कोरोना चे तुमच्या जीवनावर परीणाम

Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39

सभ्य स्त्री पुरुष हो,

कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.

( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही हात, चारी पाय जोडून कळकईची विनंती:

गल्लीतला / नेहेमीचा तुमचा डॉक्टर संपूर्ण हॅझमॅट सूट घालून तुम्हाला तपासत असेल, तर आणी तरच तुमच्या दवाखान्यात जा.

अन्यथा तुम्ही तुमचा व तुमच्या डॉक्टरचाही जीव धोक्यात घालत आहात.

समजा, तुमच्या आधी त्याने तपासला, त्या पेशंटला करोनाचा आजार असिंप्टमॅटिक स्टेजला असेल, तर तुम्ही काय कराल? त्या विशिष्ट पर्सनल प्रोटेक्टीव्ह सूट शिवाय त्या डॉक्टरलाच स्वतःला इन्फेक्शन झालेले असेल ते तुम्हाला कसे समजेल?

घाबरू नका, पण उगाच दवाखान्यात धाव घेऊही नका. तुमचे नेह्मीचे जीपी/हॉस्पिटल करोना ची ट्रीटमेंट करण्यास सक्षम नाही. त्यासाठी "डेसिग्नेटेड प्लेसेस" उर्फ संसर्गजन्य कक्ष स्थापन केलेत तिथेच जा.

आम्ही डॉक्टरमंडळीही तिथे येऊन तुम्हाला सेवा देऊ.

उगा गल्लीतला दवाखाना उघडत नाही म्हणून आंदोलन वगैरे करू नका भावांनो. तिथे करोनाचं इंजेक्शन भेटत नाय. तुमचा लाखमोलाचा जीव देऊ नका आन डाक्टरचा बी जीव घेऊ नका. _/\_

अर्र... मी उगीच लिहिले, निराश वाटतं. त्यामुळे इतरांनाही तसे वाटेल हे ध्यानात नाही आले. सॉरी.
साधना, हो. १७५ देश बाधित झालेत. सगळ्यांची सपाट झालेली इकॉनॉमी हळुहळु येईल परत.

Wfh करणाऱ्यांच्या तक्रारी वाचून मला first world problem वाचल्यासारखे फिलींग येत आहे. Happy

मी फ्लाईटस आणि एअरपोर्ट बंद असल्याने भारताबाहेर अडकून पडलोय.

भारतात कधी जाणार आणि त्या नंतर quarantine च दिवस संपवून घरी कधी पोचणार देव जाणे.

ईकडे प्रत्येक जण वेगवेगळे काहीतरी सांगतोय. कोणी म्हणतंय १५ दिवस quarantine आहे, कोणी म्हणतंय ३० दिवस. घरी लहान मुलं, जेष्ठ नागरीक असल्याने home quarantine शक्य नाही. हाॅटेल वर रहावं लागणार. मधे ऐकलं होतं की सरकारने काही ५ स्टार हाॅटेल सोबत टाय अप केलं आहे. कोणी म्हणतंय की सरकारी हाॅस्पिटल मधे रहावे लागणार. काय खरं काय खोटं भारतात आल्यावर कळेल.

माझ्या फिल्डमधे wfh शक्य नाही. काम नाही, घरच्यांच्या सोबत नाही.

ईतके दिवस एकटाच बोअर होणार......

बाहेरील रहदारी आणि बांधकामे /दुरुस्ती कामे बंद आहेत म्हणून की काय पण घरात धुळीचे प्रमाण खूप कमी झालेले गेल्या आठवडाभरात लक्षात आले आहे.

रुस्ती कामे बंद आहेत म्हणून की काय पण घरात धुळीचे प्रमाण खूप कमी झालेले गेल्या आठवडाभरात लक्षात आले आहे.>>>>> खरंच की! धूळ कमी कशी याचे आश्चर्य वाटत होते. कालपर्यंत मेट्रोचे काम चालू होते.आज मात्र सन्नाटा आहे.

आता धीर सुटत चाललाय. लोकं एकएकटे (घरच्यांशी न बोलता/भेटता) मरणाला सामोरे जातायत - बातम्या येतायत. हे फार हाँटिंग आहे, भयानक आहे. आपण आपल्या माणसापाशी धीर द्यायला, नसणरोत - ही कल्पनाच सहन होत नाही. मरणाच्या दाढेतून बाहेर पडायला, जवळच्यांनी फार फार धीर द्यावा लागतो - अनुभव!
खूप भीती वाटते. मधेच या अनिश्चिततेमुळे भरुन येते.

