कोरोना चे तुमच्या जीवनावर परीणाम

Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39

सभ्य स्त्री पुरुष हो,

कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.

( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अनु
सध्यातरी तीची कंपनी एन्जाॅय करतो आहे कारण, सुदैवाने मला WFH शक्य नाही. पण एकंदर अंदाज घेऊन ऑफीसमधे इयर एन्ड क्लोजिंग अॅक्टिव्हिटीज सलग १ ते २१ तारीख रोजचे १२ तास टाकून लिमिट मधे आणल्या होत्या.
एकदा ऑफिस सुरू झाले की ये रे माझ्या मागल्या.

आमच्याकडेही (न्यू जर्सीत) WFH चालू होऊन ऑलमोस्ट २ आठवडे होत आले आहेत आणि शाळांचं रिमोट लर्निंग चालू होऊन सोमवारी दोन आठवडे होतील. इथेही ग्रोसरी स्टोअर्स चालू आहेत. रेस्टॉरंट्समध्ये बसून खाणं अलाऊड नाही पण कर्बसाईड डिलीव्हरी किंवा होम डिलीव्हरी ऑप्शन्स आहेत. रस्त्यावर गाड्या फारशा दिसतच नाहीत. रोज रात्री ८ ते सकाळी ५ कर्फ्यू आहे. आयुष्य थोडं स्लो झालंय ते आत्तातरी आवडतं आहे. आठवड्यातून ३/४ वेळा बाहेर वॉकला जातो. त्यापलिकडे घराबाहेर पडण्म नाही. दूध, भाजी वगैरे ८/१० दिवसांतून एकदा.
इथेही कोरोनाग्रस्त लोकांची संख्या वाढते आहे. पण त्यातले किती बरे झाले वगैरे बातम्या अजून कळत नाहीयेत.

आमचे शेतातील गहू काढून तयार केलेला होता. पंधरा पोती गहू घरात आहेत. किराणा दोन अडीच हजार रुपयांचा घेऊन ठेवला आहे. कोहिनूर आटा चक्की एक वर्षापूर्वी विकत घेतली आहे. भाजीवाला रोज रिक्षा घेऊन दारावर येतोय. मेडिकल एक किलोमीटर अंतरावर आहे. घरी शेवग्याची झाडं आहेत. लिंबू आहे. वांगी मिरची सुध्दा घरचीच आहे. गायी पाळलेल्या असल्यानं दूधही घरचं आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे अजिबात टेन्शन आलं नाही. संध्याकाळी चालायला जाणे मात्र बंद पडलं आहे.

बातम्या बघून हातावर पोट असणाऱ्या लोकांचं खूप वाईट वाटतंय Sad ते लोक दिल्लीहून बिहार, UP मध्ये पायी चालत निघाले आहेत. कसे पोचणार ते.वाटेत हॉटेल चालू नाहीत.
अर्थव्यवस्था खूप मोठ्या संकटात आहे. कसं भरणार आहोत आपण हे नुकसान.
आणि पोलीस, इ.बिचारे कशा अवस्थेत duty करताहेत. त्यांचेही खाण्यापिण्याचे हाल होत असतील.
आपले डॉक्टर्स,सारखे त्या रुग्णांमध्ये राहून त्यांना कोरोना संसर्ग होतो आहे. बिचारे
आणि चीनचा खूप राग येतो आहे मला.

माझ्या घरापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर माझे आजोळ आहे . माझ्या आईने साधारण १५ वर्षांपूर्वी तिथे अक्कलकोट स्वामी समर्थांचा मठ स्थापन केलेला आहे. तिथे दर वर्षी स्वामी प्रगटदिन दणक्यात साजरा होतो. पालखी पण निघते. पाच सहाशे लोक जेऊन जातात.

