कोरोना चे तुमच्या जीवनावर परीणाम

Submitted by पाथफाईंडर on 24 March, 2020 - 02:39

सभ्य स्त्री पुरुष हो,

कोरोना नावाचे हे वादळ अचानकच आपल्या जीवनात आले. त्याचे आपल्या जीवनावर आत्तापर्यंत फार कमी प्रमाणात प्रभाव पडला आहे. अजून काय काय घडू शकते, याचा अंदाज घेण्यासाठी हा धागा.

( सक्तीच्या बंदीवासात बसून रिकामटेकडे पणा करण्यासाठी मजेशीर प्रतीसाद अपेक्षीत)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजारात पालेभाज्या, कोथिंबीर, पुदिना आहेत. हे कसे निर्जंतुक करून साठवायचे?
सुरवातीला फक्त फळभाज्या खायचे ठरवले होते. पण आता लॉकडाऊन वाढत चालला आहे तर किती काळ हिरव्या पाल्यावर बहिष्कार घालायच कळत नाही.
तसंच कच्च्या भाज्या जसे की काकडी, गाजर खावे की नाही? काय काळजी घ्यावी?

पालेभाज्या, कोथिंबीर नीट धुवून घेतोय, साध्याच पाण्यात दोन-तींन वेळेस. शिजताना होपेफुल्ली सगळं बॅड stuff clear out होत असेल अशी अपेक्षा आहे. काकडी-गाजर साबणाने धुता येईल की!

हा धागा बरेच दिवसांपासून वाचते आहे पण लिहायचे धाडस होत नव्हते. मायबोली वर मी नवीन नाही पण फारसे लिहीत नाही,फक्त आवडीने वाचते. पुण्याहून मी फेब्रुवारीमध्ये बे एरियात आले. आधी मी ८ वर्षे इथेच होते पण मागच्या वर्षांपासून पुण्यात गेले. मुलगा इथे नोकरी करतो. त्यावेळी महिनाभर इकडे तिकडे आरामात फिरले. खूप कमी पेशंट होते तेव्हा. मग मार्चच्या १० तारखेला LA ला मुलीकडे आले. ती UCLA ला शिकत आहे. graduation होते june मध्ये. पण आल्यावर ५ दिवसात lockdown झाला आणि इथेच तिच्या रूममध्ये अडकलेच. क्लास online झाले. बाकी graduation कॅन्सल . आता प्रवास करून परत बे एरियात जायची भीती वाटते आणि इंडियाला तर जुलै ऑगस्ट शिवाय जाता येईलसेही वाटत नाही. मुलीकडे खूप लिमिटेड वस्तू आहेत. मग इन्स्टंट पॉट, ब्लेंडर, २/३ भांडी ऑर्डर केली कारण आता सगळे घरीच करायचे होते. १५ दिवसांचा मेनू प्लॅन करतो व तशी ग्रोसरी आणतो. आल्यावर खूपदा हात धूते. ग्रोसरी पुसून घेतो. नॉन perishable वस्तूंना २ दिवस हात लावत नाही. काही आर्ट ऍक्टिव्हिटी करावी घरी काही सामानच आणले नाही. इथे वॉकला जाणे ही माझी आवडती ऍक्टिव्हिटी. पण आता घरीच आसने करते. नेटफ्लिक्स प्राइम चालू आहे पण कधी कधी खूप suffocate झाल्यासारखे फीलिंग येते. १५ june पर्यंत इथे लॉक डाऊन आहे. LA चा प्रचंड ट्रॅफिक, इथले भरभरून वाहणारे रेस्टॉरंट्स सगळे बंद झाले आहे.

मुलगी dentistry करते. तिची परीक्षा कशी होणार? एकूणच डेंटिस्टना यापूढे खूप challenges आहेत. हे संकट काबूत येईपर्यंत त्यांच्या सेटअपमध्ये कसे सोशल डिस्टंसिन्ग ठेवणार ? बघूया. आता ह्या जीवनाचीही सवय व्हायला लागली आहे. कधी कधी भीती वाटते की आता परत पूर्वीच्या ऍक्टिव्हिटीज करू शकेन का ह्या निवांत काही न करण्याचीच सवय लागेल ?

मस्त मगन walk सोडू नका... Walk करण्यात काय हरकत आहे?मी कोरोना सुरु झाल्यापासून सायकल वर 200 miles केले आतापर्यंत...

उदय, खुप वाईट वाटल त्या मुलीबद्दल आणि मलाही हेच प्रश्न पडतात. मला प्रत्यक्ष परिस्थिती माहित नाही आणि अमेरिकेत बसून बोलायला काय जात अस पण असु शकेल पण ह्या लोकांना चालत जाताना पहाणारे कुणीच लोक नसतील ? त्यांना त्यांची काहीच व्यवस्था करता येत नसेल का? कि सध्या तशी परिस्थितीच नाही ?
इथे राहून पंतप्रधान निधीला पैसे देण्याशिवाय काहीच करता येत नाही.

कोणी कोणी खायचा सोडा पाण्यात घालून त्या पाण्यात पालेभाज्या 10 मिनिटे ठेवून मग धुवून वापराव्या म्हणतात. पण मग साठवणुकीसाठी त्या कोरड्या कश्या करणार? कोथिंबीर पंख्यावर वाळवली.

Walk करण्यात काय हरकत आहे?मी कोरोना सुरु झाल्यापासून सायकल वर 200 miles केले आतापर्यंत....
.
वाह मस्तच च्रप्स.. पण मला मुलगी बाहेर जास्त जाऊ देत नाही काळजीमुळे. पण अपार्टमेंट्स च्या टेरेसवर जाते अर्धापाउण तास गोलगोल फेऱ्या. पण फिरण्याची मजा नाही येत त्यात.

दररोज फार तर अर्धा तास घरच्याघरी २ X ४ फुट जागेत चालण्याचाच व्यायाम करून पहिल्या आठवडयाभरात २ किलो आणि टोटल लॉक डाउन काळात ५ ते ६ किलो वजन कमी करणे (वयोगट ६०+) सहज शक्य आहे हे आमच्या घरच्या ज्ये ना मंडळीनी करून दाखवले. लॉक डाऊन पूर्वी रोज १ तास समुद्रकिनारी चालण्याची सवय होतीच घरात बसून बसून काय करता येईल ह्यावर हा एक तोडगा मिळाला आणि वर्क आउट झाला.

Two days back an acquaintance who was in hospital for 2 weeks for treatment passed away in Los Angeles. His wife and his children and their families could not be with him. We are not sure about what arrangements can be made for his funeral. We his friends are all distraught.

Pages