आता धीर सुटत चाललाय. लोकं एकएकटे (घरच्यांशी न बोलता/भेटता) मरणाला सामोरे जातायत - बातम्या येतायत>>

ओह गॉड, पण तुम्ही सगळा बाह्य संपर्क तोडून टाकलात तरीही शिकार होणार?

घरात बसून राहणे तुमच्या हातात आहे ना??

सॉरी जास्त प्रश्न विचारतेय पण तिकडे काय चाललंय मला माहिती नाही. 1 लाखाच्या वर रुग्ण आहेत असे वाचतेय. पण इथल्या काही लोकांच्या मते भारतात टेस्टिंगच नाही नाहीतर भारतात याच्या दुप्पट निघतील.

सामो,
हेल्थ केअर वर्कर्स त्यांच्या परीने जितकी सोबत करता येइल तितकी करत आहेत. टेक्नॉलॉजी वापरुन प्रियजनांशी संपर्क, प्रियजनांना क्लोझर मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. शेवटच्या क्षणी प्रत्यक्ष हात धरायला प्रीस्ट /चॅपलिन नसणे हे खूप जणांसाठी क्लेशकारक आहे पण त्याला इलाज नाही. येणार्‍या बातम्या बघून भीती वाटणे, निराश वाटणे होणारच पण तरीही प्लीज तुम्ही खूप ताण नका घेवू. देवावर श्रद्धा आहे तर जेव्हा वेळ येइल तेव्हा पैलतिरीही तोच नेइल असा विचार करा.

स्वाती2, परिस्थिती खरेच इतकी वाईट आहे का हो?? बातम्या इतक्या उलटसुलट की काही कळत नाहीये. बरे झालेंक्यांची संख्या जास्त आहे, गेलेल्यापेक्षा.

>>>>सॉरी जास्त प्रश्न विचारतेय>>>> अजिबात नाही. प्लीज असे समजू नका. हा फोरम आहे म्हणुन जरातरी संतुलित विचार कळतात.
>>>>पण तुम्ही सगळा बाह्य संपर्क तोडून टाकलात तरीही शिकार होणार?>>> साधना, बाह्य संपर्क कमीत कमी आहे. औषधे, ग्रोसरी, लाँड्री बस्स!! बाकी गाणी-सिनेमे चालू आहे पण एखादा डिप्रेसिंग लेख वाचला की धीर सुटतो. मनात विचार येतो हे संपणार कधी. या काळ्ञाकुट्ट बोगद्याचा अंत कुठे?
>>>>>टेक्नॉलॉजी वापरुन प्रियजनांशी संपर्क, प्रियजनांना क्लोझर मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. शेवटच्या क्षणी प्रत्यक्ष हात धरायला प्रीस्ट /चॅपलिन नसणे हे खूप जणांसाठी क्लेशकारक आहे पण त्याला इलाज नाही. >>>>> प्रियजनांचे शब्द फार महत्वाचे असतात माणसाला मृत्युच्या दाढेतून काढायला. फार फार!
>>>येणार्‍या बातम्या बघून भीती वाटणे, निराश वाटणे होणारच पण तरीही प्लीज तुम्ही खूप ताण नका घेवू. देवावर श्रद्धा आहे तर जेव्हा वेळ येइल तेव्हा पैलतिरीही तोच नेइल असा विचार करा.>>>> धन्यवाद.

१- चहा फक्कड करता येवू लागला. बेड-टी ची सवय नाहीशी झाली.
२- डाळ / तान्दुळ ह्यात किती पाणी घालावे ह्याचा अन्दाज पक्का बसला.
३-स्वयं-पाक करताना (multi tasking) करता येवू लागले.
४-टीवी बघण्याचे प्रमाण कमी झाले. सकाळी पुजे साठी वेळ मिळू लागला, सन्ध्या़काळी राम रक्षा, मारुती स्तोत्र म्हणू लागलो.
५-जेवणाचं प्रमाण आपसुक कमी झालं. ४ चपाती च्या ऐवजी २ मधे च पोट भरतय. भुक लागेल तस खाणं , खाण्याच्या वेळा अश्या निश्चित नाही. सन्ध्या़ळी ७/ ७:३० ला चुल बन्द म्हणजे बन्द आणि तोन्ड ही :).
६-नकारात्मक विचार आले की एकतर माउथ-वाश घेणे, अथवा १० मिनिटे डोळे मिटुन - जेजुरी, अथवा महालक्ष्मी मन्दिर परीसरात मनोमन फिरुन येणे.

