चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ साठी सगळ्या अटी पूर्ण न करणारी दोन उत्तरं
देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मोगलांची निर्णय हो आराधना

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
समर्थन शिवं सुंदरा

आता खेळात खरी रंगत भरली आहे. छान मजा येत आहे !

भरत,
३ साठी प्रयत्न चांगला पण चूक.
आता एक करा.
आकलन’ या शब्दावर चांगला जोर द्या ! त्याच्या योग्य ‘तो’ शब्द मिळेल. तेव्हा उत्तर जवळ येईल. Bw

आहा,
किती सुंदर उत्तर, बरोबर !

लंपन, बरोबर !

घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद

वरील सर्व सहभागींचे अभिनंदन व आभार !
छान झाला हा डाव.
सुरवातीस फक्त २ सूचक शब्द असताना भरत, वावे, अवनी आणि साद यांनी गाणी ओळखली. विशेष कौतुक !

प्रयोगादाखल मी एक नवा खेळ तयार केला आहे. खाली काही निरर्थक वाक्ये दिली आहेत. एका वाक्याच्या प्रत्येक शब्दातील कुठलेही फक्त एक अक्षर तुम्ही बाजूला काढायचे. अशी त्या वाक्यातली निवडलेली अक्षरे क्रमाने ठेवली, की भारतातील एका गावाचे नाव तयार होते. ते नाव तुम्ही सांगायचे आहे. प्रत्येक शब्दातील एकच अक्षर घ्यायचे आहे आणि ते जसेच्या तसे वापरूनच गावाचे नाव तयार होते.

एक उदाहरण देतो.
हे वाक्य बघा :
वासोट्याचा गलबलापून सकायचे.
याचे उत्तर आहे : सोलापूर

(तुमच्या प्रतिसादांवरून खेळाच्या पुढच्या पातळ्या ठरवता येतील. तसेच पर्यायी उत्तरे निघतात का हेही कळेल).
..........................................................................................
गाव ओळखा:

१.बाहेरगावच्या मिरच्यांत कुटायला मसालेदार.

२.व्यासंगाला गणितज्ञाच्या रिकामटेकडा यमुनेकाठी गहिवरतो.

३.आबासाहेब नगरातून हलणार कोणत्याही घटकेपूर्वी.

४. अराजक कायद्याचे जबाबदारी रेटायची नाकारली.

५. अध्यापकांनी नंतरच्या मंडपात भोजनास विभागणे.

६. सरदेशमुखच्या वाहनात करामतीने प्रदूषण मानवते.

२. संगमनेर
४. रायबरेली
५. अनंतनाग
६. देहरादून

सर्व बरोबर !
म्हणजे ही सोपी पातळी झाली.
वरच्या पातळीवर जाण्यासाठी काही सूचना ?

इं ए. मध्ये एक शब्दकोडं असतं. चार पाच प्रश्न - त्यांची प्रत्येकी एका शब्दांची उत्तरं शोधायची. त्यासाठी शब्दातील अक्षरांच्या संख्येइतक्या चौकटी दिलेल्या. त्यातल्या काही चौकटी ठळक केलेल्या. त्या चौकटींतली अक्षरे घेऊन बनवलेला शब्द दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी फिट बसायला हवा.

धन्यवाद, ठीक आहे.
आता वरच्या गाव ओळखण्याच्या कोड्यात शब्दांचा क्रम विस्कटून देतो. बघा हे कसे वाटते. प्रत्येक शब्दातील एकच अक्षर घ्यावे.

१. भवताल सामाजिक तातडीने कळले समयसूचक.

२. सौरचूल सदनात सुमंगल फिरवायची.

३. समजतात उठाठेवी गावाकडच्या कारभार्‍याला.

मी शब्द क्रम विस्कटून द्यावा हे सुचवणार होतो, पण ओळखणे फारच अवघड होईल असे वाटले म्हणुन सुचवले नाही.

प्रयत्न करून बघतो.

मानव, अगदी बरोबर.
म्हणून आता तीनच दिली आहेत.
मला अजून एक उत्सुकता आहे, की माझ्या मनातल्या उत्तरापेक्षा पर्यायी उत्तर तुमच्याकडून येऊ शकते का?
बघूया प्रयोग करून...

३ उमरगा >> बरोबर
पण
२. गदवाल? >> चूक ,
कारण अधिकृत नाव गढ़वाल आहे.
उत्तर वेगळे आहे.

Pages