ था जाति से पुष्करना ब्राह्मण थे। मूल रूप से चुरू के थे। बचपन से ही इनमे कवि प्रतिभा दिखने लगी थी। उन्होंने १७-१८ वर्ष की उम्र तक लेखन शुरू कर दिया था। चुरू से मैट्रिक करने के बाद वे कलकत्ता चले गए। उनका लिखा पहला गीत था - आओ वीरो हिलमिल गाए वंदे मातरम । उनके द्वारा रामू चन्ना नामक नाटक भी लिखा गया।

१९४२ के बाद वे बम्बई आ गए उन्होंने कुछ फिल्म्नो भी भूमिका निभाई
(https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A...)

वरवर पाहता याच्या गायिका लता आहेत. पण इथे मन्ना डे यांची पण नोंद आहे.
https://www.lyricsindia.net/songs/418

गाण्याच्या मधले 'कोरस' पुरुषी दिसतात.
काय वाटते ?

आपणा सर्वांच्या सहभागाने खेळ छान झाला.
भरत सर्वोत्तम. राज, अवनी तुम्ही पण छान.

हे कोडे रचतानाचे काही अनुभव:
सुरुवातीस दोन शब्द आणि शब्दसंख्या देणार होतो. पण मराठी गाण्यांच्या तुलनेत इथे ध्रुवपद हा गोंधळाचा भाग आहे. काही दोन ओळींची तर काही चार ओळींची. पुन्हा कित्येकदा चारोळी झाल्यावर पहिली ओळ पाचवी म्हणून तीच येते. तसेच, काही शब्द जे आपण मराठीत जोडून लिहितो ते हिंदीत तोडून लिहिलेले आढळतात.

त्यामुळे शब्दसंख्या हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो. म्हणून अन्य वैशिष्ट्यांचा पर्याय निवडला.
एकंदरीत संगीत रजनी छान झाली.
सर्वांना धन्यवाद !

नव्या खेळात घेऊया थोडे नागरिकशास्त्र.

खाली ६ निरर्थक वाक्ये दिली आहेत. त्यातील शब्दांचा क्रमही विस्कटलेला आहे. प्रत्येक वाक्यात नागरिकशास्त्राचा एक शब्द दडलेला आहे. योग्य ती अक्षरे उचलल्यावर तो तयार होईल. अशा प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या संबंधित वाक्याच्या शब्दसंख्येइतकी आहे.

असे एकूण ६ शब्द (अनुक्रम १ ते ६) तयार करा. ते तयार झाल्यावर खालीलप्रमाणे त्यांची रचना करायची. त्यातून असे अर्थपूर्ण वाक्य तयार होईल :

(१ २ ) हा ( ३ ४ ५ ६ ) आहे.

………………………………………………………………………………..
१. सावधगिरीतल्या सचेतन चंद्रकांता प्रगतीमुळे विनाशकाळी.

२. तंजावरी अखेरचा पाचावरती वैचित्र्यपूर्ण दुस्वास अविश्वसनीय.

३. आरवल्यास मातीसमान खचाखच विषयांच्यात प्रभातकाळी.

४. कामकाजात तत्वाधिष्ठीत देहधारणा विचारणा.

५. उत्तरदायी राघवदादा मनाप्रमाणे मंदगतीने कटवतात.

६. गरजेचे प्राधिकरण विकावयास अज्ञानमूलक.

सर्व उत्तरे बरोबर.
आपणा सर्वांचे अभिनंदन ! विशेषतः घटनादत्त आणि विचारस्वातंत्र्य यासाठी.

सर्वांना हे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

मंजूताई, धन्यवाद .
खरं म्हणजे तुम्ही सगळे या खेळात मन लावून भाग घेता त्याबद्दल आनंद वाटतो.
....................
यावेळेसच्या खेळात प्रत्येक शब्दातून एक अक्षर उचलायचे आहे, असे काही लिहिले नव्हते. तरीसुद्धा योग्य शब्द तुम्ही सर्वांनी ओळखलेत याबद्दल विशेष कौतुक !

डॉ तुमची सगळी कोडी मस्त असतात....सहमत.

मला सोडवण्यासाठी वेळ नसला किंवा काही येत नसले तरी इतर लोकांनी कशी सोडवलीत कोडी हे पहायला मी अधुनमधून या धाग्यावर येऊन जाते. सगळी प्रक्रिया पण धमाल आहे.

धन्यवाद कुमार सर.

पुन्हा एकदा वरील सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.
तुम्हीदेखील जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कोडी स्वतः तयार करून इथे जरूर द्या. प्रत्येक व्यक्तीने बनविलेल्या कोडयाची चव वेगवेगळी असते. त्यामुळे अधिक मजा येईल.

आतापर्यंत बरेच विषय कोडयातून हाताळले गेलेत.
विज्ञान हा एक महत्त्वाचा प्रांत अजून बाकी आहे.

बघा, घेताय का कोणी जबाबदारी ! Bw

गाणी ओळखा

१. एका महान अभिनेत्या गायलेलं गाणं - कृष्णधवल चित्रपट

२ एका महान अभिनेत्रीने गायलेलं गाणं -

३. पडद्यावर नायक आणि नायिका या दोघांनी स्वतःसाठी पार्श्वगायन केलं आहे. ( पार्श्वगायन हे आधीच्या काळातल्या एकाच वेळी चित्रीकरण + ध्वनिमुद्रण या पेक्षा वेगळे )

४. मराठीतल्या एका आघाडीच्या अभिनेत्याने पार्श्वगायन केलेली दोन गाणी.

Pages