हात, जंतू, पाणी आणि साबण

Submitted by कुमार१ on 15 March, 2020 - 22:46

‘करोना’च्या जागतिक साथीमुळे वैयक्तिक स्वच्छतेबाबत बरीच चर्चा सर्वत्र होत आहे. रोगप्रसार कमी होण्याचे दृष्टीने त्याचे महत्व नक्कीच आहे. क्षणभर आपण ही साथ बाजूला ठेवू. कुठलाही संसर्गजन्य रोगप्रसार टाळण्याचे दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता ही कायम खूप महत्वाची आहे. त्यातील एकाच महत्वाच्या पैलूकडे या लेखाद्वारे लक्ष वेधत आहे आणि तो म्हणजे आपल्या हातांची स्वच्छता.

आपले हात शास्त्रीयदृष्ट्या स्वच्छ कसे करावेत यावर काही मूलभूत माहिती देत आहे. वरवर पाहता हा विषय सामान्यज्ञान किंवा शालेय पातळीवरचा वाटेल. पण वास्तव तसे नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य लोक ही क्रिया उरकून टाकल्यासारखी करतात. हात धुण्याची महत्वाची कृती ही कायम व्यवस्थित व्हावी या उद्देशाने काही सूचना करतो. आपणही आपापले अनुभव लिहा. ही चर्चा सर्वांसाठी आरोग्यदायी व्हावी ही इच्छा.
..........

१. हात धुण्यासाठीचे पाणी स्वच्छ आणि वाहते असावे. ते गार किंवा गरम याने फरक पडत नाही. फक्त हात जर तेलकट असतील तर गरम असल्याचा फायदा होतो.
२. धुण्याची क्रिया किमान २० सेकंद झाली पाहिजे. जरा आजूबाजूस निरीक्षण केल्यास असे दिसेल, की बरेच लोक हे काम ३-४ सेकंदात उरकतात, अगदी पाटी टाकल्यासारखे.

३. हात धुताना ते खरखरून घासले पाहिजेत.
४. बहुतेक लोक फक्त हाताचा तळवा वरवर धुतात. हात नीट धुताना तळहाताची खालची बाजू आणि हातांची मागची बाजू ही देखील नीट धुतली पाहिजे.

५. साबणाचा वापर : हा या प्रक्रियेतील कळीचा मुद्दा आहे. आता साबणाच्या वापराने काय फायदे होतात ते पाहू.

इथे एक मुद्दा स्पष्ट करतो. साबणाचा एक गुणधर्म म्हणजे तो surfactant असतो. आपण हातांनी विविध कामे करताना त्यांच्यावर कमी अधिक प्रमाणात मेदाचा थर जमा होतो. नुसत्या पाण्याने हात धुताना हा थर सहज निघून जात नाही. याचे कारण म्हणजे पाणी आणि मेद ही दोन एकमेकात न मिसळणारी माध्यमे आहेत. त्या दोघांच्या संपर्कात साबण सोडला की मग मात्र ‘इमल्शन’ तयार होते आणि परिणामी त्वचेवरील मेदाचा थर पाण्याबरोबर छान निघून जातो. आता हाताला लागून आलेले जीवजंतू आणि साबण यांचा संबंध पाहू. करोना आणि अन्य काही जंतू यांच्या पेशीभोवती मेदाचे आवरण असते. जेव्हा आपण साबणाने हात धुतो त्यावेळेस हे आवरण तोडले जाते. साबणाचा वापर करीत हात खसाखसा चोळले की हातावरचे काही जंतू फुटून जातात. त्वचेला साबण लावल्याने ती निसरडी होते आणि त्यामुळे तिथले जंतू पाण्याबरोबर वाहून जातात. साबणवापराचे असे हे फायदे आहेत.

