कोरोना चे तुमच्या जीवनावर परीणाम

Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39

सभ्य स्त्री पुरुष हो,

कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.

( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशा पोस्टपोन नंतर तर भर लग्नात मुलगी उखाणा घेईल Wink :
गांव मे आया कोरोना,
पर सांसू बोले कपडे बरोबर करोना,
xyz बोला डरोना,
बस डिसेंबर तक रूकोना...

अमा, मी सहसा गोड आणून ठेवत नाही, कारण ते ठेवण्याची वेळ माझ्यावर येतंच नाही, मी आणल्या आणल्या फडशा पाडते. काल सकाळी गाडीला चक्कर मारवून आणायला म्हणून गेले होते तेव्हा येताना दुकानात जाऊन अंडी घेतली. तेव्हाच चॉकलेटे घ्यायला पाहिजे होती हे रात्री अगदी प्रकर्षाने जाणवले... जाऊदे आता तो विषय नको, परत खावेसे वाटेल.

काल सुपर डेलीमधून श्रीखंड ,अमूल बटर,पनीर आणि कलिंगड मागवले होते.आज डिलिव्हरी झालीय्.त्यामुळे आज जेवणात श्रीखंड आहे या विचाराने शांत शांत वाटतंय.

आदिश्री, बिग हग!

रोजचा स्वयंपाक, भांडी हे सगळं करता करता तब्येतीची वाट लागली आहे.
पचनसंस्थेच्या संबंधी अनेकानेक प्रॉब्लेम असल्यामुळे उसळी, पाव, पास्ता आम्ही कोणीच खात नाही उसळीनी पित्त वाढत, पावामध्ये, पास्तामध्ये मैदा असतो ई. करणे आहेत.
नुसती खिचडीनी पोट न भरणं वगैरे मुळे पोळी,आमटी, भात हा मिनिमम स्वयंपाक आहे. 3-4 वेळेस भाजी होतेच बटाटा, वांगी वगैरे करते.
हात, पाय इतके दुखतात की साईड इफेक्ट्स माहिती असूनही पेन किलर्स घ्याव्या लागल्या.
नवरा बिचारा सकाळी उठून रोज लादी पुसणे, जमेल तेवढी भांडी घासणे करून 9 वाजता WFH सुरु करतो.
मन :शांती साठी रोज सकाळी प्राणायाम, ओंकार करते. जे मी आधीही करायचे.
संध्याकाळी रामरक्षा लावतो, म्हणतो.

मी केर काढते, नो mopping. रोज कोणीतरी दिवसभरात कुठेतरी ग्लासभर पाणी सांडतच, आपोआपच mopping होतं Happy

हात, पाय इतके दुखतात की साईड इफेक्ट्स माहिती असूनही पेन किलर्स घ्याव्या लागल्या>>>>

रोजच्या मिनीमम कामांमुळे इतका त्रास व्हायला नको खरेतर. तेही एक सैपाक व दुसरा वरकाम करत असताना.

ऑफिसमधले फर्निचर 9 ते 10 तास बसून काम करण्यासाठी बनलेले असते (ergonomically viable).

तेच घरात डायनिंग टेबल, सोफा वगैरे फर्निचर आपण डोळ्यांना चांगले दिसावे याचा विचार करून विकत घेतलेले असते. आता आपण जर 10 तास बसून ऑफिसचे काम करण्यासाठी हे फर्निचर वापरत असू तर भरपूर त्रास होणार.

तुमचा त्रास कदाचित या कारणामुळे असेल.

रूचा,स्वाभाविक आहे. आजकाल आपण खूप मदतनीसांवर अवलंबून आहोत. त्यामुळे जड जातंय. आम्ही घरी दोघंचजणं असतो व त्यातून फक्त झाडूपोछाला मावशी. सध्या दांड्याने फरशी पुसतेय गुडघेदुखी वाढू नये म्हणून. कुणाला वाटत पैसे वाचवायला करते. वाटू देत बापड्यांना. काम करत राहिल्याने वेळ जातो, पैसे वाचतात, फिटनेस, कॉन्फिडन्स वाढतो असे अनेक फायदे आहेत. आजपासून नो भाजी. एकंदरीत अगदी साधी जीवनशैली असल्याने फारसा फरक पडला नाहीये. आज दालफ्राय तंदूरी रोटी जवसाची चटणी केली. आता हेच एक च्यालेंज आहे की घरातल्या उपलब्ध साहित्यातून स्वयंपाक करणे. आठ दिवस झाले बाहेर पडलो नाही व अजून तेरा दिवस काढायचेत...