सामो,
"येणार्‍या बातम्या बघून भीती वाटणे, निराश वाटणे होणारच पण तरीही प्लीज तुम्ही खूप ताण नका घेवू. देवावर श्रद्धा आहे तर जेव्हा वेळ येइल तेव्हा पैलतिरीही तोच नेईल असा विचार करा."
अगदी हेच. जेव्हा हातांत काहीच नसतं तेव्हा श्रद्धा असते. म्हणजे हातांच्या ओंजळीत काहीतरी असतं. ओंजळ रिकामी नसते. ताण घेऊ नका. आपण सारे एकाच नावेतून जाणारे सहप्रवासी आहोत.

साधना,
जसे टेस्टिंग उपलब्ध होत आहे तसे बाधित रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. मात्र त्याच जोडीला साथीचा प्रसार वाढल्यानेही आकडा वाढत आहे. इथे नोकरीच्या ठिकाणी रजा अगदी मोजक्या असतात. वर्क फ्रॉम होम पर्याय हा फार कमी लोकांना आहे. आमच्या इथे अगदी बुधवारी स्टे अ‍ॅट होम ऑर्डर येइपर्यंत लोकं कामावर जात होती, असेंब्ली लाईनवर काम करत होती, कामासाठी घाबरत विमान प्रवासही करत होती. तेव्हा सोशल डिस्टंसिंग हे खर्‍या अर्थाने नुकतेच सुरु झालेय असे म्हणायला हवे. त्याचा परीणाम दिसायला वेळ लागेल.
अमेरीकेत ओबेसिटीचे प्रमाण बरेच आहे आणि त्यामुळे डायबेटिस, हाय ब्लडप्रेशर अशा व्याधीग्रस्थांचेही. करोना वायरसने बाधित व्यक्तीला अशी आधीची व्याधी असल्यास प्रकृती झपाट्याने खालावते. सौम्य लक्षणे असलेले बरेच जण घरीच क्वारंटाईन केले आहेत. मात्र लक्षणे सुरवातीला सौम्य होती आणि नंतर अचानक तब्येत खूप बिघडली असेही होत आहे. इम्युन सिस्टिमने खूप तीव्र प्रतिसाद दिल्याने तब्येत खालावणे असेही होत आहे. तीव्र लक्षणांसह आजारी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. आमच्याकडे या सगळ्यासाठी पुरेसे रिसोर्सेस नाहीत. आमच्या गावातील हॉस्पिटलला पीपीइ चा तुटवडा आहे. मिडलस्कूल आणि हायस्कूलने सायन्सच्या वर्गासाठी ऑर्डर केलेले सेफ्टी गॉगल्स हॉस्पिटलला दान केले यावरुन परिस्थितीची कल्पना यावी. अशीच परीस्थिती सगळीकडे आहे. लोकं पीपीइ विकत घेण्यासाठी पैशाचे डोनेशन करत आहेत पण विकत घेण्यासाठी पुरेसा मालच उपलब्ध नाही. युद्धपातळीवर कारखाने चालवा असे आदेश दिले तरी प्रत्यक्ष माल उपलब्ध होण्यास वेळ लागणार आहे. मात्र सगळे आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. पुरेशी पीपीइ आणि वेंटिलेटर्स उपलब्ध होवोत. लस तयार करण्याच्या प्रयत्नांना यश मिळून जीवित हानी टळो हीच प्रार्थना.

अमेरीकेत किती माणसे साथीत दगावतील याचे अंदाजे आकडे भयावह आहेत. आमच्या राज्याची राजधानी, आमच्या शेजारची काउंटी हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेय . कम्युनिटी स्प्रेड होवू नये म्हणून शक्यतो घरात रहाणे करत आहोत. १५ मार्चला मी शेवटची ग्रोसरी केली. जे आहे ते पुरवून वापरत आहोत. खाण्यात आवड निवड बाजूला ठेवलेय. कडक हिवाळ्यात, आहे तो शिधा पुरवून वापरायची २० व्या शतकातली जुनी सवय, आता परत उपयोगात आणतोय. आमच्याकडे त्यात टोर्नॅडो सिजनही सुरु झालाय.

आमच्या घरात पुढील आठवड्यापासून पगार येणार नाही. नो पे किंवा रजा वापरा. कामगारांना टेंपररी अनएंप्लॉयमेंट साठी अर्ज करायचा पर्याय आहे. माझ्या नवर्‍याला तो पर्याय सध्यातरी नाही. उद्या देखील तो स्पेशल परमिशनवर कामावर जाईल. फक्त मोजकेच लोकं तिथे असतील अंतर राखून काम चालेल हेच समाधान आहे. वॉर अ‍ॅक्ट नुसार विशिष्ठ पार्ट बनवून द्या म्हणून आदेश आला तर घरी रहायचाही पर्याय नसणार.

