माझं काय चुकलं? - २

Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44

लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्‍या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजमाचं झाड सोडा.ते मिक्स कडधान्यात एक काळे लहान वाटाणे असतात.माझ्याच्याने ते कधीही नीट शिजले नाहीयेत.

एक काळे लहान वाटाणे असतात.माझ्याच्याने ते कधीही नीट शिजले नाहीयेत..... जुने झाले वाटणे की शिजत नाहीत.माझ्याकडे कूकरच्या शिट्या न देता गॅस मंद करून शिजवते.चांगले शिजतात.

लोकहो, काळे वाटाणे मीठ घालून भाताबरोबर वेगळ्या डब्यात कुकरला 3 शिट्या करून घ्या. 1 शिटी मोठ्या आंचेवर, 2 शिट्या मंद आंचेवर. वाटाणे बुडून वर जरासं राहील इतकं पाणी. भिजलेलेे 1 वाटी असतील तर 1 सपाट चमचा (थोडं कमीपण चालेल) मीठ. बोटचेपे (सॅलड साठी अगदी योग्य) शिजतील. मी नेहमी करते असं. मग अजून वाटलं तर भात बाहेर काढून झाल्यावर एखादीच शिट्टी.

ओके, धन्यवाद देवकी, प्रज्ञा.काळे वाटाणे एकटी उसळ म्हणून घरी आणले नाहीत कधी, फक्त मिक्स कडधान्य म्हणून वापरले.
पण एकटे आणले तर हे नक्की पाळेन.

काळे वाटाणे एकटी उसळ म्हणून घरी आणले नाहीत कधी, फक्त मिक्स कडधान्य म्हणून वापरले>> म्हणुनच असावे.. टीम वर्क येत नसावे त्यांना. काळे म्हणतात म्हणुन रुसून बसत असावेत ते.. Wink

हीही आशु. किंवा मग ते तनमनानं कणखर असतात सह्याद्रीच्या काळ्या फत्तराप्रमाणे. टीमला अशा एकाची गरज असतेच ना!
प्रज्ञानं सांगितले तोच माझाही फंडा आहे या बाबतीत. चांगले शिजतात पण बोटचेपे पर्यंत.. च.. मिळून येत नाहीत चवळी वगैरे प्रमाणे.

माफ करा, परत त्याच झाडावर येऊन बसतेय. काबुली चणा, राजमा करवंटी तुकड्यासोबत छान शिजले.
पण
पण
पण
पण
पण
काळा वाटाणा अजरामर राहिला. खूप तास भिजवणे, करवंटी तुकडा, कुकर आणि मी दोंही हरलो. पाकीट फेकून दिले
Sad
प्रज्ञा ने लिहिलेय तसे मीठ पण घातले, सर्व केले.
माझ्या नशिबात काळ्या वाटाण्याची उसळ नाहीच. Sad

चिमूट सोडा घातला तर दगड पण शिजतील.. काळा वाटाणा क्या चीज है....मोठ्या gas वर एक शिट्टी आणि 20 मिनिटे बारीक gas यावर सर्व पचण्यास जड कडधान्ये छान शिजतात

चांगले दोन तीन वेळा पाण्यात धुवून भिजवायचे १२ एक तास (आदल्या दिवशीच) का. वा.
मग परत सकाळी भिजवलेले पाणी फेकून नवीन पाणी, जरासं तेल आणि मीठ घालून ५-६ शिट्या काढाव्या. कूकर पुर्ण थंड झाल्यावरच उघडावा.

सोडा कशाला, तसेही का. वा. पाद्रे असतातच. मी गॅसावरच शिजवते. घरचेच असतात म्हणा.

आता मग एकच उपाय , काळया वाटण्याला संमोहित कर, त्याच्या अंतर्मनाला सूचना दे की तो पावटा आहे.
मग कुकर ला १० शिट्ट्या काढून बघ.

aashu29 > तुम्ही मुंबईत असता तर मी तुम्हाला खात्रीशीर दुकान सांगितले असते जिकडचे काळे वाटाणे तीन/चार शीट्यात शिजतात.