६. आता कुठल्या प्रकारचा साबण वापरावा, हा पुढचा मुद्दा. साबणाचे साधारणपणे उपलब्ध असलेले दोन प्रकार म्हणजे वडी आणि द्रवसाबण. हे दोन्ही प्रकार वापरून काही संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्याबद्दल आता पाहू.
आपल्याकडे वडीचा वापर खूप होतो. अनेक जण लागोपाठ एकच वडी वापरतात तेव्हा ती सतत ओली राहते. त्यामुळे तिच्यावर धुणाऱ्याच्या हातातून आलेले जंतू राहू शकतात. मात्र हे जंतू पुढील हात धुणाऱ्याला ‘हस्तांतरित’ होत नाहीत असे आढळले आहे. त्यामुळे वडीबद्दल अकारण गैरसमज नको. फक्त एक काळजी सर्वांनी घ्यावी. एखाद्याने हात धुतल्यावर ती वडी पुरेशी कोरडी व्हावी. मग दुसऱ्याने तिचा वापर करावा. आपण वडीला हात लावण्यापूर्वी जर ती बुळबुळीत दिसली तर ती आधी पाण्याखाली धुवावी आणि मगच वापरावी.

द्रवसाबणाच्या वापराने अर्थातच वडीच्या तोट्यापासून सुटका होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्याचा वापर प्राधान्याने व्हावा.

७. हात धुवायला साबण की सॅनिटायझर , हा सध्याचा बहुचर्चित मुद्दा आहे. सॅनिटायझरमध्ये दोन प्रकार असतात – अल्कोहोलयुक्त आणि विरहित. अल्कोहोलयुक्त प्रकाराला जंतुनाशक गुणधर्म आहे. त्यासाठी त्यातील अल्कोहोलचे प्रमाण कमीत कमी ६२% असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारण जनतेसाठी साबणाने नीट हात धुणे हे पुरेसे आणि योग्य आहे. संसर्गजन्य रुग्णाशी जे लोक थेट संबंधित आहेत त्यांच्यासाठी सॅनिटायझरची शिफारस केली आहे. तसेच ज्या परिस्थितीत वाहते पाणी, साबण आणि हात धुण्याची जागा उपलब्ध नसतात, त्या वेळीही ते वापरावे.

८. हात धुऊन झाल्यावर ते कशाने पुसावेत? हाही एक महत्वाचा मुद्दा.

धुतलेले हात कोरडे करण्यासाठी दोन पर्याय आहेत – कापड व कागदी रुमाल. घरगुती वापरासाठी कापड योग्य वाटते. असे हात पुसायचे कापड रोज स्व‍च्छ धुवून उन्हात वाळवलेले असावे. ही काळजी बऱ्याच घरांत घेतली जात नाही.
कागदी रुमालाने हात कोरडे करण्यात अजून एक फायदा आहे. कागद त्वचेवर अगदी घासून फिरवता येतो आणि त्यामुळे पूर्ण कोरडा होतो. घासण्याच्या क्रियेने हातावरील उरलेसुरले जंतू निघून जातात. हे पाहता सार्वजनिक ठिकाणी कागदी रुमालाचा वापर योग्य वाटतो.

सारांश: हात कशानेही पुसले तरी ते अगदी कोरडे करणे महत्वाचे.

९. कोणत्या परिस्थितीत हात नीट धुणे अत्यावश्यक आहे? शौचालयातून बाहेर आल्यावर, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवणापूर्वी हात धुणे या मूलभूत गोष्टी आपण जाणतो आणि पाळतो. या व्यतिरिक्त काही मुद्द्यांचा उल्लेख आवश्यक वाटतो.

a. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास भेटण्याआधी आणि नंतर.
b. बाळांचे लंगोट बदलल्यानंतर
c. आपल्या तोंडापुढे हात धरून शिंकल्या वा खोकल्यानंतर
d. पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर
e. कचरा हाताळल्यानंतर.