मुलाला सध्या वर्क फ्रॉम होम आहे मात्र पुढील आठवड्यापासून त्याचीही परीस्थिती नवर्‍यासारखीच असेल. त्यांच्या राज्याची परीस्थिती आमच्या राज्यापेक्षा वाईट आहे. तिथे काल डिझॅस्टर डिक्लेअर केले आहे. त्यामुळे एवढ्या पास्त्यात एवढी सर्विंग्ज, एवढ्या तांदळात इतकी सर्विंग्ज असे मोजून जी ग्रोसरी आहे ती पुरवून वापरायचा लेकाचा प्रयत्न असेल.

साधना, मी फक्त ज्या राज्यात राहते तिथलं साधारण सांगू शकते. आधी, म्हणजे मार्चच्या सुरूवातीपर्यंत दिवसाला ८० टेस्ट्स होऊ शकणार होत्या. नंतर फेडरल मदत मिळाल्यावर ती संख्या वाढली (किती ते माहित नाही) नंतर रिपाेर्टेड केसेस एक्सपोनेंनशीयली वाढत आहेत. हा आकडा मोठा असेल पण घाबरू नका असं इथल्या हेल्थ आॅथरिटीचं म्हणणं आहे. इथे आजवर १३ लोकं दगावलीत यातली १२ वयाने ७०+ आणि इतर व्याधी असणारी आहेत. एकाच इ-मेल मध्ये दगावणार्या व्यक्तीचं वय लिहिलं नव्हतं. पुढे काय ते नंतर कळेल.
आता आरोग्यसेवेविषयी, रूग्णांची काळजी घेणारी लोकं काम करताहेत. त्यांचे खालील दोन संदेश उदा. म्हणून पहा:
Did you know that before the COVID-19 crisis, approximately 60% of long-term care residents never received a visitor? The Long Term Care Office needs our help to let residents know we're here for them and thinking about them during this time. Print out a #LoveFromADistance flyer, write a message, snap a photo, and post to their Facebook page.

Veterans’ Affairs is collecting video clips, which can be shown on the closed-circuit TV in the facility.

एनीवे, आजाराची व्याप्ती पाहता हे आपल्यालाही होऊ शकेल याची मानसिक तयारी करायला हवी असं आजूबाजूच्या लोकांशी (व्हर्च्युअली) संवाद साधताना जाणवतं. ते नाही झालं तर चांगलंच आहे पण वी डोन्ट नो वाॅट वी डोन्ट नो. अर्थात स्टेट गाईडलाइन सांगते ते आम्ही पाळतोय. त्यात सोशल डिस्टंसिंग हे मुख्य. लाॅक आऊट वगैरे नाही त्यामुळे आपापले वाॅक करू शकतो ही जमेची गोष्ट.

आता बाकीची हेल्थ केअर बदलली आहे. दुसर्या नाॅन इमर्जन्सी साठी टेलिहेल्थ हा पर्याय आहे. त्यात डाॅक्टर/नर्स/थेरपिस्टशी व्हिडीओ काॅन्फ करणे येतं. हे आम्ही आधीही केलं आहे त्यात नवं काही नाही. पण आता ज्यांना जावंच लागेल त्यांना फक्त इ.आर. हा पर्याय आहे. मागच्या आठवड्यात माझा कलिग जाऊन आला. त्यानंतर त्याला १४ दिवस लाॅक डाऊन व्हायला सांगितलं.
शाळा, सलाॅन,जिम, पार्क स्ट्रक्चर्स अशा संपर्क होऊ शकणार्या जागा, व्यवसाय पूर्ण बंद आहेत. रेस्ताॅं. फक्त टू गो आॅर्डर्स घेतात.