आज मी पोलिसांच्या भीतीने जरा घाबरतच पटकन गाडीवर तिथे जाऊन आले तर मठात चिटपाखरूही नव्हते. एकटेच स्वामी शांत चेहऱ्याने बसले होते. पालखी तिथेच शेजारी उभी केली होती. एकदम कसतरीच वाटले. दरवर्षीचा उत्सव डोळ्यासमोर येत होता. काय करणार.. कालाय तस्मै नमः Sad

While everyone is in a panic about the coronavirus (officially renamed COVID-19 by the World Health Organization), there's an even deadlier virus many people are forgetting about: the flu.

Flu season is hitting its stride right now in the US. So far, the CDC has estimated (based on weekly influenza surveillance data) that at least 12,000 people have died from influenza between Oct. 1, 2019 through Feb. 1, 2020, and the number of deaths may be as high as 30,000. .
ह्या रिपोर्ट चा विचार केला तर corona ni मृत्यू येण्याचे प्रमाण कमी आहे

सूचीजी ना हेरि पोटर द्या

रूपांतरण रस पिला तरी आवाज बदलत नाही,

ह्यांचा आवाज परशु प्रांजपेचाच आहे

डोक्यात शेण भरलेले एकेक जन आहेत इकडं. परांजपेने तुम्हाला आईवरुन शिव्या दिल्या होत्या म्हणून तुम्हाला प्रत्येक आयडी तोच दिसतो का?

एक दम लॉक डाउन जाहीर केल्यावर एकदम धसका बसला व घाबरगुंडी उडाली होती. माझ्याघरी साठवणूकीचे असे अन्न धान्य फारसे नसते.
पण मग धीराने घ्यायचे ठरवले. काल दुकानातून कांदे बटा टे, जास्तीचा पास्ता वाल घेउन आले. उपलब्ध आहे माल पॅकेज्ड फूड उपलब्ध नाही.
पण भाज्या फळे आहेत उपलब्ध. माझी औष धे आहेत घरी. मग सध्या गप्प बसायचे ठरवले आहे. २१ दिवस म्हणजे ६३ मील्स त्यातले सहा मील
टाइम्स संपले. पुढे बघू.

बाकी हवा मस्त आहे इथे. कुत्रा दिवसातून दोन दा फिरवायला काही अडचण आली नाही अजून परेन्त. बिलिडिंग च्या बाहेर सोसायटीने चेक नाका बसवला आहे. आत येताना हँड सॅनिटायझर मस्ट आहे व टेंपरेचर घेउन फ्लॅट नंबर चेक नोंदून ठेवत आहेत. सुपरवायझर मराठीच आहे.
काल आम्ही करोनाच्या सीमेवर लढत आहोत . म्हटला. त्यांना दुरून विश करत आहे बाहेर पडल्यावर. लॉक डाउन संपल्यावर मी त्यांना
कॅ डबरीज देणार आहे.

स्वीगी वरून डिलिव्हरी चालू आहेत का? तुमचा कायअनुभवर?

छान

आमच्या फैमिली डॉक्टर नी क्लिनिक बंद ठेवलेले दिसले. कारण कळले नाही. जवळच्या 90 ft रोडवर सगळी दुकाने बंद. केमिस्ट सुद्धा.
जास्त दूरवर नको जायला म्हणून तसेच घरी आलो.

क्लिनिक बंद
फक्त केजुअल्टी व इमरजेंसी सुरु आहेत

कोर्टाने फोन , व्हाट्सअप वरुन उपचार करायला परमिशन दिली , असे ऐकले

क्लिनीक बंद ठेवण्याचे आदेश खरंच आहेत का ,की डॉ.स्वत:च क्लिनीक बंद ठेवत आहेत.आमच्या फँमिली डॉ.चे क्लिनीक पण बंदच आहे.