जेवणापूर्वी हात धुण्याची सवय बहुतेक घरांत बहुतांश वेळा पाळली जाते. परंतु सार्वजनिक ठिकाणी मात्र बरेच लोक याचा आळस करताना दिसतात. जरा मंगल कार्यालये, उपाहारगृहे आणि प्रवासातील निरीक्षण करून पाहा. हे चित्र बिलकूल समाधानकारक नाही. बफेसाठी रांग लावण्यापूर्वी हात धुवून येणारे लोक अत्यल्प आहेत. काहींना या कृतीचा जाम आळस आहे तर काहींना त्यात कमीपणाही वाटतो ! “इथे काय चमच्यानेच तर खायचे आहे”, असा युक्तिवाद करणारेही आढळतात. पण जेवताना रोटी तोडणे आणि लिंबू पिळणे ही कामे तरी आपण हातानेच करतो, याचा त्यांना विसर पडतो.
प्रवासातील खाण्यादरम्यान तर हातांची स्वच्छंता हा विषयच अनेकांनी धाब्यावर बसवलेला दिसतो. यामध्ये जाणीवपूर्वक सुधारणा व्हायला हवी.

१०. सध्याच्या युगात आपण दिवसभर अनेकवेळा मोबाईल आणि कम्प्युटर हाताळतो. त्यामुळे मोबाईलचा पडदा आणि कम्प्युटरचा कीबोर्ड यांच्यावरही अगणित जंतू जमा होतात. या उपकरणांची योग्य ती स्व‍च्छता नियमित करावी. त्यात हलगर्जीपणा करू नये.

“हातांची नियमित स्व‍च्छता राखल्यास संसर्गजन्य रोग पसरणारच नाहीत का?” असा युक्तिवाद कधीकधी केला जातो. कुठल्याही रोगाचा १००% प्रतिबंध शक्य नाही हे बरोबर. परंतु काही मूलभूत स्वच्छता पाळल्यास रोगप्रसार रोखला जातो हे निःसंशय. म्हणूनच सामाजिक आरोग्याचे दृष्टीकोणातून हातांची स्व‍च्छता हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.
…….

समाजात काही भीषण रोगांची साथ आल्यानंतर वैयक्तिक स्व‍च्छतेचे मुद्दे खूप चर्चिले जातात. कालांतराने आपल्याला या सगळ्याचा विसर पडतो. व्यवस्थित हात धुण्याची सवय ही खरे तर कायमस्वरूपीच हवी. ही साधी गोष्ट वारंवार सांगायची आणि चर्चेला घ्यायची वेळ यायला नको. दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ‘जागतिक हातस्वच्छता दिवस’ म्हणून पाळला जातो. वास्तविक असा ‘दिन’ ठेवण्याची वेळ यावी हे खेदजनक आहे. सध्याच्या जागतिक साथीच्या निमित्ताने जगातील सर्वच नागरिक ही आरोग्यविषयक मूलभूत गोष्ट कायम आचरणात आणतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
*********************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुमार१,
खूप उपयोगी !!!!
Is there any study, research ...why virus impacting some region badly.....

सतीश,
धन्यवाद.

ज्या भागांत कोविद अधिक आढळला, तिथली सर्वसाधारण परिस्थिती अशी होती:
१. पहिला रुग्ण (संपर्कातून) लवकर निर्माण होणे
२. लोकसंख्येची दाट घनता

३. ज्येष्ठांची संख्या अधिक असणे आणि त्यांना आधीच एखादा मोठा आजार असणे
४. सामाजिक अंतर ठेवण्यास झालेला उशीर आणि हलगर्जीपणा

५. निदान चाचण्यांची सहज उपलब्धता, आणि
६. रुग्णांचे आकडे जाहीर करण्याची सक्षम यंत्रणा.

(अर्थात याला थोडे अपवाद असू शकतात).

कुमार१,

Thanks for prompt reply Happy

आज Public Domain information/data something missing.... वाटत.....
Developing country where no of infected person, deaths are maximum.......
Are there people so casual in nature?......

There healthcare system is much better than India.......

उदा.
जानेवारीत KEM ला गेलो होतो for my relative some paralysis related case.....Ward मद्ये परिस्थीती करिता मझ्याकडे शब्द नाही....
But the way doctor treat my relative...absolutely no word ....within 24 hour they give 80% recovery :)....