भाजीच्या कुकरमधे तीन शिट्यात किंचित दडदडीत रहातो, तो आमच्याकडे आवडतो. पाच शिट्यात शिजेल बहुतेक. असंही मी का वा क्वचित करते. करते तेव्हा वाटण आणि गरम मसाला घालून आमटी करते त्याची. एरवीच्या उसळी गोडा मसाला, गूळ वाल्या असतात पण ही अशी करते.

कडधान्य न शिजणे या कॅटॅगरीत मी पण.
राजमा, काळे वाटाणे याच्या जोडीला चवळी, हिरवे वाटाणे पण शिजत नाही माझ्याकडून.
माझ्या ऑफिसमध्ये एक सहकारी अतिशय चविष्ट, मऊ शिजलेल्या काळ्या वाटाण्याची उसळ आणते. मी तिच खाते.
स्वतः करायच्या भानगडीत पडतच नाय.

त्या काळ्या वाटाण्यांवरून अवसे/पुनवेला जमेल तेव्हा नारळ उतरून टाक बरं! आणि मग त्या उतार्याच्या नारळाच्या करवंटीचा तुकडा घाल शिजवताना. अलाबला टळू दे गे माऽऽऽय असा पुकारा करून,बोटं कडकडा मोडून मगच झाकण लावून कुकरला शिजत ठेव.
(सॉरी मला रहावलं नाही.. अख्ख्या पोस्टसाठी Light 1 घे )

चिमुट भर सोडा त्या वाटाण्याचं कवच फक्त मऊ करेल. त्याचा मानवाच्या शरिरावर काही परिणाम होत नाही. तरी हवंच असेल तर टीबॅग टाका. चहा किंचितसा अ‍ॅसिडिक असल्याने काही सोडा उरलाच तर त्याचे उदासिनीकरण करेल आणि पोटात गॅसेस होणार नाहीत.
छोल्यात याने छान रंगही येतो. काळ्या वाटाण्याला रंगाची काही जरुरी नाही, पण काही बेरंग ही होणार नाही.
सोडा + टी बॅग असं मसाला लॅबचा लेखक क्रिस अशोक सांगतो.

आशुडी,
तेच म्हणतेय मी सोडा वगैरे घालूच नये कशात. गरम पाण्यात भिजत घालते मी कडधान्य अगदीच कडक कॅटेगरीतील असतील तर... का.वा. , पावटे वगैरे. तेल घालावेच कडधान्यात उकडवताना. ते शास्त्र आहे! आजी नेहमीच घालायची.
(खरेच शास्त्र आहे, असे नंतर वाचनात आले. तापमान वाढतं आणि कवच पटकन नरम होतं वगैरे वगैरे .....)

कुठून घेता का. वा. ? आमच्याकडे घरचेच असतात. इतका त्रास कधीच झाला नाही एक दोनदा बाहेरचे विकतचे पण घेतलं होता.

<<संमोहित कर त्याच्या अंतर्मनाला सूचना दे की तो पावटा आहे.
<<कुकर समोर उभे राहून मायबोलीवरच्या पोस्टी मोठ्याने वाचुन पहा.>> Lol
आशु 29 तुमचे काळे वाटाणे दाढे झाले असतील किंवा जुने असल्यामुळे शिजत नसतील खराब लागत असतील तर ते फेकून देण्यातच शहाणपण आहे.माझे हिरवे चणे तसे झाले होते, मीपण फेकून दिले . dmart मधून आणत असाल तर डेट बघून फ्रेशच घ्यायचे तसेही घरात चार चार महिने पडून असतात नेहमी करत नसल्यामुळे.

सोडा, टी बॅग, तेल. नक्की करून बघेन. करवंटी आहेच. थँक्यु.
होय सिमरन, ते पाकीट जुने झालेय, म्हणुन पण नसतील शिजत वाटाणे.
नवीन आणुन वरचे नवे उपाय करून बघेन.

मेधावि, मगे २ दा मिक्सर ला भरडून भाजी करण्यात आली पण ती मऊ मऊ शिजलेल्या दाण्यांची उसळ खाण्यात जी मजा आहे ती नाही येत, शिवाय पोट बिघडेल अशी भिती वाटते.

चला आता हे झाड सोडूया Lol

खोब्याची वडी उचलता उचलता तुटू नये ह्यासाठी त्यात काय घालता? खवा नाही मिळत इकडे. मी दूध, मिल्कमेड घालते.

Pages