सध्या दांड्याने फरशी पुसतेय गुडघेदुखी वाढू नये म्हणून. कुणाला वाटत पैसे वाचवायला करते.>>>

जीना सिर्फ अपने लिये... बाकी लोगोंका क्या, कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है केहना.... Happy Happy

मंजुताई,
तुमचे कौतुक वाटते.त्या मानाने आमचे पिढी आळशी आहे.अर्थात अपवाद आहेतच.

आदिश्री, बिग हग! >>>धन्यवाद देवकी Happy ,
नंदेची मुलगी UT Arlington, मध्ये असते. कार नाही, किराणा संपत आला आहे, online अभ्यास असूनही इकडे येता येत नाही. 100 मैलापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्याला सहा महिने शिक्षा आणि हजार डालर दंड आहे. म्हणून आम्हालाही जाता येत नाही. तिथे पण एक केस निघाली आहे. ( तिच नाव देवकी आहे Happy आज वाढदिवस आहे तिचा म्हणून एकदम आठवण आली)

सध्या दांड्याने फरशी पुसतेय गुडघेदुखी वाढू नये >> तसाही mop मिळतो मंजुताई ज्याला बसावे/वाकावे लागत नाही. हे सगळे निस्तरले की बघा.

>>गांव मे आया कोरोना,
पर सांसू बोले कपडे बरोबर करोना,
xyz बोला डरोना,
बस डिसेंबर तक रूकोना...

Rofl

माझ्या माहितीत एक लग्नवाले आहेत. पण माझी हिम्मत नाही आहे त्यांना सजेस्ट करायची की आहात तिथेच लग्न करा आणि एखादं रिसेप्शन नंतर तुमच्या गावी जायला मिळालं की करा. खरं एकत्रच राहतात सो ऑन लाइन लग्न करुन, त्यात झुम किंवा वेबेक्सने इतर मंडळींना समावून घ्यायची, त्यामुळे व्हायरल/फेमस व्हायची संधी का घालवताहेत हे मला कळत नाही पण ते असो.

मी सध्या इथले विविध मेल्स्/आवाहने पाहून शिवण मशीन विकत घेऊन मास्क बनवायला हवेत या मताला आले आहे. अर्थात योग्य ती खबरदारी पाळून, सूचना आहेत. मला ते वेगळं हेप्पा फिल्टरचं मटेरियल मिळत नाहीये पण मिळेल अशी आशा करते. मेलं शालेय जीवनातलं सगळं आयुष्य अभ्यास एके अभ्यास करण्यात गेलं असं वाटतंय. मी चित्रकला, शिवण्,टीप्ण यात कधी रस दाखवला नाही. देखेंगे ये भी करके देखेंगे. आमच्याकडे घराबाहेर येउन पिक अप करून हे मास्क्स्/डोनेटेड गॉग्ल्स इ. घेऊन जातात.

माझा भाऊ आजपासून परत कामावर गेला. मेडिकल प्रोफेशनल्स साठी फेस शिल्ड बनवायचे काम आजपासून महिंद्राने सुरू केले. बीएस6 साठी पूर्ण वर्षभर झटून शेवटी लाँचची वेळ आली तेव्हा अचानक प्लांट बंद करावे लागले. पण त्याच प्लांटमध्ये आता फेस शिल्ड बनवायचे काम सुरू झाले.

https://auto.ndtv.com/news/coronavirus-pandemic-mahindra-to-manufacture-...

माझ्या घरी एक इलेक्ट्रिक शिवण मशीन आहे व मला जुजबी शिवण जमते.
जो अ‍ॅन्स नावाच्या फॅब्रिक दुकानात (५) मास्क बनवायचे किट मोफत देतात.
आपण किट आणायचे व मास्क करून डोनेट करायचे. ते मग धुवून दवाखान्याला डोनेट करतात.
आमच्या राज्यात काही महिलांनी ही असा उपक्रम सुरु केला आहे.
मीही पाच मास्क केले !