Hygiene, healthcare system in India we can't compare to USA,UK.....as per me....
But information n Numbers saying...something is missing.....

सतीश,
अजून त्या मुद्द्याचा पुरेसा अभ्यास व्हावा असे वाटते. तूर्त मला असे वाटते, की ‘त्यांच्याकडे’ :

१.सामाजिक अंतर ठेवण्यास झालेला उशीर आणि हलगर्जीपणा. सुरवातीची बेफिकिरी नडली असावी. याबाबाबत जर्मनी अधिक जागरूक असल्याचे बातम्या सांगतात.

२. विशिष्ट विषाणूविरोधी प्रतिकारशक्तीमध्ये वांशिक फरक असतात.

डॉक,
खूप छान माहिती व चर्चा.
>>>
म्हणूनच ती निर्माण होईपर्यंत संचारबंदीचे महत्व ! >>> +७८६
पण काही महाभागांना ते काळत नाही अजून..

नेहेमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण लेख! आवडला.
चर्चा ही संयत चालली आहे.

आताच एक बातमी वाचली - जगभरात नोव्हेंबरमध्ये करोनाची दुसरी लाट येणार?

याबद्दल काही सांगता येइल का? का हा एक फार्स असावा?

Herd immunity म्हणजे काय आहे सर, मला नक्की लक्षात आले नाही. बरीच लोक करोना होऊन बरी झाली तरी ती immunity त्यांच्या पुरती रहाणार ना, herd कशी काय immune होणार? का बर्या होणार्या रुग्णांचा plasma available आहे म्हणून हे ग्रुहीत धरले आहे.. की नैसर्गिकरित्या ती माणसात काही काळाने तयार होते ....का survival of the fittest ( अजून घरी रहाणे अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे म्हणून काही लोकांच्या जीवनाला तिलांजली )आणि immuno-compromised लोकांचे काय , where do they fall in this assumption?
फारच गोंधळ उडाला आहे. आणि आणखी एक प्रश्न करोनातून बरे झाल्यावर काही कायमस्वरूपी शारीरिक हाणी होते का ?
धन्यवाद Happy

योकु, धन्यवाद.

जगभरात नोव्हेंबरमध्ये करोनाची दुसरी लाट येणार?
>>>>>
तूर्त याबद्दल भाकीत करणे अवघड आहे. अधिकृत वैद्यकीय नियतकालिकात याबाबाबत अजून तरी चर्चा झाल्याचे वाचनात नाही.
बघू, नजर ठेवून राहू !

आदिश्री,
चांगला प्रश्न. आता सामूहिक (herd) प्र-शक्ती म्हणजे काय ते बघू.

एखाद्या समूहातील खूप लोकांमध्ये जेव्हा एखाद्या आजाराविरुद्ध प्र-शक्ती निर्माण होते, त्याला ‘सामूहिक (herd) प्र-शक्ती’ म्हणतात. ही २ प्रकारे निर्माण होते:

१. एखाद्या जंतूचा संसर्ग झाल्यानंतर
२. सामूहिक लसीकरण केल्यावर.

सध्या कोविद संदर्भात फक्त पहिलाच मुद्दा लागू आहे. गेल्या काही महिन्यात या विषाणूचे कोट्यावधी ‘कण’ वातावरणात आहेत. त्यामुळे ते आपल्या सर्वांच्याच शरीरात कमीअधिक प्रमाणात गेलेले आहेत. त्यापैकी काहींना लक्षणे आलीत, तर काहींना नाही.

जेव्हा हा विषाणू शरीरात जातो तेव्हा त्याचा प्रतिकार म्हणून शरीर antibodies तयार करते. यालाच आपण प्र-शक्ती निर्माण झाली असे म्हणतो. आताचा संसर्ग जबरदस्त आहे. त्यामुळे समाजातील खूप लोकांत कालांतराने करोना २ विरुद्धची प्र-शक्ती निर्माण होणार आहे. >>>> भविष्यात प्रत्यक्ष आजार कमी होत जाईल >>> नव्याने आजार होण्याची शक्यताही खूप कमी होते.