क्लिनीक बंद ठेवण्याचे आदेश खरंच आहेत का ,की डॉ.स्वत:च क्लिनीक बंद ठेवत आहेत.आमच्या फँमिली डॉ.चे क्लिनीक पण बंदच आहे.
>>>

उलट क्लिनिक उघडायचे आवाहब केले जातेय

आमच्याकडे घरुन काम नेहमीचं आहे त्यामुळे त्यात फरक नाही. ऑफीस जवळंच आहे तसंही. फक्त शाळा बंद झाल्याने कन्या खुष. पण मित्रमैत्रिणींबरोबर फोनवर सारख्याच गप्पा चालू. पहिल्या दिवशी दर तासाने स्वयंपाकघरात येऊन ‘काये खायला काये खायला’ हा प्रकार झाल्यावर , हे किती दिवस चालणार हे वाटुन खड्डा पडला पण दुसर्‍या दिवसापासुन ते थांबले. बाकी ठीक चालुये. जरा नवीन पदार्थ करत आहे.

कॉलनीत पोरं व पालकं सॉकर खेळत होती तेव्हा इतरांनी त्यांना शाब्दिक फटके दिले. त्यामानाने भारतीय बाहेर पडत नाहीयेत. शहाणी बाळं झालीत आमच्या गावात तरी. पोलीस आकाशात घिर्ट्या घालताहेत व कुठे गर्दी दिसली तर (१० हून जास्त) रागावत आहेत.

बातम्या पहाणे वाचणे कमी केले. निराश वाटतं.

सुनिधी काळजी करू नका. पूर्णपणे अलिप्त राहिले तर कोरोनाबाधित व्हायची शक्यता जवळपास शून्य आहे.

बाकी इकॉनॉमि खड्ड्यात जातेय वगैरे सगळे बरोबर आहे. जे नोकरी करताहेत ते सुपात आहेत, धंदेवाईक जात्यात गेलेत. असेच काही महिने चालले तर अजून वाईट परिस्थिती येणार. गेल्या दोन तीन दशकात सर्व प्रकारची भौतिक प्रगती अतिजलद गतीने होताना आपण पाहिलीय. त्या प्रगतीची फळे अनुभवली, भोगली. आता त्याची दुसरी बाजू समोर आलीय, तिलाही तसेच अनुभवायला हवे. निराश होऊन चालणार नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर कित्येक देशातील एक पिढी परत देश उभारण्यात कामाला आली. कोरोना संकट टळल्यावर आपल्या सर्वांनाच परत देश उभारायच्या कामाला लागावे लागणार, जो आपला देश असेल तो. आज जी मुले लहान आहेत, त्यांना हेही शिक्षण मिळणार, जे आपल्याला मिळाले नव्हते.

>> बातम्या पहाणे वाचणे कमी केले. निराश वाटतं.

गेले कित्येक महीने घरी टिव्ही बंद आहे. मुलाचा अभ्यास आणि इतर अनेक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक बंद केला आहे. फार फार क्वचित पाहणे होते. बातम्या आणि सिरियल्स तर अजिबात नाही. ज्या बातम्या कळणे आवश्यक आहे त्या आजकाल तशाही इकडून तिकडून कळतात. आता शेजारी पाजारी जेंव्हा टीव्ही (बातम्या आणि सिरियल्स) पाहणारे दिसतात तेंव्हा "कसे काय पाहत असतील" असा विचार मनात येतो.

साधना यांनी म्हणल्याप्रमाणे खरंच व्यवसाय करणारे जात्यात आहेत आणि नोकरी करणारे सुपात...माझ्याकडेही हीच परिस्थिती आहे...व्यवसाय बंद पडलाय..ह्या लॉक डाऊन नंतर जर कंपनीने एम्प्लॉइज कमी करायचे ठरवले तर त्यात आपला नंबर लागेल अशी भीती वाटायला लागली आहे.
दररोज वेगवेगळया बातम्या वाचायला मिळतात...काल वाचलं की हा आजार ऑगस्ट पर्यंत असाच राहणार...आज वाचलं की मे एंड पर्यंत सगळं नॉर्मल होईल....
काही कळेनासं झालंय...

आमच्याकडे पावसाळ्यात पूर आला होता. त्यातून सावरण्यात तीन ते चार महिने गेले. मंदी तर आहेच. व्यापार, उलाढाल सगळं बंद आहे. आता हे संकट गेल्यावर सावरायला वेळ तर लागणारच. फार विचार केला की निराश व्हायला होतं.

Pages