चित्रखेळ ...

Submitted by हेमंतकुमार on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान खेळ
शब्दक्रम विस्कटून >>> हे डोक्याला भुंगा आहे.

२ >>> या गावाबद्दल थोडी माहिती देणार का ?

आतापर्यंत येथे भाग घेतलेल्या सर्वांचेच मी अभिनंदन करतो. काहीजणांनी खूप झटून उत्तरे शोधली हे कौतुकास्पद !

गाण्यांशी संबंधित कोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरतात हे दिसते. सहाजिक आहे. सुश्राव्य गाणी आपल्या ओठांवर वर्षानुवर्षे असतात त्यासंबंधी कोडे तयार करणे, सोडवणे आणि नंतर त्या गाण्याचा ऐकून आस्वाद घेणे, हे सगळेच आनंददायी असते.

गूढ कोड्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. तुम्हीपण कोड्यांचे वेगवेगळे प्रयोग इथे जरूर करा. स्वतः तयार करण्याची मजा काही औरच.
शुभेच्छा !

* मंदसौर >>>

शाळेत माझ्या वर्गात मंदसौरवाले नावाचा मुलगा होता. आतापर्यंत त्या आडनावाचा मी ऐकलेला एकमेव माणूस !
पण तेव्हापासूनच मला त्या गावाच्या नावाचे कुतूहल वाटत आले आहे.
………………………
आपल्या सर्वांच्या इथल्या सुसंवादानेच खरी मजा येते !

मंदसौर भारीच !
हे चक्क जिल्ह्याचे ठिकाण आहे.
मानव पृ >> +७८६

संगीताच्या बाबतीत आपण बरेच लोक ‘कानसेन’ नक्कीच आहोत. आपले जितके मराठी गाण्यांवर प्रेम आहे, तितकेच हिंदी गाण्यांवर देखील. किंबहुना आपला एक कान मराठी तर दुसरा हिंदी गाणी ऐकण्यासाठी आसुसलेला असतो !

... तर घेऊन आलोय पुन्हा एकवार गाण्यांचा खेळ पण....
अब की बार हिंदी गानोंके साथ …..
……………………………………………………….
इथे तुम्हाला हिंदी चित्रपटातील गाणे ओळखायचे आहे. त्यासाठी प्रत्येक गाण्याची शोधसूत्रे अशी दिली आहेत:

१. गाण्याच्या ध्रुवपदातील दोन शब्दांचे समानार्थी किंवा भावार्थी मराठी शब्द, आणि
२. त्या गाण्यासंबंधी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती.

गाणे ओळखल्यावर ध्रुवपद पूर्ण लिहावे.
………………………………………………
१. भाग्य, विश्वास
• याच्या गीतकारांच्या प्रयत्नामुळेच रेडीओवर गाण्याचे आधी गीतकाराचे नाव सांगण्याची प्रथा पडली.

२. नयन, सौंदर्य
• हे गाणे असलेल्या चित्रपटाचे लेखन बंगाली कादंबरीवरून आणि दिग्दर्शक देखील बंगाली व्यक्ती.

३. गमन, क्षण
* याच्या संगीतकारांनी हिन्दी व मलयालम चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी कारकि‍र्दी दरम्यान तब्बल १२ वर्षे कामात विश्रांती घेतली होती.

४. लाट, आयुष्य
याचे गीतकार या कारकि‍र्दीपूर्वी सैनिकी सेवेत होते. त्यांनी लिहिलेल्या गीतांची संख्या काही हजारांत.

५. खोटे, चालत जाणे
या गीतकारांनी कारकि‍र्दीपूर्वी रेल्वेत नोकरी केली. यांच्या नावाचे टपाल तिकीट आहे.

६. कर्म, खराबी
याचे गीतकार हे कवी, नाटककार आणि अभिनेते देखील होते.

७. संकट, सोबत
हे युगल गीत असून या संगीतकारांची लोकप्रिय गाणी परदेशी गाण्यांवर बेतलेली असायची असा प्रवाद आहे.

....................................................................

२. ह्रिषीकेश मुखर्जी आहे का ?
बावर्ची सिनेमातले मोरे नैना बहाये नीर. पुढची ओळ आठवत नाहीये.

उद्या सकाळी उठल्यावर बघते Happy .

१ व ७ बरोबर.

४ चे गाणे ओळखावे
५ चूक.
*२ हमने देखी है उन आँखों कि महकती खुशबू >>> चूक , कारण
यात "सौंदर्य" नाही; सगळा "सुगंध' आहे !

५ सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाना है
न हाथे है न घो डा है वहां पैदल ही जाना है
शैलेंद्र

यांनी रेल्वेत काम केलंय हे माहीत नव्हतं.

३ संगीतकार रवी - यांनी मलयालम मध्ये संगीत दिलंय हे माहीत नव्हतं. विविधभारतीवर त्यांची प्रदीर्घ मुलाखत झाली होती, त्यातही ऐकल्याचं आठवत नाही.

_/\_

३ संगीतकार रवी - >>> हो. आता गाणे ओळखा !
भरत,
नंतर उरलेले ३ इतरांसाठी सोडणार का ? Bw

२. ह्रिषीकेश मुखर्जी आहे का ? >>> चूक. थोडी वेगळी गल्ली आहे.

आता ...
२, ४, ६ पूर्ण आणि ३ चे गाणे ओळखणे हे बाकी आहे.

जुनी गाणी!
माझा पास.. Happy

मंदसौर हा जिल्हा लक्षात राहीला कारण शाळेतले ऑफ तास.
भूगोलाच्या पुस्तकांतले सगळे नकाशे जवळपास पाठ झालेले.. नाव शोधा खेळामुळे.. मजा यायची.. Happy

जुनी गाणी!
माझा पास.
>>>

हरकत नाही याच्यानंतर तुम्ही ही नवीन गाण्यांचे कोडे घेऊन येऊ शकता !

२.

जीवन से भरी तेरी आँखे मजबूर करे जीने के लिए
सागर भी तरसते रहता है, तेरे रूप का रस पीने के लिए

फिल्म : सफर
दिग्दर्शक: असित सेन
बंगाली कादंबरी लेखक : आशुतोष मुखर्जी
हेच गाणं मनात आलं पहिलं ...
बाकी माहिती सौजन्य : गूगल शोध

२.

जीवन से भरी तेरी आँखे मजबूर करे जीने के लिए >>>
बरोबर, छान !

Pages