नंतर याचा फायदा समाजातील दुबळी प्र-शक्ती असलेल्या व्यक्तींनाही होतो.
.........

धन्यवाद कुमार सर, फार छान समजावून सांगितले तुम्ही...
म्हणजे जिथे जास्त रुग्ण आहेत, तिथे जास्त exposure मिळाले आहे असे म्हणता येईल का...Is that then directly proportional to the herd immunity?

>>>
धन्यवाद कुमार सर, फार छान समजावून सांगितले तुम्ही... >>> +११
एक शंका आहे. कोणत्याही नव्या रोगाची सामूहिक प्रतिकारशक्ती साधारण किती दिवसांत येते ?

कोणत्याही नव्या रोगाची सामूहिक प्रतिकारशक्ती साधारण किती दिवसांत येते ?
>>>>>>
याचे एकच एक उत्तर नाही. नव्या आजाराच्या स्वरूपानुसार तो कालावधी ठरतो. मुख्य म्हणजे तो आजार समाजात किती झपाट्याने फैलावतो, यावर ते अवलंबून असते.

कोविद१९ बाबत सध्या तरी कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. बरेच महिने लागतील असे वाटते.

कुमार सर,
++++
तुम्ही खूप समजवत आहात...... Pls keep going....

आम्हाला इतके ( मुलभूत ) Dr नाही विचारता येत....hmm...
( शाळेत Dr n Chemist ल माहिती विचार्न्याबाबत एक English मध्ये lesson होता.... पण ते मी आतापर्यत एकदाही विचरू शकलो नाही)

आज लोकसत्तात वाचनीय आले...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-lockdown-dr-raman-...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-dr-raman-gangakhed...

गेल्या काही महिन्यात या विषाणूचे कोट्यावधी ‘कण’ वातावरणात आहेत. त्यामुळे ते आपल्या सर्वांच्याच शरीरात कमीअधिक प्रमाणात गेलेले आहेत. त्यापैकी काहींना लक्षणे आलीत, तर काहींना नाही. जेव्हा हा विषाणू शरीरात जातो तेव्हा त्याचा प्रतिकार म्हणून शरीर antibodies तयार करते. यालाच आपण प्र-शक्ती निर्माण झाली असे म्हणतो. आताचा संसर्ग जबरदस्त आहे. त्यामुळे समाजातील खूप लोकांत कालांतराने करोना २ विरुद्धची प्र-शक्ती निर्माण होणार आहे.>> फार गोंधळात टाकणारं विवेचन आहे. याचा अर्थ आपल्या सगळ्यांना किंवा बहुसंख्यांना कोरोना (व्हर्जन वन) झाला आहे? तो होऊ नये म्हणूनच लॉकडाऊ केले आहे ना? कोट्यवधी कण वातावरणात आहेत म्हणजे? हवा सोडून इतरत्र?

फिल्मी,
१. वातावरणातील विषाणू सर्वांच्याच शरीरात जातात. पण हे प्रमाण सूक्ष्म असल्याने प्रत्येकाला आजार होत नाही.

२. पण ज्याची प्र-शक्ती कमी पडते, त्याला आजार होतो आणि त्याच्या शरीरात विषाणू प्रचंड फोफावतो.

३. आता समजा, सर्वांचा संचार चालूच ठेवला तर निरोगी माणसे (लक्षणे नसलेली) एखाद्या आजारी व्यक्तीच्या निकट संपर्कात येतील. त्यातून त्यांना विषाणूचा ‘मोठा डोस’ मिळू शकेल >>> समाजात आजार वाढत जाईल.

४. मर्यादित संचार ठेवून आपल्या सर्वांच्याच शरीरात सूक्ष्म डोस जात असल्यानेच कालांतराने सामूहिक प्र-शक्ती निर्माण होईल.