आता लहान तोंडी मोठा घास आणि Light 1 सामो आणि तत्सम पॅनिक आय डीज साठी,
त्यांनी कुठच्या दुसर्या धाग्यात बहुतेक “बायपोलार” चा उल्लेख केला होता. ते असो की नसो, माझा त्याबद्दल अभ्यास/अनुभव नाही पण हेल्थ केअर/आॅफस एच आर ने सांगितलंय सर्वांना ते सांगते, यासाठी तुमचे नेहमीचे थेरपिस्ट्स कामावर आहेत. त्यांना प्लीज संपर्क करा. ते नसतील तर तुमच्या इंशुरन्स तर्फ् एक वेगळी तीन फ्री थेरपी सेशन्सची सुविधा असते ती वापरा. ते पॅनिक अन्य जागी लिहून तुम्हाला आणि ते वाटणार्याला फायदा होईल का याचा स्वत:च विचार करा. तरीही लिहावंसं वाटलं तर लिहा पण इथल्या आॅनलाइन समुपदेशनाऐवजी जे यातले तज्ञ आहेत त्यांची साथ धरा. शुभेच्छा Happy

आय होप दिस मेक सेन्स. मी इतर बातम्या फक्त हेडिंग वाचते, आई-बाबांची चौकशी करून रिसिविंग एंड होते पण डिटेल्स फक्त जिथे मी सध्या राहते तिथलेच वाचते कारण मी माझ्या कुटुंबाची सपोर्ट सिस्टिम आहे. शक्यतो मला माझे मनोधैर्य घालवायचं नाही. टु बी आॅन्स्ट अनलेस आय कॅन गो आऊट देयर टू फाइट विथ माय नाॅलेज आय शुड ओन्ली बी एबल टू केयर फाॅर माय फॅमिली. मला करता येण्यासारखी गोष्ट रक्तदान अन्य योग्य डोनेशन्स, कुणाला सामान आणून हवं असेल त्यांच्या दाराबाहेर ठेवणं हे मी करू शकते आणि करेन. याउप्पर पॅनिक होऊन काय साध्य होणार? सो काल्म डाउन आणि तुम्ही अमेरिकेत असाल तर तुमच्या राज्याची हेल्थकेयर आॅथरिटी साइट काय सांगते त्याप्रमाणे ठरवा. जस्ट थिंकिंग आऊट लाऊड Happy
सर्वांसाठीच स्टे सेफ.

आमच्या राज्यात परीस्थिती ठीक आहे. आमच्या आणि शेजारच्या जिल्ह्यात जास्त रूग्ण आहेत. 'mandatory stay-at-home order' लागू केली आहे. म्हणजे तुम्ही आवश्यक कामांसाठी बाहेर पडू शकता, पण आवश्यक असेल तरच. योग्य ती काळजी घेऊन आणि नियम पाळून अगदी वॉकलाही जाऊ शकता. ग्रोसरीचे आवश्यक सामान मिळत आहे. उद्यापासून काही भारतीय दुकानं बंद असतील, काहींनी ऑन लाईन ऑर्डर घेणं सुरू केलं आहे. आमच्याकडे दोन आठवडे झाले घरून काम चालू आहे. लेकीचे सगळे क्लासेस ऑनलाईन झाले आहे. माझे दोन प्रॉजेक्ट्स सुरू झाले होते, ते दोन आठवडे झाले, होल्डवर टाकले आहेत. नवरा अधून मधून रनिंग करून येतो, आम्ही आमच्या 'पेट'ला चालायला नेतो. थोडक्यात वीकएंडच्या पार्ट्या बंद होणे, क्लासेस बंद होणे आणि सोशलायझेशन बंद होणे व्यतिरीक्त इथे वैयक्तिक रीत्या लोकांचं बरं चाललं आहे.
आमच्या गावाशेजारीच जगातील उत्कृष्ट हॉस्पिटलपैकी एक आहे. आज सकाळी त्यांच्याकडून आलेला अपडेटः

"We had our biweekly COVID update yesterday and the predictive model our ID team had plotted shows some good news. Seems like locally social distancing may infact have flattened the curve this past week. We're far below what the model predicted. Moving forward, not sure how they'll have to calibrate that model with the changes in testing guidelines, but a sliver of good news in this terrifying post-COVID world"

म्हणजेच सोशल डिस्टनसिंग, हेल्थ केअर प्रोव्हायडरने सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळल्यास तुम्हाला धोका नाही. सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे, बातम्यांमधून चांगले तेव्हढेच लक्षात ठेवणे, कुणाला हवी असल्यास नियम पाळत मदत करणे. थोडक्यात आपापल्या परीनं सर्वसामान्य लोक काही ना काही करत आहेत ही जमेची बाजू.