वेका,
हेप्पा फिल्टर मटेरीयल मलाही मिळाले नाहीये. मी नुसतेच कॉटनचे मास्क शिवायला घेत आहे. काहीच सुरक्षा नसण्यापेक्षा हे बरे. फिल्टरसाठी पॉकेट वाले तयार करत आहे म्हणजे फिल्टर मटेरीयल मिळाल्यास आत घालता येइल. मी खाली दिलेली लिंक वापरतेय.
https://www.youtube.com/watch?v=POvs4vlQJOM

आदिश्री, बिग हग.
https://www.sewausa.org/COVID-19 इथे तुम्हाला सॅन अँटोनियो भागातील नॉन मेडीकल हेल्पलाईनचा नंबर मिळेल. त्यांच्याकडून तुम्हाला ग्रोसरी वगैरेसाठी नक्की मदत मिळेल. तुमच्या भाचीसाठी देखील अर्लिंग्टंन टेक्सासमधे सेवा कडून मदत मिळेल का ते पहा.

मला गावातल्या दुकानात मासा (टॉर्टिया पीठ) आणि ऑल परपझ फ्लोर मिळाले. त्यामुळे आता घरगुती टॉर्टिया आणि नान करता येतील. गावातले हे ग्रोसरी स्टोअर चेन वाले नाही. काल सकाळी लवकर गेले. चारच जण होतो. कांदे, बटाटे प्रत्येकी एक बॅग मिळत होती, जोडीला केळी आणि ब्रेडचे दोन लोव्ज. जवळ जवळ दोन वर्षांनी पांढरा ब्रेड विकत घेतला. काल लंचला पिनटबटर पेपर जेली सँडविच, आज बटाटा भाजी सँडविच. हे असे करुन ८-१० दिवस नक्कीच जातील.

>>मीही पाच मास्क केले !>> ग्रेट _/\_
आमच्या इथे जो अ‍ॅन दुकान असलेल्या काउंटीत नेमका आजाराचा जोर जास्त आहे, शक्यतो प्रवास करु नका असे आलेय.
साधना, महिंद्राची बातमी वाचून छान वाटले.

भरणाऱ्यापैकी आहोत. काही लोकांची प्रियजन आयुष्याशी झगडत असताना मला कणकीची काळजी वाटते हे जाणवून स्वतः ची लाज वाटली.>>
अस काही वाटुन घेवू नका. आपल्याला पुर्वी जे सहज मिळत होते ते आता मिळत नसेल तर होणारच तसे. प्रत्येकवेळी एक्स्ट्रीम गोष्टींशी कंपेअर करून आपली दु:ख छोटी कशी होणार ? मला आता बाहेर झाड लावता येत नाहीत म्हणुन वाईट वाटते. अगदीच उथळ दु:ख. असो.
गव्हाचे पीठ मैदा जिथे मिळतो तिथे मिळते वॉलमार्ट/टारगेट मध्ये. छोटा पॅक असतो किंग ऑर्थरचा . परवा मी तेच आणुन ठेवल. कारण माझ्याकडचे पीठ संपायला आलेले.
माझ्या कामाच्या स्वरुपा मध्ये हे कोरोनाचे आकडे ट्रॅक करुन , कॅश इंपॅक्ट बघण इत्यादी येत. भयंकर डिप्रेस वाटत. लोक काय काय फाल्तु कमेंट वगैरे करत असतात ते बघुन एकदमच राग पण येतो. पण मग लक्षात येत कि जो तो आपल्या परिने यातून मार्ग काढतो आहे आणि प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे. काहींना नाव ठेवून बर वाटत तर काहींना मेसेज फॉर्वर्ड करुन.

<<मला गावातल्या दुकानात मासा (टॉर्टिया पीठ) आणि ऑल परपझ फ्लोर मिळाले. त्यामुळे आता घरगुती टॉर्टिया आणि नान करता येतील. गावातले हे ग्रोसरी स्टोअर चेन वाले नाही. काल सकाळी लवकर गेले. चारच जण होतो. कांदे, बटाटे प्रत्येकी एक बॅग मिळत होती, जोडीला केळी आणि ब्रेडचे दोन लोव्ज. जवळ जवळ दोन वर्षांनी पांढरा ब्रेड विकत घेतला. काल लंचला पिनटबटर पेपर जेली सँडविच, आज बटाटा भाजी सँडविच. हे असे करुन ८-१० दिवस नक्कीच जातील.>>
स्वाती, तुम्हाला ग्रोसरी मिळाली म्हणून बरे वाटले Happy

आपण किट आणायचे व मास्क करून डोनेट करायचे. ते मग धुवून दवाखान्याला डोनेट करतात.
आमच्या राज्यात काही महिलांनी ही असा उपक्रम सुरु केला आहे.
मीही पाच मास्क केले !>>> विकु छान एकदम.
मी पहिल्यांदा तोच उपक्रम जॉइन करायचा विचार केलेला. पण त्या ऐवजी वस्तु डिलिव्हर करण्याचा इथे ग्रुप सुरु झाला आहे. तो जॉइन केला आहे. ते मास्कच जमत का बघते.