बाहेरून आल्यावर कपडे बदलायला हवेत का? चपला बूट यातून कोव्हिडं चे विषाणू येतील का?
दाढी केस यातून संसर्ग होईल का अशा साध्या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ व्यक्तींकडून

Is the virus on my clothes? My shoes? My hair? My mail?
https://mybs.in/2YMT4kj

आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवायची अशा प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञ व्यक्तींकडून

Get enough protein, focus on vitamins, minerals to boost your immunity
https://mybs.in/2YMT4kV

डॉक्टर खरे, वरील लिंक वाचल्यावर संभ्रम वाढला. त्यात कपडे, केस यातून संसर्ग होणार नाही म्हणतात, पण सरकारने दिलेल्या सूचनेनुसार बाहेर जाताना डोके झाकणे तसेच घरी आल्यावर लगेच शरीर व कपडे साबणाने धुणे अनिवार्य आहे ना ?

कोणती सरकारी सूचना ज्यात बाहेर जाताना डोकं झाकलं पाहिजे असे सुचवलंय?

मी तरी असं कुठेही वाचलेलं नाही.

हो डॉक्टर, मी शोधलं पण डोके झाकण्याबद्दल सूचना नाही मिळाली.
नंतर आठवलं की एक फॉरवर्डेड मराठी व्हिडीओ पाहिला होता ज्यात दोन बायकांनी तोंड व डोके झाकले जाईल अशा प्रकारे ओढणी कशी बांधावी याचे प्रात्यक्षिक दाखवून घराबाहेर पडताना त्याप्रमाणे करण्यासाठी सांगितले.

हातांच्या स्वच्छते साठी कुठल्या प्रकारचा साबण वापरावा यासंबंधी एक उपयुक्त लेख इथे आहे :

https://elemental.medium.com/are-antibacterial-soaps-more-effective-than...

साधारणपणे असा समज असतो की, जंतुनाशक द्रव्य घातलेला साबण अधिक उपयुक्त असतो. परंतु काही अभ्यासांत असे दिसले आहे, की हे साबण आणि सामान्य साबण यांच्या उपयुक्ततेत फारसा परक आढळून आला नाही.

हात नीट चोळून घासणे हे हे अधिक महत्वाचे.

हे सायलेंट कॅरिअर नक्की काय प्रकार आहे?
म्हणजे एखादया सा .कॅ.ला कोरोना होऊन गेला तरी त्रास होत नाही का?
स.कॅ. फक्त पसरवण्याचे काम करतो पण त्याला स्वतः ला काही त्रास होत नाही,असे असते का?

स.कॅ. फक्त पसरवण्याचे काम करतो पण त्याला स्वतः ला काही त्रास होत नाही,असे असते का? >>> होय.

त्याला संसर्ग झालेला असतो पण त्या रोगाची कुठलीच लक्षणे नसतात.
म्हणून,
हे लोक समाजात आजार अधिक पसरवतात. (प्रत्यक्ष रुग्णाचे आपण लगेच विलगीकरण करतो).

त्याला संसर्ग झालेला असतो पण त्या रोगाची कुठलीच लक्षणे नसतात.>>>>>म्हणजे त्याला संसर्ग होतो आणि त्यातून तो आपोआप बरा होतो कोणताही त्रास न होता
असेच का?

आदू,

लक्षणे नसलेल्या Carrier च्या शरीरात ते जंतू असतात पण त्याला “आजार” होत नाही. त्यामुळे तो ‘बरा’ होण्याचा प्रश्नच नाही ! तो सतत (त्याच्या दृष्टीने) ‘बरा’च असतो .

काही आजारांची carrier अवस्था कायम देखील असू शकते.

आय विश, काही इम्यूनीटी टेस्टर असले असते. आपण carrier होऊ शकतो , की पेशन्ट , फुल इम्यूनीटी नो carrying no symptom , पेशंट झालो तर आजाराची तीव्रता कशी राहील. हे सगळे बघता आले असते. किमान लस येईपर्यंत आपल्याला काही तरी अंदाज बांधता आला असता.

Pages