Having said that, काही राज्यांमधली परीस्थिती चांगली नाही. वर स्वातीनं तिच्या राज्याबद्दल लिहीलं आहेच. न्यूयॉर्कची परीस्थिती खरंच काळजी करण्याजोगी आहे. डॉक्टर्स आणि नर्सेसना पुरेशी आवश्यक साधन सामग्री नसणं हेही काळजीचे कारण आहे. आमच्या समोर रहाणार्‍या शेजारणीची मुलगी तिकडे रेसीडन्सी करत आहे. तिच्याकडून कळले की हे सगळे लोक तेच तेच मास्कस वापरत आहेत. कधी कधी तर ट्रॅशबॅग्ज प्रोटेक्टीव्ह गिअर्स म्हणून वापरत आहेत. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने सुरवातीपासून अतिशय चुकीचा अप्रोच घेतला, त्याप्रमाणे चुकीची निवेदनं-भाषणं केली गेली, निधी ताबडतोब उपलब्ध केला नाही. प्रेसिडेंटच जर महत्व देत नसेल तर सामान्य लोकांना त्याचा सिरीयसनेस कसा कळेल? राज्य, शहरं आणि सर्वसामान्य नागरीक स्थानिक पातळीवर, वैयक्तिकरीत्या प्रयत्न करत आहेत. तुलना करायची नव्हती पण रहावले नाही - त्यामानाने भारत सरकारनं चांगली कामगिरी केली आहे. लोकांनी साथ दिली पाहिजे एवढंच जरी पाळलं तरी भारतात परीस्थिती सुधारेल.
यातून बाहेर पडू नक्कीच.

स्वाती२, तुमच्याकडे बरीच अवघड परिस्थिती दिसतेय. इंडियन ग्रोसरी मिळत नसेल ते ठीक पण अमेरिकन ग्रोसरी पण बंद झाल्यात का तिकडे? तुमच्या नियोजनाचे कौतुक आणि तुम्हाला गुड लक!
इथे कॉस्को, होल फूड्स , ट्रेडर जो वगैरे चालू आहेत, ते सोशल डिस्टन्सिंग एनफोर्स करून एका वेळी २५ वगैरे लोक आत सोडत आहेत पण फ्रेश प्रोड्यूस आणि इतर वस्तू व्यवस्थित उपलब्ध आहेत. कर्ब साइड पिकपचाही ऑप्शन्स देत आहेत बरीच स्टोअर्स.
आम्ही न्यूजर्सीत आहोत, इथे केसेस चे प्रमाण प्रचंड आहे. आमच्या गावात पण डझन भर केसेस झाल्यात आता. लोक एकमेकाला मदत करत आहेत. एका मैत्रिणीने तिच्या शिलाई मशीन वर कापड + एसी चे फिल्टर्स असे वापरून मास्क्स तयार करून हॉस्पिटल्स आणि इमर्जन्सी वर्कर्स ना दिले. आमच्याकडे ( आमची रोबॉटिक्स टीम असल्यामुळे) बरेच सेफ्टी गॉगल्स होते ते आम्ही डोनेट केले. इंडियन ग्रोसरीज सगळ्या एकदमच आता उद्यापासून बंद होतील. पण आमच्या नेबरहुडातच मोठ्या ग्रोसरी स्टोर्स पैकी एक ओनर रहात असल्यामुळे शेजारी असल्याचा फायदा, म्हणजे व्हॉट्सप्प वर ऑर्डर दिल्यास शेजारी म्हणुन आम्हाला गरजेच्या वस्तू मिळण्याचा ऑप्शन आहे!
गावातल्या उत्साही लोकांचा एक फेबु ग्रुप आहे त्यावर लोक वेगवेग्ळ्या मजेशीर अ‍ॅक्टिविटीज ऑनलाइन खेळ वगैरे आयोजित करत असतात. जसं - तुमच्या फोन मधला शेवटून १२ वा फोटो पोस्ट करा, आजचा मेनू पोस्ट करा, आज डोक्यात असलेले गाणे लिहा वगैरे. काल एक नवी अ‍ॅक्टिव्हिटी कुणीतरी सुचवली आणि जाम लोकप्रिय झाली आहे ती म्हणजे बेअर हन्ट! म्हणजे आपण आपल्या घरात एखाद्या खिडकीत बाहेरून दिसतील असे छोटे टेडी बेअर्स ठेवायचे. सध्या वेदर बरेच चांगले असल्यामुळे लोक आपापले किंवा आपल्या मुलांसोबत नेबर हूड मधे ट्रेल वर वॉक ला जात आहेत. तर मुलांनी (किंवा मोठ्यांनी पण) असे येता जाता दिसणार्‍या घरांच्या खिडक्यांमधले टेडी शोधायचा गंमत खेळ!
वेळ अवघड आहे, कधी न पाहिलेले संकट आहे हे खरे पण पॉझिटिव्ह रहाणे महत्त्वाचे आहे. आलेल्या परिस्थितीचे फायदे घेत आहोत. आयुष्याचा वेग कमी झालेला एंजॉय करत आहोत. संपर्क तुटलेल्या नातेवाईक मित्र मैत्रिणींना आवर्जून फोन , व्हिडिओ कॉल केले जातायत. मुलांबरोबर कधी नव्हे तो निवांत वेळ आणि क्वालिटी टाइम मिळतोय. कामातून वेळ मिळाला तर कधी मुलासोबत कुकिंग/ बेकिंग, कधी सगळ्या मेंब्रांना घेऊन घर स्वच्छ्ता, मधेच लेकी कडून मॅनिक्युअर, कधी तिच्यासोबत एखादा नेफ्लि मूव्ही किंवा टिकटॉक व्हिडिओ सुद्धा! असले उद्योग सुरु असतात.
अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे मनोधैर्य खचू न देता पॉझिटिव्ह रहात आहोत.