हे कम्युनिटी मास्क प्रोजेक्ट्स आमच्या गावात पण चालू आहेत. पण त्याच ग्रुप ला समजले की काही संस्था , विशेषतः मोठी हॉस्पिटल्स त्यांना मास्क ची गरज असली तरीही होममेड मास्क स्वीकारत नाहीयेत. त्यांना त्याच्या विश्वासर्हतेची खात्री करायला काही मार्ग नसल्यामुळे त्यांनी मदत स्वीकारली नाही असे कळले. रेस्क्यू स्क्वाड , फायर स्टेशन, काही नर्सिंग होम्स इ. काही ऑर्गनायजेशन्स नी घेतले मास्क्स. तेव्हा कुणाला डोनेट करणार आहात ते लोक अ‍ॅक्सेप्ट करतात का हे बघून मग च मास्क शिवायला घ्या असे सुचवेन.

आमच्याकडेही मोठ्या हॉस्पिटल्सची पर्टिक्युलर रिक्वायरमेंट आहे मास्क्सबाबत. घरगुती चालायचे नाहीत.

लोक्स ही इकडच्या मैत्रीणीच्या बहिणीची व्यथा शेअर करतेय.

https://www.change.org/p/ministry-of-external-affairs-india-help-in-gett...

थोडक्यात सांगायचं तर या मुंबईमधल्या घरचा कर्ता पुरूष घानामध्ये अडकला आहे. त्यांना एक मुलगी आहे जी स्पेशल कीड आहे. ही मुलगी सोडून इतर म्हणजे मुलीची आई, आजी आणि भाऊ यांना कोविड-१९ झाला आहे. The only care giver who is in Ghana needs to come home and with no flights coming in Mumbai it’s hard. Please please help.

बापरे! वेका, फारच कठीण आहे परीस्थिती. न्युज चॅनेलची मदत होवू शकेल का? किंवा मुख्यमंत्री ठाकरे?

I don’t know any big shots g. I am going to call the friend in evening and ask what are options. I am honestly can’t think my brain is freezed over this.
बातमीमध्ये आलं तर बहुतेक काही होईल. निदान पिटीशन तरी साइन करा. मला ऑनेस्ट्लई माहित नाही पिटीशन्स कशा चालतात पण आता तिला हेच सुचलं असेल.

>>पिटीशन सोडुन काय करता येईल प्ली़ज सांगा<<
या समस्येवर पिटिशन हा उपाय/मार्ग (इवन मदती करता) कसा काय होउ शकतो, हा प्रश्न पडला आहे. मुंबईत असल्याने लोकल प्रतिनिधी (नगरसेवक, आमदार) हे नक्किच मदत करतील. मुख्य्मंत्री/पंतप्रधान कदाचित शेवटचा ऑप्शन. मुलीच्या वडिलांना घानावरुन आणणं या परिस्थितीत कठिण आहे...

राज तुम्ही म्हणता ते बरोबर असेल. त्यांनी मिनिस्टर लोकांशी (आता नक्की कुणाशी ते माहित नाही मला डिटेलवार) बोलून पाहिलं पण यावेळी ते त्या बाबतीत स्ट्रिक्ट आहेत असं दिसतंय. म्हणून हा अप्रोच केला आहे. मला आणखी डीटेल्स संध्याकाळी समजले की सांगायचा प्रयत्न करेन. आणखी काय पर्याय असेल? तुम्हाला का असं वाटतं की पिटीशन्स हा पर्याय नाही?

छोटा पॅक असतो किंग ऑर्थरचा . परवा मी तेच आणुन ठेवल. कारण माझ्याकडचे पीठ संपायला आलेले>>.धन्यवाद सीमा बघते...
आदिश्री, बिग हग.
https://www.sewausa.org/COVID-19 इथे तुम्हाला सॅन अँटोनियो भागातील नॉन मेडीकल हेल्पलाईनचा नंबर मिळेल. त्यांच्याकडून तुम्हाला ग्रोसरी वगैरेसाठी नक्की मदत मिळेल. तुमच्या भाचीसाठी देखील अर्लिंग्टंन टेक्सासमधे सेवा कडून मदत मिळेल का ते पहा.>> खूप खूप आभार स्वाती2
वेका>> वाईट वाटते आहे. I totally understand.

Pages