धीर सुटणार्‍या आयडींना - जेनोआ, इटली मधल्या इटालिका ग्रोन्डोना आजीची गंमत वाचा. ह्या १०२ वर्षाच्या आजीचे हृदय जरा कमजोर, तशात तिला कोरोनाव्हायरसची लागण झाली. रूग्णालयात डॉक्टरांनी रक्त तपासले. त्या सीरोलॉजिकल सँपलनुसार ती स्पॅनिश फ्ल्यू च्या कचाट्यातूनही वाचली असावी असा कयास निघाला. अतिवृध्द व्यक्तीवर फार संसाधने खर्च नको म्हणून म्हणा, किंवा तिची लक्षणे "क्रिटीकल" नव्हती म्हणून म्हणा, तिला रूग्णालयात फार औषधे दिली नाहीत. पण आजीबाई जिद्दीची. २० दिवस कोरोनाशी लढाई झाल्यावर आता आजी पूर्ण बरी होणाच्या मार्गावर आहे. जणू अमरपट्टा घेवून जन्माला आली असावी Happy अशाही आशादायी बातम्या येत आहेत.

स्वाती २ नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद. वेका तुमचा प्रतिसाद पण स्वाती२ चाच आहे समजून वाचला. एकदम संयत व मच्युअर प्रतिसाद. अंजली मैत्रेयी सीमंतिनी पण उत्तम प्रतिसाद. सकाळीच वाचले.

मला वर्क फ्रॉम होम नाही करता येत. आज एक कामासाठी ऑफिसात जावे लागेल रिक्षा मिळाली नाही तर चालत जायची तयारी ठेवली आहे.
इथले सुपर मार्के ट रिकामे होत चालले आहे. पण काल माल वाहतुकीस परवानगी दिली आहे. एक दोन दिवसात बघू. २१ दिवस गुणीले ३ ६३ मील्स इतके सामान जेम तेम आहे.

सामोजी, तुम्हाला निराशेचा त्रास होतो त्या साठी सरकारी हेल्थ केअर मधून ट्रीटमेंट उपलब्ध असल्यास चेक करा. इन्सुअरन्स मध्ये इन्क्लुडेड आहे का? तसे नसल्यास कम्युनिटी एफर्ट मध्ये भाग घेणे, व्यायाम बाग काम अ‍ॅनिमल शेल्टर मध्ये काही वेळ काम करणे जमत असल्यास बघा. स्थितप्रज्ञता आल्यास तुमचा त्रास कमी होईल शुभेच्छा.

धन्यवाद अमा. नक्कीच डॉक्टरांना विचारेन. आज सकाळी भरुन आले होते पण त्याचे कारण काल एक फार ब्लीक लेख वाचला होता. परत जर त्रास जाणवला तर वैद्यकिय मदत घेइनच. घरात बसून सूर्यप्रकाशही कमी पडत असेल, डी व्हायटॅमिन घेते पण तरी. मुख्य म्हणजे सकाळी बालकनीत ताजी हवा अनुभवण्याची सवय लावून घेतली पाहीजे. कॉफीचा कप घेउन, लॅपटॉपपुढे बसण्याऐवजी जरा गॅलरीत उभे रहायचे. असे लहान लहान बदल केले तर मूड स्विंग्स होणार नाहीत, असे वाटते.

स्वाती2, वेका, प्रतिसादासाठी धन्यवाद. परिस्थिती खरेच गंभीर आहे. पण तुमचे धैर्यही अतुलनीय आहे.

आमच्या घरात पुढील आठवड्यापासून पगार येणार नाही. नो पे किंवा रजा वापरा

हे वाचून आश्चर्य वाटले. इथे अजूनतरी लोकांचे पगार बंद झालेले नाहीत. आमच्या कंपनीने पगार 8 दिवस आधीच दिला. कमी पगार असलेल्याना दर 15 दिवसांनी पगार देणार. माझी बाई 21 पासून येत नाहीये, ती यायला तयार आहे, मीच नको सांगितले. तिचाही पूर्ण पगार दिला. माझा पगार येईल तोवर तिचा पगार देईन. त्यानंतरही जसे जमेल तसे देईन कारण तिचा उत्पन्नाचा दुसरा सोर्स डेली टेम्पो ट्रान्सपोर्ट होता, जो 2 आठवड्यापासून बंद झाला. त्यामुळे मी व तिचे अजून 1 काम हाच सोर्स उरलाय तिला.

आमच्या ऑफिसात आम्ही आईटी, अकौंटस, टॅक्स, बँकिंग वगैरे लोकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. आमची किराणा स्टोअर्स सुरू आहेत.. आमच्या इनवोईसिंग वगैरे सिस्टिम्स आधीपासूनच ऑटोमेटेड असल्यामुळे जोवर स्टोअर्स सुरू आहेत तोवर सगळ्यांना घरून कामे करता येतील.

कर्फ्यु असला तरी लोकल किराणा, भाजी सुरू आहे, मी कालच घरपोच मागवली. रिलायन्स फ्रेश, डी मार्ट वगैरे सुरू आहेत. मुलगी पुण्याला आहे तिथेही तिच्या घरासमोरचा मॉल सुरू आहे. त्यामुळे सध्या खिशात पैसे असतील तर अन्नाची चिंता नाही. हातावर पोट असलेल्याना फुकट राशन, जेवणे देणार असे रेडिओवर ऐकतेय. प्रत्यक्ष होतेय का माहीत नाही.

अर्थात इथे साथीने अजून भयावह रूप धारण केलेले नाही. याची माझ्या मते 2-3 कारणे असू शकतात. टेस्टिंग फॅसिलिटीज अतिशय कमी असल्यामुळे ज्याला लक्षणे दिसताहेत फक्त त्यांचीच टेस्ट होतेय. यात बाहेरून आलेले व त्यांच्या संपर्कात आलेले इतक्यांचीच टेस्ट होतेय. कम्युनिटी स्प्रेड मुळे बाधित होणारे यात अजून आलेलेच नाही. सगळ्यांचीच सरसकट टेस्टिंग व्हायला लागली तर कदाचित संख्या अचानक वाढेल.

आणि बाहेर कॉरोनाबद्दल भीती असल्यामुळे कम्युनिटी स्प्रेडमुळे बाधित लोक स्वतःहून टेस्टिंगला जात नसावेत. इम्युनिटी चांगली असलेला तरुण माणूस ताप, खोकल्याने चार दिवस आजारी राहून नंतर बराही होईल. पण तो कोरोना पेशंट आहे असे जाहीर करून घरचे सामाजिक बहिष्कार ओढवून घेणार नाहीत. असे पेशंट जर टेस्टिंगला गेले तरीही आकडा वाढू शकतो.

आता देवालाच साकडे. देव करो व वरची कारणे खोटी ठरोत.

सध्या https://aem.asm.org/content/76/9/2712 ह्या पेपरचा वारंवार उल्लेख होत आहे. तापमान ४० डिग्रीच्या वर गेले की कोरोना व्हायरसचा प्रसार होत नाही असा काहीसा आशय आहे. मात्र हे १००% खरे ठरेल असे नाही कारण हा "नॉव्हेल कोरोना" व्हायरस आहे. म्हणजे कोरोना संघ तोच पण हा गडी नवा. त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की सगळं आलबेल होईल ह्या भरवश्यावर राहू नये असे जागतिक आरोग्य संघटनेकडून वारंवार सांगितले जात आहे. भारतात उन्हाळा लवकरच सुरू होत असल्याने इतर देशांपेक्षा जीवितहानी कमी होईल अशी आशा आहे. पण येत्या २१ दिवसात लोक जर घराबाहेर पडले तर किमान २५-५० लाख लोक मृत्यूमुखी पडतील असे प्राथमिक अनुमान आहे. तेव्हा थोडा भार देवावर पण बराचसा भार स्वतःवर आहे असे मानून दिलेले ५ नियम पाळावे ही सर्वांना विनंती.

Pages